Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स, वाचा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने विरोधकांनी टीका सुरु केलं आहे.महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह देशभरातील इतर महत्वाचे अपडेट्स
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News Live Updates: ठाकरेंचे कोकणातील महत्वाचे शिलेदार, माजी आमदार राजन साळवी वाजतगाजत शिंदेच्या गोटात सामील झाले. पक्षप्रवेशाच्या सोहळ्यात राजन साळवींनी शक्तीप्रदर्शनाची संधी सुद्धा साधून घेतली. तर उदय सामंत...More
Beed: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही माहितीची सीआयडीला धनंजय देशमुख आणि अश्विनी देशमुख यांच्याकडून खात्री करायची आहे.. म्हणूनच आज दुपारी केज विश्रामगृहातील सीआयडी कार्यालयामध्ये धनंजय देशमुख आणि अश्विनी देशमुख या जाणार आहेत. सीआयडीच्या अधिकाऱ्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही माहिती यावेळी दिली जाणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या होटेल सुका सुखीला भेट दिली आहे. सुका सुखीच्या 2 वर्ष पूर्ण होण्या निमित्ताने राज ठाकरे आज महेश मांजरेकरांचा होटेलला पोहचले आहेत.
पंढरपूर: माघी यात्रेनंतर पंढरपुरात जीबीएसचे दोन संशयित रूग्ण आढळून आल्याने प्रशासन सतर्क झाले असून यानंतर आरोग्य विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. दोन्ही संशयित रूग्ण पंढरपूर शहरातील असून त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जीबीएसचे रूग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाने पंढरपूर शहरात पाहणी सर्वे सुरू केला आहे. सर्वे मध्ये शहरातील 30 हजार कुटुंबातील नागरिकांच्या आरोग्याची माहिती गोळा करण्यात आली आहे. दोन्ही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे शहरातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आव्हान येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर महेश सुडके यांनी केले आहे.
पंढरपूर: माघी यात्रेनंतर पंढरपुरात जीबीएसचे दोन संशयित रूग्ण आढळून आल्याने प्रशासन सतर्क झाले असून यानंतर आरोग्य विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. दोन्ही संशयित रूग्ण पंढरपूर शहरातील असून त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जीबीएसचे रूग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाने पंढरपूर शहरात पाहणी सर्वे सुरू केला आहे. सर्वे मध्ये शहरातील 30 हजार कुटुंबातील नागरिकांच्या आरोग्याची माहिती गोळा करण्यात आली आहे. दोन्ही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे शहरातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आव्हान येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर महेश सुडके यांनी केले आहे.
परभणी: शहरात आज( 15 फेब्रुवारी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडुन कृषी मंत्री कोकाटे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. काल कृषी मंत्री यांनी एक रुपया भिकारी सुद्धा घेत नाही आणि आम्ही एक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांना दिली, असे वक्तव्य केले होते. याचाच निषेध म्हणुन परभणीत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून निषेध केलाय. शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्या बरोबर करणाऱ्या कृषी मंत्र्याना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय.
भंडारा : शहरातून बीटीबी मार्केटसमोरून जाणारा जुना राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय झाला आहे. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होते. हा महामार्ग भंडारा शहरातील सामान्य रुग्णालयाकडं जाणारा मोठा मार्ग आहे. मात्र, या मार्गावरून जड वाहतूक होत असल्यानं मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. परिणामी, अनेकदा छोट्या मोठ्या वाहनधारकांचे अनेकदा अपघात घडले असून वारंवार नागरिकांनी प्रशासनाला निवेदन दिल्यानंतरही त्यांच्याकडून कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळं राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारच्या स्थानिक नेत्यांनी बीटीबी मार्केटसमोर चक्काजाम आंदोलन सुरू केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांनी यात सहभाग घेतलाय.
वाशिम : शहरातील शुक्रवार पेठ भागातील रहिवासी दिपक डाळ यांच्या घराचे बांधकाम सुरू असताना खोदकामात चांदीची नाणी सापडली आहेत. खोदकाम करताना 4 ते 5 फूट खोदल्यावर एक मातीचा गडवा आढळून आला. ज्यामध्ये चांदीची अंदाजे 60 ते 62 नाणी होती. मजुरांनी हा गडवा घरमालक पप्पू सुदाम डाळ यांच्याकडे सुपुर्द केला. घरमालकाने कोणतेही मोह न बाळगता तातडीने पोलिस आणि महसूल विभागाला याबाबत कळविले. महसूल प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन नाणी ताब्यात घेतली आहेत.
परभणी : आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडुन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. काल कृषीमंत्री कोकाटे यांनी एक रुपया भिकारी सुद्धा घेत नाही आणि आम्ही एक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांना दिली, असे वक्तव्य केले होते. याचाच निषेध म्हणून परभणीत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याबरोबर करणाऱ्या कृषीमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय.
रत्नागिरी : उद्धव ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख आणि राजेंद्र महाडिक यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. आज विलास चाळके आणि राजेंद्र महाडिक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
अहिल्यानगर : शहरातील पत्रकार चौकात चेंबरच्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू झालाय. महापालिकेच्या अग्निशामक विभागाने रात्री उशिरा अज्ञात इसमाचा मृतदेह बाहेर काढला. ठिकठिकाणी खोदलेल्या खड्ड्यांवर झाकण नसल्याने हा अपघात घडला. नगर - मनमाड राज्य महामार्गाच्या रस्त्याचे काम सुरू असून ठेकेदाराच्या हलगर्जीपणमुळे मृत्यू झाला आहे. शिवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गडचिरोली : सध्या बारावीच्या परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान राबवले जात असून कॉपी करणाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण मंडळाने दिले आहेत. असे असले तरी बारावीच्या हिंदी विषयाच्या पेपरला चक्क उत्तरे लिहिलेली प्रश्नपत्रिकाच विद्यार्थ्यांना दिल्याचा धक्कादायक प्रकार मुलचेरा येथील शहीद बाबूराव शेडमाके विद्यालय तथा ज्युनिअर कॉलेजच्या केंद्रावर उघडकीस आला आहे.
मंत्री भरत गोगावले हेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे याकरिता रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातील शिवसैनिकांनी चक्क अष्टविनायक यात्रा सुरू केली आहे.शिवसेनेचे रोहा तालुका प्रमुख एडवोकेट मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा निघाली आहे.रोहा तालुक्यातील शिवसैनिक सुध्दा या यात्रेत सहभागी आहेत. भरत गोगावले हेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे यासाठी श्री अष्टविनायकाच्या चरणी त्यांनी साकडे घातले आहे.
नगर शहरातील पत्रकार चौकात चेंबरच्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू...
महापालिकेच्या अग्निशामक विभागाने रात्री उशिरा या अज्ञात इसमाचा मृतदेह काढला बाहेर...
ठिकठिकाणी खोदलेल्या खड्ड्यांवर झाकण नसल्याने घडला अपघात...
नगर - मनमाड राज्य महामार्गाच्या रस्त्याचे काम सुरू असून ठेकेदाराच्या हलगर्जीपणमुळे मृत्यू...
शिवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात केला दाखल...
या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद...
जालना- परतुर येथील माजी आमदार सुरेश जेथलीया आज करणार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
काही वेळात अजित पवार,सुनील तटकरे,सुरज चव्हाण परतुर येथे होणार दाखल
पहिल्यांदा अजित पवार बागेश्वरी साखर कारखाना येथे येणार
त्यानंतर १२ वाजता परतूर येथील क्रीडा संकुलावर होणार पक्ष प्रवेश सोहळा
पुणे शहर पोलीस दलाच्या तरंग '2025' कार्यक्रमामुळे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या परिसरात वाहतूकीत बदल
शहर पोलीस दलाच्या वतीने तरंग हा अजय-अतुल संगीत रजनीचा मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आज सायंकाळी आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
त्यामुळे या परिसरातील वाहतूकीत आज बदल करण्यात आला आहे.
बॅकेच्या माजी मॅनेजरकडूनच बॅकेच्या तिजोरीवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना दादरमध्ये समोर आली आहे
न्यू इंडिया को आॅप बॅक लिमिटेड बॅकेच्या माजी जनरल मॅनेजरने बॅकेेच्या तिजोरीतून तब्बल ११२ कोटी रुपये काढले
हितेश प्रविणचंद मेहता असे या आरोपीचे नाव आहे
राष्ट्रवादी शरद पवार गटाने बोलावली तातडीची बैठक..
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सोनवणे, आमदार क्षीरसागर करणार बैठकीला मार्गदर्शन
राष्ट्रवादी शरद पवार गटाने आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. सकाळी 11 वाजता बीड मधील राष्ट्रवादी भवन येथे ही बैठक होणार आहे.
कोल्हापुरात येऊन व्यापार करणाऱ्या परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघड
कोल्हापुरातील 'भाऊ'चा प्रताप उघड
सत्ताधारी पक्षातील महत्त्वाचा पदाधिकारी असलेल्या भाऊचा फोन रेकॉर्ड समाज माध्यमांवर व्हायरल
कोल्हापुरात हॅण्डलूम व्यवसायिकांकडून दोन लाख रुपयांची खंडणी मागून त्यांना अर्वाचे शिवीगाळ केल्याचं फोन रेकॉर्ड मधून उघड
गेल्या रविवारी कोल्हापुरातील दसरा चौकात भरवण्यात आलेल्या हँडलूमचा मांडव अचानक पडल्याने चर्चेला उधाण
भाऊचा त्रास वारंवार होत असल्याने पुन्हा कोल्हापुरात व्यापारासाठी न येण्याचा व्यापाऱ्यांचा पवित्रा
शिंदेंच्या ठाण्यात गणेश नाईक जनता दरबार घेणार
24 फेब्रुवारीला ठाणेकरांच्या समस्या आणि तक्रारी ऐकणार
ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जनता दरबारचे आयोजन करण्यात आले आहे
काही दिवसापूर्वी गणेश नाईक यांचा भव्य नागरिक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते भाषणात बोलताना ठाण्याचा कारभार सुधारण्याचा असल्याचे देखील घोषणा केली होती
भाजप पक्ष वाढीवर देखील नाईक लक्ष देणार
कोल्हापूर शहरातील कचरा उठावात हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल मुख्य आरोग्य निरीक्षकासह तिघे निलंबित
कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी यांनी केली कारवाई
महापालिकेच्या आणखी सात जणांवर दंडात्मक कारवाई
छत्रपती संभाजीनगर शहरातील जिमला भीषण आग
संभाजीनगरच्या दिल्लीगेट परिसरातील घटना
भीषण आगीत संपूर्ण जिम जळून खाक
घटनास्थळी अग्निशमन दल दाखल
एक मार्चपासून शनिशिंगणापूर शनि देवाला ब्रँडेड तेलानेच करावा लागणार अभिषेक...
भेसळीच्या तेलाने शिळेची झीज रोखण्यासाठी शनिशिंगणापूर देवस्थानचा निर्णय....
एक मार्चपासून शनिदेवाला सुट्या तेला ऐवजी भाविकांना ब्रँडेड तेलानेच करावा लागेल अभिषेक....
एक मार्चपासून चौथऱ्यावरील तैलाभिषेकासाठी फक्त ब्रँडेड कंपनीचे, शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे...
शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ न्यास बैठकीत आणि ग्रामसभेतही हा निर्णय घेण्यात आला...
नांदेड शहरात मोटारसायकल चोरीच्या घटनांत सातत्याने वाढ होताना दिसतेय, शहरातील चिखलवाडी भागातील बलबीरसिंघ यांच्या घरासमोर लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली आहे. चोरीची ही संपूर्ण घटना CCTV कॅमेरात चित्रित झाली आहे. मात्र तरीही पोलिसांना हा चोर सापडलेला नाही.
नांदेडच्या सिडको भागातील एका हॉटेलमध्ये ग्राहकाला खिचडी खाताना त्यात चक्क मृत उंदीर आढळलाय. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या ग्राहकाने अन्न आणि औषध प्रशासनाकडे रीतसर लेखी तक्रार केलीय. श्रीकांत बिरादार नावाच्या या ग्राहकासोबत हा धक्कादायक प्रकार घडलाय. त्याने हॉटेल मालकाच्या हे निदर्शनास आणून देताच हॉटेल मालकांने बिल देऊ नका पण चर्चा करू नका अशी विनंती केल्याचे या तक्रारीत म्हंटले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाशिकमध्ये खिंडार पडणार
भाजपचा मनसेला नाशिकमध्ये मोठा धक्का
मनसेचे 20 हुन अधिक पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार
*प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला नाशिकमध्ये मोठे खिंडार पडणार
स्थापने पासून राज ठाकरे सोबत असणारे मनसैनिक पक्षालरामराम ठोकून भाजपात प्रवेश करणार*
मागील महिन्यात राज ठाकरेंनी नाशिकमध्ये येऊन घेतली होती पदाधिकारीची भेट, मात्र तरीही पदाधिकारी आज दुपारी करणार भाजपात प्रवेश
तेरखेडा येथील फटाके कारखाने प्रशासनाच्या रडारवर , फटाका कारखान्यातील स्फोटानंतर महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर
तेरखेडा येथील बाबा फायर वर्क्स कारखान्यात स्फोट होऊन 9 कामगार झाले होते जखमी
दोन पथकांकडून तेरखेडा येथील सर्वच फटाका कारखान्यांची तपासणी सुरू
कामगारांचे कारखान्यात वास्तव्य, परवानगी नसताना अनधिकृत वीज कनेक्शन असलेले फटाका कारखाने प्रशासनाकडून सील
नियम धाब्यावर बसवत फटका कारखाने होते सुरू, तपासणीसाठी पथक आल्यानंतर कारखानदाराचे पलायन
तपासणी पथकासोबत तांत्रिक तज्ञ नसल्यामुळे अधिकचा दारूसाठा बाळगणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्यास येत आहेत अडचणी
जीबीएसचा नागपुरात पहिला बळी...शुक्रवारी सायंकाळी रुग्णालयात झाला मृत्यू...
- नागपुरात गुइलेनबॅरे सिंड्रोममुळे एका 45 वर्षीय रुग्णाचा शासकीय रुग्णलयात आयसीयूमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे...
- नागपुरातील पारडी शिवारात राहणाऱ्या एका व्यक्ती ला 11 फेब्रुवारीला आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले होते...
- या रुग्णाच्या दोन्ही हात आणि पायाला लखवा मारला होता... श्वास घ्यायला त्रास होता. शिवाय बीपीचा त्रास होता..
- शुकवरी संध्याकाळी प्रकृती बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाला...
- दरम्यान आणखी दोन जीबीएसचे रुग्ण आयसीयुत उपचार घेत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सध्या बनावट कागदपत्रांचा सुळसुराट पाहायला मिळत आहे. चक्क पाच मिनिटात सायबर कॅफेवर तयार केले जातात बनावट कागदपत्रे शंभर रुपये पासून ते पाचशे रुपयात उत्पन्नाचे आणि जातीचे प्रमाणपत्र तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव मोलगी अक्कलकुवा शहादा आणि तळोदा तालुक्यांमध्ये समोर आला आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून अप्रत्यक्षपणे आ. रोहित पवारांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कुस्ती स्पर्धेला विरोध...
कुस्तीगीर संघाकडून पत्र काढून कुस्तीगीर संघा व्यतिरिक्त इतरांकडून आयोजित केलेल्या कुस्त्यांमध्ये सहभागी न होण्याचे मल्लांना आवाहन...
कुस्तीगीर संघा व्यतिरिक्त कोणत्याही संघटनेला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा घेण्याचा अधिकार नसल्याचा पत्रात उल्लेख...
अमेरिका आज आणखी ११९ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना करणार हद्दपार करणार आहे. भारतातून अवैधपणे अमेरिकेत गेलेल्या स्थलांतरितांना मायदेशी पाठविणारे दुसरे विमान आज अमृतसर विमानतळावर उतरणार, तिसरे विमान उद्या भारतात येईल.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स, वाचा एका क्लिकवर