Maharashtra News Live Update :  गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल, 17 रस्ते वाहतुकीस बंद

Breaking News Live Updates : महाराष्ट्र, देश-विदेशातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 17 Sep 2024 06:19 PM
चौथा मानाचा गणपती तुळशी बाग अलका चौकात दाखल

चौथा मानाचा गणपती तुळशी बाग अलका चौकात दाखल झाला आहे. पुण्यातील विसर्जन मिरवणुका यावेळी वेगाने पुढे जाताना दिसत आहेत. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई अलका चौकात दाखल होणार

थोड्याच वेळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती अलका चौकात दाखल होतोय. चार वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्यानंतर दोन तासांच्या आत दगडूशेठ आलका चौकात येतोय. विसर्जन मिरवणुकांना लागणारा वेळ पाहता दगडूशेठचे वेळ पाळणे कौतुकास्पद  असल्याचे बोलले जात आहे. 

पुण्यातील कोंढवा परिसरात वाळू व्यावसायिकावर गोळीबार,  कोंडव्यातील साळवे नगरमधील घटना

पुण्यातील कोंढवा परिसरात वाळू व्यावसायिकावर  गोळीबार.


 कोंडव्यातील साळवे नगर मधील घटना.


पूर्व वैमानस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती.


अज्ञात तरुणांनी दोन ते तीन गोळ्या झाडल्या.


जखमी झालेल्या वाळू व्यवसायिकाला केले रुग्णालयात दाखल.


हल्लेखोरांची ओळख पटली असून, पोलिसांकडून शोध सुरु. 


कोंढवा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून,  अधिकचा तपास सु

आर्थिक व्यवहारातून पुण्यातील उरळी कांचन परिसरात गोळीबार करणाऱ्याला अटक

आर्थिक व्यवहारातून पुण्यातील उरळी कांचन परिसरात गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक बंदूक आणि तब्बल १७५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. शनिवारी पुण्यातील उरूळी कांचनमधील इनामदार वस्ती याठिकाणी एका जणाने त्याच्या बंदुकीतून दोघांवर गोळीबार केल्याची घटना घडली होती. हा हल्ला आर्थिक व्यवहारातून झाल्याचे समोर आलं आहे. दशरथ शितोळे यासह तीन जणांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलीय. या गोळीबारात काळूराम महादेव गोते हे जखमी झाले आहेत. अर्थिक वादातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

भाजप आमदार गिरीश महाजन यांच्या विरोधात शरद पवारांकडून मातब्बर चेहरा रिंगणात 

भाजप आमदार गिरीश महाजन यांच्या विरोधात शरद पवारांकडून मातब्बर चेहरा रिंगणात 


भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार 


खोडपे गिरीश महाजन यांच्या विरोधात जामनेर विधानसभा लढवणार 


शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत खोडपे यांचा शिवस्वराज्य यात्रेदरम्यान प्रवेश होणार 


खोडपे यांची जळगाव जिल्ह्यात मराठा नेता म्हणुन ओळख, एकट्या जामनेर मतदारसंघात मराठा समाजाची तब्बल 1 लाख 40 हजार मतदान 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात 


शरद पवार देखील यात्रेला उपस्थित राहणार 


सूत्रांची माहिती

सोलापुरात गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद निमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकीत लेझर बीम लाईट वापरण्यास बंदी 

सोलापुरात गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद निमित्ताने निघणाऱ्या मिरवणूकीत लेझर बीम लाईट वापरण्यास बंदी 


सोलापूर शहर पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडून प्रखर लेझर बीम लाईट वापरण्यास प्रतिबंध आदेश 


मिरवणुकीत साउंड सिस्टीम सोबत प्रखर बीम लाईट, लेजर लाईट, प्लाज्मा इत्यादीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो


मात्र लाईट्स मुळे मिरवणुकीत सहभागी नागरिकांसह पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या डोळ्यांना इजा होऊन कायमचे निकामी होण्याची शक्यता आहे


या शिवाय लाईट्समुळे डोळे दिपून वाहनचालकांचे देखील अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे निर्बंध असणे आवश्यक असल्याचे आयुक्ताचे मत 


त्यामुळे 15 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर पर्यंत सोलापूर शहरात गणेशोत्सव, ईद ए मिलाद च्या कोणत्याही सर्वजनिक कार्यक्रमात, मिरवणूकीत लेजर बीम  लाईट वापरू नये 


अन्यथा भारतीय न्याय संहिता कलम 233 प्रमाणे कारवाई करणार, पोलीस आयुक्तांचे आदेश

दोन वर्षानंतर मिळणार मांजरा धरणातून पाणी; बीड जिल्ह्यासह लातूर, धाराशिव जिल्ह्याला होणार लाभ, कृषी सिंचन क्षेत्र वाढणार

 


बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई, धारूर आणि लातूर शहरासह कळंब, अन्य छोट्या- मोठ्या गावांचा पाणीपुरवठा असलेला मांजरा प्रकल्प यंदा भरण्याच्या मार्गावर आहे. धरण ८० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहे. त्यामुळे दोन वर्षांनंतर सिंचनालाही पाणी मिळणार आहे. १५ ऑक्टोबरच्या पाणीसाठ्यावर कालवा समितीच्या बैठकीत यावर निर्णय होईल. त्यातून लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील १८ हजार २२३ हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे. 


मांजरा धरण २०२०, २१, २२ मध्ये भरले होते. परिणामी, प्रकल्पाच्या उजव्या, डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे सलग तीन वर्षे शेतीला पाणी मिळाले. २०२२ नंतर प्रकल्प भरला नाही. त्यामुळे शेतीला पाणी मिळाले नाही. यंदा प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहे. ८० टक्क्यांच्या वर पाणीसाठा झालेला आहे. 


रब्बी हंगामासाठी शेतकऱ्याची मागणी आली तर उजव्या, डाव्याकालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत होऊ शकतो. मात्र मागणी नाही आली तर उन्हाळी पिकासाठी पाणी सोडण्याचा निर्णय होईल. यामुळे तीन जिल्ह्यातील १८,२२३ हेक्टर शेतावरील पिकांना पाणी मिळणार आहे.

 गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल, १७ रस्ते वाहतुकीस बंद

 गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल 


आज पाचवाजेनंतर मध्यभागातील प्रमुख १७ रस्ते वाहतुकीस बंद राहणार


 मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीस खुले करून देण्यात येणार आहेत.



पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीचा मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरु होणार 


हे रस्ते राहणार बंद


मिरवणूक सुरू होण्यापूर्वी मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता गणेश रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, बगाडे रस्ता गुरू नानक या रस्त्यांवरील वाहतूक विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत बंद राहणार

मनसेचे वरळीकडे विशेष लक्ष, 21 सप्टेंबरला व्हिजन मनसे जाहीर करणार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी अनेक मतदारसंघाकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केलीय. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील वरळी विधानसभाकडे  विशेष लक्ष देत वरळी व्हिजन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 21 सप्टेंबरला जाहीर केले जाणार आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे असा वरळी मतदारसंघांमधील लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

पॅरोल मागणाऱ्या कैद्यांकडून वारंवार एकाच रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, औरंगाबाद खंडपीठाकडून चौकशीचे आदेश

पॅरोल मागणाऱ्या कैद्यांकडून वारंवार एका विशिष्ट रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात असल्याच्या निदर्शनास आल्याने औरंगाबाद खंडपीठाने चौकशीचे आदेश दिले आहेत.


पॅरोल मागणाऱ्या कैद्याचा अर्जही न्यायालयाने फेटाळला 


अनेक कैदी एकाच रुग्णालयातून आणलेले प्रमाणपत्रे सादर करत असल्याचा नमुना खंडपीठाने नोंदवला.


संभाजीनगरमधील गर्भपात प्रकरणातील कथित आरोपी असलेल्या डॉक्टराकडून हे प्रमाणपत्र दिले जात असल्याचे आले समोर 


कैद्यांकडून आलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पोलिसांनी चौकशी करण्याचे न्यायालयाचे आदेश 


पोलिसांनी चौकशी करून 23 सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश..


 



नाशिकमध्ये 2016 मध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात 2023 मध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेला दोषी कुंदन सुरेश परदेशी याने याचिका दाखल केली होती. परदेशी यांनी जुलै 2024 मध्ये लग्न करण्यासाठी पॅरोलसाठी अर्ज केला आणि नंतर त्यांच्या पत्नीच्या गर्भधारणेशी संबंधित वैद्यकीय समस्यांचे कारण देत मुदतवाढीची विनंती केली.


या साठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्यात आले होते... त्यानंतर कोर्टाने आदेश दिले

पुण्यात गणेश विसर्जन सोहळ्यासाठी साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त

गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे.... पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठकेर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गांवरून मिरवणूक जाणार आहे...मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहर तसेच उपनगरात साडेसहा हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 


कसा असणार पोलीस बंदोबस्त


अतिरिक्त पोलीस आयुक्त : ४


पोलीस उपायुक्त : १०


सहायक पोलीस आयुक्त : २५


पोलीस निरीक्षक : १३५


पोलीस कर्मचारी : पाच हजार ७०९


राज्य राखीव पोलीस दल : एक तुकडी


गृहरक्षक दलाचे जवान : ३९४

पार्श्वभूमी

मुंबई : सध्या राज्यात मोठ्या घडामोडी होत आहेत. कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. दुसरीकडे राज्यात काही भागात पुन्हा एकदा पाऊस परतण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाचीही एकीकडे धूम आहे. पुणे आणि मुंबई यासारख्या महत्त्वाच्या शहरांत गणेश विसर्जनाची तयारी केली जात आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.