Maharashtra Breaking 15th July LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Maharashtra Breaking 15th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 15 Jul 2024 01:09 PM
महसूल कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप

महसूल विभागाचा आकृतिबंध लवकर मंजूर करावा, नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती मिळावी यासह विविध मागण्यांसाठी आज महसूल कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. वर्ध्यात देखील काम बंद करीत महसूल कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतलाय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देत महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे. यादरम्यान विविध घोषणा देऊन मागण्या मान्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहेय. मागण्या मान्य न झाल्यास यापुढे राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra News: ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद मातोश्रीवर; उद्धव ठाकरे यांची भेटीसाठी दाखल

Maharashtra News: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी अयोध्येत झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर आक्षेप घेतला होता. प्राणप्रतिष्ठा सोहळा शास्त्रानुसार होत नसल्याचं शंकराचार्यांचे म्हणणं होतं. यावेळी शंकराचार्यांच्या या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. 


दुसरीकडे राहुल गांधी यांनी हिंदुत्व आणि हिंसा यासंदर्भात काही दिवसांपूर्वी संसदेत भाषण करताना जो मुद्दा उपस्थित केला होता. त्यालासुद्धा अविमुक्तेश्वरानंद यांनी समर्थन दर्शवलं होतं.

Maharashtra News : मोहरमच्या सवारीत निखाऱ्यावर नाचण्याचा धक्कादायक प्रकार

Maharashtra News : सध्या सर्वत्र मोहरम सुरू आहे.या मोहरमच्या सवारीत अनेक अंधश्रद्धच्या प्रथा पाळल्या जातात. असाच काहीसा धक्कादायक प्रकार नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथे घडला आहे.सरसम येथे सध्या मोहरम निमित्त रात्री गावातून सवारी काढण्यात येत आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात भाविक वेगवेगळ्या अंधश्रद्धच्या प्रथा पाळतात. रविवारी रात्री सरसम येथील भाविक चक्क निखाऱ्यावर नाचत होते.अनेक वर्षांपासून हा प्रकार याठिकाणी सुरू आहे.या निखाऱ्यावर नाचताना अनेकांना ईजा देखील होत असते.परंतु अंधश्रद्धा च्या नावाखाली हे भाविक ईजा झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करतात.दरम्यान 3 सेकंद निखाऱ्यावर पाय ठेवल्यास इजा होत नाही, त्यापेक्षा अधिक काळ पाय ठेवाक्यास इजा होते. हे यामागचे शात्रीय करण आहे.आशा घटनेत अनेक जण जखमी देखील होतात. पण कोणी समोर येत नाही.त्यामुळे आशा अंधश्रद्धा सारख्या प्रथा बंद झाल्या पाहिजेत.अशी मागणी अंनिसचे लक्षीमन शिंदे यांनी केलीय. 

Sangali News : धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण द्या या मागणीसाठी पलूसमध्ये पाच दिवसांपासून उपोषण

Sangali News : धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण द्यावे  या मागणीसाठी पलूस मध्ये पाच दिवसापासून उपोषण सुरू आहे.  धनगर समाजाचे अंकुश पाटील यांनी पाच दिवसापासून  उपोषण सुरु केलेय. त्यांची तब्बेत आता खालावत चालली आहे. मुसळधार पाऊस, थंडगार वारा यामध्ये पाटील आपले उपोषण सुरु ठेवले आहे. आरक्षणासाठी अंकुश पाटील यांनी बुधवारपासून उपोषण सुरु केले आहे. गेल्या चार दिवसापासून मराठा, धनगर सह सर्व समाजातील उपोषणास भेट देऊन पाठिंबा देत आहेत. दिवसभर समाजाच्यावतीने धनगरी ओव्याचा कार्यक्रम होत आहे. सायंकाळी अचानक दमदार पावसाने हजेरी लावल्याने मंडपात सर्वत्र पाणीच पाणी झाले. रात्रभर व दिवसभर झालेल्या पावसातही पाटील उपोषणावर ठाण मांडून बसले होते.धनगर समाज आरक्षणाची लढाई कुठल्याही परिस्थितीत अर्ध्यात सोडणार नाही. सरकारमधील लोकप्रतिनिधीशी सकारात्मक चर्चा झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असे उपोषणकर्ते अंकुश पाटील यांनी म्हटले आहे

Maharashtra Politics : काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा आणि मतांच्या फुटीचा विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका

Maharashtra Politics : काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा  आणि मतांच्या फुटीचा  विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका!


मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्येच पडले होते दोन गट, काँग्रेसच्या विश्वासार्ह आमदारांचा  मतांचा कोटा  नार्वेकर यांच्या बाजूने वळवण्याचा होता ठाकरेंचा आग्रह

 

विधान परिषद निवडणुकीच्या आदल्या रात्री काँग्रेस आणि ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं? आदल्या रात्री नेमकी काय रणनीती बदलण्यात आली?

 

एकीकडे काँग्रेसला मतांच्या फुटीची भीती असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना उर्वरित काँग्रेसचे मतांचा पाठिंबा द्यायचा की जयंत पाटलांना द्यायचा यावर काँग्रेसचे दोन गट निर्माण झाले होते 
Navi Mumbai News: राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षा अल्का लांबा यांच्याकडून मृत महिलेच्या कुटूंबियांची भेट

Navi Mumbai News: शिळफाटा येथे मंदिरातील 3 पुजाऱ्यांनी केलेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्ये प्रकरणी मृत महिलेच्या कुटुंबियांची काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा अल्का लांबा यांनी भेट घेत सांत्वन केलेय. सदर घटना अतिशय दुर्दैवी असून याला पूर्णतः सरकार जबाबदार असल्याची प्रतिक्रिया अल्का लांबा यांनी दिलेय. यासोबतच संपूर्ण काँग्रेस पक्ष याप्रकरणी रस्त्यावर उतरून विधानसभेला घेराव घालणार अथवा मंत्र्यांच्या गाड्या अडवून त्यांना याप्रकरणी जाब विचारत तीव्र आंदोलन करेल असा इशारा देखील अल्का लांबा यांनी दिलाय.

Wardha News: वर्ध्यात आठ बस गाड्या पंढरपूरसाठी रवाना

Wardha News: वर्ध्यात वारकऱ्यांना पंढरपूर येथे पोहचता यावे यासाठी 45 बस फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. सुरुवातीला वारकरी असलेल्या प्रवास्याना गैरसोय झाली, पण उशिरा वर्धा बस स्थानकातून आज पंढरपूर साठी आठ गाड्या सोडण्यात आल्या आहेय. उशिरा का होईना बसेस उपलब्ध झाल्या आणि वारकऱ्यांनी पंढरपूर च्या दिशेने आपला प्रवास सुरू केला आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking 15th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...


1. दरड कोसळल्यानं कोकण रेल्वेला फटका; मुंबईहून कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या 15 तासांपासून रखडल्या


2. दरड कोसळल्याने दिवा-रत्नागिरी पॅसेंजर रद्द, तर मांडवी, जनशताब्दी, तुतारी आणि तेजस अजूनही ट्रॅकवरच, दक्षिणेत जाणाऱ्या गाड्या पुण्यामार्गे


3. रायगड आणि रत्नागिरीसाठी आज रेड अलर्ट, दोन्ही जिल्ह्यांमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, तर चिपळूण बाजारपेठेत शिरलेलं वाशिष्ठीचं पाणी ओसरलं


4. मुंबईतील पावसाने सरासरी हजार मिमीचा टप्पा ओलांडला, जुलै महिन्याची सरासरी अवघ्या 14 दिवसांत पूर्ण 


5. मुंबईला पाणी देणाऱ्या 7 धरणांमध्ये आता 35 टक्के पाणीसाठा, काल एका दिवसात 6 टक्क्यांची वाढ

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.