Maharashtra Breaking LIVE Updates: ...म्हणून आज या देशातील शेतकऱ्यांना जीव द्यायची वेळ आलेली आहे - शरद पवार
Maharashtra Breaking 11th August 2024 LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
Solapur : बार्शीत शरद पवारांना माजी आमदार प्रभावती झाडबुके यांनी बांधली राखी
शेतकरी मेळव्याच्या निमित्तने बार्शीत आलेल्या शरद पवार यांनी आपल्या जुन्या सहकारी माजी आमदार प्रभावती झाडबुके यांची घेतली भेट
यावेळी प्रभावती झाडबुके यांनी शरद पवारांना राखी बांधून औक्षण करत केले स्वागत
प्रभावती झाडबुके यांनी 1962 ते 1972 या काळात विधानसभेत बार्शी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते
आज भाषणात ही शरद पवार यांनी झाडबुके यांचा उल्लेख केला होता
Solapur : राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवार हे माजी मंत्री आणि जुने सहकारी दिलीप सोपल यांच्या भेटीला
शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने बार्शी दौऱ्यावर असेलेल्या शरद पवार हे माजी मंत्री दिलीप सोपल निवासस्थानी पोहोचले
तर शरद पवारांच्या भेटीसाठी दिलीप सोपल यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येने उपस्थित
पवारांच्या सोबत विजयसिंह मोहिते पाटिल, खासदार धैर्यशील मोहिते पाटिल हे देखील उपस्थित
दिलीप सोपल हे अनेक वर्ष शरद पवार यांचे सहकारी राहिलेत मात्र मागील विधानसभा निवडणुकीत सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला
Nanded : काँग्रेस बैठकीत सकल मराठा समाजाने केली घोषणाबाजी
विभागीय बैठकीत काही काळ गोंधळ
काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी आंदोलनकांची मागणी
Akola : अकोल्यात देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात सुरक्षा यंत्रणेची चूक समोर आलीय.
देवेंद्र फडणवीस यांचा ताफा मुख्य राष्ट्रीय महामार्गावर लागला तरी फडणवीसांचा सुरक्षा यंत्रनेचा पोलिसांचा ताफा हा कृषी विद्यापीठाचा होता.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या विश्रामगृहात फडणवीस जाणार असं सुरक्षा यंत्रणेला वाटलं होतं..
मात्र फडणवीस यांचं वाहन थेट मुख्य महामार्गावर लागल्याने त्यांच्या ताफ्यातील मागील सुरक्षा यंत्रणेचा ताफा हा मागेच राहिला.
यात पोलिसांचे वाहन आणि ॲम्बुलन्स इतर वाहने मागेच राहिले होते...
याआधीही फडणीसांच्या ताफामध्ये अकोल्यात अशीच चूक झाली होती..
Supriya Sule : माझा फोन हॅक झाला - सुप्रिया सुळे
माझा फोन कुणीतरी दुसर चालवत आहे- सुप्रिया सुळे
माझा फोन बंद असताना मला जयंत पाटील यांना रिप्लाय आलाय- सुप्रिया सुळे
माझा फोन कुणी हॅक केला माहिती नाही- सुप्रिया सुळे
पण याचा नवीन बळी मी झाली- सुप्रिया सुळे
पण माझ्या नवऱ्याला नको ते मेसेज पाठवू नका म्हणजे झालं- सुप्रिया सुळे
विचारलं असत तर सांगितले असतं- सुप्रिया सुळे
मला सगळं नेले तरी मतदार नेऊन जाऊन शकत नाही- सुप्रिया सुळे
माझ्या मोबाईवरीन कुणाला मेसेज पाठवला आहे मला माहित- सुप्रिया सुळे
माझ्या मोबाईल वर मेसेज करा, पैसे मागा तिकीट मागा जे काय मागायचं ते मागा.- सुप्रिया सुळे
Ulhasnagar : उल्हासनगरत पाणीटंचाई आणि अनियमित पाणी पुरवठ्यामुळे महिला त्रस्त
उल्हासनगरमधील महिला वर्गाला ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई आणि अनियमित पाणी पुरवठयामुळे अडचणींनाचा सामना करावा लागतोय.
पावसामुळे धरणात समाधानकारक पाणी साठा असतांना केवळ महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे उल्हासनगरकरांवर कृत्रिम पाणी टंचाई ओढावली आहे.
Ulhasnagar : एनसीबी कडून आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश
उल्हासनगर मधील कुरिअर मधील कारवाई
पावणे दोन कोटीचा मुद्देमाल केला जप्त
सहा आरोपींना ठोकल्या बेड्या
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या एनसीबी अधिकाऱ्यांनी 75 किलो गांजा आणि 48 हजार कोडिन बॉटल अशा एकूण पावणे दोन कोटी रुपयांच्या आम्लपदार्थांच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे उल्हासनगर येथे ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आले आहे
Political : भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांचा राजीनामा
युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदाचा दिला राजीनामा
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला राजीनामा
परतूर विधानसभा मतदारसंघांमध्ये पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ हवा असे कारण देत दिला आपल्या पदाचा राजीनामा
Supriya Sule : सुप्रिया सुळे यांचा फोन आणि Whatsapp हॅक
X वर सुप्रिया सुळे यांची माहिती
Sharad Pawar : बार्शी येथील शरद पवार यांच्या शेतकरी संवाद सभेदरम्यान मराठा बांधवांनी काळे झेंडे दाखवत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा सभास्थळी दिल्या
Sharad Pawar : आज या देशातील शेतकऱ्यांना घामाची कष्टाची किमत मिळतं नाहीये - शरद पवार
म्हणून जीव द्यायची वेळ आलेली आहे - शरद पवार
माझ्या कडे जेव्हा कृषी खात्याची जबाबदारी होती तेव्हा कोट्यावधीचे कर्ज माफ केले - शरद पवार
शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त कसे मिळतील याची काळजीघेत होतोय - शरद पवार
आज मोदी साहेबांच्या राज्य, या सत्तेचा उपयोग शेतकरी आणि शिकलेला तरुण नोकरीं मिळतं नसेल. तर निराश तरुण आपल्याला देशभरात दिसतय - शरद पवार
जिथे तरुण निराश असतो तिथल्या देशाचे चित्र ही नैराश्य दिसतं - शरद पवार
तरुण पिढीला हाताला काम दिलं पाहिजे - शरद पवार
लोकसभाची निवडणुका झाल्या तुमच्या सारख्या लोकांनी जादू दाखवली - शरद पवार
चारशे पार म्हणणाऱ्यांना तीनशे पार जाता आली नाही त्यांना दुसऱ्याची मदत घेऊन सरकार स्थापन करावी कागली- शरद पवार
Pune : शिवसेना आमदार किशोर दराडे यांना पुणेरी भाषेत पुणेकरांनी सुनावलं
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
शिवसेनेचे आमदार किशोर दराडे पुण्यातील बाजीराव रोडने जात असताना. त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरने सायरन वाजवत गाडी चालवली होती.
एक सुज्ञ पुणेकरांनी गाडीचा सायरन का वाजत आहे म्हणून पाहिलं तर गाडीमध्ये आमदार किशोर दराडे बसलेले होते.
यावेळी पुणेकरांनी गाडीची काच खाली घ्यायला लावली व ड्रायव्हरला शीट बेल्ट का लावला नाही असा जाब विचारला.
यावेळी आमदार दराडे हे पुणेकरांकडे पहात राहिले. त्याचबरोबर आमदार दराडे यांना खडे बोल सुनावले.
आम्ही जनता आम्ही निवडून देतो तेव्हा ते आमदार आहेत पोलिसांकडे पाहू नका असही या पुणेकरांनी आमदार दराडे यांना सुनावलं.
तर आमदार दराडे हा सर्व प्रकार पहात होते. शेवटी जाताना पुणेकरांनी शिव्याची लाख ओळी देत त्यांच्या समोरून काढता पाय घेतला.
Akola : अकोला जिल्ह्यातील पातूर येथे ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या स्वागताचे बॅनर्स अज्ञातांनी फाडलेत.
आमदार भास्कर जाधव पातूर शहरात आज दुपारी 4 वाजता येतायेत .
आमदार नितीन देशमुख यांच्या विकासनिधीतून रेणुका टेकडीवरील मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन करणार आहेत.
पातूरात भास्कर जाधव करणार कार्यकर्त्यांना संबंधित. बॅनर्स फाडल्यानंतर पातूरात शिवसैनिक आक्रमक.
Thane : काल उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेण बांगड्या आणि नारळ फेकल्यानंतर ठाण्यातल्या मनसैनिकांवर आता गुन्हे दाखल करायची प्रक्रिया सुरू झाली आहे,
दुसरीकडे ठाण्याचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला आव्हान दिले आहे,
पुढच्या वेळी तुम्ही सांगाल तिथे तुम्ही सांगाल त्यावेळेस मी स्वतः येऊन आंदोलन करीन ते देखील दिवसाढवळ्या करेन असे आव्हान अविनाश जाधव यांनी संजय राऊत यांच्या टिकीला उत्तर देताना केले आहे,
Rohit Pawar : दिल्लीच्या बादशाहला मराठी माणसासमोर झुकवणारा नेता म्हणजे शरद पवार - रोहित पवार
याभागात सोयाबीनची शेती मोठ्या प्रमाणात आहे, सोयाबीनचे आजचे भाव परवडणारे नाहीत - रोहित पवार
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे खतचे भाव वाढलेत - रोहित पवार
मात्र भाव पाच वर्षांपूर्वी जे होते तेच भाव होते - रोहित पवार
विधानसभामध्ये जे आम्ही मांडतो तेव्हा त्याचेउत्तर मिळतं नाहीय - रोहित पवार
मोदी फडणवीस म्हणाले होते उत्पन्न दुप्पट करू पण यांनी खर्च दुप्पट केला पण भाव वाढले नाहीत - रोहित पवार
पवार साहेब कृषी मंत्री असताना लोकं फोन करायचे की कांद्याचे भाव पडलेत - रोहित पवार
Nashik - नाशिकच्या देवळाली मध्ये रस्त्यासाठी जन आंदोलन
- देवळाली भगूर रस्त्यावर खड्डे पडल्याने स्थानिक नागरिक आक्रमक
- लोक वर्गणी काढून भीक म्हणून लोकप्रतिनिधींना देणार
- खड्ड्यांमध्ये झाडे लावत आंदोलन सुरू
- प्रशासनाविरोधात काळ्या फिती बांधून काळे झेंडे दाखवत आंदोलन
- नागरिकांनी चिखलात बसून घेत केले आंदोलन
Solapur : बार्शीत शरद पवार गटाचा मेळावा,
शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटिल, आमदार रोहित पवार, खासदार धैर्यशील मोहिते पाटिल हे उपस्थित
विशेष म्हणजे बीआरएसचे सोलापुरातील नेते भगीरथ भालके हे देखील कार्यक्रमला उपस्थित
उत्तम जानकर ही उपस्थित
Political News : मुंबईतील माजी नगरसेवक आमदार खासदारांची आणि पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीच आयोजन
ठाकरे गटाकडून भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होत
याचा देखील आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे, विधानसभा निवडणूक हा ही विषय
Political News : मुंबईतील माजी नगरसेवक आमदार खासदारांची आणि पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीच आयोजन
ठाकरे गटाकडून भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होत याचा देखील आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे, विधानसभा निवडणूक हा ही विषय
Bhandara : शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेत भंडाऱ्यात बॅनर
मध्यरात्री लावलेले बॅनर सकाळ होताच काढलेत
भंडारा शहरातील बहिरंगेश्वर मंदिर परिसरात सकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना एक आश्चर्यचकीत करणारं बॅनर बघायला मिळालं.
या बॅनरवर भंडाऱ्याचे आमचे लाडके आमदार नरेंद्र भोंडेकर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख होता.
भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे राज्य सरकारकडून त्यांना मंत्रिपद मिळेलं अशा अपेक्षा बाळगून आहेत.
Chiplun : गुहागर मधील पिंपर परिसरात आढळला ब्लॅक पॅंथर
रत्नागिरीतील गुहागर मध्ये पिंपर गावच्या परिसरात ब्लॅक पॅंथर आढळून आला.
रस्त्याच्या लगत हा ब्लॅक पॅंथर जंगलाच्या दिशेने जात असताना काही नागरिकांनी पाहिला आणि त्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद केला.
ब्लॅक पॅंथर हा तसा लाजाळू आणि निशाचर असल्याचे म्हटले जाते
गुहागर तालुक्यात अनेकदा ब्लॅक पॅंथरचे दर्शन होत असते...
पिंपळमध्ये आढळून आलेला हा ब्लॅक पॅंथर बराच वेळ एकाच जागेवरती बसून राहिल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे.
Buldhana - बुलढाण्यात अवैध सोनोग्राफी सेंटर पकडले.
- आरोपी मात्र डॉक्टर नाही , खरे आरोपी अद्याप मोकाट.
- सोनोग्राफी सेंटर वरील धाड दिखावा तर नाही ना...?
- जिल्हा शल्य चिकित्सक आणि पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात.
Pune : राज ठाकरे यांच्या पुण्यातील निवासस्थानाजवळ मनसे कार्यकर्ते दाखल,
पुण्यातील राज महाल परीसरात मनसे कार्यकर्ते पोहचले आहेत
काल ठाण्यात झालेल्या राड्या नंतर मनसे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी एकवटले आहेत
राज ठाकरे मात्र हॉटेलमध्येचं मुक्कामी आहेत, खाजगी कामासाठी राज ठाकरे आले असल्याची शहर मनसेची माहिती.
पक्षीय कोणतेही कार्यक्रम आज नाहीत.
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोमवारी धुळे,जळगाव जिल्ह्यासह मालेगाव मध्यचा दौरा
अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याची गुप्त वार्ता विभागाची पोलीस प्रशासनाला सूचना
गुप्तवार्ता विभागाकडून वरील भागात धोकादायक हालचाली अनेक दहशतवादी संघटनांकडून असल्याने विशेष काळजी घेण्याची सूचना आल्याची जळगाव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख महेश्वर रेड्डी यांची अधिकाऱ्यांना पत्राद्वारे माहिती
वक्फ संस्थांची सुनावणी बंदद्वार न घेता खुल्या पद्धतीने घ्या
- वक्फ मंडळाच्या अध्यक्षांच्या दालनातील सुनावणीला विरोध
- सध्या 184 वक्फ संस्थांची सुनावणी मंडळाच्या अध्यक्षांच्या दालनात सुरू
- समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची भूमिका
- महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अध्यक्षांना लिहिलेले पत्र
Thane : ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये राडा घालणाऱ्या मनसेच्या 44 कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गाड्यांवर हल्ला करणे, गोंधळ घातल्या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल
रात्री ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना नोटीसा देऊन सोडण्यात आल्यानंतर रात्री उशिरा नौपाडा पोलिसांनी केले गुन्हे दाखल
उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर,ताफ्यावर हल्ला करणाऱ्या आणि गडकरी रंगायतन येथे राडा घालणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांचा शोध सुरू
Kalyan : मोबाईल घरफोडी प्रकरणी चार आरोपींना अटक, 8 लाखांचे 29 मोबाईल केले जप्त
दिवसां फळविक्रेते रात्री चोरटे
तालुक्यातील कोनगाव येथील मोबाईल दुकानाच्या मागील भिंत फोडून केलेल्या घरफोडीतच्या गुन्ह्यातील चार आरोपींना शिताफीने अटक करून चोरीस गेलेले 8 लाख 13 हजार रुपये किमतीचे 29 मोबाईल हस्तगत करण्यात कोनगाव पोलिसांना यश मिळाले आहे
अशी माहिती कोनगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल अडुरकर यांनी दिली आहे.
Pune : पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड झालीये.
निगडीतील ओटा स्कीम इथं 12 ते 13 वाहनांना समाजकंटकांनी लक्ष केलं.
मध्यरात्री ही घटना घडल्यानं परिसरात दहशत पसरली आहे.
दारूच्या नशेत ही तोडफोड करण्यात आल्याची अन दोघांना अटक केल्याची माहिती निगडी पोलिसांनी दिलीय.
तोडफोडीत रिक्षांचे प्रमाण अधिक असल्यानं अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय.
Ajit Pawar : शाहू महाराजांच्या खासदारकीसाठी बंटींनी की पी एन यांनी इंटरेस्ट दाखवला- अजितदादा पवार
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज काँग्रेसचे दिवंगत आमदार पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले...
यावेळी अजितदादा पवार यांनी पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांचे सांत्वन केले...
यावेळी लोकसभा प्रचाराच्या मुद्यावर देखील चर्चा झाली...
पी एन साहेब यांनी वयोमानानुसार जेवढा झेपेल तेवढा प्रचार करायला हवा होता...
असे म्हणताच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराज आणि पी एन पाटील यांच्या मैत्रीबद्दल सांगितले...
त्यानंतर अजित पवार यांनी शाहू महाराजांच्या खासदारकीसाठी बंटींनी की पी एन साहेबांनी जास्त इंटरेस्ट दाखवला असा प्रश्न केला...
Beed : बीडच्या परळीत कावड यात्रेचा उत्साह, 51 कलशात आणलेले गंगेचे जल वैद्यनाथाला अर्पण
श्रावण महिना सुरू आहे आणि पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या बीड मधील परळी वैजनाथ येथे अनेक कावड यात्रा या गंगेचे जल घेऊन वैद्यनाथाला अर्पण करण्यासाठी येत असतात.
परंपरेचे स्वरूप बदलले असले तरी युवकांमध्ये कावड यात्रेचा उत्साह कायम आहे.
अशीच एक कावड यात्रा हिंगोली ते परळी वैजनाथ आली असता 51 कलशात हे जल आणण्यात आले होते.यावेळी कावड यात्रेतील भाविकांनी भजनावर ठेका धरलेला दिसून आला.श्रावण महिन्यानिमित्त परळीत भक्तीमय वातावरण आहे.
पण वातावरण बिघडवण्यासाठी हे करण्यात येत आहे,
हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना माहीत आहे,
थांबा 2 महिने मग तुम्हाला सत्तेची मस्ती कळेल, समोर असते तर शिवसैनिक काय आणि महाराष्ट्र काय हे कळले असते
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांची पुण्यात पत्रकार परिषद
सगळे नियोजित कार्यक्रम होणार
प्रत्येक जिल्ह्यात सगळ्या रॅली उपस्थितीत राहवं
माझ्या दाडीवर आक्षेप नसेल घेतला सगळ्या दाडी राखणा-यांवर घेतला असेल
मी राणे यांचा सन्मान करतो
फडणवीसांचे हे चपला व्हायला लागले आहेत
राणेंचा सन्मान करतो
उत्तर द्यावच लागणार आहे
गाड्या फोडणा-यांच्या विचारानं थोडच राज्य चालतं
आम्हाला दुस-या पक्षांचा म्हणुन हिणवलं जातं मात्र आम्हि त्याकडं लक्ष देत नाही
Pune : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचे आयोजन आज पुण्यात करण्यात आले आहे.
सारसबाग येथील गणपतीचे दर्शन आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन करून या रॅलीला सुरुवात होणार
डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास अभिवादन केल्यानंतर रॅलीची सांगता होईल.
त्यापूर्वी या रॅलीची तयारी पूर्ण झालीय.
डेक्कन परिसरात जिथे रॅली संपेल तिथे एक स्टेज उभारण्यात आला असून स्पीकर देखील लावण्यात आलेत.
या संपूर्ण चौकात भगवे झेंडे तसेच जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ फ्लेक्स सुद्धा उभारले आहेत.
Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या वारसदारांच्या पालख्या वाहत आहेत- बावनकुळे
वाघनखांच्या साक्षीनं येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही
उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेल्या टीकेनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रत्युत्तर
उद्धव ठाकरेंच्या रॅलीतील हिरवे झेंडे जनता विसरली नाही- बावनकुळे
मातोश्रीबाहेर मुस्लिम समाजानं आंदोलन ही उद्धव ठाकरेंच्या अधोगतीची सुरूवात
Pune : पुण्यात डेक्कन परिसरात खळबळ
दारू पिऊन कार चालकाला पोलिसांनी पकडले
ड्रायव्हर दारूच्या नशेत
गाडी ने याआधीच कुठेतरी अपघात केल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे
गाडी सध्या सावरकर स्मरकसमोर उभी आहे
येरवडा पोलीस ठाण्याचे ए पी आय यांच्या सावधानतेमुळे पुढचे अपघात वाचले
Sindhudurg : सिंधुदुर्गात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 23 कोटी 72 लाखांचे नुकसान
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या महिनाभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेती, बागायतींसह घरांचे आणि इतर स्थावर मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यातील 996 कुटुंबं थेट बाधित झाली आहेत.
तर शेकडो एकर शेती, बागायती आणि घरांचे मिळून आतापर्यंत सुमारे 23 कोटी 72 लाखांचे नुकसान झाले आहे.
या नैसर्गिक आपत्तीत पुरात वाहून गेल्याने, तसेच अंगावर वीज कोसळल्याने चार व्यक्तींचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
अतिवष्टीमुळे जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान भात शेतीच झाला आहे.
पुराच्या पाण्यात पंधरा दिवस भातशेती पाण्याखाली गेल्याने भातशेती कुजून गेली आहे.
जिल्हयात झालेल्या या नुकसानीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.
Bhandara : भंडाऱ्याच्या तुमसरात गाईचा मृत्यू
गौमातेला चक्क दोरखंडानं बांधून ट्रॅक्टरनं ओढतं नेत केली विटंबना
तुमसर नगर परिषदविरुद्ध बजरंग दल कार्यकर्त्यांमध्ये रोष
Ashok chavan : भाजपा खासदार अशोक चव्हाण यांना एका कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी आरक्षणाबाबत जाब विचारला ..
अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदार संघातील मुगट या गावी एका कार्यक्रमात मराठा आंदोलकानी जाब विचारला .
आरक्षण देण्यासाठी इतका वेळ का लागतो, आमच्या योद्धाची प्रकृती खालावत आहे ,
आरक्षण वेळेत दिलं नाही ,तर विधानसभेत तुमच्या सोबत नाही तर तुमच्या विरोधात असे खडे बोल आंदोलकांनी सुनावले.
तुम्ही आरक्षणासाठी काय केल याचं उत्तर देखील आंदोलकांनी अशोक चव्हाण यांना विचारलं..
Thane : ठाण्यातील नौपाडा परिसरात असलेलं मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयावर काल रात्रीपासून पोलिसांचा बंदोबस्त..
मनसेने काल उद्धव ठाकरे यांच्या सभेत राडा केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती
अशातच आता मनसेच्या ठाणे मध्यवर्ती कार्यालया बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय..
Kolhapur : शिवसैनिकानी मनसे शाखा फलकांना काळं फासत केली तोडफोड
उद्धव ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर काही वेळापूर्वी नारळ फेकण्यात आल्याची घटना मुंबई ठाणे इथ घडलीय.
याचे संतप्त पडसाद काल रात्री कोल्हापूर उशिरा शहरात उमटलेत.
कोल्हापुरातील संतप्त शिवसैनिकानी शहरातील मनसेच्या शाखा फलकांची तोडफोड केलीय.
त्यामुळं संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय.
Pune : उजनी धरणावर विद्युत रोषणाईतून साकारली तिरंग्याच्या प्रतिमा
अतुल भालेराव यांच्या ड्रोन कॅमेराने टीपलेली ही खास दृष्य
पुणे-सोलापूर आणि नगर जिल्ह्यासाठी वरदायणी ठरलेल्या उजनी धरणावर स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमिवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलीय. उजनी धरणाच्या सोळा दरवाजातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गावर या विद्युत रोषणाईतून भारताच्या तिरंग्याची प्रतिमा साकारण्यात आली असून हे मनमोहक दृश्य सर्वांची नजर वेधून घेतयं.
Amravati : अमरावती मेळघाटात 30 फूट खोल नदीत वाहन कोसळलं
वाहनात चार जण होते बसून
माजी खासदार नवनीत राणा आल्या सगळ्यांसाठी धावून
मेळघाटच्या हरीसाल जवळ रात्री 11.30 च्या जवळपास एक वाहन पुलाच्या खाली वाहन कोसळलं...
Buldhana : आषाढी वारी करून संत गजानन महाराजांची पालखी आज शेगाव येथे विसवणार.
