Maharashtra Breaking LIVE : हार्बर रेल्वेचा खोळंबा, विद्युत पुरवठा होत नसल्याने लोकल रखडल्या

Breaking News Live Updates : महाराष्ट्र, देश-विदेशातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 02 Sep 2024 01:58 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking 2 September LIVE: सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज...More

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी, उद्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन 

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे या मागणीसाठी उद्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन 


महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीकडून आंदोलनाचा इशारा, या समितीत अनेक एसटी कर्मचारी संघटनांचा समावेश 


आंदोलन तीव्र झाल्यास ऐन सणासुदीत कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाण्याच्या तयारीत असल्याने लालपरीची चाकं उद्यापासून थांबवण्याची शक्यता 


कृती समितीतील पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत ७ आॅगस्ट रोजी बैठक झाली होती 


यात विविध मागण्यांवर चर्चा झाली होती, अशात अद्यापही तोडगा निघत नसल्याने संपाचा इशारा