Maharashtra Breaking Updates LIVE : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking News Live Updates : महाराष्ट्र, देश-विदेशातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 14 Sep 2024 01:54 PM
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी दाखल होणार

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी दाखल 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे व भाजपाचे इतर नेते सागर बंगल्यावर उपस्थित

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचे शिष्ठमंडळ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार 

धाराशिव : - बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचे शिष्ठमंडळ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार 


- आमदार राऊत हे स्वतः आंदोलनात असल्याने त्यांच्या ऐवजी त्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार 


आमदार राजेंद्र राऊत यांचे शिष्टमंडळ 200 गाड्यांचा ताफा घेऊन घेणार मुख्यमंत्र्यांची भेट 


तर सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील घेणार आमदार राजेंद्र राऊत यांची भेट 


संध्याकाळी 5 वाजता बार्शी येथील आंदोलनस्थळी घेणार भेट 


मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांचे ठिय्या आंदोलन सुरूय 


आमदार राजेंद्र राऊत यांची मागणी सरकार मान्य करणार का याकडे सर्वांचे लक्ष.


साउंड बाईट : राजेंद्र राऊत (आमदार, बार्शी)

रुपाली चाकणकर यांच्याविरोधात अश्लिल पोस्ट, दोघांवर अटकेची कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याबाबत अश्लील पोस्ट करणारे दोघेजण अटकेत 


ठाणे पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाची सनी पारखे आणि जगन्नाथ हाटे यांच्यावर अटकेची कारवाई 


रूपाली चाकणकर यांच्या वतीने इंस्टाग्राम आणि फेसबुक वर अश्लील पोस्ट करणाऱ्या 32 जणांची लिस्ट सायबर क्राईम ला देण्यात आली होती 


अटक करण्यात आलेल्या दोघांवर कलम 72/ 2024, कलम 354 ड, 509, 34 या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे 


सन्नी पारखे याला गंगापूर येथून तर हाटे याला चुनाभट्टी मुंबई येथून अटक

अखेर कोल्हापुरात वंदे भारत ट्रेन ट्रायलसाठी दाखल

अखेर कोल्हापुरात वंदे भारत ट्रेन ट्रायलसाठी दाखल


पुणे-कोल्हापूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनची आज ट्रायल रन


वंदे भारत ट्रेनची प्रवाशांना देखील उत्सुकता


रेल्वे स्थानकावरील प्रवासी वंदे भारत ट्रेन पाहण्यासाठी रेल्वे बोगीत

लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात सुधारणा, निर्यातमूल्य शुल्क कमी केल्याचा परिणाम

लासलगाव ब्रेकिंग...


- लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात सुधारणा...


- कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी ४५५० रुपये भाव...


- तर जास्तीत जास्त ४८०० रुपये, तर कमीत कमी ३१०० रुपये प्रति क्विंटल भाव..


- कांद्याचे निर्यातमूल्य रद्द व शुल्क कमी केल्याचा परिणाम..


- कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
- मात्र कांदाच शिल्लक नसल्याने कांद्याचे भाव वाढूनही शेतकऱ्यांना तसा फायदा कमीच...

गणेशोत्सवाच्या भंडाऱ्यातून 70 विद्यार्थ्यांना विषबाधा, जळगामधील घटना


पारोळ्यातील शिवरे येथे गणेशोत्सवनिमित्त सारंग माध्यमिक विद्यालयात भंडारा देण्यात आला. त्यातून शाळेतील ७० विद्यार्थी व चार शिक्षकांना विषबाधा झाली. त्यापैकी दोन विद्यार्थिनींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. शिवरे येथील सारंग माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवनिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम घेण्यात आला. भंडाऱ्यात डाळभात, मटकीची भाजी व गुलाबजाम असा मेन्यू होता. सर्व विद्यार्थ्यांचे जेवण झाल्यानंतर अचानक अनेक विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागली. काहींना उलट्याही झाल्याने धावपळ उडाली. यात १२ ते १५ वयोगटातील एकूण ७० विद्यार्थी व चार शिक्षकांचाही समावेश आहे. त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी तामसवाडी प्राथमिक उपकेंद्राच्या वैद्यकीय पथकांसह शहरातील काही खासगी डॉक्टरांनी देखील विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू केले. उपचार नंतर काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले तर काही वर अद्यापही उपचार सुरू आहेत

अंथरुणावर लघुशंका केली म्हणून सावत्र आईकडून उलाथण्याने चटके, गाल, ओठ, तोंडावर भाजले

सावत्र आईने उलाथण्याने दिले मुलीला चटके  



कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथील पुजा शुभम मगरे या सावत्र आईने चिमुरडीला चटके दिले आहे


५ वर्षांच्या चिमुरड्या मुलीने अंथरुणावर लघुशंका केली म्हणून गालावर, ओठांवर, तोंडावर, गळ्याजवळ  गुप्तांगा जवळ उलाथणे तापवुन चटके  देऊन भाजले आहे,


ही घटना शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली...


शुभम मोकिंदराव मगरे हा दुसरी पत्नी पुजा व दोन मुलांसह कासारवाडी येथे भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहेत 


शुभम व पुजा यांचे दुसरे लग्न असुन दोघांनाही पहिल्या लग्नापासून अपत्य आहेत...


शुभम कामानिमित्त बाहेर गेले असता पत्नी पुजा मगरे  हिने अल्पवयीन मुलगीने हिला अंथरुणावरती लघुशंका केल्याच्या कारणास्तव रागाने उलाथणे आगीवर तापवुन चटके देऊन भाजले आहे.  



यामुळे मुलीच्या चेहऱ्यावरती अंगावरती जखमा झाल्या आहेत


शुभम मगरे यांनी शिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पूजा मगरे  हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपा महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव भाजप प्रदेश कार्यालयात पोहोचले

भाजपा महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव भाजप प्रदेश कार्यालयात पोहोचले


भाजपच्या विविध आघाड्यासोबत भूपेंद्र यादव करणार चर्चा


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवस भूपेंद्र यादव भाजपच्या विविध आघाड्यांकडून घेत आहेत आढावा

सोयाबीनच्या हमीभावाने खरेदीसोबतच खाद्यतेलावरील आयात शुल्कही वाढवले

मुंबई - सोयाबीनची 90 दिवसांनी हमीभावाने खरेदी करण्याच्या निर्णयापाठोपाठच केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळेल असा विश्वास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला असून या निर्णयाबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.


राज्यात सोयाबीनचा पेरा 52 लाख हेक्टर पेक्षा जास्त झाला असल्याने तसेच यावर्षी पाऊस पाणी व्यवस्थित झाले असल्याने सोयाबीनचे उत्पन्न बंपर होणार आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सातत्याने प्रयत्न करीत असून त्या दृष्टिकोनातून त्यांनी केंद्र शासनाकडे सोयाबीनची हमीभावाने खरेदी करावी, खाद्यतेल, सोया मिल्क, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यास शुल्क लावावे आणि सोयाबीन निर्यातीसाठी प्रत्येक क्विंटल मागे किमान 50 डॉलर इतके अनुदान द्यावे, अशा मागण्या केल्या होत्या. 


त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून केंद्र शासनाने मागील आठवड्यातच सोयाबीनची 90 दिवस हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर काल खाद्यतेलावरील आयात शुल्क 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 


आपण केलेल्या 3 पैकी 2 मागण्या मान्य केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी एक्स या सोशल प्लॅटफॉर्मद्वारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल तसेच या निर्णयासाठी सातत्याने आग्रह धरणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.


यापूर्वी किती होते आयात शुल्क?


कच्च्या खाद्यतेलावर पूर्वी  5.5% आयात शुल्क होते ते आता 27.5% असेल तर रिफाइंड तेलावरील आयात शुल्क पूर्वीच्या 13.75 टक्क्यावरून आता 35.75 टक्के इतके वाढवण्यात आले आहे.

अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपुल येथे चार वाहनांचा विचित्र अपघात

अहमदनगर 
अहमदनगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील पांढरीपुल येथे चार वाहनांचा विचित्र अपघात..


चार वाहने एकमेकांना मागून धडकल्याने झालेल्या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान...


तर दोन ट्रक रोड सोडून थेट दुकानात घुसले.... सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही...


सकाळी सहाच्या दरम्यान झाला अपघात... अपघातामुळे दोन किलोमीटर पर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा...
क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू

पतीने मोबाईल दिला नाही, पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

मोबाईलचा हट्ट न पुरवल्यामुळे पिंपरी- चिंचवड मध्ये पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली अन पोलीस तपासात पतीने मोबाईलचे कारण स्पष्ट केले. शिवानी गोपाल शर्मा असं आत्महत्या केलेल्या वीस वर्षीय विवाहितेचे नाव आहे. शिवानी या गेल्या काही दिवसांपासून पती गोपाल शर्माकडे मोबाईलचा हट्ट करत होत्या. गोपाल करत असलेली नोकरी अन तिथून मिळणाऱ्या पगारातून पगार, हे पाहता तातडीनं तो मोबाईल खरेदी करू शकत नव्हता. म्हणूनच पगार झाल्यावर मोबाईल घेण्याचा प्रयत्न करू गोपाल ने सांगितलं होतं. मात्र शिवानी घरी एकटीच असायची अन टाईमपास साठी त्यांना मोबाईल हवाचं होता. अखेर तो हट्ट पूर्ण न झाल्याने बुधवारी त्यांनी घरात पती नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. पती जेव्हा नोकरीवरून घरी परत आला. तेव्हा पत्नीने आत्महत्या केल्याचं समोर आले. वाकड पोलिसांनी याबाबत चौकशी केल्यानंतर मोबाईलच्या हट्टा पायी पत्नीने गळफास घेतल्याचं उजेडत आल्याचे पोलिसांनी सांगितल आहे.

पंढरपूर येथील धनगर समाजाच्या उपोषणाला सरकारचे मंत्री देणार भेट, एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची आहे मागणी 

धनगर समाजाला एस.टी मधून  आरक्षणाची अंमलबजावणी करावी  याकरिता  आमरण उपोषणाला बसलेल्या बांधवांना भेट देण्यासाठी सरकारचे मंत्री अतुल सावे, शंभूराजे देसाई ,चंद्रकांत दादा पाटील धनगर व ओबीसी समाज नेते श्री. प्रकाश अण्णा शेंडगे आज  शनिवार १४ सप्टेंबर रोजी दुपारी २.००वाजता उपोषणस्थळी पंढरपूरला भेट देणार आहेत.   आंदोलनाची पुढील दिशा आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून ठरवण्यात येईल सोबत आमदार दत्ता मामा भरणे,माजी आमदार रमेश भाऊ शेंडगे ,माजी आमदार रामराव वडकुते ,माजी आमदार हरिभाऊ भदे, माजी आमदार पोपटराव गावडे, मा.पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष नानजी देवकाते पाटील हे समाज नेते उपस्थित राहणार आहेत.

पार्श्वभूमी

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. दुसरीकडे काही नेते तिकीट मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन आपल्या सोईच्या पक्षात जाताना दिसत आहेत. राज्यात मराठवाडा, विदर्भ यासारख्या भागात पवसाने सध्या विश्रांती घेतली आहे. पुणे, मुंबईतही सध्या पावसाची परिस्थिती नाही. या प्रमुख घडामोडींसह इतरही महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.