Maharashtra Breaking LIVE: पोलिसांकडून बदलापूरमध्ये लाठीचार्ज, रेल्वे स्टेशन रिकामं करण्यासाठी बळाचा वापर

Maharashtra Breaking 20th August 2024 Marathi News LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहा फक्त एबीपी माझावर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Aug 2024 08:03 PM
बदलापूर स्टेशनमध्ये पहिली लोकल दाखल

बदलापूर स्टेशनमध्ये पहिली लोकल दाखल झाली आहे. बदलापूर स्टेशनमध्ये 11 तासानंतर लोकल दाखल झाली आहे.

Girish Mahajan on Badlapur News : आंदोलन करणाऱ्यांना 8 वेळा समजावून सांगितलं पण त्यांनी याआडून राजकारण केलं : गिरीश महाजन

आंदोलन करणाऱ्यांना 8 वेळा समजवून सांगितलं मात्र काही आंदोलक या दुर्दैवी घटनेच्या आडून राजकारण करू पाहत होते. लाडक्या बहिणीचे बॅनर घेऊन अशा घटनांमध्ये राजकारण केलं हे दुर्दैवी आहेत. अनेक पोलिस जखमी झाले आहेत. आरोपीवर कडक कारवाई होईल. लोकल सेवाही लवकरच सुरू होईल अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

Badlapur News : बदलापूरच्या प्रकरणात उज्वल निकम विशेष सरकारी वकील असणार : देवेंद्र फडणवीस

बदलापूरच्या दुर्दैवी घटनेचा गतीने तपास करुन खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल आणि यात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

बदलापूर प्रकरण हायकोर्टात पोहोचलं, सुमोटो अंतर्गत दखल घेण्याची विनंती

बदलापूर प्रकरण हायकोर्टात पोहोचलं, सुमोटो अंतर्गत दखल घेण्याची विनंती


बदलापूरमध्ये घडलेल्या प्रकरणाची एसआयटीमार्फत हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी


मात्र न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकलपीठानं सुनावणी घेण्यास व्यक्त केली असमर्थता


याचिकाकर्ता वकिलाला योग्य खंडपीठासमोर दाद मागण्याचे निर्देश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी मुंबईला येणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या दरे या गावी आहेत. एकनाथ शिंदे उद्या सकाळी मुंबईत दाखल होतील.

बदलापूरमध्ये आंदोलक आक्रमक, बसच्या काचा फोडल्या

बदलापूर रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर आंदोलकांनी एसटी बसची देखील तोडफोड करण्यात आली आहे. 

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची NHRC ने स्वतःहून घेतली दखल

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर शाळेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराची NHRC, भारताने स्वतःहून दखल घेतली आहे.महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना नोटीस बजावून दोन आठवड्यांत सविस्तर अहवाल मागवला आहे.
 त्यात एफआयआर नोंदवण्यात उशीर होण्यामागील कारण, त्याची स्थिती आणि पीडित मुलींच्या आरोग्याचा समावेश अपेक्षित आहे.

Badlapur Case : बदलापूरमध्ये पोलिसांकडून लाठीचार्ज, जमावाकडून दगडफेक

बदलापूर रेल्वे स्थानक पूर्णपणे रिकामं करण्यात आलं आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर आंदोलकांनी प्रत्युत्तर म्हणून दगडफेक केली. 

Badlapur Case : बदलापूरमध्ये पोलिसांकडून लाठीचार्ज

 बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये दाखल झालेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अखेर लाठीचार्ज केला आहे. बदलापूरमधील दोन लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी विरोधात कारवाईच्या मागणीसाठी आंदोलक बदलापूर स्थानकात पोहोचले होते. सकाळपासून आंदोलक रेल्वे स्टेशनमध्ये रुळावर होते. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज केला. 

लडक्या बहिणीच नव्हे तर त्यांच्या छोट्या मुलीदेखील असुरक्षित, बदलापूर प्रकरणावर उद्धव ठाकरे आक्रमक!

मुंबई : आज लडक्या बहिणीच नव्हे तर त्यांच्या छोट्या मुलीदेखील असुरक्षित आहेत. देशात अशा घटना घडता कामा नयेत. आपल्याला दिल्लीतील निर्भया हत्याकांडाचा अनुभव आहे. त्या प्रकरणातील आरोपींवर दोष सिद्ध झाला. पण त्यांना फाशीची शिक्षा द्यायला किती उशीर लागला. अशा घटनेचं राजकारण न करता, अशा प्रकरणांतील आरोपी सुटता कामा नये. सर्ज राजकीय नेते आपले पक्ष, जात-पात सोडून एकत्र आले तर महिला सुरक्षित राहतील. असं घडलं तरच आपण राज्यातली लाडकी बहीण सुरक्षित आहे, असे आपण म्हणू शकतो. 

Badlapur Crime News : बदलापूरमध्ये तणावाची स्थिती, आंदोलक आक्रमक

ठाणे : बदलापूरमध्ये सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. येथे आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत.


Badlapur News Live Today : पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड, शेकडो आंदोलक रस्त्यावर

बदलापूरमध्ये आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत. रेल्वे स्थानक, ज्या शाळेत मुलींवर अत्याचार झाले, त्या शाळेत शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. या शाळेची संपूर्ण तोडफोड करण्यात आली आहे. दुसरीकडे आंदोलकांना पांगवण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड केली जात आहे.

Badlapur News : पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या, जमाव आक्रमक

बदलापुरातील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आंदोलक आक्रमक झाले आहेत. आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा कारवी, अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. पण जमाव अद्याप पांगलेला नाही.

बदलापूर प्रकरणाची सरकारकडून गंभीर दखल, नीलम गोऱ्हे बदलापूरला रवाना, सरकारला अहवाल देणार

बदलापूर प्रकरणाची सरकारकडून गंभीर दखल


कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या नीलम गोऱ्हे कोल्हापूर आणि सांगलीमधील काही कार्यक्रम रद्द करून तातडीने बदलापूरला जाणार


पीडित कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी नीलम गोऱ्हे जाणार


नीलम गोऱ्हे यांच्याकडून घटनेचा अहवाल देखील राज्य सरकारला दिला जाणार


नीलम गोऱ्हे यांची माहिती

Badlapur Bandh : बदलापुरातील आंदोलन चिघळले, आंदोलकांची दगडफेक, शाळाही फोडली!

ठाणे : बदलापूर रेल्वे स्थानकावर जमलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. येथे आंदोलक चांगलेच आक्रमक झाले असून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. सोबतच या ठिकाणी दगडफेकही करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेचे सर्व अपडेट्स 


बदलापुरात आंदोलक आक्रमक, शाळेची तोडफोड, रेल्वे स्थानकावर दगडफेक!

ठाणे : बदलापूरमध्ये आंदोलक आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी ज्या शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला होता, त्या शाळेती तोडफोड केली आहे. तर दुसरीकडे बदलापूर रेल्वे स्थानकावर जमा झालेल्या आंदोलकांनी दगडफेक करत घोषणाबाजी केली आहे. 


बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवणार, आरोपीला कठोर शिक्षा होईल- एकनाथ शिंदे

मी पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. याप्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा होईल. आरोपीला अटक करण्यात आलं आहे. या प्रकरणात मी बाललैंगिक अत्याचाराअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. कर्मचारी कामावर ठेवताना पूर्ण चौकशी करणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित संस्थेवरही कारवाई करण्याचे निर्देश मी देलेल आहेत. या प्रकरणात संस्थाचालकाची चूक असेल तर त्यांचीही चौकशी करायला सांगितले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावरही मी कारवाई करण्याचे सांगितले आहे.

गुन्हेगार मोकाट कारण हे सरकार मोकाट, बदलापूर प्रकरणावर अंबादास दानवे आक्रमक!

बदलापूर घटनेवर अंबादस दानवे आक्रमक


लाडकी बहीण असा उदो उदो करत असताना राज्यात बहिणीवर अत्याचार होत आहेत 


लाडकी बहीणची शो बाजी सरकार करत आहे 


बदलापूर ची घटना निषेधार्य आहे 


गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत याचे मुख्यकारण सरकार मोकाट आहे

महाविकास आघाडीच्या जागावाटपच्या चर्चेला उद्यापासून सुरुवात

महाविकास आघाडीच्या जागावाटपच्या चर्चेला उद्यापासून सुरुवात


महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची उद्या पहिली बैठक 


हॉटेल लीला मध्ये उद्या सकाळी ११ वाजता बैठक होणार 


काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी शरद पवारांकडून जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांचा समावेश 


ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि अनिल परब यांचा समावेश 


मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरेही पहिल्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता 


सूत्रांची माहिती

Shirdi Crime : राहुरी काळया फिती लावून दहाव्याचा विधी; मारेकऱ्यास फाशीची शिक्षा देण्याची मागणी

Shirdi Crime : सोन्याच्या दागिन्यांसाठी 67 वर्षीय वृद्धेचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर मारेकर-यास फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी नातेवाईक आणि  ग्रामस्थांनी काळ्याफिती लावून मुकमोर्चा काढत दशक्रियाविधी केलाय. 13 ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथिल मांजरी शिवारात शेतात पाहणी करण्यासाठी गेलेल्या 67 वर्षीय सुमन सावळेरराम विटनोर यांची सोन्याच्या दागिण्यांसाठी शेजारी राहणाऱ्या 35 वर्षीय संदीप चोपडे या युवकाने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली होती. अवघ्या काही तासात राहुरी पोलिसांनी आरोपीस  गजाआड केले. मात्र घडलेल्या घटनेमुळे परिसरातील महिला मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मयत सुमन विटनोर यांच्या नातेवाईक आणि  ग्रामस्थांनी दशक्रियाविधी आधी मुकमोर्चा काढून  आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केलीय.

संभाजीनगर जळगावला जोडणाऱ्या चाळीसगाव घाटात दरड कोसळली

संभाजीनगर : संभाजीनगर-जळगावला जोडणाऱ्या चाळीसगाव घाटात दरड कोसळली


चाळीसगाव फाटा दरड कोसळल्याने वाहतूक बंद


घटनास्थळी महामार्ग पोलीस दाखल


दरड काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू



रात्री सव्वा नऊ वाजेच्या दरम्यान कोसळी दरड


दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे बंद


संभाजीनगर जळगाव प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी पर्याय रस्ता निवडावा


सकाळी दरड बाजूला केल्याने एक बाजूची वाहतूक सुरू

Mumbai Crime News : मुंबईच्या BKC परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ

Mumbai Crime News : मुंबईच्या बीकेसी परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ


बीकेसी नाल्यात हा मृतदेह आढळून आला आहे


नाल्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती


या व्यकतीची ओळख अद्याप पटलेली नसून त्या मृत व्यकतीच्य हातावर मुकेश असे गोंदवण्यातआले आहे


पोलिस मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar: खराब रस्त्याचा फटका आदिवासी गर्भवती महिलेला

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजी नगरच्या कन्नड तालुक्यातील करंजखेडजवळ महादेव खोरा या वस्तीवर जाण्यासाठी असलेला खराब रस्त्याचा फटका आदिवासी गर्भवती महिलेला बसला. या महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर सुरुवातीला झोळी करून नंतर एका पिकअप व्हॅन मधून तीन किलोमीटरचा प्रवास करून महिला करंजखेड च्या शासकीय रुग्णालयात पोहोचली मात्र रुग्णालयाच्या दारातच तिची प्रसूती झाली. सुदैवाने बाळ आणि बाळंत सुखरूप आहे. मात्र स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतर देखील गाव खेड्यात अजूनही मूलभूत सुविधा पोहोचल्या नाहीत हे या उदाहरणावरून स्पष्ट होतं. 

Mumbai, Thane Rain Updates : मुंबई, ठाण्यात सकाळपासून पावसाची संततधार

Mumbai, Thane Rain Updates : मुंबई, ठाण्यात सकाळपासून पावसाची संततधार


काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि उपनगरांत पावसाचं पुनरागमन

Beed News : बीडच्या धारुर तालुक्यातील चोरांबा येथे नदीला पूर

Beed News : आज झालेल्या दमदार पावसानंतर बीड जिल्ह्यातील धारूर च्या चोरंबा नदीला पूर आला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर दमदार पाऊस बरसल्यानंतर मध्यंतरी मोठा खंड पडला होता मात्र आता पुन्हा जोरदार पावसाने कमबॅक केल्याने बळीराजा सुखावला आहे..धारूर तालुक्यातील चोरांबा येथे मुसळधार पाऊस पडल्याने येथील नदीला पूर आला आहे. या पावसामुळे चोरंबा ते चिंचवड रस्ता सुद्धा वाहून गेला आहे


 
Mahila Police Bharti : महिला पोलीस भरतीसाठी पावणेतीन लाख अर्ज

Mahila Police Bharti : राज्यात महिला पोलीस भरतीसाठी यावेळी 3924 पदांसाठी पावणेतीन लाखांहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी एक लाखाहून अधिक महिला उमेदवार उच्चशिक्षित आहेत. मुंबईला सर्वाधिक पसंती असून एक लाखांहून अधिक महिलांनी मुंबई पोलीस दलातील भरतीसाठी अर्ज केले आहेत.

Pune News : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अटक आरोपींच्या जामीन अर्जावर पुणे सत्र न्यायालय आज निर्णय देणार

Pune News : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अटक आरोपींच्या जामीन अर्जावर पुणे सत्र न्यायालय आज निर्णय देणार आहे. दारुच्या नशेत पोर्शे कार चालवून दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यासाठी ससुन रुग्णालयात या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. या प्रकरणी अल्पवयीन मुलाचे आईवडील विशाल आणि शिवानी अग्रवाल यांच्यासह ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हलनुर यांच्यासह अशपाक मकानदार आणि अमर गायकवाड हे आरोपी आहेत. या सहा आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद पूर्ण केला असुन सरकारी वकीलांचा युक्तिवाद देखील पुर्ण झालाय. त्यावर न्यायालय आज निर्णय देणार आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking 20th August 2024 Marathi News LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहा फक्त एबीपी माझावर...


1. मुंबईमध्ये षण्मुखानंद सभागृहात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त संकल्प मेळाव्याचे आयोजन, यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित राहणार.


2. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर, संध्याकाळी सात वाजता राज ठाकरे विदर्भ एक्सप्रेसने नागपूरला रवाना होणार.


3. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यसभेसाठी आज आपला उमेदवार जाहीर करण्याची शक्यता, राज्यसभेच्या 2 जागांपैकी एक भाजप आणि एक राष्ट्रवादी लढणार. राष्ट्रवादीकडून नितीन पाटील यांना ही जागा मिळण्याची शक्यता.


4. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची भूमिका, ते मराठा आरक्षणाला विरोध करतायत असं म्हणणं चुकीचं, मुख्यमंत्री शिंदेंचं स्पष्टीकरण. 


5. मी नेहमीच मुख्यमंत्री शिंदेंच्या पाठीशी, त्यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या एकाही निर्णयात मी आडकाठी आणली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर पदाचा राजीनामा देईन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.