Maharashtra Breaking LIVE Updates: दोन मागण्या मान्य, आंदोलन फक्त स्थगित, अद्याप आंदोलन संपलेलं नाही- लक्ष्मण हाके
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
शासनाने आमच्या दोन मागण्या मान्य केलेल्या नाहीत. सगेसोयरे याबाबतचा अध्यादेश अद्याप यायचा आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होईल. त्याशिवाय आम्ही सगेसोयरे याबाबतीत आम्ही अध्यादेश काढणार नाही. खोटे कुणबी प्रमाणपत्रे देणाऱ्यांवर तसेच घेणाऱ्यांवर कारवाई करू, असे सरकारने आश्वासन दिलं आहे. पण आम्हाला जोपर्यंत आम्हाला याबाबत श्वेतपत्रिका मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय. हे आंदोलन संपलेलं नाही.
पुणे : पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी केला रास्ता रोको
रास्ता रोको करत विद्यार्थ्यांनी केलं आक्रमक आंदोलन
गेल्या सहा दिवसांपासून पोलीस विद्यार्थी करत आहेत आंदोलन
प्रशासनाला जाग येत नसल्याने विद्यार्थ्यांनी केला रस्ता रोको
वय वाढवून द्यावं आणि पावसाळ्यात पोलीस भारतीसाठीची मैदानी चाचणी पुढे ढकलावी यासाठी हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत
अजित पवारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत जावं, असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलं आहे. अकोला येथे 'एबीपी माझा'शी साधलेल्या 'एक्सक्लूझिव्ह' संवादादरम्यान त्यांनी ही मागणी केलीय. दरम्यान, हे आपलं वैयक्तिक मत असलं तरी पक्षानं यावर विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महायुतीत अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे. काहीही करून त्यांनी महायुती सोडावी यासाठी दोन्ही मित्र पक्षातील काही लोक प्रयत्न करीत असल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे. यासाठी काही लोक मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केलाय.
कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार गटाला एकाच आठवड्यात दुसरा धक्का
अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर
विधानसभेला महाविकास आघाडीची उमेदवारी मलाच, कार्यकर्त्यांनो कामाला लागा- ए वाय पाटील
राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ए वाय पाटील यांची घोषणा
विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीकडून लढण्यावर ए वाय पाटील ठाम
महाविकास आघाडीत येण्यासाठी के पी पाटील आणि ए वाय पाटील यांच्यात चढाओढ
विधानसभेला महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी दोघेही इच्छुक
नातेवाईक असूनही ए वाय पाटील आणि के पी पाटील यांच्यामध्ये राजकीय वैर
विधान परिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी
भाजप प्रदेशकडे आतापर्यंत 35 जणांनी केले अर्ज
भाजपचे पाच उमेदवार निवडून येतील इतकी मते भाजपकडे आहेत पण भाजपकडे आतापर्यंत 35 इच्छुकांनी अर्ज केले
भाजप प्रदेशकडे आलेल्या अर्जावर पुन्हा एकदा कोअर कमिटी बैठकीत चर्चा होणार
कोअर कमिटी बैठकीत चर्चा झाल्यानंतर यादी दिल्लीला पाठवली जाणार
भौगोलिक, सामाजिक समिकरण निकषावरच दिली जाणार उमेदवारी
संघटनेतील सक्रिय पदाधिकाऱ्यांची भाजप प्रदेश कडे मागणी
अहमनगर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात
सोलापूर-पुणे -कल्याण बायपासवर झाला अपघात
तीन वाहनांचा भीषण अपघातात दोन जण ठार तर दोन गंभीर जखमी
बायपासवर ट्रेलर आणि ट्रकचा समोरासमोर अपघात
अपघातग्रस्त ट्रेलरला एक कारही मागून धडकली
ट्रेलर आणि ट्रकच्या दोन्ही ड्रायव्हरचा जागीच मृत्यू
तर कार मधील दोघे जण गंभीर जखमी
जखमींना अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल
अपघातामुळे बायपास रोडवर वाहतुकीची कोंडी; पोलीस घटनास्थळी दाखल
सोलापुरात भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळ
भाजपाचे खासदार आणि सोलापूर निरीक्षक धनंजय महाडिक यांच्यासमोर झाला गोंधळ
खासदार धनंजय महाडिक यांची सत्ता असेलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी भाजपविरोधात काम केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप
मात्र जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी कार्यकर्त्यांना थांबवत वैयक्तिक म्हणणे मांडण्याची केली सूचना
लोकसभेच्या पराभवाचे चिंतन करण्यासाठी आयोजित करण्यात आली बैठक
लोकसभेतील पराभवानंतर पहिल्यांदाच होतेय बैठक
दरम्यान गोंधळ सुरू होताच माध्यम प्रतिनिधींना बाहेर थांबवण्यात आले
गोंधळानंतर बंद दाराआड बैठक सुरू
दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर आता राज्यातील शेतकऱ्यांवर पाणीपट्टीचं संकट
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शेतीच्या पाणीपट्टीत 20 टक्के वाढ केलीय
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने 29 मार्च 2022 रोजी जलदराचे पुनर्विलोकन व सुधारणा करण्याच्या उद्देशाने एक अध्यादेश जारी केलाय...
