Maharashtra Breaking 12th July LIVE Updates: नवाब मलिक यांचा मेडिकल जामिन दोन आठवड्यांनी वाढवला
Maharashtra Breaking 12th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
Yavatmal News : नांदेड, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, येथील दुचाकी चोरून यवतमाळ येथे विक्री करनाऱ्या चोरट्यांस लालखेड पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळून 10 लाख रुपये किमतीच्या 20 चोरलेल्या दुचाकीसह जप्त करण्यात आल्या. लखन देवीदास राठोड, रा. मोरगव्हाण ह.मु. सुलतानपूर, जि. बुलडाणा, वैभव घुले रा सुलतानपूर, बादल राठोड, शुभम राठोड अशी अटक करण्यात आलेल्यांची 4 आरोपींची नावे आहे.
Ahmednagar News : स्मशानभूमी ही प्रत्येक गावाची मूलभूत सार्वजनिक सुविधा मानली जाते. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील 333 गावांत अद्याप स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने तेथे उघड्यावर किंवा मिळेल त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. तर काही ठिकाणी जागा उपलब्ध असूनही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे स्मशानभूमी नसल्याचे चित्र आहे.
Aashadhi Ekadashi 2024 : मुख्यमंत्र्यांच्या पूजेच्यावेळी होणारी व्हीआयपी गर्दी टाळण्यासाठी देण्यात येणाऱ्या पासेसवर नियंत्रण आणण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. वास्तविक मंदिराचा गाभारा, सोळखांबी लहान असल्याने जास्त व्हीआयपी आत आले तर मुख्यमंत्र्यांसह महत्वाच्या व्यक्तींना अनावश्यक गर्दीला सामोरे जावे लागते यामुळे मंदिर समितीशी ठरवून महवपुजेला मर्यादित व्हीआयपीन प्रवेश देण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी Abp माझाशी बोलताना सांगितले. याशिवाय महापूजा सुरु असताना मुखदर्शनाची रांग सुरूच राहणार असून महापूजा कमीतकमी वेळेत करण्यासाठी मंदिर समितीशी चर्चा केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
Shirdi News : संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा येथील मुस्लिम युवकाने हिंदु मुलीशी एकमेकांच्या परस्पर सहमतीने लग्न केल्याने परिसरातील हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. या मुलीला फुस लावुन पळवला असल्याचा आरोप करत हा प्रकार लव्ह जिहाद असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केलाय. या प्रकरणी आज संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा गावातून सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढत घारगाव पर्यंत नेण्यात आला होता. या मोर्चामध्ये अनेक धर्मीयांचे झेंडे देखील पाहायला मिळाले व प्रभू श्री रामचंद्र की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, गर्व से कहो हम हिंदू है अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी घारगाव गाव व परिसर बंद ठेवत हिंदू संघटनानी या घटनेचा निषेध केलाय.
Wardha News : हिंगणघाट शहरातील मुख्य वस्तीत एका व्यक्तीच्या घरात 532 ग्रॅम गांजा आढळून आलाय. हिंगणघाट पोलिसांनी छापा टाकून गांजा जप्त केला आहे तर अमली पदार्थ प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहेय. संत चोखोबा वार्ड हिंगणघाट येथील टाका ग्राउंड जवळ राहणारा शेख युसुफ शेख करीम याचे घरी गांजा असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी रेड केला. दरम्यान, आरोपीच्या घराच्या घरझडती मध्ये अंदाजे 15,960 रूपये किंमतीचा ओलसर गांजा 532 ग्रॅम या सापडला.सदर गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपीविरूद्ध एनडीपीएस कायदयान्वे गुन्हा नोंद करण्यात आलाय.
Nawab Malik: नवाब मलिक यांचा जामीन 2 आठवड्यांनी वाढवला आहे
नवाब मलिक यांचा मेडिकल जामिन दोन आठवड्यांनी वाढवला.
ED कडून ED च्या वकिलांना भूमिका काय घ्यायची याबाबत कोणतीही सूचना नसल्यामुळे जामीन वाढवत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
Dhule News: धुळे जिल्ह्यात पावसाने पूर्णतः पाठ फिरवली असून यामुळे जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पात केवळ 12 टक्के जलसाठा शिल्लक असून यामुळे धुळेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र असून एकीकडे शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत तर दुसरीकडे अजूनही काही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून शिंदखेडा तालुका आणि धुळे तालुका या ठिकाणी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असलेले पेरण्या कोळंबल्या आहेत, सद्यस्थितीत शहराला आठ ते नऊ दिवसांनी पाणीपुरवठा होत असून जुलै महिन्याचे तेरा दिवस उलटून देखील अद्यापही पाऊस न झाल्याने जल प्रकल्प कोरडे ठाक पडण्यास सुरुवात झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा धरणात केवळ एक टक्के जलसाठा शिल्लक असून यामुळे धुळेकरांवर पाणी टंचाईचे संकट अधिक वाढले आहे
Maharashtra News: केंद्रीय निवडणूक आयोगाचा रिप्लाय न आल्याने गणपत गायकवाड वेटींगवर
केंद्रीय निवडणूक आयोगाचा रिप्लाय आल्यानंतर गणपत गायकवाड मतदान करणार
काँग्रेस ने तक्रार केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ही तक्रार पाठवण्यात आलेली आहे
मात्र अद्याप पर्यंत निकाल न आल्यानं गणपत गायकवाड मतदान केंद्राच्या बाहेर वेटींगवर
Pandharpur News : पंढरपूरची आषाढी यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरला जात असतात.या भाविकांच्या सोयी साठी नांदेड परिवहन विभागाने 230 विशेष बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड परिवहन विभागात एकूण नऊ आगार आहेत.या नऊ अगारातून 230 बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.13 जुलै ते 22 जुलै पर्यंत ह्या बसेस नांदेड ते पंढरपूर आशा धावणार आहेत. नांदेड परिवहन विभागाने तयारी पूर्ण केली आहे.यासाठी कर्मचाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.एखाद्या गावातून 40 प्रवाशी मिळाल्यास त्या प्रवाशांसाठी देखील बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती नांदेड परिवहन विभागाचे विभागीय नियंत्रक चंद्रकांत वडस्कर यांनी दिलीय.
Hingoli News : हिंगोली मध्ये आज सर्व महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने लेखणी बंद आंदोलन करण्यात आला आहे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आला आहे आकृतीबंध मंजूर करण्यात यावे यासह विविध मागण्यासाठी आज हे आंदोलन केले गेले आहे मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन अधिक अधिक तीव्र सुद्धा होणार आहे असे प्रशासनाला दिलेल्या निवेदनामध्ये सांगण्यात आला आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा परिणाम प्रशासकीय कामावर होण्याची सुद्धा शक्यता आहे.
Maharashtra News : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं नीरा स्नान आज सराटी या ठिकाणी मोठ्या उत्साहातपार पडलं. यावर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे नीरा नदी प्रवाहित आहे. या वाहत्या नदीच्या पाण्यात आज तुकोबांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले. नीरा स्नानानंतर तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्याला निरोप देऊन सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल.
Mumbai Rain : मुंबईत दोन दिवस उसंत घेतलेल्या पावसाने आज जोर धरलेला पाहायला मिळत आहे. आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Pune News : पुणे महापालिकेच्या वसतीगृहात दारू पार्टी अन् धांगडधिंगा
शहरातील घोले रोडवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात प्रकार
वर्षानुवर्षे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दारूच्या पार्ट्या करत धांगडधिंगा केल्याचा प्रकार
याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा टीव्ही बंद असणे, कुचकामी सुरक्षा व्यवस्थेमुळे वसतिगृहातील बेशिस्तपणा वाढत असल्याने शांत विद्यार्थ्यांना त्रास
108 खोल्यांचे मोठे वसतीगृह बांधले असून तेथे 400 जणांच्या राहण्याची सोय आहे
समाज विकास भागाकडून 14 विद्यार्थ्यांची वसतिगृहातून हकालपट्टी
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
1. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज निवडणूक; महायुतीचे 9 तर मविआकडून 3 उमेदवार रिंगणात, कोण कोणाला शह देणार याची उत्सुकता
2. विधान परिषदेची निवडणुकीआधी सर्व पक्षांकडून मतांची जुळवाजुळव, भाजप, राष्ट्रवादी, शिंदे गट, ठाकरे गट, काँग्रेसच्या बैठका, काँग्रेसच्या बैठकीला दोन आमदारांची दांडी
3. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची 3-4 मतं फुटणार, शेकापच्या जयंत पाटलांचा दावा, काँग्रेसच्या तीन ते चार डाऊटफुल आमदारांची व्यवस्था पक्ष करेल, कैलास गोरंट्याल यांचा इशारा
4. पहिल्या पसंतीच्या मतांवर दोन्ही उमेदवार निवडून आणण्याची अजितदादांचं प्लॅनिंग, आमदारांच्या बैठकीला छगन भुजबळ गैरहजर
5. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 288 पैकी 225 पेक्षा जास्त जागा जिंकणार, शरद पवारांचा विश्वास
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -