Maharashtra Breaking LIVE Updates: निकृष्ट बांधकाम असलेली निर्माणाधीन पाण्याची टाकी कोसळली, बुलढाण्यातील घटना

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 13 Jun 2024 10:38 PM
Praniti Shinde : खासदार झाल्यानंतर प्रथमच मंगळवेढा दौऱ्यावर आलेल्या प्रणिती शिंदेंचा ‘टमटम’मधून प्रवास!

Praniti Shinde : खासदार झाल्यानंतर प्रथमच मंगळवेढा दौऱ्यावर आलेल्या प्रणिती शिंदे यांनी ‘टमटम’मधून प्रवास केला आहे. मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ येथील ग्रामदैवत कामसिद्ध देवाची यात्रा भरली होती. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे कामसिद्ध देवीच्या दर्शनासाठी प्रथमच खासदार झालेल्या प्रणिती शिंदे यांनी हजेरी लावली होती.

Buldhana News : निर्माणाधीन पाण्याची टाकी कोसळली, निकृष्ट बांधकाम असल्याने मोठी दुर्घटना

बुलढाणा : शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या चिचारी या गावात पाण्याची टाकी बांधण्यात येत होती. जवळपास 95 टक्के या पाण्याच्या टाकीचे काम पूर्णही झालं होतं, मात्र ही पाण्याची टाकी आज अचानक कोसळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात बांधण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाक्या या निकृष्ट दर्जाच्या असून या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. चौकशी करून 24 तासात या दोषींवर कारवाईत न झाल्यास जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रशांत डीक्कर यांनी दिला आहे.

Pandharpur News : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग खचला

Pandharpur News : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग खचला....


पालखी मार्गाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच दसुर फाटीजवळ दोन ते तीन किलोमीटर पालखी मार्ग खचला....


पंढरपूरहुन वेळापूरकडे जाणारी एक लेन तीन किलोमीटर पर्यंत बंद.... 


या ठिकाणी रस्त्याला पडल्या मोठमोठ्या भेगा..... 


पालखी प्रस्थानाला काही दिवस उरले असतानाच मार्ग खचल्याने वारकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष....


 

Hingoli Water Issue : पावसाळा सुरू होऊनही जिल्ह्यात 10 टँकर सुरू 

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊनही टँकरची संख्या मात्र कमी होत नाही हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यात एकूण दहा टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय जिल्ह्यातील पवार तांडा नावाच्या गावात सुद्धा संपूर्ण उन्हाळा भरामध्ये टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय जून महिना लागून जवळपास दहा दिवस झाले चांगला दमदार पाऊस होऊन सुद्धा पाणीटंचाई कायम आहे.

Beed News: पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंबाबत सोशल माध्यमांवरील बदनामीकारक पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, ओबीसी समाज बांधव आक्रमक

Beed News: भाजप नेत्या पंकजा मुंडे व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबत सोशल मीडियातून बदनामीकारक पोस्ट केल्या जात आहेत. अशा पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी ओबीसी समाज बांधव आक्रमक झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर एकत्रित येत पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर आत्महत्या केलेल्या तीन तरुणांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत आल्यानंतर रस्त्यावरच ठिया देत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यानंतर महिलांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत पोस्ट करणाऱ्या वर कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान पोलीस अधीक्षक यांनी अशा पद्धतीने पोस्ट करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले असून ओबीसी समाज बांधवांच्या प्रतिनिधींनी देखील अशा पोस्ट थांबवण्याचे आवाहन करत यापुढे आक्रमक भूमिका घेण्याचा देखील इशारा दिला आहे. 

Pune News: इंदापूर नीट परिक्षेच्या घोटाळ्याची चौकशी करा

Pune News: नीट 2024 परीक्षेत झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी आणि झालेली परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा घ्यावी यासाठी इंदापूर तहसील कार्यालयावर पालक विद्यार्थ्यांसमवेत भव्य मोर्चा काढण्यात आला. नगरपरिषदेपासून जुन्या पुणे सोलापूर महामार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयावर दाखल झाला. यावेळी हातात विविध प्रकारचे होर्डिंग घेऊन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एन टी ए स्कॅम है अशी घोषणाबाजी ही यावेळी करण्यात आली असून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आलेय.


 

Sangali News: सांगली वाहतूक नियंत्रण शाखेनं मॉडिफाय केलेले 70 सायलन्सर जेसीबीनं नष्ट केले

Sangali News: सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वाहतूक नियंत्रण शाखेने मोडिफॉय केलेले 70 सायलन्सर जेसीबीने नष्ट केलेत. गेल्या 3 महिन्यात सांगली वाहतूक शाखेने या मोडिफॉय केलेल्या आणि कर्णकर्कश आवाज करत शहरांतून फिरवणाऱ्या गाड्याचे 70 सायलन्सर जप्त केले होते. या कारवाईतुन जवळपास 1 लाख 58 हजार दंडही वसूल करण्यात आला होता. हे मोडिफॉय केलेल्या 70 सायलन्सर नष्ट करून  अशाप्रकारे तरुणांनी आपल्या गाड्यांना मोडिफॉय करून कर्णकर्कश आवाज करणारे सायलन्सर बसवू नये असे आवाहन सांगली वाहुतक शाखेकडून या कारवाईच्या माध्यमातून करण्यात आलंय.


 

MNS News: विधानसभा मनसे स्वतंत्र लढणार, 200 ते 225 जागांवर लढण्याची तयारी, मनसेला महाराष्ट्रात स्पेस मिळणार का?

MNS News: लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राज्यातील राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील विधानसभेत तयारीला रोजगार लागली आहे. लोकसभेत महायुतीला बिनशेत पाठिंबा देणारा मनसे आता विधानसभा स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे. 

Kolhapur News: दिल्ली दौऱ्यावरुन कोल्हापुरात आल्यावर खासदार शाहू छत्रपती महाराज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Kolhapur News: दिल्ली दौऱ्यावरुन कोल्हापुरात आल्यावर खासदार शाहू छत्रपती महाराज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर


कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज शेतकऱ्याच्या बांधावर 


कागल तालुक्यातील तमनाकवाडा, कापशी खोऱ्यात दोन दिवसांपूर्वी झाला होता अवकाळी पाऊस


तालुक्यातील कापशी, हणबरवाडी, बेरडवाडी, बालेघोल गावात झाला होता ढगफुटीसदृश्य पाऊस


नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करणार- खासदार छत्रपती शाहू महाराज

Nagpur News: नागपूर जिल्ह्यातील धमाना येथील स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट

Nagpur News: नागपूर जिल्ह्यातील धमाना येथील स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झाला आहे.  चारमुंडी कंपनीत स्फोट झाला आहे. स्फोटात तीन कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती  आहे.  नातेवाईकांची कंपनीच्या गेटवर गर्दी केली आहे. 

Jalna News : अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट

Jalna News : जालना : अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. बाबा जानी दुर्राणी यांनी आज अंतरवाली सराटीत येऊन जरांगे यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केलीय. आज मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा सहावा दिवस आहे. यावेळी जरांगे यांनी आरोग्याची काळजी घेत उपचार घ्यावेच असं आवाहन त्यांनी केलं.


 

Thane News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्था बाहेर  सुपरमॅक्स कंपनीतील कामगारांचे आंदोलन 

Thane News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्था बाहेर  सुपरमॅक्स कंपनीतील कामगारांचे आंदोलन 


दोन वर्षापासून कंपनी बंद असून कामगारांना मासिक वेतन न दिल्याने कामगार संतप्त 


अनेक वेळा मुख्यमंत्र्यांचे भेट देऊन कुठलाच मार्ग न निघाल्याने मोठ्या संख्येने कामगार मुख्यमंत्री यांच्या शुभ दीप बंगल्या बाहेर  कंपनीत मयत झालेल्या  कामगारांचे फोटो लावलेले बॅनर हातात घेत मुख्यमंत्री न्याय द्या अशा घोषणा करत केले आंदोलन


दीड हजार कर्मचारी असून आम्हाला मुख्यमंत्र्यांकडूनच अपेक्षा आहेत आम्हाला न्याय मिळाला नाही तर आत्मदान करणार असल्याचा  इशारा कामगारांकडून देण्यात येत आहे

Hingoli News : मनोज जरांगे यांच्या मागण्यासाठी आष्टीकर यांचे राज्यपाला पत्र

Hingoli News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केला आहे त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाला द्यावे असे पत्र हिंगोली चे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी राज्याचे राज्यपाल यांना लिहिले आहे. 


आंतरवाली सराटी येथे 8 जून पासून मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत त्यांची प्रकृती खालावत असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे तत्काळ मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे निर्देश राज्य शासनाने द्यावे अशाच पत्र हिंगोली चे  खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी राज्याचे राज्यपाल यांना लिहिले आहे. 

Bhandara News: भंडाऱ्याच्या आंधळगावं ठाणेदाराची दबंगगिरी, वृद्ध हॉटेल व्यावसायिकाला मारहाण, भंडाऱ्याच्या कांद्री येथील प्रकार

Bhandara News: राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मध्यरात्री सुरू असताना तिथं पोहोचलेल्या ठाणेदारानं दबंगगिरी करीत 60 वर्षीय वृद्ध हॉटेल व्यावसायिकाला बेदम मारहाण केली. हा प्रकार रामटेक - गोंदिया या राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा जिल्ह्यातील कांद्री इथं 7 जूनच्या मध्यरात्री घडला. हा मारहाणीचा संपूर्ण प्रकार हॉटेलमधील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. भालचंद्र तुरस्कर असं ठाणेदारांनी मारहाण केलेल्या वृद्ध हॉटेल व्यावसायिकाचं नावं आहे. राष्ट्रीय महामार्गावर मागील अनेक वर्षांपासून तुरस्कर यांचं हॉटेल असून प्रवास करणारे वाहनधारक चहा पिण्यासाठी इथं थांबतात. 7 जूनला आंधळगावंचे ठाणेदार विवेक सोनवणे हे त्यांचे रायटर दिलीप वलदे यांच्यासोबत हॉटेलमध्ये होपचलेत आणि हॉटेल व्यावसायिकाला मारहाण केली. यावेळी त्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करीत मारहाण करताना मारून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप हॉटेल व्यावसायिक तुरस्कर यांनी केली आहे. हॉटेल व्यावसायिक तुरस्कर यांना मारहाण करणाऱ्या ठाणेदारावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी, हॉटेल व्यावसायिक भालचंद्र तुरस्कर यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांनी घडलेल्या प्रकरणाची तक्रार भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांना केली असून ठाणेदार सोनवणे यांच्यावर तातडीनं कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Maratha Reservation Updates: मराठा आरक्षणाचा विषय पेटला, महापूर येथे रस्ता रोको, लातूर औरंगाबाद रस्त्यावर रस्ता रोको, वाहतूक ठप्प

Maratha Reservation Updates: मराठा आरक्षणाच्या विषयी मनोज जरंगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लातूर जिल्ह्यातील मराठा बांधव एकवटला आहे. महापूर येथील ग्रामस्थांनी एकत्र येत आज रास्ता रोको पुकारला आहे. लातूरवरून औरंगाबाद बीड आंबेजोगाईकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर महापूर गावाजवळ रस्ता रोको करण्यात येत आहे. मागील अर्ध्या तासापासून हा रस्ता रोको सुरू आहे. याचा थेट परिणाम वाहतुकीवर झाला आहे. वाहनाच्या लांबच लांब रांगा रस्त्यावर लागलेल्या दिसून येत आहेत. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मराठा आरक्षण विषयी जोरदार घोषणाबाजी आंदोलक करत आहेत. हा रस्ता रोको किती काळ चाललेली याबाबतची कोणतीही माहिती सध्या समोर येत नाही.






 




Gondia Crime News : पतीचा गळा आवळुन पत्नीने केली हत्या; अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ईसापुर येथील घटना

Gondia Crime News : गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ईसापुर येथील रहिवासी असलेले मेघशाम भावे (42) यांची पत्नी वैशाली मेघशाम भावे (38) हिने पती मेघशाम भावे याचा गळा आवळुन हत्या केल्याची घटना उघडकीस आली. 11 जुन च्या रात्री जेवन करुन भावे कुटुंबीय झोपी गेले पती झोपेत असतांना पत्नी वैशाली हीने मेघशामचा गळा आवळुन हत्या केली. काल सकाळ होऊन सुद्धा मुलगा जागा झाला नसल्याने वडील कुंडलीक भावे यांनी मेघशामला हाक दिली असता मुलाने प्रतिसाद न दिल्यामुळे वडिलांनी मुलाच्या पायाला स्पर्श करुन उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगा मेघशामचा शरीर त्यांच्या हाताला थंड लागल्याने मुलगा मरण पावल्याचे निदर्शनास आले. मुलगा मेघशामचा आकस्मिक मृत्यु झाला समजुन त्याची अंत्यविधी करिता तयारी करण्यात आली आणि संपूर्ण नातेवाईक आल्यानंतर दुपारी 1 वाजता अंत्यविधी साठी रितीरिवाजा प्रमाणे मेघशामची आंघोळ करण्यात आली त्यावेळी त्याच्या गळ्यावरती गळफास सारखी काळ्या रंगाचे निशाण दिसुन आले. हि बाब आई-वडिल आणि नातेवाईकांच्या लक्षात येताच मेघशामचा आकस्मिक मृत्यु नसुन हत्या करण्यात आली. या बाबदची माहिती अर्जुनी मोरगाव पोलीसांना देण्यात आली. अर्जुनी मोरगाव पोलीसांनी कसलाही विलंब न करता तात्काळ ईसापुर येथे जात मेघशाम भावेंचे घर गाठुन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविले. संशयावरुन पत्नी वैशाली हीला ताब्यात घेवुन कसुन चौकशी केली असता मेधशामचा गळा आवळुन हत्या केल्याची कबुली दिली. तर हत्येमागचं नेमक कारण काय ? याचा तपास मोरगांव अर्जूनी पोलिस घेत आहेत. मोरगांव अर्जुनी पोलिसांनी पत्नीच्या विरोधात भादवी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Sindhudurg LIVE Updates: तरेळे कोल्हापूर राष्ट्रीय घाटमार्गावरील करूळ घाटाचे नूतनीकरण काम अपूर्ण, महामार्ग प्राधिकरणकडून 'तारीख पे तारीख'

Sindhudurg LIVE Updates: तरेळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग असलेल्या पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या प्रमुख मार्गावर करूळ घाटाचे नूतनीकरण काम पूर्ण करण्याची तिसरी डेडलाईनही हुकली आहे. हे काम पूर्ण करून वाहतूक सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून 'तारीख पे तारीख' देण्यात येत आहे. यापूर्वी सुरुवातीला 31 मार्च, त्यानंतर 31 मे अशा तारखा महामार्ग प्राधिकरणने दिल्या होत्या. त्यानंतर 31 मे रोजी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी घाट दुरुस्ती कामाची पाहणी करीत 10 जूनपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली डेडलाईन उलटली तरी अद्याप घाट दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे करूळ घाट वाहतुकीस कधी सुरू होणार? याकडे प्रवासी, वाहनचालक, व्यापारी डोळे लावून बसले आहेत. पावसाळ्यात दरवर्षी करुळ घाटात दरड कोसळून रस्ता मार्ग बंद ठेवावा लागत असे. मात्र हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अत्यारित रस्ता आल्याने रस्ता नूतनीकरण करण्यात येत आहे. मात्र अद्यापही काम अपूर्ण असल्याने पर्यटक, वाहनचालक यांच्या मधून नाराजीचा सुर उमठत आहे.

Konkan News: सावंतवाडीत चोरीच्या उद्देशाने घरात घुसणाऱ्या युवकाला ग्रामस्थांनी दिला चोप

Konkan News: चोरीच्या उद्देशाने घरात घुसणा-या परप्रांतीय युवकाला ग्रामस्थांनी पकडून चांगलाच चोप दिल्याची घटना सावंतवाडीतील माजगाव गावात घडली. हा युवक माजगाव येथील एका घरात  खिडकी तोडून आत घुसत असल्याचे लक्षात आल्यावर येथील महीलेने आरडाओरड केली. यावेळी तो युवक बाजूच्या जंगलात पळून गेला. यावेळी येथील ग्रामस्थांनी पोलीसांना याची माहिती दिली. मात्र तो युवक जंगलात पळून गेल्यामुळे हाती लागला नाही. मात्र येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवीत्रा घेत माजगाव येथे राहणाऱ्या इतर परप्रांतीय कामगारांकडे चौकशी केल्यानंतर तो युवक त्यांच्यातीलच एक असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्या युवकाला पकडून संतप्त ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला, त्यानंतर पोलीसांच्या हवाली केला.

Beed News Updates LIVE: बीडमध्ये पोलीस प्रशासनाकडून जातीय सलोखा रॅलीचं आयोजन

Beed News Updates LIVE Updates: बीड जिल्ह्यात मागील काही दिवसात दुषीत झालेले सामाजिक वातावरण पाहता आज बीड पोलीस अधीक्षकांनी जातीय सलोखा रॅलीचे आयोजन बीड येथे करण्यात आले होते छत्रपती संभाजी राजे स्टेडियम ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत या रॅलीचे आयोजन केले गेले होते. या रॅलीत बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर याचबरोबर महादेव महाराज चाकरवाडीकर यानीही या रॅलीत आपला सहभाग नोंदवला.

Beed News Updates LIVE: बीडमध्ये पोलीस प्रशासनाकडून जातीय सलोखा रॅलीचं आयोजन

Beed News Updates LIVE Updates: बीड जिल्ह्यात मागील काही दिवसात दुषीत झालेले सामाजिक वातावरण पाहता आज बीड पोलीस अधीक्षकांनी जातीय सलोखा रॅलीचे आयोजन बीड येथे करण्यात आले होते छत्रपती संभाजी राजे स्टेडियम ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत या रॅलीचे आयोजन केले गेले होते. या रॅलीत बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर याचबरोबर महादेव महाराज चाकरवाडीकर यानीही या रॅलीत आपला सहभाग नोंदवला.

Nashik News LIVE Updates: नांदगाव : दहा हजारापासून ते साठ हजारापर्यंत बोकडाला मागणी

Nashik News LIVE Updates: येत्या 17 तारखेला मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण असल्याने इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिम बांधव हे 'बकरी ईद' सणाच्या निमित्ताने बकऱ्याची कुर्बानी देतात.या कुर्बानीसाठी नाशिकच्या नांदगाव येथील आठवडे बाजारात लाखोंची उलाढाल होत मोठ्या प्रमाणात बोकड खरेदी-विक्री झाली..बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर बाजारात बकरे विक्रीसाठी आलेले होते.कुर्बानीसाठी घेण्यात आलेल्या बोकड खरेदी - विक्रीतून लाखों रुपयांची उलाढाल नांदगाव बाजार समितीत झाली.पाच हजार रुपयांपासून ते 40 हजार रुपये किंमतीच्या बोकडांची मागणी आज बाजारात होती. इस्लामिक कालगणनेतील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी  बकरी ईद साजरी करण्यात येते. त्यानुसार या दिवशी कुर्बानीचा उत्सव म्हणून या ईदचे महत्त्व आहे.

Palghar News: पालघर - वाढवण बंदराच्या जोड रस्त्यांच्या जमीन अधिग्रहणाला सुरुवात

Palghar News: लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच पुन्हा एकदा वाढवण बंदराच्या हालचालींना वेग आला आहे . वाढवण बंदराला जोडणाऱ्या स्वतंत्र महामार्गाच्या उभारणीसाठी जेएनपीएने हालचाली सुरू केल्या आहेत . पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि पालघर या दोन तालुक्यांमधील जवळपास 28 पेक्षा अधिक गावांमधील जमीन अधिग्रहण वाढवण बंदराला जोडणाऱ्या महामार्गासाठी केल जाणार आहे . याचा अध्यादेश आला असून महसूल आणि जेएनपीए कडून भूसंपादनासाठी ठिकठिकाणी आढावा बैठका घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे . लोकसभा निवडणुकीत वाढवण बंदराला विरोध करणाऱ्या पश्चिम किनारपट्टीवरील गावांमध्ये भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवाराने मताधिक्य घेतल्याने येथील बंदर विरोधातील संघटनांचा बंदराला असलेला विरोध क्षमला असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत .

Sunetra Pawar Rajya Sabha Candidate: राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

Sunetra Pawar Rajya Sabha Candidate: बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंकडून पराभव झाल्यावर आता सुनेत्रा पवार संसदेत बॅकडोअर एन्ट्री घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब झालंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची काल रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आता थोड्याच वेळात सुनिता पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी छगन भुजबळ पार्थ पवार, आनंद परांजपे बाबा सिद्दिकी इच्छुक होते. मात्र आता सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आलीय. 

MNS Meeting : विधानसभेच्या रणनितीसाठी मनसेची महत्त्वाची बैठक, मनसे नेते, सरचिटणीस, मुंबईतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

MNS Meeting : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अॅक्शन मोडवर आहे. मनसेची वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात बैठक होत आहे. मनसेचे नेते, सरचिटणीस तसंच मुंबईतील प्रमुख पदाधिकारी बैठकीसाठी दाखल होत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 

Mumbai Local Updates: मध्य रेल्वेच्या लोकलची रखडपट्टी, मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल 20 ते 25 मिनिटं उशिरानं, प्रवाशांना फटका 

Mumbai Local Updates: मध्य रेल्वेच्या लोकलची रखडपट्टी 


मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल 20 ते 25 मिनिटं उशिरानं, प्रवाशांना फटका 


विक्रोळी येथे जलद मर्गिकेवर पॉइंट मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक होती खोळंबून,  


सकाळी 7 वाजल्या पासून ते 8 वाजेपर्यंत हा बिघाड दुरुस्त करण्यात 1 तास लागल्याने संपूर्ण वेळापत्रकावर परिणाम 


बिघाड दुरुस्त झाला असला तरी अनेक गाड्या खोळंबल्या

Sangali News LIVE Updates: सांगलीत बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त, आरोपी अहद शेखने 40 लाखांच्या बनावट नोटा चलनात आणल्याचं उघड, 50 रूपयांच्या बनवत होता हुबेहूब नोटा

Sangali News LIVE Updates: आम्ही असं म्हणतोय कारण तब्बल 40 लाखांच्या बनावट नोटा चलनात आणल्याचं उघड झालंय. सांगली पोलिसांनी कारवाई करत अटक केलेल्या मिरजच्या अहद शेखने 40 लाखांच्या बनावट नोटा चलनामध्ये आणल्याचं चौकशीत उघड झालंय. 50 रूपयांच्या या हुबेहूब बनावट नोटा आहेत.  अहद कडून सव्वा दोन लाखांचा प्रिंटर, लॅपटॉप जप्त केला आहे. त्याच्याकडून नोटा घेणाऱ्या एजंटाचा शोध सुरू आहे. कसून चौकशी केली असता मिरजेत त्याचा बनावट नोटा तयार करण्याचा छापखानाच सुरू केल्याचे उघडकीस आला. अहदच्या या कारनाम्यामागे आंतरराज्य कनेक्शन असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केलाय. 70 रुपयाला बनावट शंभर रुपये तो देत असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे त्याच्या एजंटाचा शोधही पोलीस घेत आहेत. 

Sharad Pawar Yugendra Pawar Baramati Taluka Drought Tour: तिसऱ्या दिवशी थोरल्या पवारांसोबत युगेंद्र पवारांचा बारामती दौरा

Sharad Pawar Yugendra Pawar Baramati Taluka Drought Tour LIVE: आज तिसऱ्या दिवशी शरद पवार यांच्यासोबत युगेंद्र पवार देखील करणार बारामती तालुक्याचा दुष्काळी दौरा


इंदापूर आणि पुरंदरचा दौरा केल्यानंतर आज शरद पवार बारामती आणि दौंड मधील दुष्काळी भागाचा दौरा करणार


 शरद पवार बारामती तालुक्यातील तीन दुष्काळग्रस्त गावांना देणार भेटी, या भेटीत युगेंद्र पवार स्वतः शरद पवारांसोबत असणार


दोन दिवसापूर्वी कार्यकर्त्यांनी भेटून बारामती विधानसभा मतदारसंघात युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी शरद पवारांकडे केली होती


बारामती तालुक्याच्या शरद पवारांच्या दौऱ्यात युगेंद्र पवार स्वतः शरद पवारांसोबत करणार दौरा

Baramati Latest Rain Updates: बारामती तालुक्यातील कन्हेरी गावात ढगफुटी सदृश पाऊस

Baramati Latest Rain Updates: बारामती तालुक्यातील कन्हेरी गावात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची तारांबळ उडाली आहे. काल रात्री झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना अचानक आलेल्या पावसामुळे काय करावे आणि काय नको अशी अवस्था येथील ग्रामस्थांची झाली होती. बारामतीतील याच कन्हेरी गावात जागृत हनुमान मंदिर आहे पवार कुटुंबीय आपल्या प्रचाराचा शुभारंभ याच मंदिरातून करत असतात.

Maharashtra Legislative Council Elections 2024 LIVE: विधान परिषदेची रणधुमाळी; शिक्षक-पदवीधर मतदारसंघासाठी 55 उमेदवार रिंगणात

Maharashtra Legislative Council Elections 2024: मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगानं (Central Election Commission) महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची (Maharashtra Vidhan Parishad Election 2024) निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई (Mumbai News) पदवीधर, कोकण (Konkan News) विभाग पदवीधर, नाशिक (Nashik News) विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा 4 जागांकरिता निवडणूक होत आहे. एकूण 88 उमेदवार या निवडणुकीसाठी वैध ठरले होते. त्यापैकी 33 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्यानं आता 55 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Bapu Bhegade: पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडेंची महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ

Ajit Pawar Leder Used Abuse Language to Lady Officer At Pune: पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडेंनी महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ केली.  तळेगाव नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच हा धक्कादायक प्रकार घडलाय. नगरपालिकेने मिळकत करात वाढ केली, ही करवाढ अवाजवी आहे, असा प्रश्न उपस्थित करत बापू भेगडे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे शिष्टमंडळ घेऊन गेले होते. या चर्चेवेळी पुढील चार वर्षे ही करवाढ लागू असेल असा प्रश्न महिला अधिकाऱ्याला विचारण्यात आला. मात्र त्यांनी दिलेलं उत्तर हे भेगडेंना पटलं नाही आणि त्यांनी महिला अधिकाऱ्यांना उद्देशून अर्वाच्य भाषा वापरली.

Nationalist Rajya Sabha Candidate LIVE: राष्ट्रवादी राज्यसभेवर कोणाला पाठवणार? सुनेत्रा पवार, पार्थ पवार, आनंद परांजपे यांची नावं चर्चेत

Nationalist Rajya Sabha Candidate LIVE: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यसभा उमेदवाराची घोषणा करण्यात येणार आहे. आजच संबंधित उमेदवाराचा उमेदवारी अर्ज देखील भरण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी पार्थ पवार, सुनेत्रा पवार, बाबा सिद्दिकी, समीर भुजबळ, आनंद परांजपे यांची नावं चर्चेत आहेत. घराणेशाहीचा आरोप स्वीकारुन, अनेक ज्येष्ठ नेत्यांची नाराजी ओढवून अजितदादा घरातलाच उमेदवार देतात की एखादा मंझा हुआ पक्षातील नेता समोर करतात की नवा ताज्या दमाचा खेळाडू राज्यसभेवर पाठवतात, हे आज समजेल.

MNS Meeting LIVE Updates: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अॅक्शन मोडवर, मनसेचे नेते, सरचिटणीस, मुंबईतील पदाधिकारी उपस्थित राहणार

MNS Meeting LIVE Updates: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अॅक्शन मोडवर आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी साडेदहा वाजता वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात बैठक घेणार आहेत. मनसेच नेते, सरचिटणीस तसंच मुंबईतील प्रमुख पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूक तसंच संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुपारी एक ते अडीचच्या दरम्यान पक्षातील विविध पद आणि जबाबदाऱ्यांसंदर्भात माटुंगा इथे कार्यक्रम पार पडणार आहे.

Sanjay Raut on Maharashtra Politcs: चार महिन्यांत राज्यातलं सरकार बदलणार, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा निर्धार; तर ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार, संजय राऊतांचा विश्वास

Sanjay Raut on Maharashtra Politcs: महाराष्ट्रात चार महिन्यांत सत्तांतर होणार आहे, असा निर्धार शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. चार महिने द्या मला सरकार बदलायचं आहे, असं पवार म्हणाले. इंदापूरमध्ये दुष्काळग्रस्त शेतीची पाहणी करताना पवारांनी त्यांच्या विधासभेच्या मास्टर प्लॅनलचा ट्रेलर रिलीज केला. पुढचं सरकार हे आमचंच असेल, ऑक्टोबरमध्ये निवडणूक लागली की हे पीक तरारून वर आल पाहिजे असं ठाकरे त्यांच्या नेत्यांना म्हणाले.  तर, राज्याचं नेतृत्व उद्धव साहेबांकडेच जाणार आहे, असा निर्धार संजय राऊतांनी व्यक्त केला. ठाकरे गटाच्या मुंबईतील नेत्यांचा आज मेळावा पार पडला. त्यामध्ये ते बोलत होते

Maratha Reservation LIVE: डॉ. जयश्री पाटील यांचं मराठा आरक्षणाला आव्हान, आजपासून हायकोर्टात सुनावणी

