Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, पाहा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी देशमुख कुटुंबीय आज भगवान गडावर जाणार आहेत. यासह देशभरातील विविध बातम्यांचे अपडेट्स...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News Live Updates: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी देशमुख कुटुंबीय आज भगवान गडावर जाणार आहेत. देशमुख कुटुंबीय महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहेत....More
भंडारा: राजकीय व्यासपीठावरून एकमेकांवर चिखलफेक करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या दोघांनी आज एकमेकांची गळाभेट घेत आलिंगन दिलं. भंडारा जिल्ह्याच्या पिंपळगाव इथं शंकरपट शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर होते. यावेळी या दोन्ही नेत्यांनी घेतलेली ही गळाभेट काही वेगळं राजकीय संकेत तर, देत नाही ना, अशी कुजबूज सुरू झालीय.
लातूर: जिल्ह्यात सुरु असलेल्या हमीभावाने सोयाबीन खरेदी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी तालुकास्तरीय पथके गठीत करण्यात आली आहेत. याबाबतचे आदेश लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज निर्गमित केलेत. ही पथके दररोज अचानकपणे प्रत्येक खरेदी केंद्रावर चार वेळा भेट देवून तेथील सोयाबीन खरेदी प्रक्रियेची तपासणी करणार आहेत. राज्य शासनाने सोयाबीन खरेदीला ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली असून, या काळात सोयाबीन खरेदीमध्ये अनियमितता होवू नये, नोंदणीकृत शेतकऱ्यांचे सोयाबीनच खरेदी केली जाईल, यासाठी तालुकास्तरीय पथके उपाययोजना करणार आहेत. तसेच याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्याच्या सूचना या पथकांना करण्यात आल्या आहेत. लातूर जिल्ह्यात सध्या विविध ५२ खरेदी केंद्रांच्या माध्यमातून हमीभावाने सोयाबीन खरेदी केली जात आहे.
इंदापुर: विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा इंदापूरमध्ये भव्य नागरिक सत्कार पार पडलाय. राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, भाजपाचे पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला आहे. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी हा सोहळ्याचे आयोजन केलं होतं. राम शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग इंदापूर तालुक्यात आहे, राम शिंदे यांची नुकतीच विधान परिषदेच्या सभापतीपदी वर्णी लागली आहे त्या पार्श्वभूमीवर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं.
मुंबई : जैन समाजाचे 1952 मध्ये 57 खासदार होते, आता ही संख्या शून्यवर आली असल्यानं जैन समाजानं जास्तीत जास्त सरकारी कामांमध्ये सहयोग देत सरकारमध्ये आपला सहभाग दाखवावा, असे आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे.
राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपालांच्या उपस्थितीत भगवान महावीर स्वामी निर्वाण कल्याणक समितीचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढांनी जैन समाजाला हे आवाहन केले आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 2 येथील पार्किंगमध्ये अपघात झाल्याची घटना
पॅसेजर सोडण्यासाठी आलेल्या मर्सिडिज गाडीवरील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात
अपघातात 5 जणं जखमी, जखमींमध्ये २ झेट रिपब्लिक देशाच्या दोघांचा समावेश, तर ३ जणं विमानतळावरील क्रू मेंबर असल्याची पोलिसांची माहिती
जखमींमधील २ परदेशी नागरिकांवर नानवटी रुग्णालयात उपचार सुरू, तर विमानतळावरील जखमी क्रू मेंबरवर कुपर रुग्णालयात उपचार सुरू
सुदैवाने यात कोणतिही जिवीत हानी झालेली नाही
संबधित गाडीही ही नवी मुंबईतील एका हाॅटेलमधून पॅसेजरला सोडण्यासाठी आली होती.
विमानतळ गेट नं १ येथील स्पिडब्रेकरवर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने चालकाने ब्रेक एवजी एक्सिलेटर दाबल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याची पोलिसांची माहिती
या प्रकरणी पोलिसांनी चालकासह गाडी ताब्यात घेतली असून चालकावर सहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या प्रकरणी सहार पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बीड: भगवानगडानंतर देशमुख कुटुंब बीड मधील नारायण गडावर देखील जाणार आहे. महंत नामदेव शास्त्री यांच्या भेटीनंतर नारायण गडावरील महंत शिवाजी महाराज यांची देखील देशमुख कुटुंब भेट घेऊन चर्चा करणार आहे. सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे घेऊन धनंजय देशमुख, वैभवी देशमुख भगवानगडावर दाखल होत आहे.
दौंड: तालुक्यात बहिण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. चुलत भावानेच अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी दौंड पोलिसांनी दोघाजणांना अटक केली आहे. लैंगिक संबंधातून ही पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने ही घटना उघडकीस आली. पीडित तरुणी दौंड तालुक्यातील रहिवासी असून तिच्यावर वायरलेस फाटा आणि पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा येथे आरोपींनी अनेक वेळा अत्याचार केले आहेत. यातील आरोपी पैकी एकाचा दौंड तालुक्यात येथे एक फोटो स्टुडिओ आहे. या स्टुडिओत आणि पीडितेच्या घरी आरोपींनी वेळोवेळी पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. 2024 मध्ये मार्च ते जून दरम्यान हा अत्याचार झाल्याचं फिर्यादीत म्हटल आहे.
- काल सादर झालेल्या अर्थसंकल्पानंतर नाशिकमधील कांदा उत्पादकांमध्ये निराशा ...
- कांद्यावरील 20% निर्यात मूल्य रद्द करतील अशी तरी होती किमान अपेक्षा
- कांद्यावरील महामंडळ स्थापन करण्याची होती मागणी
- अर्थसंकल्पात कांदा उत्पादकांचे नुकसान भरपाई म्हणून कांद्याच्या निधीची तरतूद करण्याची होती मागणी
- कांद्यावर निर्बंध आहेत यावर निर्यात मूल्य याची कुठलीही गरज नाही ...
- कांद्याचे दर पाडण्यासाठी सरकार म्हणून प्रयत्न केले जाते या शेतकऱ्याच्या आर्थिक नुकसानीवर सरकारकडे धोरण नाही- दिघोळे ...
- कांद्यावरील निर्यात शुल्क शून्य करण्याची होती गरज
वाशिमच्या मंगरूळपीर शहरात आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची तक्रार पीडितेच्या पाल्याने केली..या प्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
शाळेतून घरी परत येत असतांना. एका ५० वर्षीय दिव्यांनाग आरोपीने मुलीला रस्त्यावर थांबवून चॉकलेटचे आमिष दाखवून आरोपीने मुलीचे तोंड दाबून जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रारी वरून.पोलिसांनी आरोपीवर बीएनएस कलम ३७६ सह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला. अधिक तपास मंगरूळपीर पोलिसांकडून करत आहे..
आज आरोग्याचा संदेश देत अकोलेकर धाव-धाव धावलेय अन चाललेही.... निमित्त होतंय 'इंडियन मेडिकल असोसिएशन' आणि जिल्हा क्रीडा विभागाने आयोजित केलेल्या तिक्ष्णगत ' आयएमए वॉकथाॅन 2025' स्पर्धेचं... 'मला धावू दे' म्हणत तब्बल दोन हजारांवर अकोलेकर या स्पर्धेत धावलेय. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होतेय आंतरराष्ट्रीय सायकलपटू कर्नल भारत पन्नू आणि माजी ऑलम्पिकपटू बलवंतसिंग….अकोल्यात गेल्या एकोणवीस वर्षांपासून 'इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या वतीने 'अकोला वॉकथोन' स्पर्धेचं आयोजन करण्यात येतंय. आरोग्यासाठी नागरिकांनी धाववावे आणि चालावे यासाठी जनजागृती व्हावी, असा स्पर्धेमागचा उद्देश आहेय. दहा, सहा आणि तीन किलोमीटर अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आलीये. सकाळी साडेसात वाजता 'सिव्हिल लाईनभागातील आय.एम.ए.हॉल' येथून स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवण्यात आलीय. शहराच्या विविध भागांतून या स्पर्धेचा मार्ग होताय. वसंत देसाई स्टेडीयम येथे या स्पर्धेचा समारोप झालाय. या स्पर्धेत धावण्याबरोबर सामाजिक विषयांना वाचा फोडणाऱ्या अनेक मुद्द्यांवर झाक्या आणि संदेशही देण्यात आलेयेत.
पुण्यातील मुंढवा एबीसी रोड परिसरातील एका पब हॉटेलमध्ये दोन गटात् फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतचा एक व्हिडीवो देखील व्हायरल झाला आहे. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला असून त्यामध्ये चार ते पाच जाणाचे डोके फुटल्याची माहिती आहे. मागील काही दिवसापासून मुंढव्यात वाहने तोडफोड, जबरी चोऱ्या, हॉटेलमधील हुक्का अश्या घटना घडल्या आहेत.
याबाबत कुठलाही गुन्हा अजून दाखल नाही. मुंडवा परिसरात पब मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आज राज्यभरात परीक्षा घेतली जात आहे... वाशिम जिल्ह्यात आज 12 परीक्षा केंद्रावर 4100 विद्यार्थी आज परीक्षा देणार असून त्या साठी 60 पोलीस कर्मचाऱ्यांची बंदोबस्त म्हणून असणार आहे.तर महसूल कर्मचारी मोठ्या प्रमाणात आपला कार्य पार पाडणार आहेत..
शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांच्यासह अन्य तीन जणांवर 10 कोटी खंडणी मागीतल्या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
स्वप्नील बांदेकर हे वसई विरार महापालिकेचे नालासोपारा येथील माजी नगरसेवक आहेत
आकाश पवनकुमार गुप्ता या बांधकाम व्यवसायिकाच्या वरळी येथील आदर्श नगर , सागर दर्शन सोसायटी, येथील प्लॉट नंबर 5 (पार्ट 15) माहीम विभाग, वीर नरिमन नगर वरळी येथील एस आर ए च्या प्रोजेक्ट्स संदर्भात तक्रार करून, त्या केलेल्या तक्रारीत समजोता करण्यासाठी 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या चा आरोप माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांच्यावर आहे.
बांधकाम।व्यावसायिक पवन गुप्ता यांचे सहकार ग्रुप आणि।महावीर ग्रुप नावाने वरळी आणि वसई विरार परिसरात बांधकामचे प्रोजेक्ट सुरू आहेत.
गुप्ता यांच्या बांधकामावर केलेल्या सर्व तक्रारी मागे घेण्यासाठी हिमांशू शहा या माध्यस्था च्या माध्यमातून स्वप्नील बांदेकर यांनी 10 कोटींची मागणी केली. जर दिले नाहीत तर सर्व प्रोजेक्ट बंद पाडू अशी धमकी दिली होती. शेवटी तडजोडी अंती दीड करोड रुपये मध्ये समजोता करून, 25 लाखाचे टप्पे करून देण्याचे ठरले होते.
काल 1 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता मिरारोड येथे भेटून ठरल्या रकमेतील 15 लाख रुपये देण्याचे ठरले असता, नवघर पोलीस ठाणे येथे सापळा रचून ही कारवाही करण्यात आली आहे.
या घटनेत माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर, त्यांचे मित्र किशोर, नितीन आणि मध्यस्थ हिमांशू शहा, यांना पोलिसांनी अटक केले आहे.
नितेश राणे -
महाराष्ट्र राहणाऱ्या कोणत्याही रोहींगिया मुसलमानां आम्ही राहू देणार नाही. मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे.
