Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Live Updates:  महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह देशभरातील इतर महत्वाचे अपडेट्स

मुकेश चव्हाण Last Updated: 12 Feb 2025 02:47 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News Live Updates: लाडकी बहीण योजनेचा फटका अनेक योजनांना बसताना पाहायला मिळतोय. या योजनेचा फटका शेतकऱ्यांनाही बसतोय का हा प्रश्न विचारण्याचा कारण शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेसाठी दिलं जाणार...More

भाईंदर पश्चिममध्ये गैस पाइपलाइन फुटली 

भाईंदर : भाईंदर पश्चिममधील मॅक्सस मॉलजवळ मेट्रो ट्रेनसाठी होणाऱ्या कामाच्या खोदकामादरम्यान गॅस पाइपलाइन फुटल्याने गॅस गळतीची घटना घडली. गॅस गळतीची माहिती मिळताच, महानगर गॅस कंपनीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काम सुरू केले.
अग्निशमन दलही तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि रस्ता वाहतूक थांबवून गॅस गळती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. या दुर्घटनेनंतर भाईंदर पश्चिममधील काही भागांची गॅस सेवा खंडित झाली आहे. गॅस सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी दुरुस्तीचे काम सुरू आहे. घटनेनंतर स्थानिक लोकांनी सुटकेचा श्वास घेतला, कारण अधिकाऱ्यांनी वेळीच कारवाई केली आणि कोणत्याही मोठ्या दुर्घटनेपासून बचाव केला.