Maratha Reservation LIVE: मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर आजपासून हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठापुढे सुनावणी होणार आहे. डॉ. जयश्री पाटील यांनी 10 टक्के मराठा आरक्षणाला विरोध करत दिवाणी रिट याचिका दाखल केलीय. राज्य सरकारनं मराठा आरक्षणानुसार केलेली सरकारी नोकर भरती आणि वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून राहतील, असा हायकोर्टाने म्हटलंय. तर विनोद पाटील यांच्यावतीने मराठा आरक्षणाला समर्थन देत कॅवेट दाखल करण्यात आलंय. हे आरक्षण कोर्टात टिकेल, असा दावा राज्य सरकारने केला आहे.

OBC Leader Lakshman Hake Hunger Strike Updates: अंतरवालीतील आंदोलनाबाबत लक्ष्मण हाके आज घेणार निर्णय

OBC Leader Lakshman Hake Hunger Strike LIVE Updates: अंबड पोलीसांनी लक्ष्मण हाकेंना 149 ची नोटीस दिली आहे. अंतरवालीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही आंदोलनाची हाक दिलीय. सकाळी 10 वाजता हाके यांची अंबड येथे बैठक आहे. बार्शीत असलेले हाके पोलीस पथकासोबत अंबड कडे निघाले आहेत.
काल रात्री दीड वाजेपर्यंत बार्शी पोलीस ठाण्यात त्यांना थांबवले होते. तिथे ही नोटीस दिल्यावर रात्री सोडलं. 

MP Omprakash Rajenimbalkar Meet Manoj Jarange LIVE : खासदार ओमराजे निंबाळकरांनी मनोज जरांगेंच्या भेटीला

MP Omprakash Rajenimbalkar Meet Manoj Jarange LIVE : खासदार ओमराजे निंबाळकरांनी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची भेट घेतली. ओमराजे निंबाळकरांनी जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर जाताना मराठा महिला आंदोलकांनी खासदार ओमराजे निंबाळकरांची गाडी अडवली...संसदेत फक्त विषय मांडू नका, तर सभागृह बंद पाडा अशी मागणी मराठा आंदोलकांनी ओमराजेंकडे केलीय.

Manoj Jarange Hunger Strike: बजरंग सोनावणेंनी दुसऱ्यांदा घेतली जरांगेंची भेट

Manoj Jarange Hunger Strike LIVE Updates: जालना : बीडचे (Beed) नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे दुसऱ्यांदा मनोज जरांगेंची भेट घेतली. मध्यरात्री बजरंग सोनवणे आणि जिजाऊंचे वंशज शिवाजी राजे जाधव यांनी जरांगेंची भेट घेतली.. यावेळी त्यांनी जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केलीय. मनोज जरांगेंच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना एकत्र करून आपण राज्यपालांची भेट घेणार असल्याच यावेळी  खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितलं. तर खासदार ओमराजे निंबाळकरांनी जरांगेंची भेट घेतली.. त्यानंतर जाताना मराठा महिला आंदोलकांनी खासदार ओमराजे निंबाळकरांची गाडी अडवली. संसदेत फक्त विषय मांडू नका, तर सभागृह बंद पाडा अशी मागणी मराठा आंदोलकांनी ओमराजेंकडे केलीय.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...


देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये झटपट घेता येईल... 


राज्यात विधान परिषद निवडणुकांचे वारे


राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली असून आता विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं (Central Election Commission) महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची (Maharashtra Vidhan Parishad Election 2024) निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई (Mumbai News) पदवीधर, कोकण (Konkan News) विभाग पदवीधर, नाशिक (Nashik News) विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा 4 जागांकरिता निवडणूक होत आहे. एकूण 88 उमेदवार या निवडणुकीसाठी वैध ठरले होते. त्यापैकी 33 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्यानं आता 55 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


अजित पवारांची धगधगती तोफ साथ सोडणार? चर्चांना उधाण


लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातील अजित पवारांच्या ताफ्यातील धगधगती तोफ आता साथ सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कोणाचंही नाव समोर आलं नसून महिला पदाधिकारी नाराज असून लवकरच पक्ष सोडणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच, ही नाराज महिला पदाधिकारी पूर्वाश्रमीची मनसे नगरसेविका होती, अशीही माहिती समोर आली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.