सध्या राज्यात सर्वत्र बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई सुरु आहे. मात्र पुढील काढत या कारवाईचा वेग अधिक तीव्र केला जाणार असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले
सरकारी यंत्रणेत जे अधिकारी खोटी कागदपत्र करण्यास रोहींगिया मुस्लमानांना मदत करतात त्यांची नाव सरकारकडे आली आहे. त्यांच्यावर पण कारवाई केली जाणार असल्याचे नितेश राणे म्हणाले.
पुणे शहारत गेल्या काही दिवसांपासून गुलेन बारी सिंड्रोम जीबी या आजाराचे रुग्ण हे वाढत आहे.शहरात या आजाराचे १४९ संशयित रुग्ण आढळून आले आहे तर तीन संशयित रुग्णांचा मृत्यू देखील झालं आहे.यामुळे शहरात चिंतेचा वातावरण निर्माण झालं आहे.मात्र अस असलं तरी आज पुण्यातील ससून रुग्णालय येथे गुलेन बारी सिंड्रोम जीबी आजाराचे पाच रुग्णांना एकत्रित डिस्चार्ज देण्यात आलं.यावेळी या रुग्णांना फुलांचा पुष्पगुच्छ देत,पेढे भरवत डिस्चार्ज देण्यात आलं आहे.यावेळी या रुग्णांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळालं.
पुण्यातील ससून रुग्णालय येथे जोबीएस रुग्णांचे २८ रुग्ण असून आज पाच रुग्णांना ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देण्यात आले.यावेळी अधीक्षक डॉ.यलप्पा जाधव,डॉ.रोहिदास बोरसे,डॉ. एच.बी.प्रसाद हे उपस्थित होते.ससून मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार देण्यात येत आहे.यावेळी रुग्ण तसेच रुग्णाच्या नातेवाईकांच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळालं.
गडचिरोलीचे पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवेदनशीलपणा परत एकदा दिसून आला आहे.
गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातील सुनील पुंगाटी या सतरा वर्षीय मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने नागपूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्याच्या आई-वडिलांनी त्याला दाखल केलं
मात्र आई-वडिलांकडे उपचारासाठी पैसे नसल्याने मुलाच्या आईने मंगळसूत्र विकून एक लाख रुपये रुग्णालयाकडे जमा केले, मात्र उपचारासाठी आणखी रक्कम हवी होती. तसेच त्यांना मुलाची देखभाल करत असताना खाण्यासाठी ही पैसे उपलब्ध नव्हते.
एका मेसेज द्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल रात्री ही माहिती समजल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख असलेले रामेश्वर यांना तात्काळ मोफत उपचारासाठी कारवाई करण्याचे निर्देश दिले.
त्यातून भामरागडच्या त्या अतिदुर्गम भागातील सुनील पुंगाटी वर नागपूरच्या खाजगी रुग्णालयात आता पूर्णपणे मोफत आणि चांगले उपचार सुरू आहेत.
तसेच मंगळसूत्र विकून भरलेले एक लाख रुपये ही त्यांना परत मिळणार आहेत..
एका मेसेजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाई करून त्यांच्यातील संवेदनशीलपणा आणि कारवाईसाठी असलेली तत्परता दाखवून दिली आहे.
सातारा ब्रेकिंग..
शिवकालीन वाघ नखं नागपूरला रावांना..
19 जुलै 2024 मध्ये लंडन विक्टोरिया अल्बर्ट म्युझियम येथून वाघ नखं साताऱ्यात आणण्यात आल होत..
तब्बल सात महिन्यांचा कालावधीसाठी ही वाघ नखं साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आली होती..
चार लाख तीस हजार हून अधिक शिवप्रेमींनी या वाघनखांचे दर्शन घेतलं..
आज ही वाघनखं नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयामध्ये निघाले आहेत...
