Maharashtra News Live Updates : नाशिकमध्ये भाजपचे माजी नगरसेवक मुकेश सहाणे यांना जीवे मारण्याची धमकी

Maharashtra News Live Updates 19 September 2024 : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर....

प्रज्वल ढगे Last Updated: 19 Sep 2024 02:16 PM

पार्श्वभूमी

मुंबई : सध्या देशात तसेच राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्या दृष्टीन राज्यातील राजकीय पक्षांनी हालचाली चालू केल्या आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती...More

नाशिकमध्ये भाजपचे माजी नगरसेवक मुकेश सहाणे यांना जीवे मारण्याची धमकी

- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापलं..

- भाजपचे माजी नगरसेवक मुकेश सहाणे यांना जीवे मारण्याची धमकी

- दोन दिवसात जीवे मारण्याचा आला धमकीचा फोन
- विजय गायकवाड या नावाने आला धमकीचा फोन

- संशयिता विरोधात नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- उबाठा जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा मुकेश सहाणे यांचा आरोप