Maharashtra News Live Updates : महाविकास आघाडीचे जागावाटप उद्या जाहीर केले जाण्याची शक्यता

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 15 Oct 2024 12:30 PM
राष्ट्रवादी पक्षाकडून पंकज भुजबळ यांनी घेतली आमदारकीची शपथ

राष्ट्रवादी पक्षाकडून पंकज भुजबळ यांनी घेतली आमदारकीची शपथ


 

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यरात्री मनोज जरांगे यांची घेतली भेट

जालना - उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मध्यरात्री मनोज जरांगे यांची भेट घेतलीय...


अंतरवाली सराटीत दोघांमध्ये भेट झाली. दोन तास चर्चा झाल्याची माहिती....


अंतरवालीच्या सरपंचाच्या शेतात भेट झाल्याची माहिती...


विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी घेतलेल्या भेटीला महत्त्व प्राप्त झाल आहे....


भेटीमध्ये काय चर्चा झाली याची अद्याप माहिती नाही.

महाविकास आघाडीचे जागावाटप उद्या जाहीर केले जाण्याची शक्यता

महाविकास आघाडीचे जागावाटप उद्या जाहीर केले जाण्याची शक्यता


उद्या महाविकास आघाडी पत्रकार परिषद घेणार 


दिल्लीतील मविआ वर्तुळातून माहिती

दुपारी 12 वाजता 7 आमदारांचा शपथविधी, निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार

दुपारी १२ वाजता ७ आमदारांचा शपथविधी


विधीमंडळतात उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार

बुलढाण्यात निवडणुकीच्या तोंडावर भाजप, मनसेला धक्का

ऐन निवडणुकीच्या तोंडावर बुलढाण्यात मोठे राजकीय उलथापालट बघायला मिळत आहे. बुलढाण्याचे माजी आमदार व भाजपचे जेष्ठ नेते धृपतराव सावळे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष व पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख विठ्ठलराव लोखंडकार यांनी काल सायंकाळी मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला बुलढाणा जिल्ह्यात बळ मिळाल्याचे चित्र आहे.

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. कोणत्याही क्षणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. हीच बाब लक्षात घेता राज्यातील सर्व पक्ष कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे राज्यातील नेत्यांचे इनकमिंग आणि आऊटगोइंग चालू झालं आहे. निवडणुकीची घोषणा लक्षात घेता महायुती सरकारने गेल्या काही दिवसांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मुंबईसारख्या शहरात पावसाने हजेरी लावली आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर.    

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.