Maharashtra News Live Updates : ऐन गणेशोत्सवात पिंपरी चिंचवडमध्ये खुनाचे सत्र, तीन हत्या तर दोन गोळीबाराच्या घटनांनी खळबळ

Maharashtra News Live Updates 18 September 2024 : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर....

प्रज्वल ढगे Last Updated: 18 Sep 2024 03:17 PM
महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात, संजय राऊत ,अनिल देसाई, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड बैठकीसाठी उपस्थित 

महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात 


जागावाटपा संदर्भात महाविकास आघाडीची बैठक 


संजय राऊत ,अनिल देसाई, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड बैठकीसाठी उपस्थित 


महाराष्ट्रातील जागावाटपा संदर्भात होणार बैठकीत चर्चा

ऐन गणेशोत्सवात पिंपरी चिंचवडमध्ये खुनाचे सत्र, तीन हत्या तर दोन गोळीबाराच्या घटनांनी खळबळ

पिंपरी चिंचवड शहरात कायदा अन सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. गणपती विसर्जनादिवशी तर एकाने थेट फिनिक्स मॉलच्या दिशेने गोळीबार केला तर दोघांनी एकाचा गळा चिरून खून केलाय. पत्नीशी प्रेमसंबंध ठेवणाऱ्या प्रियकराचा खून करण्यासाठी पती थेट बिहारहून पुण्यात आल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालंय. यामुळं शहरात खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन खून आणि दोन ठिकाणी गोळीबारासह चोऱ्या-माऱ्यांच्या घटना घडल्यात. वाकडचे पोलीस निरीक्षक एस बी कोल्हटकर यांचे तर गुन्हेगारांवर कोणतीच पकड राहिली नसल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू आहे. दुसरीकडे सर्वसामान्यांचे प्रश्न व्हर्च्युअली सोडविण्याचा विडा हाती घेतलेले पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना वाकडमध्ये काय सुरुये याची कल्पना आहे की नाही? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडलाय. अशातच हिंजवडी पोलिसांच्या हद्दीत बावधनमध्ये आणखी एक खुनाची घटना समोर आलीये. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कायदा-सुव्यवस्थेबाबत पोलिसांवर अनेकदा खरडपट्टी केलेली आहे. पण याचं पिंपरी चिंचवड पोलिसांना काही सोयरसुतक नसल्याचं दिसून येतंय. ऐन गणेशोत्सवात पिंपरी चिंचवडमध्ये घटनांनी हे अधोरेखित केलंय.

सप्टेंबर अखेरपर्यंत महायुतीचे जागा वाटप पूर्ण होणार, सूत्रांची माहिती 

सप्टेंबर अखेर महायुतीचे जागा वाटप पूर्ण होणार 


सध्या 288 जागांबाबत देवेंद्र फडणवीस- अजित पवार, अजित पवार- एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस चर्चा पूर्ण करत आहे 


वन टू वन चर्चा पुर्ण झाल्यानंतर तिन्ही पक्षाचा वतीने काही जागांवर दावा सांगण्यात आला आहे त्याबाबत तिन्ही नेते एकत्रित बसून निर्णय घेणार 


ज्या जागांबाबत एकमत होतं नाही त्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच अंतीम निर्णय घेतील तो सर्व नेत्यांना मान्य असेल 


एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती

सप्टेंबर अखेरपर्यंत महायुतीचे जागा वाटप पूर्ण होणार, सूत्रांची माहिती 

सप्टेंबर अखेर महायुतीचे जागा वाटप पूर्ण होणार 


सध्या 288 जागांबाबत देवेंद्र फडणवीस- अजित पवार, अजित पवार- एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस चर्चा पूर्ण करत आहे 


वन टू वन चर्चा पुर्ण झाल्यानंतर तिन्ही पक्षाचा वतीने काही जागांवर दावा सांगण्यात आला आहे त्याबाबत तिन्ही नेते एकत्रित बसून निर्णय घेणार 


ज्या जागांबाबत एकमत होतं नाही त्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच अंतीम निर्णय घेतील तो सर्व नेत्यांना मान्य असेल 


एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती

महामंडळ जागा वाटपासंदर्भात आज अजित पवार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांशी बोलणार  

महामंडळ जागा वाटप संदर्भात आज सीएमसोबत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस बोलणार 


महामंडळ वाटप करताना भाजपा आणि एनसीपी पक्षाच्या कोट्यातील महामंडळ वाटप लवकर करावे ही भूमिका आहे पण अंतर्गत पक्षात वाद नको यामुळे महामंडळ जागा वाटप करावे का याबाबत आज अजित पवार त्यांच्या नेत्या समवेत संवाद करण्याची शक्यता 


एनसीपी पक्षाच्या कोट्यात असलेल्या   महामंडळांचे वाटप  लवकर करावे यासाठी अजित पवार ही आग्रही

भिवंडी शहरात विसर्जनादरम्यान घडलेल्या घटनेचा आमदार रईस शेख यांच्याकडून निषेध

भिवंडी शहरात काल विसर्जनादरम्यान घडलेल्या घटनेचा आमदार रईस शेख यांनी निषेध केला असून काही समाजकंटकांकडून भिवंडीचा वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे, यामध्ये राजकीय सूडबुद्धीने हा प्रकार केल्याचा वास येत असल्याचे शेख यांनी सांगितले. तर अफवांवर विश्वास ठेवू नये असा नागरिकांना आवाहन करण्यात आला आहे. दरम्यान आज ईद मिलादुन्नबी निमित्त शहरातून मिरवणूक निघणार आहे. त्यामुळे आम्ही सर्व या मिरवणुकीदरम्यान दाखवून देऊ की आम्ही सर्वधर्मीय एक आहोत. एक आहोत.  मात्र काही नेते मंडळी ट्विट करून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत; त्यांना विनंती आहे की त्याने असे करून भिवंडी शहरातील वातावरण खराब करू नये, असे रईस शेख म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार 21 सप्टेंबरला 1 दिवशीय कोकण दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार 21 सप्टेंबरला 1 दिवशीय कोकण दौऱ्यावर


चिपळूण मध्ये अजित पवार यांची सभा पार पडणार 


अजित पवार यांच्यानंतर दोनच दिवसात शरद पवार यांची देखील कोकणवारी 


शरद पवार 23 आणि 24 तारखेला कोकण दौऱ्यावर 


विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार कोकणात आढावा घेणार असल्याची सूत्रांची माहिती

25 तास उलटूनही पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अद्याप सुरूच

25 तास उलटूनही पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अद्याप सुरू 


अजूनही पुण्यातील लक्ष्मी रोड,केळकर रोड,टिळक रोडवर मंडळांची मिरवणूका सुरूच 


कुमठेकर रोड वरील मिरवणुका संपल्या


लवकरात लवकर मंडळ पुढे काढण्यासाठी पुणे पोलीस करत आहेत प्रयत्न

काल रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या गोंधळानंतर आज भिवंडीत वातावरण शांत 

भिवंडी अपडेट 


काल रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या गोंधळानंतर आज भिवंडीत वातावरण शांत 


काल भिवंडीतील वंजारपट्टी नाका इथे गणपती विसर्जनाच्या वेळी अज्ञात इसमाने मूर्तीवर दगडफेक केल्याचा आरोप हनुमान मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला, 


त्यानंतर याच ठिकाणी कार्यकर्ते आणि काही संघटना यांनी ठिय्या आंदोलन केले होते, 


मात्र हाणामारी आणि आंदोलन मोठे होत असल्याने पोलिसांना शेवटी सौम्य लाठीचार्ज करावा लागला, 


त्यांनतर पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केले आहेत, सीसीटिव्ही तपासून अज्ञान व्यक्ती आणि मारहाण करणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे, 


मात्र आज ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा या परिसरात पोलीस बंदोबस्त दिसून येतोय, सर्व भागात पोलिसांचे पथके आहेत, परिस्थिती देखील नियंत्रणात आहे,

काल रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या गोंधळानंतर आज भिवंडीत वातावरण शांत 

भिवंडी अपडेट 


काल रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या गोंधळानंतर आज भिवंडीत वातावरण शांत 


काल भिवंडीतील वंजारपट्टी नाका इथे गणपती विसर्जनाच्या वेळी अज्ञात इसमाने मूर्तीवर दगडफेक केल्याचा आरोप हनुमान मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला, 


त्यानंतर याच ठिकाणी कार्यकर्ते आणि काही संघटना यांनी ठिय्या आंदोलन केले होते, 


मात्र हाणामारी आणि आंदोलन मोठे होत असल्याने पोलिसांना शेवटी सौम्य लाठीचार्ज करावा लागला, 


त्यांनतर पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केले आहेत, सीसीटिव्ही तपासून अज्ञान व्यक्ती आणि मारहाण करणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे, 


मात्र आज ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा या परिसरात पोलीस बंदोबस्त दिसून येतोय, सर्व भागात पोलिसांचे पथके आहेत, परिस्थिती देखील नियंत्रणात आहे,

