Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स, एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यासह देशात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडत आहेत.
भाजपच्या प्रत्येक मंत्र्यांकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीच्या एका स्वीय सहाय्यकाची नेमणूक होणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील काही प्रश्न असतात, अशातच ती कामं मार्गी लावण्यासाठी नेमणूक केली जाणार
आदिवासी भागातील प्रश्न आणि ग्रामीण भागातील प्रश्न सोडवण्यासंदर्भात संघ आणि भाजपचं पाऊल
दरम्यान, याआधी देखील भाजपकडून मंत्र्यांकडे संघ विचारणीचे स्वीय सहाय्यक नेमणूक करण्यात आल्या होत्या
भाजप आणि संघ परिवारातील कामांसंदर्भात समन्वय राहावा यासाठी पुढाकार
अमरावती : येथील 41 हजार संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. संत्रा गळतीची 134 कोटीची मदत अखेर जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टी आणि बुरशीजन्य रोगामुळे फळपिकांची 60 टक्के गळती झाली होती. निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार वरुड-मोर्शी दौऱ्यावर असताना माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी अजित पवार यांच्यासह शेतात जाऊन संत्र्यांची पाहणी केली होती. यावेळी संत्राला नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे अजित पवार यांनी आश्वासन दिले होते. आता अजित पवार यांनी आश्वासन पूर्ण केल्याने संत्रा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र भुयार यांचे संत्रा उत्पादकांनी आभार मानले आहेत.
बीड : बनावट नोटांची छपाई करून चलनात आणणाऱ्या टोळीविरुद्ध मकोका लावण्याची तयारी सुरू झाली आहे. बीड शहरात तीन महिन्यांपूर्वी बनावट नोटा छापाई करणारी गँग उघडकीस आली होती. छपाई करणाऱ्या मुख्य आरोपी मनीष क्षीरसागरला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत आरोपाची चौकशी करताना पोलिसांना हे रॅकेट अट्टल गुंड असलेली आठवले गँग चालवत असल्याचे पुरावे त्यासंबंधीचे धागेदोरे मिळाले. या वरून बीड शहर पोलिसांनी अक्षय आठवले आणि ओमकार सवई यांना देखील अटक केली. यावेळी मनीष क्षीरसागर बनावट नोटा छापायचा कारखाना कशा पद्धतीने चालविला जात होता. त्या नोटा बाजारात चलनात आणले जात होते. याचे सर्व पुरावे दिले आहेत. बनावट नोटा छपाई करणारे संघटित गुन्हेगार असल्याने त्यांच्यावर मकोका लावण्यासाठी संबंधित पोलीस महासंचालकांकडे प्रस्ताव पाठविल्याचे समजते. एक ते दोन दिवसात या प्रस्तावास महासंचालक मान्यता देण्याची शक्यता आहे.
अंबाजोगाईत सायरनमुळे फसला चोरीचा प्रयत्न
अंबाजोगाईतील दुर्गानगर येथे चोरीच्या उद्देशाने पाच चोरटे आलेले असता फसला प्रयत्न
कॉलनीतील सीसीटीव्हीचा सायरन वाजल्याने चोरटे पसार झाले
गुरुवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास घटना घडली.
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आतापर्यंत सात मृतांचे शवविच्छेदन झाले आहे. या सर्व मृतदेहांवर रासायनिक प्रक्रिया करून मृतदेह पोलिसांच्या स्वाधीन केले जातील आणि त्यानंतर ते नातेवाईकांना सुपूर्द केले जाणार आहे. हे मृतदेह दूरचे असल्याने जवळपास पाच ते सहा दिवस त्यांच्या गावी जाण्यासाठी लागू शकतात. त्यामुळे सर्व मृतदेहांवर रासायनिक प्रक्रिया करूनच मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात येतील, अशी माहिती जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.
रायगडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता.
ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप भाजपच्या वाटेवर.
लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती पक्ष प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती.
ठाकरे गटाची ताकद महाड विधानसभा मतदार संघात कमी झाल्याने जगताप मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत.
येत्या 15 फेब्रुवारीला पक्ष प्रवेश करणार असल्याची राजकिय वर्तुळात चर्चा.
स्नेहल जगताप या काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या.
तर महाड महानगर परिषदेच्या त्यांनी नगराध्यक्षा म्हणून मागील पाच वर्ष काँगेस मधून कामकाज पाहिलंय.
चंद्रपूर : ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वनहक्क-बांबू संवर्धन व कौशल्य विकास क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे मोहन हिराबाई हिरालाल यांचं नागपुरात निधन झाले आहे.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील परांडा गावातून एक सात वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती .. प्रांजली कदम ही मुलगी शाळेतून घरी आली , नंतर खेळायला गेली होती . 20 जानेवारी रोजी सायंकाळ पासुन ती बेपत्ता झाली . तक्रार आल्यानंतर पोलीसांनी शोध सुरु केला . गावात प्रतेक घराची तपासणी करण्यात आली .. काल रात्री ती मुलगी गावातील एका घरात सापडली . एका वृद्ध महिलेने तीला दोन दिवस घरात डांबून ठेवले . बाहेर पोलीस आहेत तुझं अपहरण करतील अशी भिती दाखवली होती .. दरम्यान मुलगी सुखरूप आहे . या प्रकरणी पोलीसानी तिन संशयीताना ताब्यात घेतले . मुलीला डांबून ठेण्यामाघे त्यांचा काय हेतू होता याचा तपास सुरु आहे.
किल्ले रायगडावरील संवर्धनाच्या कामाची छत्रपती संभाजी राजेंकडून पाहणी
किल्ले रायगडावर हिरकणी बुरुज, श्रीगोंदा तलाव, आणि नाणे दरवाजा संवर्धनाचे पुनर्बांधणीचे काम युद्ध पातळीवर सूरु.
संवर्धन करताना आढळून आलेल्या पाण्याच्या प्राचीन टाकीतून गाळ काढण्याच्या कामाला सुध्दा गती.
नाणेदरवाजा साठी लागणारे मोठ मोठाले दगड बसवण्यावे काम सुरू असून हे काम लवकरच पुर्ण होणारं असल्याची छत्रपती संभाजी राजेंची माहिती
गारगोटीमध्ये भर वस्तीत असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या जागेची विक्री
खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला थांगपत्ताच नाही
खाजगी मालकाने विकली आणि महसूल विभागाने ही तत्परतेने सातबारा करून दिला
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मालकी अधिकारांत नाव मात्र खरेदी करताना कोणतीच नोटीस नाही
बांधकाम व्यवसायिक सयाजी देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला जागा खाली करण्यासंदर्भात पाठवली नोटीस
वसंतदादा शुगर इनस्टीट्युटची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभ आज पार पडतोय. साडे दहा वाजता या कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. त्या आधी विश्वस्त मंडळाची ९ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला संस्थेचे अध्यक्ष शरद पवार , उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील , संस्थेचे विश्वस्त अजित पवार, हर्षवर्धन पाटील , जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार आहेत.
वसंतदादा शुगर इनस्टीट्युटची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभ आज पार पडतोय. साडे दहा वाजता या कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. त्या आधी विश्वस्त मंडळाची ९ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला संस्थेचे अध्यक्ष शरद पवार , उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील , संस्थेचे विश्वस्त अजित पवार, हर्षवर्धन पाटील , जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार आहेत.
बीडच्या आष्टी तालुक्यातील वाहिरा येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आलीय. आतापर्यंत या प्रकरणात सात आरोपींना अटक झालीय. आष्टी तालुक्यातील अंभोरा ठाणे हद्दीतील वाहिरा येथे १७ जानेवारी रोजी रात्री हातोळण येथील तीन सख्ख्या भावांवर दहा जणांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात आजिनाथ भोसले, भरत भोसले या दोन भावांचा जागीच मृत्यू झाला होता. तर तिसरा भाऊ कृष्णा भोसले गंभीर जखमी झाला होता.
अहिल्यानगर शहरात 100 वे अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. तब्बल 22 वर्षांनंतर अहिल्यानगरला नाट्यसंमेलन भरवण्याचा मान मिळाला आहे. 27 जानेवारीपर्यंत होणाऱ्या या नाट्यसंमेलनात बाल महोत्सव, बाल नाट्य, व्यावसायिक नाटिका, एकांकिका, "नाटक समजून घेतांना" या शिर्षकाखालील परिसंवाद , भव्य नाट्य दिंडी अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी नगरकरांसाठी असणार आहे. या नाट्य संमेलनासाठी मंत्री उदय सामंत, आशिष शेलार, सिने नाट्य कलाकार वैभव मांगले, प्रशांत दामले, विशाखा सुभेदार यांच्यासह अनेक कलाकारांची उपस्थिती असणार आहे.
गेल्या काही वर्षात राज्यातील विविध भागात बिबट्यांची दहशत आणि त्यातून होणाऱ्या हल्ले वाढले आहेत. महाराष्ट्रात सद्यस्थितीत 4 हजार 800 च्या जवळपास बिबटे असल्याची नोंद वन्यजीव विभागाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे बिबट्यांच्या संख्येत दोन वर्षात जवळपास 500 ने भर पडली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत जंगली भागात आढळून येणारे बिबट्या शहरी वस्तीत देखील आढळून येत आहे. त्यामुळे संध्या वाढत असल्याने बिबट्यांचे नियंत्रण हाताबाहेर जात असल्याचे वास्तव आहे.
आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईतील विविध ठिकाणी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये मांडलेले विचार, त्यांच्या भूमिका त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांची गाजलेले वक्तव्य याची पोस्टर्स मुंबईत सर्वात लावण्यात आले आहे... शिवसेना राज्य संघटक अखिल चित्रे यांच्याकडून हे पोस्टर्स सर्वत्र लावण्यात आली आहे.
पालघरच्या डहाणू येथील समुद्रकिनाऱ्यावर 31 जानेवारी आणि एक दोन फेब्रुवारी असं सलग तीन दिवस डहाणू फेस्टिवलच आयोजन करण्यात आल आहे . डहाणू सह पालघर मधील ग्रामीण भागातील खाद्य पदार्थांची ओळख निर्माण व्हावी तसच येथील पर्यटनाला चालना मिळावी म्हणून मागील तीन वर्षांपासून डहाणू नगरपरिषदे कडून डहाणू फेस्टिवलचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी तीन दिवसात तीन लाख लोक या डहाणू फेस्टिवलला भेट देतील असा विश्वास डहाणू नगर परिषदेकडून व्यक्त करण्यात आला आहे . डहाणू सह पालघर मधील खाद्यपदार्थ , बचत गटांकडून तयार केल्या जाणाऱ्या हस्तकला वस्तू यांचे स्टॉल्स या डहाणू फेस्टिवल मध्ये लावले जाणार असून या फेस्टिवल मुळे स्थानिकांना रोजगार वाढीत मदत होईल असा विश्वास देखील यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशभर गाजत असलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या मुद्यावरून आता प्रशासन देखील आलर्ट झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण उशिरा जन्म मृत्यू प्रमाणपत्र देण्याबाबतच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्याने, यापुढे उपविभागीय - अधिकारी यांनी जन्म मृत्यू प्रमाणपत्र पुढील आदेश येईपर्यंत वितरित करू नये, असे स्पष्ट आदेश शासनाने जारी केले आहेत.
नाशिकच्या कळवण तालूक्याच्या दौ-यावर असतांना शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी अचानक देवळा तालूक्यातील विद्यानिकेतन शाळेला भेट दिली..अचानक आलेल्या मंत्र्यांचा शाळेतील शिक्षकांनी सत्कार केला तर मंत्री भुसे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शिक्षकांनी काय शिकवले याची माहिती घेत विद्यार्थ्यां कडून पुस्तकातील पाठ म्हणावयास सांगितले..सुमारे १ तास भुसे यांनी देवळा तालूक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना भेट दिली.
पुणे
उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांचा सर्किट हाऊसमध्ये सकाळपासून बैठकांचा धडाका सुरु
पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच सर्किट हाऊसमध्ये बैठका घेत आहे
पीडब्लूडी आणि मेट्रो संदर्भात बैठक सुरु असल्याची माहिती
पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरुच
पुण्यातील बी टी कवडे रोड परिसरात टोळक्याकडून १५ ते २० गाड्यांची तोडफोड
रात्री पावणे नऊच्या सुमारास घटना घडली
दारूच्या नशेत धिंगाणा करत केली गड्यांची तोडफोड
आरोपींना पोलिसांनी कोंढवा पोलिसांनी घेतले ताब्यात
दारूच्या नशेत ३ तरुणांनी भर रस्त्यात घातला राडा
हॉटेलमध्ये जाऊन सुद्धा तोडफोड केल्याची माहिती
तोडफोडीत गाड्यांचे मोठे नुकसान
टेम्पो, रिक्षा, चार चाकी असे अनेक वाहनांचे नुकसान
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला
रुग्णांची संख्या २२ वरून थेट ५९ वर
दोन दिवसात संख्या दुपटीने वाढली
३८ पुरुष तर २१ महिलांना जीबीएसची बाधा
१२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यातील विविध हॉस्पिटलमध्ये त्यांचेवर उपचार सुरू
पुणे महापालिकेचं शीघ्र कृती दल अलर्ट मोडवर
किरकिटवाडी, सिंहगड रस्ता आणि धायरी परिसरात सर्वाधिक रुग्ण
या परिसरातले पाण्याचे नमुने महापालिकेकडून तपासले जात आहेत
दुर्मिळ आजार असला तरी नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं तज्ज्ञांच मत
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News Live Updates: जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ काल (22 जानेवारी) भीषण अपघात झाला. यामध्ये 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघाताबाबत आता विविध माहिती समोर येत आहे. तसेच आज हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिन आहे. राज्यासह देशात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -