Maharashtra Breaking 14th June LIVE Updates: फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बखर सापडली
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
Maharashtra Politics : जयप्रकाश मुंदडा यांचा अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंदडा यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश
संपर्कप्रमुख आनंदराव जाधव आणि राजू चापके यांच्या उपस्थितीत
जयप्रकाश मुंदडा हे माजी सहकार मंत्री ठाकरे गटाचे हिंगोलीतील महत्त्वाचे नेते म्हणून ओळख
लोकसभेचे उमेदवारी न मिळाल्याने उद्धव ठाकरे यांच्या वर नाराज होते शिवाय उद्धव ठाकरे भेटत नसल्याची खंत सुद्धा त्यांनी काही दिवसापूर्वी व्यक्त केली होती
नांदेड : मृग नक्षत्रला सुरुवात झाली असली तरी नांदेड जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. मान्सूनचे आगमन नांदेड जिल्ह्यात झाले. परंतु जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचे आगमन झाली नाहीये. जिल्ह्यात आता पर्यंत 30 पूर्णांक 10 मिलीमीटर इतक्या कमी पावसाची नोंद झालीय. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांनी बी बियाणे आणि खते खरेदी करण्याकडे बी बियाणे बाजाराकडे पाठ फिरवल्याचे दिसून येतं आहे. दरवर्षी या दिवसात नांदेडच्या नवीन मोंढा बाजारात शेतकऱ्याची खरेदीसाठी मोठी गर्दी असायची. मात्र यंदा पाऊस लांबल्याने शुकशुकाट पहावयास मिळत आहे.
Shivaji Maharaj Bakhar in France : शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बखर सापडली आहे. पुण्यातील संसोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांना ही बखर सापडली आहे. 'नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स'मध्ये इतिहास संशोधनासाठी लागणारी काही जुनी कागदपत्रे तसेच पुस्तकं चाळत असताना या दोघांना छत्रपती शिवाजी महाराजांची जुनी अप्रकाशित बखर सापडली आहे.
अमरावती : अकोला येथील शुभम बिल्लेवार (वय 35) अकोल्यावरून अंजनगाव याठिकाणी कुटुंबातील लग्न सोहळा आटोपून परत जाताना वडुरा फाट्यावरील ब्रिजवर अचानक चायना मांजा आल्याने शुभम बिल्लेवार या युवकाचा गळा कापल्या गेला. जखम मोठी असल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
बीड : बीड शहराजवळील पिंपळनेर परिसरामध्ये आज सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली दीड ते दोन तास झालेल्या पावसाने परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहायला मिळत होतं. मृग नक्षत्राच्या आगमनालाच पाऊस आणि सुरुवात केल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस या परिसरात झाला आणि या पावसामुळे मनकर्णिका नदीला पाणी आले आहे. नदीला पाणी आल्याने बीड पिंपळनेर हा रस्ता काही काळ बंद राहणार आहे.
नवी मुंबई : EMC सायबर सेल पनवेल यांच्याकडून शेअर मार्केटमध्ये चागल्या परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणुक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचे इंदोर येथील बनावट कॉल सेंटर उध्वस्त करून सायबर गुन्हे करणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेचे आरोग्य सेविका आणि आशा सेविकांचं मुंबईतील आझाद मैदान येथे मागील चार दिवसापासून आंदोलन सुरू आहे. आरोग्य सेविका आणि अशा सेविकांना किमान वेतन मिळावं या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. शिवाय आरोग्य सेविकांना पीएफ आणि पेन्शन मिळावी ही सुद्धा मागणी या आंदोलन करणाऱ्या आरोग्य सेविकांची आहे. या मागणीसाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची मागील दोन महिन्यापासून वेळ मागितली असून अद्याप वेळ मिळत नसल्याने मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे... मात्र आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर काही प्रमाणात मुंबईचे परिणाम पाहायला मिळतोय.
Indu Mill Memorial : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाकडे सरकारचे दुर्लक्ष झालं आहे. कंत्राटदारावर अंकुश न राहिल्यामुळे स्मारकाचे काम ठप्प झाल्याची टीका, शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाने ट्वीट करत म्हटलं आहे, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या स्मारकाबाबत मिंधे-भाजप सरकार अक्षम्य दुर्लक्ष करत असून गेले वर्षभर ह्या स्मारकाचे काम रखडले आहे. बाबासाहेबांच्या विचारांचे प्रेरणादायी जागतिक दर्जाचे स्मारक दादरमधील इंदू मिल कपाऊंड येथे उभारण्यात येत आहे. 2018 साली स्मारकाला मंजूरी मिळाली आणि कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. कराराप्रमाणे कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली. अगदी कोरोनासारख्या कठीण काळातदेखील ह्या स्मारकाच्या कामात खंड पडू दिला नव्हता. मात्र गेले वर्षभर स्मारकाच्या कामाकडे सरकारने पुर्णतः दुर्लक्ष केले आहे. एमएमआरडीएच्या आयुक्तांनी स्मारकाच्या कामाचा आढावा घेणारी बैठकच घेतली नाही, परिणामी कंत्राटदारावर अंकुशच राहिलेला नाही आणि स्मारकाचे काम ठप्प झालेले आहे.
भंडारा : आरएसएसचे लोकं जे बोलतात आहेत, त्यांनीच आता शिख घेतली पाहिजे. अशा लोकांच्या प्रती कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही. काही बोलायचं नाही. ज्यांच्यासोबत हे लोकं आहेत, ते बोलतात आहे की, हे अहंकारी आहेत. यांनीच आता शीख घेतली पाहिजे. समजलं पाहिजे की आम्ही कुठल्या अहंकारी लोकांसोबत काम केलं आणि देशाला बरबादीकडं नेलं हे त्यांनी समजलं पाहिजे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांना लगावला.
Beed : लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या संदर्भामध्ये बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वादग्रस्त लिखाण झाले त्याच्या विरोधामध्ये यापूर्वी शिरूर त्यानंतर परळी शहर त्यानंतर वडवणी शहर बंद राहिले होते आणि आज सीरसाळा शहर ओबीसी बांधवांच्या वतीने बंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सीरसाळा शहरातील या बंदमध्ये ओबीसी समाजातील सगळ्या जाती धर्मातील लोक सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे..
Raj Thackeray Maharashtra Tour: मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच करणार महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. जुलै दरम्यान राज ठाकरे राज्यभर दौरा करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन आणि निवडणुकीची तयारी यासंदर्भात राज ठाकरे दौरा करणार आहेत.
Wardha News: महावितरण कडून ज्या कंपनीला स्मार्ट मीटर लावण्याचे कंत्राट दिले गेले आहे, त्याला आता विरोध होऊ लागला आहेय. सेलू तालुक्यात याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने समीर देशमुख यांनी महावितरण अभियंत्याला निवेदन देऊन वोरोध दर्शविला आहेय. स्मार्ट मिटरबाबत कंपनीने जागृती करावी, योजनेबाबत सविस्तर माहिती द्यावी आदी मागण्यांचा निवेदनात समवेश आहे.
Raj Thackeray Birthday : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडीच्या वतीने पडघा परिसरात वृक्षारोपणाचे कार्यक्रम. तसेच तसेच खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रम मध्ये आजी-आजोबांना स्नेहभोजन व पसायदान घेऊन येथील अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्यांचे व खाऊचे वाटप करून राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन भिवंडीत मनसे कडून करण्यात आले होते.
Konkan Hapus News: कोकणातील हापूस आंब्याचे जगातील सर्वोत्कृष्ट आंब्यांत अढळ स्थान कायम आहे. त्या पाठोपाठ आता आंब्याच्या पदार्थांत मराठमोळ्या आमरसने जगात पहिला क्रमांक पटकावला आहे. टेस्ट अॅटलास या नामवंत ऑनलाईन फूड गाईडने केलेल्या अभ्यासात जागतिक पातळीवर लोकप्रिय असलेल्या आंब्यांच्या पदार्थांची चव, गुणवत्ता, पाकक्रिया आणि लोकप्रियता या निकषांवर जगातील दहा पदार्थांची निवड केली. यामध्ये कोकणातील हापूस आंब्यापासून महाराष्ट्रात घरोघरी चवीने खाल्ल्या जाणाऱ्या आमरसाचे साधेपणातील श्रीमंती असे वर्णन टेस्ट अॅटलासने केले असून आमरसाला पहिल्या क्रमांकाचा मान दिला आहे. आमरसवर आधारित अनेक पदार्थ भारतात तयार केले जातात. टेस्ट अॅटलास या नामवंत ऑनलाईन फूड गाईडने आंब्याच्या वेगवेगळ्या डिश मध्ये महाराष्ट्रातील आमरसाला पहिला तर थायलंड मधील मँगो स्टिकी राईसला दुसरा क्रमांक दिला आहे. सोबत फिलिपाईन्स मधील सोर्बेत या पदार्थाला तिसरा क्रमांक दिला आहे. जावा, इंडोनेशिया मधील रुजाक, भारतातील मँगो चटणी, हाँगकाँग मधील मँगो पोमेलो सागो, ग्वांगडाँग, चीन मधील मांगुओ बुडींग, सुराबाया, इंडोनेशिया मधील रुजाक सिंगुर, ग्वांगडाँग, चीन मधील बाओबिंग तर थायलंड मधील माम्वांग नाम्पा वान हे दहा आंब्यापासून बनवले जाणारे पदार्थ या यादीत समाविष्ट आहेत.
Ahmednagar News: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. त्यातच अहमदनगरच्या पांगरमल येथील माजी सरपंच बाप्पुसाहेब आव्हाड यांनी पांढरीपूल फाटा येथे पंकजा मुंडे यांच्याबाबत लावलेल्या बॅनर जोरदार चर्चा सुरू आहे. सरकारने जर येत्या विधानसभा मतदानापूर्वी पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनःर्वसन केले नाही तर सकल ओबीसी समाज भारतीय जनता पार्टीसह सत्तेत असणऱ्या कोणत्याही पक्षास मतदान करणार नाही अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलाय. सोबतच पक्षासाठी आणि समाजासाठी ज्यांचे योगदान नाही त्यांना राज्यसभा देऊन मंत्रिपद दिले जाते मात्र पंकजा मुंडे यांना डावलले जाते असं म्हणत कार्यकर्त्यांनी भागवत कराड यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
Maharashtra politics - शिखर बँक बाबतीत अण्णा हजारे जागे झाले, यांचे मी अभिनंदन करतो. अण्णा हलले बोलले यांचं मी अभिनंदन करतो. राळेगण सिद्धीमध्ये हालचाल सुरु झाली, आणि ती अजित पवार यांच्याबाबतीच झाली. अण्णाने इलेक्ट्रॉल बॉण्ड विरोधात सुद्धा आवाज उठवला पाहिजे. महाराष्ट्रात असंख्य घोटाळे झाले यावर अण्णा हजारे यांनी आवाज उठवला पाहिजे. आण्णा हजारे यांनी इलॉक्ट्रोल बाँड, ईडी-सीबीआयचा गैरवापर यावर आवाज उठवला पाहिजे.
अण्णांना खूप काम आहे. फक्त शिखर बँक पुरता बघू नका, राज्यात घोटाळे घोटाळे झाले आहेत. त्यांनी रामलीला मैदानात बसावं, आम्ही त्यांच्यासोबत असू, असे संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut on Maharashtra politics : 10 वर्षांमध्ये फक्त अहंकार दिसला.
लोकप्रतिनिधीमध्ये अहंकाराची भाषा असू नये.
अहंकाराच्या राजकारणाला जनतेने रोखले.
आम्ही अहंकार थांबवण्यासाठी प्रयत्न करणार
जिथे जिथे रामाचं वास्तव्य होतं, तिथं तिथं भाजपचा पराभव झाला.
Rahul Narwekar : गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना करा, असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. सातारा, सोलापूर, अहमदनगर मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव व धुळे या जिल्ह्यात उपाययोजना करा, असे सांघण्यात आलेय.
Palghar News : पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडतोय आणि याचाच परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या भात पेरण्यांना सुरुवात केली आहे. पालघर जिल्ह्यात जवळपास 75 हजार हेक्टरवर भातशेती केली जाते. सध्या यांत्रिक पद्धतीने भात शेतीला महत्त्व दिलं जात असलं तरीही पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही पारंपारिक बैल आणि नांगराने उखळणी करून भात पेरणी केली जाते.
Mumbai Weter Updates: पावसानं दमदार सुरुवात केल्यानंतर मुंबईत आता उघडीप घेतली आहे. तसंच 19 जूनपर्यंत मुंबईत पावसाची विश्रांती असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान मुंबई आणि उपनगरात पुढील 24 तासांत आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोल्यात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला. याशिवाय उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात हवामान खात्याने ग्रीन अलर्ट दिला आहे.
Ratnagiri News LIVE : रत्नागिरीतील अणूस्कुरा घाटात दरड कोसळलीय.. दरड कोसळल्याने घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. बारा तासानंतर देखील अणुस्कुरा घाटातील वाहतूक ठप्प आहे. कोकणातून कोल्हापूर, पुण्याला जाणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झालाय. दरड हटवण्याचं काम राजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि पोलिसांकडून सुरु आहे.. दरड हटवल्यानंतर या मार्गावरुन होणारी वाहतूक सुरु केली जाईल.
Mumbai Wether Updates: पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहील.
हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता.
यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोल्यात हवामान खात्याचा येलो अलर्ट.
उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात हवामान खात्याने दिला ग्रीन अलर्ट (काही धोक्याची सूचना नाही)
हवामान खात्याचा अंदाज
Pune News: लोकसभेच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. नेहमीप्रमाणे त्यांनी सकाळीच या दौऱ्याला सुरुवात केली आहे. पुण्यातील सर्किट हाऊस मध्ये अजित पवार अधिकारी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. आज सकाळी वाजता अजित पवार पुण्यातील पावसाने निर्माण होणाऱ्या परिस्थिती संदर्भात बैठक घेणार आहेत. त्यासोबतच आषाढी वारी देखील याच महिन्यात आहे. या वारीच्या नियोजनासंदर्भात बैठक घेणार आहेत.
पुण्यात मागच्या शनिवारी 8 जूनला पावसाने झोडपून काढलं पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला पुण्यात पुरस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असूनदेखील त्यांचं पुण्याकडे दुर्लक्ष होतंय का? असे प्रश्न निर्माण झाले. यावरून त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले. त्यानंतर आज ते पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत उपययोजनांसंदर्भात चर्चा करणार आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये झटपट घेता येईल...
नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार सुपारी किलिंग प्रकरण; बड्या काँग्रेस नेत्याचं नाव समोर
Nagpur Purushottam Puttewar Murder Case: नागपूर : पुणे पोर्शे अपघात प्रकरणाप्रमाणेच आता नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार हिट अँड रन सुपारी किलिंग प्रकरणातही दिवसागणिक नवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. नागपूरच्या (Nagpur News) पुरुषोत्तम पट्टेवार हत्याकांड प्रकरणात (Purushottam Puttewar Murder Case) गडचिरोलीच्या (Gadchiroli) देसाईगंज येथील एका काँग्रेस (Congress) नेत्याचं नाव पुढे येत आहे. आता अटक टाळण्यासाठी हा नेता राज्यातील एका मोठ्या नेत्याचा माध्यमातून पोलिसांवर दबाव निर्माण करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संपत्तीसाठी सुपारी देऊन सासऱ्याची हत्या करणाऱ्या गडचिरोली नगर रचना विभागाची सहायक संचालक अर्चना पुट्टेवार आणि तिचा भाऊ एमएसएमईचा संचालक प्रशांत पार्लेवार यांना कट रचण्यात मदत केल्याचा या काँग्रेस नेत्यावर संशय आहे.
बकरी ईद निमित्त कुर्बानीची परवानगी देणाऱ्या पालिकेला हायकोर्टाचा दिलासा
मुंबई : बकरी ईद (Bakrid 2024) निमित्त कुर्बानीची परवानगी देणाऱ्या पालिकेला (BMC) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिलासा दिला आहे. बीएमसीनं याबाबत 29 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकाला विरोध करत हायकोर्टात आलेल्या जीव मैत्री ट्रस्टला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार दिला आहे. मात्र, कुठल्याही रहिवासी इमारतीत कत्तलीला परवानगी नाही. देवनार व्यतिरिक्त पालिकेनं परवानगी दिलेल्या 114 जागांवरच कत्तलीची परवानगी बकरी ईद निमित्त 17 ते 19 जून दरम्यान ही परवानगी 47 पालिका मंडई आणि 67 खासगी मटन शॉपवर परवानगी लागू राहील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -