Maharashtra News Live Updates 21 Sep 2024: मान्सूनचा मुक्काम राज्यात ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत राहणार, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता - IMD

Maharashtra News Live Updates 21 September 2024: राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर....

ज्योती देवरे Last Updated: 21 Sep 2024 03:05 PM
Parbhani Rain : परभणीत सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, उरले सुरले पिकही हातातून जाण्याची शक्यता 

Parbhani Rain : परभणीत सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस 


उरले सुरले पिकही हातुन जाण्याची शक्यता 


परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात आज सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.मागच्या १ तासापासून परभणी,मानवत,पाथरी या ३ तालुक्यांसह इतर भागात जोरदार पाऊस सुरू आहे.अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झालीय तसेच दोन दिवसांच्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात ऐन काढणीच्या मोसमातील आलेल सोयाबीन हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


 


 

Shirdi : शिर्डीतील मारी गोल्ड हॉटेलला आग, आग बुजविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू

शिर्डीतील मारी गोल्ड हॉटेलला आग,


आग बुजविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू


शिर्डी येथील मारी गोल्ड हॉटेलला अडीच वाजेच्या सुमारास भीषण आग लागली.


आग लागल्याचे समजताच हॉटेलमधील ग्राहक आणि कर्मचाऱ्यांनी हॉटेलचे बाहेर आले..


आग लागल्याची माहिती मिळतात शिर्डी अग्नीशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आग बुजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.


तिसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ उठत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते


मात्र अग्निशमन दलाने आग बुजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहे.


घटनास्थळी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली आहे. आग लागण्याचे कारण मात्र अजूनही समजू शकले नाही.

Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे याना डेंग्यूची लागण, डेंग्यू झाल्यावरही मतदारांना भेटायला आल्या

Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे याना डेंग्यूची लागण.


डेंग्यू झाल्यावरही मतदारांना भेटायला आल्या


केंद्रीयमंत्री रक्षा खडसे याना डेंग्यू ची लागण असताना व पुण्यात उपचार सुरू असतानाही त्या आज बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमात आल्या होत्या , त्या प्रचंड अशक्त व थकलेल्या आल्यावर ही त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली

जालना ब्रेकिंग- वडीगोद्री येथील उपोषण स्थळी तणावाच वातावरण, मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी

जालना ब्रेकिंग- वडीगोद्री येथील उपोषण स्थळी तणावाच वातावरण, 
मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी,
दुसरीकडे  ओबीसी आंदोलकांकदून घोषणाबाजी

Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने फुंकले रणशिंग, 'देवा भाऊ' म्हणत भाजप उतरणार मैदानात

Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने फुंकले रणशिंग


देवेंद्र फडणवीसांवरील धमाकेदार गाण्याने भाजपच्या प्रचाराची सुरवात


'देवा भाऊ' म्हणत भाजप उतरणार मैदानात


राम सेवक व शिवभक्त म्हणून फडणवीस यांचा गाण्यात उल्लेख


महाराष्ट्रातील विकासकामांचाही गाण्यात उल्लेख


शेतकरी, महिला, तरुणांसाठी घेतलेल्या निर्णयांना गाण्यातून उजाळा देण्याचा प्रयत्न

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक, छत्रपती संभाजीनगर - अहमदनगर महामार्ग अडवला.

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक, छत्रपती संभाजीनगर - अहमदनगर महामार्ग अडवला...


गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे आमरण उपोषण...


दखल न घेतल्याने समाज उतरला रस्त्यावर...


शेळ्या- मेंढ्यासह महामार्ग अडवला...


धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा हि प्रमुख मागणी...


सरकारने दखल न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा...

Amravati : अमरावतीत ठाकरे गटाच्या महानगरप्रमुखाविरुद्ध राजापेठ ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

Amravati : ठाकरे गटाच्या महानगरप्रमुखाविरुद्ध अमरावतीच्या राजापेठ ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल....


भाजपच्या नकुल सोनटक्केंच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई...


खासदार अनिल बोंडे यांना पराग गुडधे यांनी दिली होती फटके मारण्याची धमकी...


या धमकीनंतर बोंडे यांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आलीय...


अमरावती पोलिसांचे स्कॉटिंग वाहन त्यांच्या सोबत राहणारेय...


अमरावती शहर पोलिसांचे पथक देखील त्यांच्या ताफ्यात तैनात...

Khed : खेड मधील रहस्यमय मृतदेह प्रकरणात योगेश आर्याची खेड पोलिसांकडून चौकशी सुरू

Khed : खेड मधील रहस्यमय मृतदेह प्रकरणात योगेश आर्याची खेड पोलिसांकडून चौकशी सुरू..


योगेश आर्या स्वतः खेड पोलीस स्टेशन मध्ये हजर झाल्याची माहिती.


पोलिसांकडून योगेश आर्याची  चौकशी सुरू.



या प्रकरणाबाबत तपास लागल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती देऊ - पोलीस अधीक्षक रत्नागिरी.

Jalna : मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जालन्यात मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून मोर्चा

Jalna : मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जालन्यात मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून मोर्चा, 



सरकारने दखल घेऊन उपोषण सोडवावा मराठा आंदोलकांची मागणी,



उद्या जालना बंदची हाक. 



जालना जिल्हाधिकारी कार्यालय वरती मनोज जरांगे समर्थक मराठा आंदोलकानी आज मोर्चा काढला, मनोज जरांगे यांची प्रकृती  खालावत असून ,सरकारने तात्काळ हरकतीत येऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करून उपोषण सोडवावं अशी मागणी त्यांनी केलीय

Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यातील डार्ली गावात वीज पडल्याने 11 महिला गंभीर जखमी, एक महिलेचा जागीच मृत्यू.

Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्या अंतर्गत डार्ली गावात वीज पडल्याने 11 महिला गंभीर जखमी व एक महिला जागीच मृत्यू...
 शेतीच्या कामासाठी डार्ली या गावात 12 महिला गेले होते...परत येताना वादळ वारा सुरू होऊन वीज कोसळली...सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे या महिलांच्या उपचार सुरू असून दोन महिलांची प्रकृती गंभीर असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे

Beed : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस ऍक्टिव्ह, सहप्रभारी कुणाल चौधरी यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची केली मागणी

Beed : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस ऍक्टिव्ह; कृषिमंत्री मुंडेंच्या जिल्ह्यातून काँग्रेस कमिटीचे सहप्रभारी कुणाल चौधरी यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची केली मागणी


आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात काँग्रेस ऍक्टिव्ह झाली आहे. विधानसभेच्या अनुषंगाने काँग्रेस कमिटीचे सहप्रभारी कुणाल चौधरी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीतून चौधरी यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष केले आहे.

Pune : पुण्यात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनचा ९ वा वर्धापन दिन

Pune : पुण्यात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनचा ९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे


या कार्यक्रमाला थोड्यावेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि १ वाजता देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार 


पुण्यातील गणेश कला क्रीडा येथे हा कार्यक्रम पार पाडतोय 


नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोघांनी मिळून नाम फाउंडेशन ही सामाजिक संस्था २०१५स्थापन केली 


संस्था महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करते आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करते

Pune : अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकरामार्फत खुन

Pune : पुण्यातील कर्वेनगर मध्ये अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकरामार्फत खुन करवून चोरीच्या उद्देशाने हा खुन झाल्याचा बनाव रचला. अमोल निवंगुणे या व्यक्तीचा त्यांच्या मुलींच्या समोरच तिक्ष्ण हत्याराने भोसकून खुन करण्यात आलाय.


कर्वेनगर येथे उच्चभ्रू श्रीमान सोसायटी मधील अमोल पंढरीनाथ निवगुंने (वय42 ) या इसमाचा रात्री अंदाजे एक वाजता घरात घुसून तिक्ष्ण हत्याराने तिक्ष्ण हत्याराने वार करुन खुन  करण्यात आला आहे.

Pune : पुण्यातील खड्ड्यांवर राष्ट्रपती कार्यालय नाराज, पुणे पोलिसांचे महापालिकेला पत्र

Pune : पुण्यातील खड्ड्यांवर राष्ट्रपती कार्यालय नाराज,


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या २६ तारखेच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील खड्डे बुजवण्यासाठी पुणे पोलिसांचे महापालिकेला पत्र.....



पुण्यातील खड्डे हे पुणेकरांसाठी तर त्रासदायक ठरत आहेतच,


आता या खड्ड्यांचा फटका देशाच्या राष्ट्रपतींना देखील बसलाय.


२ आणि ३ सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु पुणे दौऱ्यावर होत्या. पुण्यातील राजभवनला त्यांचा मुक्काम होता

Beed : बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क; बीड शहर पोलीस ठाणे अंतर्गत 55 विशेष पोलीस यंत्रणा

बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क; बीड शहर पोलीस ठाणे अंतर्गत 55 विशेष पोलीस यंत्रणा


बीड जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. बीड शहर पोलीस ठाणे अंतर्गत 55 विशेष पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहे.


मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलीय. याच अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार हिंसक घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले असून पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एका ठिकाणी थांबता येणार नाही. मागील आंदोलनादरम्यान बीडमध्ये हिंसक वळण लागले होते. आणि आता याच पार्श्वभूमीवर बीड शहर पोलीस ठाणे हद्दीत विशेष पोलीस यंत्रणा सतर्क आहे. तर हा बंद शांततेत करण्याच आवाहन पोलीस यंत्रणे कडून केले जात आहे.

Solapur : भाजपच्या 6 माजी नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस, भाजपचे सदस्य नसलेल्या उमेदवाराची शिफारस केली

Solapur : विद्यमान आमदाराऐवजी ऐवजी पक्षात नसलेल्या व्यक्तीला विधानससभेचे तिकीट देण्याची शिफारस करणाऱ्या 
भाजपच्या 6 माजी नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस 


दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात सुभाष देशमुख यांच्या ऐवजी सोमनाथ वैद्य यांना उमेदवारी देण्याची शिफारस भाजपच्या माजी नगरसेवकांनी केली होती 


भाजपचे सदस्य नसलेल्या उमेदवाराची शिफारस केल्यामुळे बजावण्यात आली कारणे दाखवा नोटीस 


सोमनाथ वैद्य यांनी भाजपकडून उमेदवारी देण्याची शिफारस पक्षातील लोकांनीच केल्याने आमदार सुभाष देशमुख यांच्या अडचणीत झाली होती वाढ 


मात्र आता अशा पद्धतीने शिफारस देणाऱ्या माजी नगरसेवकांना नोटीस दिल्याने सोलापूर शहर भाजपमध्ये नवा वाद रंगण्याची शक्यता आहे.


दरम्यान, भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे यांना ही पाठवण्यात आली आहे कारणे दाखवा नोटीस 

Malegaon - पंढरपुर येथील धनगर आंदोलनाचे मालेगावच्या जळगाव निंबायती येथे पडसाद

मालेगाव ( नाशिक )...ब्रेकिंग...


Malegaon - पंढरपुर येथील धनगर आंदोलनाचे मालेगावच्या जळगाव निंबायती येथे पडसाद ...
- सकल धनगर बांधवांनी सुरू केला रास्ता - रोको..
- पुणे - इंदूर महामार्ग धरला रोखून ...
- मेंढ्या व बिऱ्हाड ही रास्ता - रोकोमध्ये सहभाग ...
- एस.टी.प्रवर्गात  सहभाग करण्याची आग्रही मागणी...
- रास्ता - रोको मुळे दुतर्फा वाहतूक ठप्प...
- शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ...

Jalna : मराठा समाजाकडून रविवारी जालना बंदची हाक, आज जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन

Jalna : मराठा समाजाकडून रविवारी जालना बंदची हाक...


मराठा कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बंदच आवाहन...


मनोज जरांगे यांची तब्येत बिघडल्याने मराठा समाज आक्रमक...


जालना बंदच निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना देणार...

मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील भोस्ते घाटात कंटेनरला अपघात

मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील भोस्ते घाटात कंटेनरला अपघात. 


चिपळूण मधून गुजरातला माल वाहून नेणाऱ्या कंटेनरला भोस्ते घाटातील अवघड वळणात अपघात.


अपघातामध्ये चालक किरकोळ जखमी. 


वाहनावरचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची माहिती.

Latur : लातूर येथील नवोदय विद्यालयातील 47 विद्यार्थ्यांना कावळची लागण, विद्यार्थ्यासह पालकांमध्ये भीतीची वातावरण

Latur : लातूर येथील नवोदय विद्यालयातील 47 विद्यार्थ्यांना कावळची लागण


विद्यार्थ्यासह पालकांमध्ये भीतीची वातावरण


विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी वेगात सुरू


दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांचा आरोग्य धोक्यात


शाळा प्रशासन स्वच्छता करत नसल्याचा पालकांचा आरोप


त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच  खळबळ उडाली आहे.

Mumbai : मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले, पदवीधर सिनेट निवडणुका पुढे ढकलल्याचे जाहीर

Mumbai : मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले...


दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणुका पार पडणार होत्या.


मात्र, विद्यापीठाने पुन्हा एकदा मागील वेळेसारखंच रात्रीच्या वेळेस एक परिपत्रक काढून निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे.


ही काही पहिली वेळ नाही. मागील निवडणुका जाहीर झाल्यानंतरही रात्रीच्या वेळीच राजकीय दबावाला बळी पडून परिपत्रक काढले गेले होते.


आता दुसऱ्यांदा अशाच प्रकारे सिनेट पदवीधर निवडणुकांसंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे,


प्रत्येक वेळी रात्रीच परिपत्रक निघते, त्यामुळे मुंबई विद्यापीठाचा कारभार रात्रीस खेळ चाले या मालिकेसारखा चालू आहे की काय,


असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Kisan Rail : शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी सुरू केलेली किसान रेल पुन्हा सुरू करण्याची मागणी

Kisan Rail : शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी सुरू केलेली किसान रेल गेल्या अनेक महिन्यापासून बंद असून ती पुन्हा सुरू करावी अशी मागणी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे

Jalgaon : जळगाव शहरातील एका अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळल्या अळ्या, पालक संतप्त

Jalgaon : जळगाव शहरातील एका अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळल्या अळ्या, पालक संतप्त


जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर भागात असणाऱ्या अंगणवाडीत लहान मुलांच्या खिचडी मध्ये आढळल्या अळ्या 


या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांकडे, अंगणवाडी सेविकांना वारंवार सूचना दिल्या जातात, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती...

Chandrapur : चंद्रपूर-ताडोबा मार्गावरील नवीन सिन्हाळा वसाहतीतून 7 वर्षीय मुलगा बेपत्ता...

Chandrapur : चंद्रपूर-ताडोबा मार्गावरील नवीन सिन्हाळा वसाहतीतून 7 वर्षीय मुलगा बेपत्ता...


भावेश जरकर असं बेपत्ता झालेल्या मुलाचं नाव,


संध्याकाळी घराच्या मागे फिरत असतांना अचानक बेपत्ता झाला मुलगा,


दुर्गापूर पोलीस आणि वनविभाग घेत आहे मुलाचा शोध, या भागात आज सकाळी एक बिबट दिसल्याने बेपत्ता मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची शक्यता बळावली

Weather : मान्सूनचा मुक्काम राज्यात ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत राहणार, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Weather : मान्सूनचा मुक्काम राज्यात ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत राहणार 


सप्टेंबरच्या अखेरीस पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता 


राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील अनेक भागात सप्टेंबर महिन्यात फारसा पाऊस झाला नाही 


विदर्भातील काही भागात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा चांगला पाऊस झालाय 


दरम्यान, आॅक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाची चिन्ह असल्याने आॅक्टोबर हिटचे चटके देखील उशिरा बसण्याची शक्यता

Manoj Jarange : बीड, पुणे पाठोपाठ मुंबईतही मराठा आंदोलक आक्रमक

Manoj Jarange : बीड, पुणे पाठोपाठ मुंबईतही मराठा आंदोलक आक्रमक


मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ चेंबूरमध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण


उद्या म्हणजे २२ सप्टेंबर रोजी केलं जाणार उपोषण

Nagpur - नागपुरात 8 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांकडून अटक

Nagpur - नागपुरात 8 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे... 


* गणपत शिरपुरकर (वय 56 वर्ष) असे आरोपीचे नाव असून तो जवळच्या दुर्गा नगर परिसराचा रहिवाशी आहे...


- नागपुरच्या आभा नगर परिसरात रविवारी दुपारी एका 8 वर्षांच्या मुलीवर तिच्या घरातच अत्याचार करण्यात आले होते...

Nagpur - नागपुरात 8 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक

Nagpur - नागपुरात 8 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे... 


* गणपत शिरपुरकर (वय 56 वर्ष) असे आरोपीचे नाव असून तो जवळच्या दुर्गा नगर परिसराचा रहिवाशी आहे...


- नागपुरच्या आभा नगर परिसरात रविवारी दुपारी एका 8 वर्षांच्या मुलीवर तिच्या घरातच अत्याचार करण्यात आले होते...

Political : कॉंग्रेसचे शिष्टमंडळ आज घेणार राज्यपालांची भेट, राहुल गांधी यांना आमदारांनी दिलेल्या धमकी प्रकाराबद्दल करणार चर्चा

Political : कॉंग्रेसचे शिष्टमंडळ आज घेणार राज्यपालांची भेट 


दुपारी तीन वाजता राजभवन वरती घेणार भेट 


लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना आमदारांनी दिलेल्या धमकी प्रकारांनी घेणार भेट 


या आमदारांचा तात्काळ निलंबन करा अशी करणार मागणी 


याच मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात काँग्रेसची आंदोलन सुरू आहेत

Dharashiv : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज धाराशिव जिल्हा बंदची हाक

Dharashiv : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज धाराशिव जिल्हा बंदची हाक


जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्याने शासनाच्या निषेधार्थ बंद ठेवण्याचे आवाहन


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असुन जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे त


रीही शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने आज धाराशिव जिल्हा बंदचे आवाहन केले आहे.


शासनाच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात येणार असुन सर्वांनी शांततेत बंद पाळावा अस आवाहन शनिवारी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल होते.


त्यामुळे सकाळपासून शहरात शुकशुकाट पाहायला मिळत असुन बहुतांश भागात दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.


दुपारनंतर मराठा बांधव आंतरवली सराटीकडे जाणार आहेत अस देखील मराठा बांधवांनी सांगितले.

Pune : पिंपरीत अजित पवार गटाचा प्रचार न करण्याचा ठराव, भाजपचा अण्णा बनसोडेंना विरोध

Pune : पिंपरीत अजित पवार गटाचा प्रचार न करण्याचा ठराव, भाजपचा अण्णा बनसोडेंना विरोध


पिंपरी विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करायचा नाही.


असा ठराव करत भाजपने थेट आमदार अण्णा बनसोडेंना विरोध दर्शवला आहे.


लोकसभेत कमळाचा उमेदवार मिळाला नाही आता आम्हाला कमळाचाचं उमेदवार हवा अशी आग्रही भूमिका बैठकीत एकमुखाने मांडण्यात आली.


भाजपचे विधान परिषदेचे आमदार उमा खापरे आणि अमित गोरखेंसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी विरोधी सूर उमटला.


लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीचा प्रचार केला नाही मग आपण घडाळ्याचा प्रचार का करायचा? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

Amit shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 25 सप्टेंबर रोजी नाशिक दौऱ्यावर

Amit shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 25 सप्टेंबर रोजी नाशिक दौऱ्यावर
-
उत्तर महाराष्ट्र चा घेणार आढावा
-
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बैठक घेणार
-
बैठकीला उत्तर महाराष्ट्र मधील आजी माजी मंत्री, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, बाहेरील राज्यातून आलेलं प्रभारी उपस्थित राहणार
-
लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रच्या  8 पैकी केवळ 2 जागावर महायुती चा विजय झाल्यान भाजप रणनीती आखणार
-
अमित शहा यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी रावसाहेब दानवे आज नाशिकमध्ये येणार

Nashik: नाशकात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने शिवसेना ठाकरे गटाच्या जागांवर ठोकला दावा, 15 पैकी 10 जागा लढण्यावर ठाम

Nashik: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने शिवसेना ठाकरे गटाच्या जागांवर ठोकला दावा
 
विधानसभा निवडणुकीच्या वाटपावर महाविकास आघडीचे मुंबईत बैठकांचे सत्र सुरू असताना नाशिकमधे मात्र रस्सीखेच
-
नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी 10 जागा लढण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ठाम
-
नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने आपल्या उमेदवारांची नावे निश्चित केली असतानाच शरद पवार गटाने या दोन्ही जागांवर आपला दावा सांगितला
-
शहरातील 3 पैकी 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढण्याच्या तयारीत 
-
नाशिक मध्य विधानसभा लढण्यासाठी  काँग्रेस ही आग्रही


 

Politics : शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टाला विनंती, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकापूर्वी चिन्ह बाबत निर्णय घ्या

Politics : शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टाला विनंती 


महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका असल्यामुळे लवकरात लवकर चिन्हाबाबत निर्णय घ्या 


महाराष्ट्र विधानसभेपूर्वी चिन्ह बाबत निर्णय होणं महत्त्वाचं 


जर घड्याळ चिन्हाबाबत तातडीने निर्णय होणार नसेल तर तोपर्यंत घड्याळ चिन्ह हे फ्रिज करण्यात यावं 


घड्याळ चिन्हाचा एकाच गटाला फायदा व्हायला नको 


शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टाला विनंती

Pune : नशेच्या इंजेक्शनची विक्री करमऱ्याला अटक; मेफेनटर्माईन सल्फेटच्या 39 बाटल्या जप्त, हडपसर पोलिसांकडून कारवाई 

Pune : नशेच्या इंजेक्शनची विक्री करमऱ्याला अटक; मेफेनटर्माईन सल्फेटच्या ३९ बाटल्या जप्त, हडपसर पोलिसांकडून कारवाई 


एस्कडा हॉटेलवर पोलिसांची कारवाई; दोन मालकांसह चौघांवर गुन्हा दाखल, विमानतळ पोलिसांत तक्रार दाखल 


पुणेकरांना सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हीटच्या झळा; दिवसा ऊन आणि रात्री थंडी, दोन ते तीन अंशांनी वाढले तापमान 


एकाच सोसायटीतील दोन फ्लॅटमध्ये १० लाखांची चोरी; बिबवेवाडी गावठाण परिसरातील घटना, सोने आणि रोकड चोरीला


बालेवाडीत अनधिकृत बांधकामावर कारवाई; हायस्ट्रीट परिसरात कारवाई,१५,५०० चौ. फूट क्षेत्र निष्कासित

 Mumbai : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) निवडणुका स्थगित, विद्यापीठ प्रशासन बॅफूटवर

 Mumbai : महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू) मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा प्रभाव..! मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) निवडणुका स्थगित


_न्यायमूर्ती चांदुरकर व पाटील यांच्या दुहेरी खंडपीठाचे मुंबई विद्यापीठास प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देताच विद्यापीठ प्रशासन बॅफूटवर

Mumbai : वांद्रे-वरळी सी लिंकवरुन उडी मारुन आत्महत्या; गोवंडीमधील रहिवाशी असल्याची माहिती आली समोर

Mumbai : वांद्रे-वरळी सी लिंकवरुन उडी मारुन आत्महत्या; गोवंडीमधील रहिवाशी असल्याची माहिती आली समोर


मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरुन एका व्यक्तीने उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. 


आत्महत्येचं कारण अजूनही समोर आलेलं नाही. याबाबत पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. 


मुंबई पोलिसांनी सदर घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, गुरुवारी रात्री 1 वाजताच्या आसपास वरळी सी लिंकवरुन एका व्यक्तीने उडी मारली 


घटनास्थळी मदतीसाठी पोलिसांनी तात्काळ यावे, अशी माहिती मिळाली. 


यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सी लिंकवरील पोल क्रमांक 83 आणि 84 जवळ पोहचले. 


 


 

Mumbai : वांद्रे-वरळी सी लिंकवरुन उडी मारुन आत्महत्या; गोवंडीमधील रहिवाशी असल्याची माहिती आली समोर

Mumbai : वांद्रे-वरळी सी लिंकवरुन उडी मारुन आत्महत्या; गोवंडीमधील रहिवाशी असल्याची माहिती आली समोर


मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरुन एका व्यक्तीने उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. 


आत्महत्येचं कारण अजूनही समोर आलेलं नाही. याबाबत पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. 


मुंबई पोलिसांनी सदर घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, गुरुवारी रात्री 1 वाजताच्या आसपास वरळी सी लिंकवरुन एका व्यक्तीने उडी मारली 


घटनास्थळी मदतीसाठी पोलिसांनी तात्काळ यावे, अशी माहिती मिळाली. 


यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सी लिंकवरील पोल क्रमांक 83 आणि 84 जवळ पोहचले. 


 


 

Thane : ठाण्यातील घोडबंदर रोडवर उलट्या दिशेने घुसणाऱ्या गाड्यांचे टायर पंक्चर होणार; प्रशासनाचा मोठा निर्णय

 


Thane : ठाण्यातील घोडबंदर रोडवर उलट्या दिशेने घुसणाऱ्या गाड्यांचे टायर पंक्चर होणार; प्रशासनाचा मोठा निर्णय


गेल्या पंधरा दिवसात घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळाले आहे.


 ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या वाहिनीवर वाहनांची वाहतूक कोंडी आणि त्यात महामार्गावरून उलट दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी 'टायर किलर'चा प्रयोग करण्यात येणार आहे. 


त्यामुळे आता घोडबंदर रोडवर उलट्या दिशेने घुसणाऱ्या गाड्यांचे टायर पंक्चर होणार असून 'टायर किलर' बसविण्याचे स्पॉट लवकरच निश्चित केले जाणार आहेत. 


तसेच सीसीटीव्ही कॅमेरा क्षेत्रात 'टायर किलर' काम करणार असल्याचे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने संयुक्तरिते बैठक घेऊन माहिती देण्यात आलेली आहे.


 

Manoj Jarange : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर घेतले उपचार,


Manoj Jarange : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर घेतले उपचार,
  
आमरण उपोषणामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. 


मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी आग्रह केल्यानंतर अखेर जरांगे यांनी उपचार घेतले आहेत.

Mumbai : आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनानिमित्त जुहू बीच येथे स्वच्छता मोहीम

Mumbai : केंद्रीय पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनानिमित्त (International Coastal Clean-up Day) तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान अंतर्गत* आज सकाळी जुहू समुद्र किनारा (जुहू बीच) येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. 


 राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे,केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा,यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहीम पार पडणार आहे....

Mumbai : मुंबई विद्यापीठ पदवीधर निवडणूक स्थगित करणे हा मुंबई विद्यापीठातील पदवीधरांचा अपमान, ABVP राज्यपालांकडे दाद मागणार

Mumbai : मुंबई विद्यापीठ पदवीधर निवडणूक स्थगित करणे हा मुंबई विद्यापीठातील पदवीधरांचा अपमान आहे.


अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच मोठ्या ताकतीने या निवडणुकीत उतरला आहे


आपले सर्व उमेदवार निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे


परंतु अशी अचानकपणे विद्यापीठाने निवडणूक स्थगित करणे अन्यायकारक आहे


या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राज्यपालांकडे दाद मागणार आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News Live Updates 21 September 2024: : देशासह राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्या दृष्टीन राज्यातील राजकीय पक्षांनी हालचाली चालू केल्या आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सध्या बैठकांचे सत्र चालू आहे. या बैठकांत जागावाटपाची चर्चा केली जात आहे. लवकरच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्यूला जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रमुख घडामोडींसह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर.... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.