Maharashtra Breaking 21st June LIVE Updates: मुख्यमंत्र्यांचा लक्ष्मण हाकेंशी फोनवरुन संवाद, वडीगोद्रीत गावकऱ्यांची घोषणाबाजी

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 21 Jun 2024 12:17 PM
Yavatmal News: तीन दिवसानंतर पावसाची हजेरी; शेतकरी सुखावला

Yavatmal News: मागील आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील 30 टक्के शेतकऱ्यांनी कपाशी आणि सोयाबीन, तूरची लागवड केली होती. मात्र पावसाने उघड दिल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र मध्यरात्री आणि सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे। तसेच नागरिकांची उकड्यापासू न सुटका झाली. 

Akola News: अकोल्यात काँग्रेसचे 'चिकल फेको' आंदोलन; भाजपाप्रणित सरकारचा केला निषेध

Akola News: 'राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महाभ्रष्टयुती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतेय, या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. असा आरोप काँग्रेसनं अकोल्यात चिखल फेको आंदोलनदरम्यान केलाय. सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून ‘चिखल फेको’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून भाजपाप्रणित सरकारचा निषेध करण्यात आलाय. अकोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 'चिकल फेको' आंदोलन केलं आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केल्याचा काँग्रेसनं यावेळी केलाय.

Ratnagiri News: मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात संरक्षक भिंतीचा मोठा भाग कोसळला

Ratnagiri News: मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात संरक्षक भिंतीचा मोठा भाग कोसळला आहे. महामार्गाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालाय सुरक्षेचा उपाय म्हणून सध्या घाटातली वाहतूक केली आहे मात्र या ठिकाणी पावसाचा जोर कायम राहिलास महामार्गाला देखील धोका निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. 

Pune News: पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर मोठी गॅस गळती 

Pune News: पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर मोठी गॅस गळती 


शिवम हॉटेल समोर गॅस गळती झाल्याने खळबळ 


रस्त्याचं काम सुरु असताना खोदकामादरम्यान झाली गॅस गळती 


मोठ्या प्रमाणात आवाज येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

सह्याद्री अतिथी गृहावर बैठक, गिरीश महाजनांचं लक्ष्मण हाकेंना आश्वासन

गोपीचंद पडळकर यांचं आवाहन 


 आपल्या दोन्ही उपोषणकर्त्यांच्या सोबत सविस्तरपणे मुख्यमंत्री बोललेले आहेत आजच पाच वाजता बैठकीचे आयोजन सरकारच्या वतीने करण्यात आलेला आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी आंदोलकांना सांगितलं. 



गिरीश महाजन यांनी काय सांगितलं? 


उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांचे उपोषणकर्त्यांशी फोनवर बोलणे झालेला आहे, ठरल्याप्रमाणे चर्चा होऊनच विषय संपेल, इथे बसून हा विषय संपणार नाही, शिष्टमंडळामध्ये गोपीचंद पडळकर, छगन भुजबळ राहतील, आणि इथली काही प्रतिनिधीही असतील. असे दहा-बारा लोकांचे शिष्टमंडळ येईल तिथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहतील, त्या चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. 

गिरीश महाजनांच्या फोनवरुन मुख्यमंत्र्यांचा लक्ष्मण हाकेंशी संवाद, वडीगोद्रीत गावकऱ्यांची घोषणाबाजी

सरकारचं शिष्टमंडळ ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी जालन्याती वडीगोद्री या गावात दाखल झालं. मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन आणि अतुल सावे आंदोलन स्थळी पोहोचले.याशिवाय गोपीचंद पडळकर, शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. 


चर्चा केल्याशिवाय मार्ग निघत नाही त्यामुळे चार पाच जणांचे शिष्टमंडळ चर्चा करून मुंबईला शिष्टमंडळ पाठवावे तिथे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि मुख्यमंत्री आहेत त्या मागण्यासंदर्भात त्या ठिकाणी चर्चा करू, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं.


सरकारशी चर्चा झाली तर लवकर मार्ग काढता येईल, एवढ्या दिवस उपोषणाला बसणे शरीरास घातक आहे. तुमच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली तर त्यातून प्रश्न सुटेल, असं महाजन यांनी आंदोलकांना सांगितलं. 


यावर लक्ष्मण हाके म्हणाले, सरकारला सबंधित व्यवस्थेला माजी भूमिका आजवर मांडली आहेत. शासन ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही म्हणते, आणि अंदोलक (मनोज जरांगे)म्हणते की आम्ही ओबीसीमध्ये घुसलोत, याचा अर्थ कोणीतरी दोघांपैकी खोटं बोलतेय. निवडणुकीच्या माध्यमातून एका बाजूला दहशत निर्माण केली जातेय. सरकारने फक्त ठराविक लोकांकडे लक्ष देऊ नये.


गावकरी आक्रमक


दरम्यान, या सर्व चर्चेवेळी गावकरी आक्रमक होऊन घोषणाबाजी करु लागले. मुख्यमंत्र्यांनी यावं अशी मागणी, गावकऱ्यांनी केली. 


लक्ष्मण हाके यांचं आवाहन 


लक्ष्मण हाके म्हणाले, हा बांधवांचा रोष आहे, भावना आहे, मी मोठा माणूस नाही, आम्ही दोघे उपोषण करणारे मोठ्या बॅकग्राऊंडचे नाहीत, सामान्य आहोत.आम्हाला कोणताही शासकीय अधिकाऱ्यामार्फत कलेक्टर मार्फत तुम्ही निवेदन पाठवून दिलं तरी चालेल.


आमच्या सर्व नेत्यांनी आणि गावातील लोकांनी एकत्रित बसावं आणि जालना जिल्ह्यातील काही लोकांनी एकत्रित बसून चर्चा  करतील, तोपर्यंत उपोषण सुटणार नाही, असा पवित्रा लक्ष्मण हाके यांनी घेतला. 


या लोकांनी निवडणुका जिंकण्याचा व्याकरण हासिल केलंय ,त्यांना आपलं अंतकरण लक्षात येत नाही ही वेदना मला शासनापुढे मांडायची आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी लोकांच्या दायित्वाची शपथ घेतली असते. एवढ्या लोकांचा आवाज शासन लोकप्रतिनिधी कसं काय दुर्लक्ष करतात? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला. 


नवनाथ वाघमारे काय म्हणाले? 


आम्हाला कोणाच्या ताटातलं हिसकावून घ्यायचं नाही. आमच्या हक्काच्या आरक्षणाचं बचाव होतो याचं लेखी उत्तर आम्हाला हवं आहे. 54 लाख नोंदी मागच्या दाराने वाटप सुरू आहे, हे तात्काळ बंद झालं पाहिजे, 54 लाख नोंदी रद्द कराव्या, असं नवनाथ वाघमारे म्हणाले. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषणावर ठाम आहोत. 


अधिकारी आठ आठ दिवसाच्या आत हे बोगस सर्टिफिकेट वाटत आहेत, या अधिकाऱ्यांची देखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली. 


सरकारला सगळी मुलं सारखी असतात मात्र आमच्याबाबत दुय्यम भूमिका घेतली जाते, सावत्र लेकासारखी वागणूक आम्हाला सरकारकडून मिळू नये, असं ते म्हणाले.


मुख्यमंत्र्यांचा लक्ष्मण हाके यांना फोन


दरम्यान, यावेळी गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करुन लक्ष्मण हाके यांच्याशी संवाद साधून दिला.  गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना फोन जोडू दिल्यानंतर तो लक्ष्मण हाके यांच्याकडे दिला


गोपीचंद पडळकर यांचं आवाहन 


 आपल्या दोन्ही उपोषणकर्त्यांच्या सोबत सविस्तरपणे मुख्यमंत्री बोललेले आहेत आजच पाच वाजता बैठकीचे आयोजन सरकारच्या वतीने करण्यात आलेला आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी आंदोलकांना सांगितलं. 



गिरीश महाजन यांनी काय सांगितलं? 


उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांचे उपोषणकर्त्यांशी फोनवर बोलणे झालेला आहे, ठरल्याप्रमाणे चर्चा होऊनच विषय संपेल, इथे बसून हा विषय संपणार नाही, शिष्टमंडळामध्ये गोपीचंद पडळकर, छगन भुजबळ राहतील, आणि इथली काही प्रतिनिधीही असतील. असे दहा-बारा लोकांचे शिष्टमंडळ येईल तिथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहतील, त्या चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. 


 

Aditi Tatkare : अदिती तटकरे गोंदिया जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्री

Aditi Tatkare : अदिती तटकरे गोंदिया जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्री होणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सुत्रांच्या हवाल्यानं मिळत आहे. 


धर्मबाबा आत्राम यांनी गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अदिती तटकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिली आहे. 

Laxman Hake Hunger Strike: सरकारचं शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाकेंची भेट घेणार

Laxman Hake Hunger Strike: ओबीसी वर्गाच्या मूळ आरक्षणात मराठ्यांचा समावेश नको, यासह इतर मागण्यांसाठी लक्ष्मण हाके  गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आणि आता आज सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंना भेटण्यासाठी उपोषणस्थळी येणार आहे. सकाळी नऊ वाजता मंत्री उदय सामंत, अतुल सावे आणि गोपीचंद पडळकर हे शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंची भेट घेऊन त्यांनी उपोषण सोडावं म्हणून विनंती करणार आहे. 

NCP Sharad Pawar Group Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची आज बैठक

NCP Sharad Pawar Group Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची आज पुण्यात बैठक होणार आहेत. आज दुपारी 3 वाजता पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे. यावेळी नवनिर्वाचिक 8 खासदारांना शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे.

BJP Meeting : महाराष्ट्र भाजपची आज महत्त्वची बैठक

BJP Meeting : महाराष्ट्र भाजपची आज महत्त्वाची बैठक होणार आहे.. विधान परिषदेच्या 11 जागांसंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडेंसह कोअर कमिटीतील सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली सुरू

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नुकतीच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत राज्यातल्या वरिष्ठ नेतृत्वाने पंकजांना राज्यसभेवर पाठवण्याची विनंती केली. राज्यात ओबीसी विरूद्ध मराठा असा संघर्ष सुरू आहे. याचमुळे ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडेंना राज्यसभेवर घ्या असा सूर राज्यातल्या काही नेत्यांचा आहे अशी माहिती समोर येतेय. 

Manoj Jarange LIVE: मनोज जरांगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज, जरांगे अंतरवाली सराटीमध्ये न जाता थेट बीडमध्ये जाणार

Manoj Jarange LIVE: मनोज जरांगेंना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. यानंतर जरांगे अंतरवाली सराटीमध्ये न जाता थेट बीडमध्ये जाणार आहे. दरम्यान उशीर झाल्यामुले अंतरवालीला जाणार नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय. दरम्यान ओबीसी आंदोलकांना सरकारचं शिष्टमंडळ आज भेटायला येणार आहे यावरून जरांगेंनी टीका केलीय. 

Nashik News: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चांदवडच्या कलाशिक्षकाचे फलक रेखाटन

Nashik News: आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नाशिकच्या चांदवडच्या नूतन माध्यमिक विद्यालय येथील कलाशिक्षक देव हिरे यांनी फलक रेखाटन करून योगा करा आणि स्वस्थ रहा असा संदेश दिला. संपूर्ण विश्वामध्ये वृद्धी, विकास आणि शांतीच्या प्रचारासाठी व वैश्विक बंधुभाव वाढवण्यासाठी योगाभ्यास आवश्यक आहे. रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी व निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून योगाला आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे, असा संदेश या फलक रेखाटनातून देण्यात आला आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...


1. पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मिरमध्ये योगदिन  साजरा करणार, श्रीनगरच्या दल लेकजवळ 7 हजार लोकांसोबत करणार योगासनं 


2. सरकारचं शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाकेंना भेटणार...उदय सामंत, अतुल सावे गोपीचंद पडळकर घेणार हाकेंची भेट


3. महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची आज बैठक, विधान परिषदेच्या जागांबाबत होणार चर्चा


4. भाजप सरकारविरोधात आज काँग्रेसचं राज्यभर 'चिखल फेको' आंदोलन. सरकारच्या प्रतिमेला चिखल लावून काँग्रेस भाजप सरकारचा निषेध करणार


5. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची आज पुण्यात बैठक, शरद पवार करणार मार्गदर्शन, विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवणार


6. 34 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या वाधवान बंधूंच्या बंगल्यात सलमान खानचा मुक्काम, शुटिंगसाठी महाबळेश्वरला आलेला सलमान वाधवानच्या बंगल्यात


7. विधानसभा निवडणुकीसाठी आम्हाला 100 जागा द्या, महायुतीत जागावाटपात जे घडलं ते घृणास्पद होतं, रामदास कदमांनी भाजपला सुनावलं, ठाकरेंच्या 21 जागांवरही बोट


8. अजित पवारांच्या महायुतीतल्या समावेशावरून रामदास कदमांची उघड नाराजी, तर अजित पवार वेळेत आले म्हणून लंगोटी वाचली, मिटकरींचा हल्लाबोल


9. राज्य सरकारवर माझा विश्वास नाही, सरकार घटनात्मक फ्रॉड करतंय, एबीपी माझाच्या झीरो अवर या कार्यक्रमात लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.