वैजापूर विधानसभा मतदारसंघात पैसे घेऊन उद्धव ठाकरे उमेदवार देणार होते, आमदार रमेश बोरनारे यांचा गंभीर आरोप 

छत्रपती संभाजीनगर ब्रेकींग


शिंदे गटाच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप 


2019 मध्ये पैसे देऊन उमेदवारी दिली जाणार होती 


वैजापूर विधानसभा मतदारसंघात पैसे घेऊन उद्धव ठाकरे उमेदवार देणार होते 


आमदार रमेश बोरनारे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप 


बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना उलट टांगले असते, अशीही केली टीका 


तीन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी वैजापूरमधील सभेतून बोरनारेंवर केली होती टीका

विरारमध्ये गणपती  विसर्जन करताना गणेश भक्ताचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

विरार : विरार मध्ये गणपती  विसर्जन करताना गणेश भक्ताचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 


अमित सतीश मोहिते ( वय 24) असे मृत्यू झालेल्या गणेश भक्ताचे नाव असून, विरार पूर्व फुलपाडा परिसरातील तो राहणारा होता. 


विरार पूर्व तोटले तलावात आज पहाटे साडे तीन वाजता ही दुर्दैवी घटना घडली आहे.



गणपती विसर्जन करताना, पाण्यात तरुणाला  फिट येऊन तो पाण्यात बुडाला,  आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.


विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने फुलपाडा परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 सप्टेंबर रोजी अमेरिका दौऱ्यावर जाणार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ सप्टेंबर रोजी अमेरिका दौऱ्यावर जाणार 


तिथे ते क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभाग घेणार आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर असतील, जिथे ते क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत आणि संयुक्त राष्ट्रांच्या 'समिट ऑफ द फ्युचर' मध्ये सहभागी होतील.


क्वाड नेत्यांची चौथी शिखर परिषद ही मोदींच्या अमेरिका दौऱ्यातील सर्वात महत्त्वाची बैठक ठरेल, अशी अपेक्षा आहे.


तिन्ही दिवसांच्या या दौऱ्यात मोदी २२ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी सांगितले.

राहुल गांधींवर वादग्रस्त विधान केल्याने दिल्लीत काँग्रेसकडून संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दाखल

काँग्रेस पार्टीने शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात लोकसभेतील विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त टिप्पण्यांबाबत तक्रार दाखल केली आहे. 


काँग्रेस पार्टीचे कोषाध्यक्ष अजय माकन यांनी तुघलक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 


काँग्रेस पार्टीने भाजपाच्या चार नेत्यांविरुद्ध सुद्धा तुघलक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


राहुल गांधी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टिप्पण्या संदर्भात ही तक्रार करण्यात आली आहे.


केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू, तरविंदर मारवाह यांच्यासह भाजपच्या दोन अन्य नेत्यांचे नावही तक्रारीत समाविष्ट करण्यात आल्याचे समजते

महाविकास आघाडीची दुपारी एक वाजता बैठक, जागा वाटपावर पुन्हा एकदा चर्चा  

महाविकास आघाडीची दुपारी एक वाजता बैठक 


 गणेशोत्सव नंतर जागा वाटपावर पुन्हा एकदा महाविकास आघाडी चर्चा करणार 


महाविकास आघाडीचे मुंबईचे जागावाटपावर आज अंतिम चर्चा होणार असल्याची माहिती 


 मुंबई सोबत महाराष्ट्रातील इतर जागांवर सुद्धा महाविकास आघाडीचे नेते चर्चा करणार

उमरेड विधानसभा मतदारसंघावरून शिंदे गट व भाजपा आमनेसामने

उमरेड विधानसभा मतदार संघावरून शिंदे गट व भाजपा आमने सामने..


सीटिंग आमदार शिंदे गटाचा असल्याचा दावा माजी आमदार सुधीर पारवे यांनी केला अमान्य..


राजू पारवे हे उमरेड विधानसभेतून शिंदे गटाचा नाहीतर काँग्रेसचा सीटींग आमदार होते , त्यामुळे भाजपने शिंदे गटाचा दावा अमान्य असल्याचे सुधीर पारवे यांनी सांगितले


माजी आमदार सुधीर पारवे हे भाजपच्या तिकिटावर उमरेडमधून निवडणूक लढण्यावर ठाम


त्यामुळे उमरेड विधानसभेवरून शिंदे गट व भाजपा आमनेसामने पाहायला मिळत आहे


यासंदर्भात सुधीर पारवे यांच्या सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.

लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत भाविकांच्या मौल्यवान वस्तू चोरीला, तीन स्वतंत्र चोरीचे गुन्हे दाखल  

लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत भाविकांच्या मौल्यवान वस्तू भूरट्या चोरांकडून चोरीला


कुणाचे मौलयवान दागिने तर व्हिडिओग्राॅफी करण्यासाठी आलेल्या तरुणाचा गर्दीत महागडा कॅमेरा चोरला


आतापर्यंत तीन स्वतंत्र गुन्हे चोरीचे दाखल झाले 


एका गुन्ह्यात ४ लाख ५० हजारांचे मौलेयवान दागिने महिलेचे चोरीला गेले आहेत


तर दुसर्या गुन्ह्यात गळ्यातील मंगळसूत्र चोराताना दोन महिलांना ताब्यात घेतले आहे

बांगलादेशमधील हिंदुंवर अत्याचार सुरु असताना भारत बांगलादेशात क्रिकेट सामने खेळायला जाऊ नका- हिंदू जनजानगृती समिती

बांगलादेश मधील हिंदूवरील अत्याचार सुरु असताना भारत बांगलादेश क्रिकेट सामने खेळवले जाऊ नका 


हिंदू जनजानगृती समितीची बीसीसीआयकडे मागणी 


हिंदू जनजागृती समितीकडून बीसीआयसीआयला निवेदन सादर 

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर आज न्यायालयात सुनावणी 

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण आाज होणार सुनावणी 


१८ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी


मागील आठवड्यात चीफ जस्टीस नसल्यामुळे आणि इतर केसेसमुळे सुनावणी झाली नव्हती.


आाज इतर महत्त्वाच्या केसेस आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाच्या वकीलांना प्रकरण मेन्शन करावी लागेल तरच सुनावणीसाठी बोर्डावर येण्याची शक्यता.

नाशिकमध्ये गणपती विसर्जनाला गेलेल्या दोन युवकांचा वालदेवी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू 

- नाशिकमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट
- गणपती विसर्जनाला गेलेल्या दोन युवकांचा वालदेवी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू 
- नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील घटना
- ओंकार गाडे आणि स्वयंम मोरे अशी दोघा मृत युवकांची नावं
- दोघे जण संध्याकाळी मित्रांसोबत गणपती विसर्जनासाठी गेले असता नदीपात्रातील एका खड्ड्यात पडले
- मात्र अग्निशमन दल तसच मदत पोहचेपर्यंत दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता
-  अथक प्रयत्नानंतर रात्री उशिरा अग्निशमन दलाने दोघांचेही मृतदेह बाहेर काढले
- ओंकार शहरातील केटीएचएम महाविद्यालय तर स्वयंम अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता

गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरूणाचा घाणेगाव येथील तलावात बुडून मृत्यू

गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरूणाचा घाणेगाव येथील तलावात बुडून मृत्यु 


मित्रांसोबत गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणाचा घाणेगाव येथील तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू.


अभय सुधाकर गावंडे असं तरुणाचे नाव आहे.


रांजणगाव येथील चार तरुण गणपती विसर्जनासाठी घाणेगाव येथील तलावाजवळ गेले होते.


चौघे जण गणपती घेवून तलावात उतरले यावेळी अभय हा पुढे होता.


अभय यास तलावातील खोलगट पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला.

पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला 23 तास पूर्ण, आतापर्यंत 99 गणपती मंडळे अलका चौकातून पुढे गेली..

पुण्यात डीजेचा दणदणाट


पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला 23 तास पूर्ण होतील


आतापर्यंत 99 गणपती मंडळे अलका चौकातून पुढे गेली..


लक्ष्मी, कुमठेकर आणि टिळक या तिन्ही रस्त्यावरून मंडळे अलका चौकात येत आहेत


पोलिस ऍक्शन मोडवर पटापट मंडळे पुढं घेण्याचे मंडळांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी नागपूरात काल महाप्रसादाचं आयोजन

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी नागपूरात काल महाप्रसादाचं आयोजन


- भाजप नेत्या निलीमा बावणे यांच्याकडून मोदी यांच्या जन्मदिनी महाप्रसादाचं वितरण


- गणेश विसर्जन आणि मोदी यांच्या जन्मदिनाचा मुहुर्त साधत महाप्रसादाचं वितरण


- नागपूरातील रामनगर भागात निलीमा बावणे यांच्या
कार्यकर्त्यांनी केलं महाप्रसादाचं वितरण

पार्श्वभूमी

मुबंई : राज्यात गणरायाचे मोठ्या थाटामाटात विसर्जन करण्यात आले. राज्यात सध्या भावसाने दडी मारली आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका रत आहेत. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.