पुरातत्त्व विभागाची टीम, ब्रिटिश अधिकारी देखील यावेळी संग्रहालयामध्ये उपस्थित होती..
भंडाऱ्याच्या पिंपळगाव येथील शंकरपटाच्या शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटनाला राहणार उपस्थित
भंडारा जिल्ह्याचे तीन दिग्गज नेते आज एकत्र येतं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले हे दोघेही आज भंडाऱ्याच्या पिंपळगाव येथील शंकरपट शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित शंकरपट उद्घाटन सोहळा आणि राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी हे दोन्हीही नेते एकत्र येणार आहेत. या सोबतचं नाना पटोले यांचे राजकीय हाडवैरी मानले जाणारे भाजपचे नेते माजी राज्यमंत्री आमदार परिणय फुके हे सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. हे तिन्ही नेते राजकीय मंचावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना बघायला मिळतात. मात्र, आज हे तिन्ही नेते एकत्र येतं असल्यानं त्यांच्या उपस्थितीकडं आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
गडचिरोली : भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुकराम महागु मडावी (46) यांची नक्षलवाद्यांनी शनिवारी रात्री हत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यांना घरातून उचलून नेत गावाला लगत असलेल्या मैदानावर त्यांची हत्या करण्यात आली. मागील काही दिवसांपासून शांत बसलेल्या नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा माजी सभापतीची हत्या करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मृतदेहाजवळ पत्रक देखील टाकले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नंदुरबार:- राज्यात बंदी असलेल्या सुगंधी तंबाखू आणि गुटक्याची तस्करी रोखण्यात पोलिसांना यश...
गुजरात राज्यातून महाराष्ट्रामध्ये येत असलेल्या गुटखा शहादा पोलिसांनी केला जप्त....
24 लाखाचा मुद्देमाल केला जप्त...
महाराष्ट्रात गुटखा बंदी असल्याने गुजरात मधून मोठ्या प्रमाणात नंदुरबारचा सीमा वरती भागातून राज्यभरात केली जाते तस्करी....
शहादा पोलिसांच्या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले....
काँग्रेसच्या प्रदेश युवक कार्यकारी अध्यक्षपदी निवडीने जल्लोष
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच ते कराड येथे आले असता त्यांचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. शिवराज मोरे व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना समाधीस्थळी अभिवादन केले.
आज वसंत पंचमी देवाचा विवाह सोहळा होत असून आजपासून रंगपंचमीपर्यंत म्हणजे पुढील 45 दिवस विठ्ठलाला व रुक्मिणीला पांढरा पोशाख वापरण्यास सुरुवात झाली आहे. यातच आज विठ्ठलाला पांढरी अंगी, उपरणं सोवळ आणि डोक्याची पगडी हे सर्व पांढऱ्या रंगात आहे तर रुक्मिणी मातेलाही पांढऱ्या रंगाची साडी परिधान करण्यात आली आहे. यावर गुलाल टाकण्यात आला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख दुपारी भगवान गडावर दाखल होणार...
भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची घेणार भेट...
नामदेव महाराज शास्त्री यांना काही कागदपत्रे आणि पुरावे देणार...
महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे भगवान गड भक्कमपणे असल्याचे म्हंटले होते...
त्यानंतर धनंजय देशमुख यांच्या भेटीला विशेष महत्व...
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच ते कराड येथे आले असता त्यांचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. शिवराज मोरे व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना समाधीस्थळी अभिवादन केले.
सांगलीत चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य चोरट्यास एलसीबीच्या पथकाने अटक केलीय. या चोरट्यांकडून चार गुन्हे उघडकीस आणून ४ लाख ६७०० रुपयांचा मुद्देमाल एलसीबीने जप्त केलाय. मेहंदी हसन सय्यद असे आरोपीचे नाव असून हा पोलिस रेकॉर्डवरील आंतरराज्य गुन्हेगार आहे. त्याच्यावर मुंबई आणि कर्नाटकात चेन स्नॅचिंग व मोबाइल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. विश्रामबाग आणि मिरज परिसरात त्याने चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले होते.
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्याकडून आयोजित केलेल्या कराड तालुक्यातील सुर्ली येथील बैलगाडा शर्यतीला राज्यभरातील बैलगाड्याचा थरार पहायला मिळाला. चुरशीने झालेल्या बैलगाडा शर्यतीत वाटेगावचा बादल 1 लाखाच्या बक्षीसाचा मानकरी ठरला.
धाराशिव जिल्हा पोलिस दलाच्या वतीने जिल्हाभर अवैध मद्य विरोधी विशेष मोहीम राबविण्यात आली. दरम्यान यामध्ये पोलिसांनी उमरगा, बेंबळीसह धाराशिव शहरात शहरात ही कारवाई केली असुन यामध्ये ९ ठिकाणी कारवाई करत १० हजार ६०० लिटल द्रव जागीच ओतुन नष्ट करण्यात आले तसेच दारु निर्मीतीचे साहीत्य जाळुन नष्ट केले. दरम्यान या प्रकरणी ९ व्यक्ती विरोधात जिल्ह्यातील संबधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप स्वबळावर निवडणुकीत लढवण्याचे संकेत अशोक चव्हाण यांनी दिले होते. त्यावर आता शिवसेने देखील अशोक चव्हाण यांचा टीका केली आहे. त्यांचे स्वबळ असेल तर आमचे पण आहेच तसेच अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही, अशी टीका शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील म्हणाले.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 183 शस्त्र परवाने रद्द झालेत. तर आठ जणांनी स्वतः सरेंडर होत आपली शस्त्रे जमा केली आहेत.
बीड जिल्ह्यात नोंदणीकृत 1281 शस्त्र परवाने आहेत. त्यात 310 प्रस्ताव रद्द करण्यासाठी पाठवण्यात आले. यावर कार्यवाही करत आतापर्यंत 183 शस्त्र रद्द करण्यात आली असून 127 शस्त्र रद्द होणार आहेत.
चंद्रपूर : वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीचा मोरक्या अजित राजगोंड याला झालेल्या अटक प्रकरणात मोठी घडामोड... राजुरा तालुक्यातील निलफडी जंगल परिसरातून वनविभागाने हस्तगत केले वाघाचे अवयव, अजित राजगोंड याने या भागात शिकार केल्याची शक्यता, हस्तगत करण्यात आलेले सर्व अवयव फॉरेन्सिक तपासणी साठी प्रयोगशाळेत करण्यात आले रवाना
उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे कोथरुडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची घेतली भेट.
माजी आमदार चंद्रकांत मोकाटे लवकरच शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार ?
जगभरातील वाईन प्रेमींना प्रतिक्षा असणाऱ्या नाशिकमधील सुला फेस्टला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. संगीताच्या तालावर थिरकणारी तरूणाई.. आकर्षक विद्यतु रोषणाई आणि सोबतीला वाईनचा ग्लास आशा इलेक्ट्रिफाईन वातावरणात सुलाफेस्ट चा पहिला दिवस पार पडला...
नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जलजीवन प्राधिकरणचे अधिकारी गैरहजर राहिल्याने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व विभागाच्या प्रधान सचिवाला फोन लावला...
अधिकाऱ्यांना समज द्या अन्यथा करारवाई करण्याचा इशारा दिला
पालकमंत्री झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पहिली जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलावली होती
त्यात त्यांनी अधिकाऱ्यांना चांगले धारेवर घरले. पैसे घेतल्याशिवाय अधिकारी काम करत नसल्याची भर बैठकीत व्यक्त केली खंत
नागपूर जिल्हा परिषद मध्ये झालेली भ्रष्ट्राचाराची लाचलुचपत विभागाकडून चौकशी करण्याचे संकेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, पाहा एका क्लिकवर