= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Amravati News : रिमझिम पावसात लाडक्या बहिणी पैसे काढायला रांगेत Amravati News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये महिलांच्या खात्यात यायला सुरुवात झाली आहे. तेच पैसे काढण्यासाठी आता बँकेत आणि पोस्ट ऑफिसमध्ये महिलांची एकच गर्दी पाहायला मिळत आहे. अमरावती शहरातील श्याम चौक येथील स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रावर तर रिमझिम पावसात महिलांच्या रांगा लागल्या आहेत. शहरातील प्रत्येक बँकेत हीच स्थिती पाहायला मिळत आहे. या जोजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींनी सरकारचे आभार मानले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Nanded : नांदेड बंद नागरिकांचा बंदला चांगला पाठिंबा Nanded : बांगलादेश मध्ये हिंदू लोकांवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे नांदेड मध्ये बंदचे आयोजन करण्यात आले सकाळ पासून नांदेड मध्ये नागरिकांनी चांगला पाठिंबा दिल्याचे पाहिला मिळत आहे व्यापाऱ्यांनी आपले आस्थापना बंद ठेवत पाठिंबा दिला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pune News : कोलकत्तातील घटनेच्या निषेधार्थ बारामतीमधील डॉक्टरांनी काढला तहसील कार्यालावर मूक मोर्चा Pune News : कोलकत्यातील वैद्यकीय महाविद्यालयात महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनसह डॉक्टरांच्या संघटनांनी २४ तासांचा बंद पुकारला असून,आज बारामती मधील डॉक्टरांच्या संघटनेने शहरातून तहसील कार्यालयापर्यत मूक मोर्चा काढला.. यावेळी डॉक्टरांच्या संरक्षणार्थ कडक कायद्याची अंमलबजावणी करावी तसेच नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी डॉक्टरांच्या वतीने करण्यात आली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Dhule News : बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी हिंदू समाजाच्या वतीनं धुळे बंदची हाक Dhule News : बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी हिंदू समाजाच्या वतीनं धुळे बंदची हाक देण्यात आली आहे, या धुळे बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून शहरातील मुख्य बाजारपेठ असणारा आग्रा रोड आज पूर्णतः बंद आहे.. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने पोलीस बंदोबस्त देखील परिणाम केला असून नागरिकांनी शांततेत बंद पाळण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शहराच्या विविध भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बाजार समिती देखील बंद ठेवण्यात आली आहे... रिक्षा चालकांनी देखील या बंदला प्रतिसाद देत रस्त्यावर रिक्षा न काढण्याचा निर्णय घेतला असून धुळे बंदला सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे याचा आढावा घेतला आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Sindhudurg: देवगड तालुक्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याची जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद होणार Sindhudurg: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या देवगड तालुक्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद होणार आहे. सिंधुदुर्ग वासियांसाठी ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असून युनेस्कोची एक टीम या महिन्यात विजयदुर्ग किल्ल्याला भेट देऊन पाहणी करणार आहे. त्यानंतर ही घोषणा केली जाणार आहे. जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषीत झाल्यानंतर पर्यटनाला चालना मिळणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Parbhani News : गावातील खराब झालेला रस्ता,पडलेली शाळा,स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी करायचा कुठे? Parbhani News : परभणी जिल्ह्यातील अनेक गावांना जोडणारा रस्ता नसल्यामुळे पावसाळ्यामध्ये या गावकऱ्यांच्या हाल होतात असाच प्रकार परभणी तालुक्यातील सुकापुरवाडी येथे झालाय.गावात यायला जायला रस्ता नसल्यामुळे गावकऱ्यांना बाहेर जाणे येणे बंद झाले आहे.त्याचबरोबर गावाची शाळा पडलीय त्यामुळे मुलांच्या शाळेचा प्रश्नही गंभीर झालाय त्यातच स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यविधी करायचा कुठे असा प्रश्न गावकऱ्यांसमोर पडलाय या सर्वच मूलभूत सुविधा मिळत नसल्याने परभणीततील अक्ख सुकापुरवाडी गावच स्वातंत्र्य दिनापासून गावात उपोषणाला बसल आहे.दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाला प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे उपोषण तीव्र करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Kolhapur News : विधानसभा मतदारसंघात मंडलिक गट हसन मुश्रीफ यांच्यासोबत राहणार; माजी खासदार संजय मंडलिक यांनी दिले संकेत Kolhapur News : विधानसभा मतदारसंघात मंडलिक गट हसन मुश्रीफ यांच्यासोबत राहणार
माजी खासदार संजय मंडलिक यांनी दिले संकेत
मंडलिक गटाने देखील हसन मुश्रीफ त्यांना पाठिंबा दिल्यामुळे समरजित घाटगे याना द्यावी लागणार एकाकी झुंज
हसन मुश्रीफ यांच्या बिद्री येथील कार्यक्रमात माजी खासदार संजय मंडलिक यांनी लावली हजेरी
आम्ही महायुतीचा घटक त्यामुळे कोणासोबत राहणार ही सांगण्याची गरज सुद्धा नाही
संजय मंडलिक यांनी अप्रत्यक्षरित्या हसन मुश्रीफ यांना जाहीर केला पाठिंबा
आधी ठाकरे गटाचे माजी आमदार संजय बाबा घाडगे यांनी हसन मुश्रीफ यांना जाहीर केलाय पाठिंबा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Nagpur News : समृद्धीवरील टोल वाचविण्यासाठी हॉटेल धारकांची रुग्णवाहिकेतून सामानाची वाहतूक Nagpur News : समृद्धी महामार्गावरील टोल वाचावा यासाठी अमरावती जिल्ह्यातील शिवनी जवळील 'महाचाय' या हॉटेलवर स्टॉल धारकाने चक्क रुग्णवाहिकेतून सामानाची वाहतूक सुरू केली आहे. एकीकडे समृद्धीवर अपघात होत असताना रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नसल्याची तक्रार आहे तर दुसरीकडे टोल वाचावा यासाठी हे स्टॉल धारक रुग्णवाहिकेतून आपल्या हॉटेल साठी लागणाऱ्या सामानाची वाहतूक करत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. समृद्धी प्रशासन या स्टॉल धारकांवर कारवाई करेल का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Palghar Earthquake : पालघरचा डहाणू तालुक्यातील पूर्वेचा परिसर भूकंपाच्या धक्क्यानं हादरला; भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल Palghar Earthquake : पालघरचा डहाणू तालुक्यातील पूर्वेचा परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. चारोटी, कासा, गंजाडसह परिसरात पहाटेच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के. पहाटे साडेसहा वाजताच्या सुमारास भूकंपाच्या धक्क्याने परिसर हादरला. भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल. पहाटेच बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Mumbai News : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील विमानात ज्वलनशील पदार्थ नेल्याप्रकरणी चौघांना अटक Mumbai News : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय (T2) विमानतळ येथील विमानात ज्वलनशील पदार्थ नेल्याप्रकरणी चौघांना अटक
चारही आरोपींनी ज्वलनशील हायड्रोजन स्पीरीट नावाचे द्रव्य विमानात घेऊन आल्याचे तक्रारीत म्हटले आहे
शुक्रवारी हे चौघं 10.30 च्या सुमारास विमातळ टर्मिनल 2 येथील येथून मुंबई ते अदीसअबाब या विमानातून हे ज्वलनशील पदार्थ नेत असल्याचा आरोप
या प्रकरणी समीर बिश्वास, बिश्वुभाई उर्फ विश्वनाथ सेंगुतर, नंदन यादव, अखिलेश यादव, सुरेश सिंग यांच्यावर सहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलकरून त्यांना अटक केली आहे.
या प्रकरणी अधिक तपास सहार पोलिस तपास करत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Powai News : पवई येथील मोरारजी नगर परिसरातील साकी विहार रस्त्याजवळील 5 फूट खोल खड्ड्यात आढळले मगर Powai News : पवई येथील मोरारजी नगर परिसरातील साकी विहार रस्त्याजवळील 5 फूट खोल खड्ड्यात आढळले मगर
रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेल्फेअर या प्राणी संघटनेचे कार्यकर्ते आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘मार्श’ प्रजातीच्या 4.6 फुटांच्या नर मगरीची सुटका केली.
साकी विहार रस्त्याजवळील खड्ड्यामध्ये मगर असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांकडून मिळाली
त्यानंतर संघटनेचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी बचाव कार्य करत मगरीची सुटका केली
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Udaipur Violence: राजस्थानच्या उदयपूरमध्ये शाळकरी मुलांच्या भांडणावरून मोठा हिंसाचार Udaipur Violence : राजस्थानच्या उदयपूरमध्ये शाळकरी मुलांच्या भांडणावरून मोठा हिंसाचार झाला. दोन धर्मांच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला, त्यातून एकानं दुसऱ्यावर चाकूहल्ला केला. यामध्ये पोलिसांनी मुलाच्या वडिलांना अटक केल्यावर निदर्शनं सुरू झाली. काही वेळातच ही निदर्शनं हिंसक झाली, ज्यामध्ये एका मॉलची तोडफोड करण्यात आली, तसंच एका गॅरेजमधील वाहनांना आग लावण्यात आली. पोलिसांनी लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Navi Mumbai : अटल सेतूवरुन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; न्हावा शेवा वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला वाचवण्यात यश Navi Mumbai : मुंबई आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवरून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका महिलेला वाचवण्यात न्हावा शेवा वाहतूक पोलिसांना यश आलं. ही महिला मुलुंडची असून, तिनं संध्याकाळी सातच्या सुमारास अटल सागरी सेतूवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मुंबईकडून नवी मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर घडली. वाहतूक पोलिसांच्या सेवेतील ललित शिरसाट, किरण म्हात्रे, यश सोनवणे आणि मयूर पाटील यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्या महिलेचं मन वळवून तिला वाचवण्यात यश मिळवलं.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra News : 'वाळवी' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची छाप Maharashtra News : 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. आट्टम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठी कलाकृतींनी विजेत्यांच्या यादीत आपले स्थान पटकावले आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार 'वाळवी'ला देण्यात आला. त्याशिवाय, सचिन सूर्यवंशी दिग्दर्शित 'वारसा' या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम कला/सांस्कृतिक चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार, सिने अभ्यासक अशोक राणे यांच्या मुंबईतील गिरण्यांवरील माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय.. तर 'कंतारा' चित्रपटासाठी ऋषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुुरस्कार जाहीर करण्यात आला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Mumbai Crime : मुंबई विमानतळावर शॅम्पूच्या बाॅटलमधून अंमली पदार्थांची तस्करी Mumbai Crime : मुंबई विमानतळावर शॅम्पूच्या बाॅटलमधून अंमली पदार्थांची तस्करी महिलेला DRIनं अटक केली आहे. आरोपी महिला ही नैरोबीहून मुंबईसाठी प्रवास करत होती. DRI ने तिच्या सामानातून अंमली पदार्थांनी भरलेल्या शॅम्पूच्या दोन बाटल्या हस्तगत केल्या. या बाटल्यांमध्ये कोकेन आणि एका विशिष्ठ रसायनाचं मिश्रण आढळलं, याची बाजारात किंमत तब्बल 20 कोटी एवढी आहे.