Maharashtra Breaking 11th July LIVE Updates: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात भाजप नेते नितेश राणे यांची चौकशी होणार

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 11 Jul 2024 03:04 PM
Maharashtra News : रस्त्यावरचे खड्डे पाहणं आणि ते सहन करणं तर दररोजच आपल्या नशिबीच; स्थानिक ग्रामस्थांचा संताप

Maharashtra News : रस्त्यावरचे खड्डे पाहणं आणि ते सहन करणं तर  दररोजच आपल्या नशिबी आहे. पण आता आम्ही तुम्हाला सर्व खड्ड्यांचा बाप दाखवणार आहोत. मुंबई-नाशिक महामार्गावरील एका पुलाला चक्क भगदड पडलंय. शहापूरजवळ समृद्धी महामार्गावरून जाणारा आणि दोन गावांना जोडणाऱ्या पुलाला भलं मोठं भगदाड पडलं आहे. शेरे - बावघर - शेंद्रूण गावांना जोडण्यासाठी हा उड्डाणपूल बनवण्यात आला आहे. पुलाचं बांधकाम किती निकृष्ट दर्जाचं आहे हे यावरून स्पष्ट होतं. कंत्राटदारावर कारवाई होईल अशी अपेक्षा करण्यावाचून आमच्या हातात दुसरं काही नाही, अशी भावना स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करतायेत. 

Maharashtra News : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात भाजप नेते नितेश राणे यांची चौकशी होणार

Maharashtra News : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात भाजप नेते नितेश राणे यांची चौकशी होणार

नितेश राणेंनी दिशाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात चौकशीची मागणी केली होती

दिशाची आत्महत्या नसून हत्या, असा नितेश राणेंनी केला होता दावा

दिशा मृत्यूप्रकरणात पुरावे असल्याचा नितेश राणेंचा दावा

मुंबई पोलिसांकडून नितेश राणेंना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Worli Hit And Run Case : चूक झाली, माझं करिअर उद्ध्वस्त, घटनेचा पश्चाताप होतोय; पोलिसांसमोर मिहीर शाहाची रडारड

Worli Hit And Run Case : मुंबई : वरळीतील (Worli Accident) हिट अँड रन प्रकरणानं (Hit And Run Case) संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अपघातातील मुख्य आरोपी मिहीर शाह तब्बल तीन दिवस फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला विरारमधून अटक केली. मिहीरसोबतच 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. निर्दयी मिहीरनं कावेरी नाखवा यांना अत्यंत क्रूरपणे दोनदा चिरडलं. पण आता याच निर्दयी आरोपीला पश्चाताप होतोय, असं त्यानं सांगितलंय. पोलीस चौकशीत मिहीर शाहनं आपली चूक मान्य केल्याची माहिती मिळाली. माझ्या हातून घडलेल्या घटनेचा मला पश्चाताप होतोय, असंही मिहीर शाहनं म्हटल्याचं समोर आलं आहे. 


वाचा सविस्तर 

Mamata Banerjee Will Meet Sharad Pawar: मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी ममता बॅनर्जी शरद पवारांची उद्या भेट घेणार

Mamata Banerjee Will Meet Sharad Pawar: उद्या संध्याकाळी ममता बॅनर्जी शरद पवारांची भेट घेणार 


उद्या संध्याकाळी मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी भेट होणार


भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट

Gondia News: सागवानाची तस्करी करणारे तिघे वन विभागाच्या जाळ्यात; गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील कोयलारी येथील घटना

Gondia News: गोंदियाच्या सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालय सडक अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या क्षेत्र सहायक कार्यालय शेंडा कोयलारी येथे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाड टाकून सागवानाची तस्करी करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतले आहे. शेंडा सहवनक्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध सागवान तस्करी सुरू असल्याची चर्चा होती. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावर बारीक लक्ष ठेवले. काही लाकूड तस्कर आपल्या घरी सागवान चिरान करीत असल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यांनी कोयलारी येथील आरोपी निलेश मेश्राम, राधेश्याम नेवारे, बाबुदास नेवारे यांना जंगलातून सागवान तोडून त्याचे चिरान करताना त्यांच्या घरी पकडले. 

Beed News : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आज बीड मध्ये मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली, सभेने होणार रैलीचा समारोप 

Beed News : बीड : मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती आज बीड मध्ये मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली निघणार आहे. या रॅलीची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी 11 वाजता शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मुख्यमार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप होणार आहे. त्यानंतर जरांगे पाटील यांचं भाषण होईल. 


जरांगे पाटील यांनी सगेसोयरे संदर्भात सरकारला दिलेल्या अल्टीमेटम 13 तारखेला संपत आहे. याच पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये शांतता रॅली निघणार आहे. या रॅलीच्या अनुषंगाने मराठा समन्वयकांनी पार्किंग ॲम्बुलन्स नाष्टा पाणी याची व्यवस्था केली आहे. तसेच स्वयंसेवकांची देखील नियुक्ती केलीय. यात महिला स्वयंसेवकाचा देखील समावेश करण्यात आला आहे.

Ratnagiri News: कोकणात भात शेतीच्या लावणीला वेग

Ratnagiri News: कोकणात आता पावसामुळे शेतीची काम भराभर उरकण्यासाठी शेतकरी सध्या मग्न आहे. त्यामुळे भात शेतीच्या लावणीला वेग आला आहे. दरम्यान, कोकणात जाण्यासाठी मुंबई - गोवा महामार्गावरून प्रवास करत असताना रत्नागिरी तालुका आणि संगमेश्वर तालुक्याच्या सीमेवरून वाहणारी बावनदी, नदीच्या किनारी असलेली भातशेती आणि छोट्या छोट्या डोंगर रांगांमध्ये माडाच्या बनात वसलेली टुमदार कौलारू घरं, त्यात समोरच्या डोंगरांमधून फेसाळत कोसळणारे छोटे धबधबे हे दृश्य पाहिल्यानंतर अनेकांची पावलं इथं काही काळ थांबतात. त्यानंतर निवळी घाटात थांबून फोटो आणि सेल्फी घेण्याचा मोह मात्र आवरत नाही. 

BHANDARA News : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार अपयशी; माजी खासदार शिशुपाल पटले यांचा भाजपला घरचा आहेर

BHANDARA News : महागाई, बेरोजगारी, विजेचे अवास्तव वाढलेले दर, यामुळं सर्वसामान्य नागरिकांना जगणं कठीण झालं आहे. उत्पादक खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळणारा दर आणि वारंवार नैसर्गिक आपत्तीत होणारं नुकसान यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांचा वारंवार सरकारकडं पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, भाजप सरकारकडून सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष होत आहे. यामुळेच भाजप सरकारला लोकसभा निवडणुकीत फटका बसला. शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य नागरिक यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारनं सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात तोडगा काढून सर्व प्रश्न तातडीनं सोडवावित, अन्यथा भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा इशारा भाजपचे माजी खासदार आणि भाजपचे विद्यमान किसान आघाडीचे प्रदेश सरचिटणीस शिशुपाल पटले यांनी भाजपला दिला आहे.

Ahmednagar News: पंकज जावळेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Ahmednagar News: अहमदनगर महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश निरंजन नाईकवाडे यांनी बुधवारी फेटाळला. बांधकाम व्यावसायिकाला बांधकाम परवान्यासाठी नऊ लाखांची लाच मागितल्याच्या आरोपावरून आयुक्त जावळे आणि त्यांचे स्वीय सहायक श्रीधर देशपांडे यांच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जावळे यांनी  जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने काल सायंकाळी निकाल दिला. गुन्ह्याचा तपास करायचा असल्याने आरोपीला जामीन देऊ नये तसेच आरोपीला जामीन मंजूर झाल्यास चुकीचा संदेश जाईल असा युक्तिवाद करण्यात आला. तो न्यायालयाने ग्राह्य धरत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

Ratnagiri News: रत्नागिरी - रविवारी गोहत्याच्या मुद्द्यावरून काढलेल्या मोर्चानंतर भाजप नेते निलेश राणे यांच्यासह 450 जणांविरोधात गुन्हा दाखल

Ratnagiri News: रविवारी रत्नागिरी शहरामध्ये गोहत्या होत असल्याच्या मुद्द्यावरून हिंदू संघटनांतर्फे काढण्यात आलेला मोर्चा आणि रास्तारोको प्रकरणी एकूण 450 जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी 11.30 ते 2.35 या कालावधीत मारुती मंदिर शिवसृष्टी, माळनाका ते जेलरोड असा मोर्चा काढत रास्ता रोको करण्यात आला होता. यावेळी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू होते. पण त्यानंतर देखील मोर्चा निघाला. शिवाय रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 31 (1) अन्वये जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. असं असलं तरी दाखल केलेल्या गुन्ह्यांची माहिती देण्यासाठी पोलिसांकडून मात्र टाळाटाळ केली जात आहे.

PM Modi on Mumbai Visit : पंतप्रधान मोदी 13 जुलैला मुंबई दौऱ्यावर येणार

PM Modi on Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जुलैला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. सायंकाळी 5.30 वाजता नेस्को प्रदर्शन केंद्रात विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर वांद्रे-कुर्ला संकुल येथे सायंकाळी 7 वा इंडियन न्यूजपेपर सोसायटी टॉवरचे उद्घाटन करणार आहेत.

Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी भाजप आमदारांची रंगीत तालीम; कशी मतं द्यावीत? भाजपच्या आमदारांना वरिष्ठांच्या सूचना

Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी भाजप आमदारांची रंगीत तालीम


भाजपच्या आमदारांनी कोणत्या पसंतीचं कशी मते द्यावीत याच्या सूचना करण्यात आल्या


भाजप आमदारांची विधिमंडळात बैठक पार पडली  यात भाजप आमदारांना दिल्या सूचना


मतदान कस करावं याची रंगीत तालीम साध्या कागदावर घेण्यात आली


कोणाचं मतदान वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी


वरिष्ठांना दिल्या सर्व आमदारांना सूचना

Samruddhi Mahamarg: नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर भलामोठा तडा

Samruddhi Mahamarg: नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघे एक वर्ष झाले तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंजनजीक 3 सेंमी रुंदीच्या 50 फूट लांबीच्या भेगा पडल्या आहेत. महामार्गासाठी एम-40 ग्रेडचे सिमेंट वापरल्यास 20 वर्षे खड्डे पडत नसल्याचा दाव एमएसआरडीसीने केला होता, तो फोल ठरला. माळीवाड इंटरचेंजवळच पुलावर मोठा खड्डा पडला आहे, त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.

Rajapur News: रत्नागिरीत राजापूर तालुक्यातील बिबट्या मृतावस्थेत आढळला

Rajapur News: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील सोलगाव, देवीची गुरववाडी येथील वसंत नारायण गुरव यांच्या घराच्या बाहेरील भागामध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला आहे. सदर बिबट्याचा भूकेने मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाकडून वर्तविण्यात आला आहे.  


याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार सोलगाव देवीची गुरववाडी येथील वसंत गुरव हे मुंबईला वास्तव्यास असून त्यांचे घर बंदस्थितीत असते. बुधवारी दुपारी गुरव यांच्या घराशेजारी बिबट्या असल्याची शेजारी राहणाऱया ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ याबाबत वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र घराबाहेर असलेला बिबट्या मृत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.  

 

त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱयांमार्पत बिबट्याची तपासणी करण्यात आली. सदर मृत बिबट्या मादी असून 5 ते 6 महिने वयाचा असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. तसेच भूकेने बिबट्या मृत झाल्याचा अंदाजही वनविभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
Shiv Sena And NCP MLA Disqualification Case: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी 23 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 

Shiv Sena And NCP MLA Disqualification Case: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी 23 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 


आजच उद्धव ठाकरेंनी सुनावणीसाठी तारीख देण्याची विनंती कोर्टाला केली होती


राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 23 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...


1. भाजप महाराष्ट्र कोअर कमिटीची आज सकाळी 10 वाजता बैठक, भाजप प्रदेश कार्यालयात सकाळी 10 बैठकीचं आयोजन,बैठकीला सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार


2. भाजप आमदारांची विधिमंडळात बैठक पार, विधान परिषदेसाठी भाजप आमदारांची घेण्यात आली रंगीत तालीम, आमदारांनी कोणत्या पसंतीची कशी मते द्यावीत याबाबत करण्यात आल्या सूचना 


3. मुंबई भाजप कोअर कमिटीची बैठक संपन्न, 11 प्रमुख नेत्यांची मुंबईतील 36 जागा महायुतीच्या म्हणून निवडून येण्यासाठी बैठक झाल्याची आशिष शेलार यांची माहिती


4. प्रदेश काँग्रेसची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू, 19 जुलैला मुंबईतील टिळक भवनात पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आयोजित, बैठकीत निवडणुकीची रणणिती आखली जाणार


5. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची बैठक संपन्न,  शिंदे गटाचे सर्व आमदार वांद्रेंच्या ताज लँड्स हॉटेलमध्ये उपस्थित 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.