Maharashtra Breaking 16th July LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Maharashtra Breaking 16th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 16 Jul 2024 09:38 AM
Thane : ठाणे करांना स्वाइन फ्लूचा धोका; रुग्णालय प्रशासन सज्ज

Thane News : ठाणे करांना स्वाइन फ्लूचा धोका, गेल्या आठवड्यात होते 70 रुग्ण, या आठवड्यात रुग्णांची संख्या 113 वर पोहोचली आहे. 


छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सज्ज झालं आहे. 19 खाटांची करण्यात आली आहे विशेष व्यवस्था केली असून त्यापैकी सहा बेड हे आयसीयूचे आहेत. स्वाईन फ्लूचे लक्षण आढळून आल्यास घाबरून न जाता तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Sindhudurg News : महाराष्ट्र गोवा आंतरराज्य प्रकल्प असलेल्या तिलारी धरण ओव्हर फ्लो, उत्तर गोव्याची पाण्याची चिंता मिटली

Sindhudurg News : महाराष्ट्र गोवा आंतरराज्य प्रकल्प असलेल्या तिलारी धरण ओव्हर फ्लो, उत्तर गोव्याची पाण्याची चिंता मिटली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग मधील तिलारी धरणा ओव्हर फ्लो झालं असून सांडव्यातुन पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धरणाच्या चारही दरवाजातून विसर्ग सुरू झाला असून 46.38 क्युमेक्स पाणी तिलारी नदी पात्रात जात आहे. धरणाची सांडवा पाणी पातळी 106.70 मीटर झाल्याने पाण्याचा विसर्ग होत आहे. तिलारी धरण ओव्हर फ्लो झाल्याने उत्तर गोव्याची पाण्याची चिंता मिटली असून धरणाचे पाणी उत्तर गोव्यातील बिचोली, पेडणे आणि बर्डेझ या तीन तालुक्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या चिंता मिटली आहे. तिलारी धरणाच्या सांडव्यातून बाहेर पडलेले हे पाणी पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीला येऊन मिळते. शिवाय तेरवण मेढे उन्नेयी बंधाऱ्यातून विसर्ग होणारे पाणीदेखील तिलारी नदीपात्रात येऊन मिळत असल्याने तिलारी नदी पात्रातील पाण्यातही कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Traffic From Thane To Vikhroli Is Slow: ठाणे ते विक्रोळी दरम्यान वाहतूक संथगतीने तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी 

Traffic From Thane To Vikhroli Is Slow: ठाणे ते विक्रोळी दरम्यान वाहतूक संथगतीने तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी 


आनंद नगर टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा 


इस्टर्न एक्सप्रेस हायवे वर खड्डे पडल्याने आणि विकास काम सुरु असल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर होतं असल्याचा चित्र

Dhule News : पिक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी, मुदतवाढ मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी

Dhule News : शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची सेतू केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे मात्र दुसरीकडे पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र अर्ज भरण्यास प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे, प्रधानमंत्री पिक विमा योजनेची वेबसाईट वारंवार बंद पडत असून तसेच माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांची गर्दी यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे अर्ज अद्यापही भरले गेलेले नाहीत यामुळे पिक विमा योजनेसाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. धुळे जिल्ह्यात जवळपास 60 हजाराहून अधिक शेतकरी या प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेत असतात, सदरच्या योजनेसाठी अर्ज करण्याची 15 तारीख ही शेवटची देण्यात आली होती मात्र अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता शासनाने मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Bhandara News : जुनी पेन्शन लागू करा, अन्यथा विधानसभा निवडणुकीत राज्य सरकारला जागा दाखवू; शेकडो कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

Bhandara News : जुनी पेन्शन पूर्ववत सुरू करावी, या मागणीला घेऊन भंडाऱ्यात शेकडो कर्मचारी आक्रमक होऊन रस्त्यावर उतरलेत. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जुनी पेन्शन हक्काची या मागणीला घेऊन भंडारा जिल्ह्यातील हजारो कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन बंद केल्यानं ही मागणी मान्य करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. तातडीनं जुनी पेन्शन लागू करावी, अन्यथा विधानसभा निवडणुकीत राज्य सरकारला त्यांची जागा दाखवू, असा इशारा या आंदोलनातून आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनात शिक्षक, आरोग्य विभाग, महसूल कर्मचारी यांचा प्रामुख्यानं समावेश होता.

Yavatmal News : नदीच्या पुरातूनच काढली अंत्ययात्रा

Yavatmal News : यवतमाळच्या कळंब तालुक्यातील जोडमोहा गावातील 75 वर्षीय नीलकंठ भोयर यांचे निधन झाले. सायंकाळी अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. मात्र, स्मशानभूमी नदीच्या दुसऱ्या तीरावर असल्याने देवनाळा नदीच्या पुराच्या पाण्यातून ग्रामस्थांना अंत्ययात्रा काढावी लागली. 


स्मशानभुमीपर्यंत जाण्यासाठी ना रस्ता आहे ना नदीवर पूल अशातच रविवारी रात्रीपासून पडलेल्या पावसामुळे नदी ओसंडून वाहत होती. सायंकाळपर्यंत नातेवाईकांनी पाणी ओसरण्याची वाट पाहिली. परंतु, पर्याय नसल्याने. जिवावर उदार होऊन पार्थिवाला निरोप देण्यासाठी वाहत्या पाण्यातून ही अंत्ययात्रा काढावी लागली. 
Nagpur News : नागपुरात झोपडपट्टी वासियांना मालकी हक्काचे पट्टे वाटप तीव्र गतीनं करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Nagpur News : नागपुरात झोपडपट्टी वासियांना मालकी हक्काचे पट्टे वाटप तीव्र गतीनं करा असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर मनपाशी संबंधित विकास कामांचा आढावा घेतला.


खासगी जागेवरील झोपडपट्टीतील अतिक्रमण धारकांना स्थायी भाडे पट्टे देण्याबाबत शासकीय नियमावली तयार करा असे निर्देश उपमुख्यमंत्री यांनी दिले. शहरातील विकासकाम संथगतीने सुरू असून त्यालाही गती द्या, मनपाची तक्रार निवारण यंत्रणा गतिमान करा असे निर्देश ही फडणवीस यांनी दिले.

NCP Sharad Pawar Demand: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विदर्भात वाढीव जागा हव्या; पवारांचा पक्ष विदर्भात काँग्रेसची डोकेदुखी वाढवणार?

NCP Sharad Pawar Demand: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नागपूरसह विदर्भात विधानसभा निवडणुकीसाठी वाढीव जागांची मागणी केली आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस फक्त काटोल आणि हिंगणा या दोन जागांवर निवडणूक लढवत होती. मात्र आता पवारांच्या पक्षाने काटोल, हिंगणा, उमरेड या ग्रामीण भागातील तीन जागांसह नागपूर शहरातील किमान दोन अशा प्रकारे जिल्ह्यात पाच जागा मागितल्या आहे.. तसेच विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात पक्षाला वाढीव जागांची अपेक्षा असून विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक जागा तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाला देण्यात यावी अशी मागणी ही पक्षाने केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मधील जागा वाटपाचा तिढा आणखी क्लिष्ट होण्याची आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे.. विशेष म्हणजे विदर्भातील 62 जागांपैकी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फक्त 12 जागा लढवल्या होत्या. यंदा मात्र पक्षाने प्रत्येक जिल्ह्यात जागेची मागणी केल्यामुळे काँग्रेसची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

Chandrashekhar Bawankule At Pune : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर

Chandrashekhar Bawankule At Pune : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर


भाजपच्या प्रदेश अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेणार


21 जुलैला अमित शाह यांच्या उपस्थितीत पुण्यात भाजपचं राज्य अधिवेशन


भाजपच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे आढावा घेणार

Maharashtra Politics : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार

Maharashtra Politics : लोकसभेच्या निवडणुकिनंतर ठाकरे गटाचं मिशन विधानसभा.


आदित्य ठाकरेंचे आजपासून विधानसभा निहाय दौरे 

मावळ लोकसभेतील पराभवानंतर आदित्य ठाकरे यांचा आज कर्जत आणि उरण विधानसभेचा दौरा.


आगामी विधानसभेच्या दृष्टीने आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार.


दुपारी 2.30 वाजता कर्जत विधानसभा येथील शेळके हॉल येथे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार, तर सायंकाळी 5 वाजता उरण विधानसभा येथील जे एन पी टी येथील मल्टीपर्पज हॉल येथे उरण विधानसभेतील पदाधिकाऱ्यांशी आदित्य ठाकरे संवाद साधणार आहेत

Harshvardhan Patil on Dhairyasheel Mane: खासदारकीच्या निवडणुकीमध्ये इचलकरंजी मधून धैर्यशील माने यांना अनेक अदृश्य शक्तीनं घेरलेलं : हर्षवर्धन पाटील

Harshvardhan Patil on Dhairyasheel Mane: खासदारकीच्या निवडणुकीमध्ये इचलकरंजी मधून धैर्यशील माने यांना अनेक अदृश्य शक्तीने घेरलं होतं. अदृश्य शक्तीने घेरलं असताना देखील पाकव्याप्त काश्मीर सारख्या इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांनी वादळात देखील दिवा लावलाय. असं वक्तव्य केलंय भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात जातीय तणाव निर्माण करण्यास संभाजीराजे छत्रपती कारणीभूत, तातडीने अटक करावी; मुस्लिम बोर्डच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात जातीय तणाव निर्माण करण्यास संभाजीराजे छत्रपती कारणीभूत 


संभाजीराजे यांना तातडीने अटक करावी


मुस्लिम बोर्डच्या पदाधिकारी यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

IAS Probationers Pooja Khedkar: पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल पोलीस महासंचालकांनी मागवला

IAS Probationers Pooja Khedkar: वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांची पोलिसांनी रात्री उशिरा शासकीय निवासस्थानी भेट घेतली. वाशिमच्या शासकीय विश्रामगृहात पोलिसांनी खेडकरांची भेट घेतली. खेडकरांची पोलिसांनी बंद दाराआड साडेतीन तास माहिती घेतली. वाशिम जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने खुद्द पूजा खेडकर यांनी पोलिसांना काही माहिती देण्याची इच्छा व्यक्त केली होती.. उपविभागीय महिला पोलिस अधिकारी नीलिमा आरज यांच्यासह दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांनी वाशिमच्या  विश्रामगृह इथं पोहचून पूजा खेडकर यांच्याकडून आरोपांसंदर्भात माहिती घेतली. 

Ajit Pawar on Nilesh Lanke : लंके शरद पवारांसोबत का गेले? अजितदादांनी सांगितली इनसाईड स्टोरी

Ajit Pawar on Nilesh Lanke : लोकसभेत पत्नी सुनेत्रा यांना विजयी करण्यात अपयशी ठरलेल्या अजित पवारांनी विधानसभेसाठी मात्र जोरदार कंबर कसली आहे.  गेल्यावेळी जिंकलेल्या 54 जागांशिवाय सर्व म्हणजे 288 जागांचा सर्वे अजितदादांची राष्ट्रवादी करणार आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत स्वतः प्रफुल्ल पटेलांनी पत्रकारांशी गप्पा मारताना ही माहिती दिलंय. गेल्यावेळी भाजपानं जागावाटप करताना प्रत्येकवेळी सर्वेवर बोट दाखवलं होतं. यासंदर्भात अजित पवारांनी त्यांच्या शैलीत टोला मारला आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना हसू आवरणं कठीण झालं. खासदार निलेश लंके शरद पवारांसोबत का गेले? याची इनसाईड स्टोरी देखील अजित पवारांनी गप्पांदरम्यान सांगितली. तर राष्ट्रवादीकडून राज्यापाल नियुक्त आमदारांमध्ये मुस्लिम समाजाला संधी देणार असल्याचंही अनौपचारिक गप्पांवेळी अजित पवारांची म्हटलंय. 

Buldhana News: समृद्धीला भगदाड, मृत्यूला आवताण; दोन आठवडे उलटूनही समृद्धी महामार्ग प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष

Buldhana News: नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग सुरू होऊन जेमतेम एक वर्ष उलटल आहे. मात्र या महामार्गाच्या कामाचा दर्जा आता समोर येत आहे. अनेक ठिकाणी कुठे खड्डे पडले आहेत तर कुठे भेगा पडल्या आहेत. समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉर वरील चॅलेंज 332.6 वरील दोन डोंगरांना जोडणाऱ्या मोठ्या पूलाला गेल्या 15 दिवसापासून मोठ भगदाड पडल आहे . जवळपास दोन आठवडे उलटूनही समृद्धी महामार्ग प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. समृद्धी महामार्ग प्रशासनाला भगदाड पडल्याचे लक्षात आल्यावर प्रशासनाने मुंबईकडे जाणाऱ्या पंधरा दिवसापासून या पुलावरील दोन लेन बंद केल्या असून फक्त एकच लेन सुरू आहे. त्यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहन चालकाला समोर पुलावर एकच लेन सुरू आहे. हे दिसत नसल्याने दररोज अनेक अपघात टाळत आहे. भरधाव येणाऱ्या वाहन चालक हा गोंधळून जात असल्याने या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता आहे . मात्र तरीही समृद्धी महामार्ग गेल्या दोन आठवड्यापासून सुस्त बसलेल आहे. आणि दिवसेंदिवस हे भगदाड मोठे होत आहे. मुंबई कॉरिडोर वरील 332. 6 वरील याच पुलाचे बांधकाम सुरू असताना भला मोठा गर्डर कोसळून अनेक कामगार जखमी झाले होते. आता त्याच पुलाला मोठे भगदाड पडल्याने समृद्धीच्या या पुलावर कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. काल रात्री असाच एक अपघात या ठिकाणी टळला. भरधाव येणाऱ्या ट्रक चालकाला समृद्धीवरील या दोन लेन बंद असून एकच लेन सुरू असल्याचा दिसलं नसल्याने सरळ हा ट्रक एका खाजगी बसला धडकला. मात्र यात कुठलेही नुकसान झालं नसलं तरी मोठ्या अपघाताची शक्यता या ठिकाणी बळावली आहे.

Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत निलंबित तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालीद यांनी फेटाळले आरोप

Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर अपघात प्रकरणावरून आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलायला सुरूवात केल्याचं दिसतंय. या महाकाय होर्डिंग विरोधात रेल्वे पोलीस आयुक्तांकडे 4 तक्रारी आल्या होत्या, त्याची वेळीच दखल रेल्वे पोलिसांनी का घेतली नाही असा सवाल तत्कालीन पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी विचारलाय. तर आम्ही केवळ होर्डिंगबाबत कागदोपत्री कायदेशीर प्रक्रिया केली असंही खालिद यांनी म्हटलंय. तर रेल्वे पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी खालिद यांचे सर्व आरोप त्यांच्या जबाबात खोडून काढले आहेत. खलिद यांनी पोलिस महासंचालक यांची परवानगी न घेता होर्डिंगला परवानगी दिल्याबाबत शिसवेंनी त्यांच्या जबाबात आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच होर्डिंगबाबत आलेल्या तक्रारी या आपल्या निदर्शनास आलेल्या नसल्याचे जबाबाद आणून दिले.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking 16th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...


1. मुंबईसह कोकणात आजही मुसळधार पावसाचा अंदाज, रायगड, रत्नागिरीत रेड तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट


2.  वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांची स्थानिक पोलिसांसोबत तब्बल साडेतीन तास चर्चा, रात्री ११ ते पहाटे दोन वाजेपर्यंत चर्चा झाल्याची माहिती


3. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मागवला पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल, अंबर दिव्याचा वापर आणि आईच्या पिस्तूलबाजीचे तपशील देण्याचे आदेश


4. पूजा खेडकरांचा आणखी एक प्रताप, मेडिकलसाठी प्रवेश घेताना पूर्णत: तंदुरुस्त, वडील क्लास वन असताना मिळवला नॉन क्रिमिलेयरचा दाखला


5. विशाळगडावरील अतिक्रमणावर हातोडा, शिवप्रेमींच्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकारकडून कारवाई, खासदार शाहू महाराज आज करणार विशाळगडाची पाहणी 


6. विधानसभेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी अॅक्शन मोडवर, सर्व 288 जागांचा सर्व्हे करणार, लोकसभेत सर्व्हेवर बोट ठेवणाऱ्या भाजपला अजितदादांचं उत्तर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.