खामगाव - शेगाव मार्गावर शेवटच्या टप्प्यात अडीच लाख भाविक दिंडीत सहभागी.
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे गेलेली संत गजानन महाराजांची पालखी आज शेगाव येथे विसावणार आहे
आज सकाळी ही पालखी खामगाव येथून शेगाव कडे रवाना झाली
अंतिम टप्प्यात असलेल्या या पालखीसोबत राज्यभरातून आलेल्या जवळपास अडीच लाख भाविकांनी सहभाग नोंदवला
बुलढाणा जिल्ह्यात काल रात्रीपासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे
भर पावसात अडीच लाख भाविक संत गजानन महाराजांच्या पालखी सोबत पायी चालत आहे
भर पावसात भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे
Hingoli : आज हिंगोलीत संतोष बांगर यांच्या नेतृत्वात कावड यात्रा निघणार
कावड यात्रेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांची सुद्धा उपस्थिती राहणार
पुन्हा एकदा राज्याच्या गादीवर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून विराजमान व्हावेत- आमदार बांगर
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दुसऱ्या श्रावण सोमवारी एक आवड यात्रा कळमनुरी ते हिंगोली असे निघत असते घडामोडीच्या चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोलीतील ओम कयाधू अमृताधारा महादेव मंदिर पर्यंत कावड यात्रा निघत असते
यावर सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उदय सामंत संजय राठोड सुहास कांदे भरत गोगावले संजय रायमुलकर हे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या सोबत कावड यात्रेत येणार आहेत
Thane : ठाण्यातील उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी डिवचणारे बॅनर्स
ठाकरे गटाकडून काढण्यात दुपारी बारा वाजताच्या सुमारास काढण्यात आलेला होता बॅनर..
सभा संपल्यानंतर पुन्हा लावण्यात आला हा बॅनर...
'घालीन लोटांगण, वंदिन चरण..' असे वाक्य आणि उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र काढत लावण्यात आले बॅनर
हरी निवास ,दमानी इस्टेट येथे लावलेला हा बॅनर ठाणेकरांचा लक्ष वेधत आहे.
अज्ञात व्यक्तीकडून लावण्यात आलेला हा बॅनर..
Sandeep Deshpande : मराठा आरक्षणाच्या आडून राज साहेबांवर हल्ला केला गेला - संदीप देशपांडे, मनसे
पुन्हा क्रिया झाली केलं तर परत पून्हा प्रतिक्रिया होणार- संदीप देशपांडे, मनसे
किरीट सोमय्या, नवनीत राणा यांच्या गाडीवरही शिवसैनिकांनी हल्ला केला, तेव्हा संस्कृती कुठे गेली होती- संदीप देशपांडे, मनसे
तुमच्याकडे बाळासाहेब यांचे विचारआहेत आमच्याकडेही त्यांचेच विचार आहेत- संदीप देशपांडे, मनसे
आपण आधी करायचं आणि नंतर शहाणपण शिकवायचं- संदीप देशपांडे, मनसे
या घटनेनंतर साहेबांनी सर्वांशी व्हिडिओ काॅलद्वारे सर्वांचं अभिनंदन केले- संदीप देशपांडे, मनसे
Sharad Pawar : शरद पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.
त्याआधी शरद पवारांनी त्यांचे निवासस्थान असलेल्या बारामतीतील गोविंद बागमध्ये जनता दरबार घेतला..
त्यानंतर शरद पवार विद्या प्रतिष्ठान येथे हजेरी लावणार असून त्यानंतर शरद पवार सोलापूर येथील बार्शी येथे कार्यक्रमासाठी हजेरी लावतील..
शरद पवार विद्या प्रतिष्ठानकडे मार्गस्थ झाले आहेत..
Mumbai Crime : मुंबईतील 25 महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवणाऱ्या विकृताला अखेर अटक,
निर्मल नगर पोलीस ठाण्यात आयटी अॅक्ट व विनयंभगाचा गुन्हा दाखल..
मोहम्मद अजीज मोहम्मद निसार खान(३६) असे अटक आरोपीचे नाव असून
तो वांद्रे येथील बेहरापाडा परिसरात पराठा शॉप चालवतो. मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking 11th August 2024 LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -