Maharashtra News Live Updates : मविआचं जागावाटप आज जाहीर होण्याची शक्यता, संभाव्य फॉर्म्युला 'माझा'च्या हाती
Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Oct 2024 12:28 PM
पार्श्वभूमी
मुंबई : जागावाटपासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांशी चर्चा झालीय. या चर्चेतली मोठी इनसाईड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागलीय. मुख्यमंत्रीपदासाठी भाजपच्या राज्यातल्या नेत्यांनी केलेल्या त्यागाची आठवण अमित शाहांनी मुख्यमंत्री शिंदेंना...More
मुंबई : जागावाटपासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांशी चर्चा झालीय. या चर्चेतली मोठी इनसाईड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागलीय. मुख्यमंत्रीपदासाठी भाजपच्या राज्यातल्या नेत्यांनी केलेल्या त्यागाची आठवण अमित शाहांनी मुख्यमंत्री शिंदेंना करून दिली... जागावाटपाच्या चर्चेत शिंदेंनी मित्रपक्षाला झुकतं माप द्यावं असा आग्रह भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने धरलाय. 'मुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचं पद आहे. ते तुम्हाला देताना आमच्या माणसांनी तेव्हा त्याग केला' असं अमित शाहांनी शिंदेंना सुनावलं. जागावाटपावरून सुरू असलेल्या रस्सीखेचीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हा थेट युक्तीवाद केला अशी माहिती महायुतीतल्या एका वरिष्ठ नेत्याने एबीपी माझाला दिलीय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Mahayuti : महायुतीच्या बैठकीनंतर तीन्ही नेते दिल्लीला जाण्याची दाट शक्यता
Mahayuti : महायुतीच्या बैठकीनंतर तीन्ही नेते दिल्लीला जाण्याची दाट शक्यता आहे. दिल्लीत जागावाटपासंदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी करणार बैठक होणार आहे. बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता आहे. आता पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाण्याची शक्यता आहे