Maharashtra News Live Updates : पुण्यात हडपसरमध्ये आगीची घटना, हडपसरमध्ये मगरपट्टा परिसरात भीमाशंकर सोसायटीत आग

Maharashtra News Live Updates : आज घडणाऱ्या राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....  

प्रज्वल ढगे Last Updated: 15 Nov 2024 12:23 PM
पुण्यात हडपसरमध्ये आगीची घटना, हडपसरमध्ये मगरपट्टा परिसरात भीमाशंकर सोसायटीत आग

पुण्यात हडपसरमध्ये आगीची घटना


हडपसर मध्ये मगरपट्टा परिसरात भीमाशंकर सोसायटीला लागली आहे


तिसऱ्या मजल्यावर असलेल्या घरामध्ये आगीची घटना 


आगीचं कारण स्पष्ट 


अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल आग विझवण्याचे काम सुरू

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर


भाजपच्या उमेदवार स्नेहा दुबेंसाठी राजनाथ सिंह मैदानात


वसई विधानसभेसाठी राजनाथ सिंह यांची जाहीर सभा


वसईतील कालिका मंदिर परिसरात राजनाथ सिंह यांची तोफ धडाडणार


उत्तर भारतीय मतांसाठी भाजपची रणनीती

मुंबई वांद्रे येथील MIG क्लब येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा सादर होणार

मुंबई वांद्रे येथील MIG क्लब येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा सादर केला जाणार आहे… महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जाहिरनाम्यातून मनसे आपली भूमिका महाराष्ट्रासमोर मांडणार आहे…. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित केला जाणार आहे… 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेमका या जाहीरनाम्यातून महाराष्ट्राला आणि मतदाराला काय आश्वासन-दावे मांडणार हे काही वेळात समोर येईल

मुंबईच्या पोलीस नियंत्रण कक्षाला बाॅम्ब ठेवल्यााबाबत धमकीचा फोन

मुंबईच्या पोलिस नियंत्रण कक्षाला बाॅम्ब ठेवल्यााबाबत धमकीचा फोन


मुंबईच्या JFA लाॅ फर्म आणि JSA आॅफिस कमला मिल लोअरपरळ च्या कार्यालयात बाॅम्ब ठेवल्याच्या ईमेलने खळबळ


गुरूवारी दुपारी हा धमकीचा मेल लाॅफर्मला आला 



JFA लाॅ फर्मच्या ईमेल आयडीवर फरझान अहमद या ईमेल आयडीवरून हा धमकीचा मेल आला


यात JFA लाॅ फर्मचं कार्यालय आणि बॅलार्ड इस्टेट येथील कार्यालयात बाॅम्ब ठेवल्याचे म्हटले होते


या घटनेची गंभीर दखल घेत कार्यालयातील कर्मचार्याने मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली


या प्रकरणी मुंबई पोलिस अधिक तपास करत आहेत.

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा होणार जाहीरनामा प्रसिद्ध


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे मनसेचा होणार जाहीरनामा प्रसिद्ध


२०१४ मध्ये विकासाची ब्ल्यू प्रिंट सादर केल्यानंतर आज मनसेच्या जाहीरनाम्यात नेमक्या कोणत्या गोष्टी असतील याकडे साऱ्यांचे लक्ष


तसेच मराठी माणूस आणि मराठी अस्मिता याला अनुसरून कोणत्या मुद्द्यांचा जाहीरनाम्यात समावेश होतो का हे पाहणे महत्त्वाचे

महाराष्ट्राच्या विधानसभेत अपक्ष उमेदवारांचा आखडा मोठा, बहुजन समाज पक्षाचे उमेदवार सर्वाधिक

महाराष्ट्राच्या विधानसभेत अपक्ष उमेदवारांचा आखडा मोठा तर बहुजन समाज पक्षाचे उमेदवार सर्वाधिक


२८८ जागांसाठी २०८६ अपक्ष उमेदवार रिंगणात


२०८६ उमेदवारांमध्ये मुख्य पक्षातील किंवा तिकीट पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने बंडखोरी केलेल्यांचा ही समावेश


बहुजन समाज पक्षाकडून २३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात


प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी कडून २०० उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

पार्श्वभूमी

मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2025) पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष पूर्ण ताकदीने प्रचाराला लागले आहेत. या पक्षांचे महत्त्वाचे नेते रोज तीन ते चार सभा घेऊन जास्तीत जास्त लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेतेमंडळी आकर्षक अशी आश्वासनं देत आहेत. महाराष्ट्रातील निवडणूक ही अनेक अर्थांनी महत्त्वाची असल्याने या निवडणुकीत प्रचारासाठी भाजपा आणि काँग्रेस पक्षाचे दिल्लीतील नेतेही येथे सभा घेत आहेत. प्रचारादरम्यान, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या प्रमुख घडामोडींसह तरही राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर....

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.