20 टक्के दरवाढ ही बागायतदार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे
राज्यात ऊस आणि केळीसह बारमाही पिकांच्या क्षेत्राला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे
एक जुलै 2023 ते 30 जून 2024 या जलवर्षासाठी 10 टक्के दरवाढ केली होती
आता 1 जुलै 2024 ते 30 जून 2025पर्यंत 20 टक्के दरवाढ राहणार आहे
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दंड
सुनावणीला सतत गैरहजर राहिल्यानं ठोठावला 3 हजार रुपयांचा दंड
महाविकास आघाडी सरकीरच्या काळात कोरोनाकाळात वीज दरवाढीविरुद्ध भाजपनं केलं होतं आंदोलन
या आंदोलनात बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण केल्याचाही आरोप
भाजपच्या 20 पदाधिकाऱ्यांविरुद्ध मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे खटला
8 जुलैच्या पुढील सुनावणीला हजर राहण्याचे कोर्टाकडून आदेश जारी
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात मोठा खुलासा.
होर्डिंगची परवानगी देणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याच्या अडचणीत वाढ होणार
होर्डिंगची परवानगी मिळाल्यानंतर त्या बदल्यात 10 वेगवेगळ्या बँक अकाऊंटमध्ये 46 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचं समोर
हे 46 लाख रुपये जरी 10 वेगवेगळ्या बँक अकाउंटमध्ये टाकले असले तरी ते एकाच व्यक्तीने घेतल्याचं समोर
पैसे घेणारी अर्शद खान ही व्यक्ती कैसर खालीद यांच्या पत्नीच्या गारमेंट कंपनीत डायरेक्टर पदावर.
कैसर खालिद यांची पत्नी सुम्मना खालीद यांच्यासोबत महापरा गारमेंट्स कंपनीत अर्शद खान डायरेक्टर आहे.
या 46 लाखांची पोलीस चौकशी करत असून या प्रकरणात खालिद यांच्या चौकशीची शक्यता आहे
छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग
भुजबळ यांच्यासमवेत 12 जण लक्ष्मण हाके यांच्या भेटीला येणार
लक्ष्मण हाके यांना भेटण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत येणारे नेते आणि अधिकारी
मंत्री छगन भुजबळ
मंत्री उदय सामंत
मंत्री गिरीश महाजन
मंत्री अतुल सावे
मंत्री धनंजय मुंडे
गोपीचंद पडळकर
समीर भुजबळ
प्रकाश शेंडगे
शब्बीर अन्सारी
संतोष गायकवाड
प्रशांत जोशी
अजय पाटणे
पुणे ब्रेक
शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभेसाठी सज्ज
विधानसभेची रणनीती ठरली, कालच्या बैठकीत दिल्या जबाबदाऱ्या वाटून
प्रत्येक खासदाराला त्यांच्या मतदारसंघात विधानसभा जबाबदारी
अमोल कोल्हे यांना महाराष्ट्र शिव स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून प्रचार करण्याची जबाबदारी
अनिल देशमुख यांना विदर्भाची जबाबदारी, तर राजेश टोपे यांना मराठवाड्याची जबाबदारी
सुप्रिया सुळे राज्यभर महिलांचे मेळावा घेणार
पालघर - काल दिवसभराच्या विश्रांतीनंतर आज पालघरमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू
मागील तसाभरापासून पालघर, बोईसर परिसरात मुसळधार पाऊस सुरू
भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसामुळे मोठा दिलासा
शेतकऱ्यांची शेतीच्या कामाची लगबग सुरू
अभिनेता अनुपम खेर यांच्या कार्यालयातील चोरी प्रकरणात दोघांना अटक
माजिद शेख आणि मोहम्मद दलेर बहरीम खान या दोघांना खेर यांच्या कार्यालयात चोरी प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे
या चोरीची माहिती अनुपम खेर यांनी 'एक्स'वर पोस्ट करून दिली होती.
या प्रकरणी खेर यांच्यातर्फे दिलेल्या तक्रारीनुसार अंबोली पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.
वरळीत मनसे विरुद्ध आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेची पोस्टरबाजी
आदित्य ठाकरेंना विधानसभेत पाडण्याची भाषा
मनसे कार्यकर्ता हर्षल खरात यांनी लावले बॅनर
विधानसभेसाठी संदीप देशपांडेंना जिंकवण्याचा निर्धार
चंद्रकांत पाटलांच्या त्या घोषणेवर खासदार फोजिया खान यांची टीका
तर परभणी आणि लातूरमधील विद्यार्थिनींची आत्महत्या झाली नसती
मुलींना मोफत शिक्षणाची घोषणा काय करता अंमलबजावणी करा
चंद्रकांत पाटलांच्या त्या घोषणेवर खासदार फोजिया खान यांची टीका
राष्ट्रवादी करणार राज्यभरात आंदोलन
संतश्रेष्ठ निवृत्ती नाथ महाराजांची पालखी थोड्या वेळात नाशिकमध्ये पोहचणार
पंचायत समितीच्या आवारात पालखीचे स्वागत होणार
दुसऱ्या मुक्कामानंतर पालखी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झाली
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके हे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत
दुपारी बारा वाजता ही भेट होणार आहे.
- नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्यानं आरोप प्रत्यारोपांना सुरवात
महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्यावर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचे गंभीर आरोप
- शिक्षक मतदारसंघात अनेक बोगस मतदारांची नोंदणी झाल्याचा आरोप
- किशोर दराडे यांच्या संस्थेच्या माध्यमातून बोगस मतदारांची नोंदणी झाल्याचा आरोप
- नाशिक शिक्षक मातदारसंघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात
- महायुतीचे (शिवसेना शिंदे गट ) उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार बैठक
- नाशिक,शिर्डी आणि जळगावमध्ये घेणार बैठक
अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा आरिफ भाईजान याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असताना आरिफच्या छातीत अचानक दुखू लागलं होतं.
पोलिसांनी त्याला उपचारासाठी जे. जे रुग्णालयात दाखल केलं.
मात्र, उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
गँगस्टर दाऊद इब्राहिमशी आणि त्याचा सहकारी छोटा शकील यांना मदत केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.
एनआयएने दाऊद इब्राहिमशी संबंधित टेरर फंडिंग प्रकरणात आरिफ भाईजानला अटक केली होती.
आरिफ हा आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत होता.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मे २०२२ रोजी आरिफला अटक केली होती.
अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा आरिफ भाईजान याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असताना आरिफच्या छातीत अचानक दुखू लागलं होतं.
पोलिसांनी त्याला उपचारासाठी जे. जे रुग्णालयात दाखल केलं.
मात्र, उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
गँगस्टर दाऊद इब्राहिमशी आणि त्याचा सहकारी छोटा शकील यांना मदत केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.
एनआयएने दाऊद इब्राहिमशी संबंधित टेरर फंडिंग प्रकरणात आरिफ भाईजानला अटक केली होती.
आरिफ हा आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत होता.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मे २०२२ रोजी आरिफला अटक केली होती.
नवी दिल्ली : आज जीएसटी काउन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक
बैठकीला अनेक राज्यांचे अर्थमंत्री उपस्थित राहणार
महाराष्ट्राच्या वतीने सचिव उपस्थित राहणार
अर्थमंत्री अजित पवार अनुपस्थित राहणार
सातारा : कोणी कितीही शड्डू ठोकले तरी जिल्ह्याचे राजकारण मी आणि शिवेंद्रराजेच करणार असे खुले आव्हान भाजप नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी आभार मेळाव्यात दिले. साताऱ्यातील कोरेगा या ठिकाणी आभार मेळावा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. दरम्यान त्यांनी आमदार महेश शिंदे आमदार शिवेंद्रराजे, मनोज घोरपडे, अतुल भोसले हे माझ्यासाठी देव असल्याचा उल्लेखही केला.
भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत विधानपरिषदेच्या नावावर चर्चा
विधानसभा निवडणुकीत फायदा असणाऱ्या चेहऱ्यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत संधी दिली जाणार
विधानपरिषदेची उमेदवारी देताना त्या उमेदवाराचा प्रभाव किती आहे, त्याच्यामुळे पक्षाला निवडणुकांमध्ये किती फायदा होऊ शकतो अशी 10 नावे दिल्लीला राज्यातून पाठवली जातील - सूत्र
राज्यातून पाठवलेल्या 10 नावावर दिल्लीत चर्चा झाल्यानंतर होणार अंतिम निर्णय
पार्श्वभूमी
मुंबई : सध्या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 आमदारांच्या निवडणुकीचा कार्यक्रमही निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्यामुळे राज्यात राजकीय पक्ष जुळवाजुळवी करत आहेत. दुसरीकडे राज्यभर कुठे पावसाच्या सरी बसरत आहेत. तर कुठे अजूनही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. या घडामोडींसह देश राज्य तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर!
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -