Maharashtra News Live Updates : महाविकास आघाडीच्या चर्चेत 205 जागांचं वाटप पूर्ण, 83 जागांवर दसऱ्यानंतर चर्चा

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 11 Oct 2024 11:26 AM
माढा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले उमेदवार अभिजित पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट घेतली

माढा विधानसभा मतदार संघातून इच्छुक असलेले उमेदवार असलेले अभिजित पाटील यांनी आज शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे भेट घेतली


अभिजित पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत महायुती सोबत काम केल आणि त्यानंतर त्यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला केंद्र सरकार कडून २८० कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आल होत


पण आत्ता विधानसभेच्या निवडणुकीत अभिजित पाटील हे महाविकास आघाडी कडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत


या अगोदर पुण्यात देखील अभिजित पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती त्यामुळे अभिजित पाटील हे महायुतीची साथ सोडणार का प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे

महाविकास आघाडीच्या चर्चेत 205 जागांचं वाटप पूर्ण, 83 जागांवर दसऱ्यानंतर चर्चा

महाविकास आघाडीच्या चर्चेत २०५ जागांचं वाटप पूर्ण झाल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती 


२०५ मध्ये प्रत्येक पक्षाला सुटलेल्या जागांसाठी तयारी सुरु 


पक्षाच्या वाट्याला आलेल्या जागांवर प्रत्येक पक्षांची उमेदवार चाचपणी सुरु 


आता उरलेल्या ८३ जागांबाबतची चर्चा दसऱ्यानंतर करणार

रत्नागिरीत वाटद खंडाळा एमआयडीसीच्या भूसंपादनाला विरोध 

रत्नागिरी- वाटद खंडाळा एमआयडीसीच्या भूसंपादनाला विरोध 


एमआयडीसीमधील प्रस्तावित प्रकल्पासाठी आज होणार आहे जमिनीची मोजणी 


उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघातील महत्त्वकांक्षी प्रकल्प 


कॅबिनेटमध्ये 29 हजार 500 कोटी रुपये मंजूर पैकी एक डिफेन्स क्लस्टर प्रकल्प या ठिकाणी प्रास्तावित


वाटद, खंडाळा, गडनरळ, मिरवणे आणि कोळीसरे पंचक्रोशीचा विरोध  


जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय नाही प्रकल्प करू नये; स्थानिकांची मागणी 


19 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रकल्पाच्या माध्यमातून होणार 


भूसंपादनाला विरोध करण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ एकवटले

नाशिकमध्ये पावसाला सुरवात, सकाळपासून शहराच्या अनेक भागात पावसाच्या सरी

नाशिकमध्ये पावसाला सुरवात
-
सकाळ पासून शहराच्या अनेक भागात पावसाच्या सरी
-
शाळा महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी आणि कार्यलयात जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ


रात्रीही शहराच्या काही भागात लावली होती पावसाने हजेरी

लॉजमध्ये प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार, स्वत:लाही संपवलं, पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ!

पिंपरी चिंचवड


-पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडी येथील एका लॉज मध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करून स्वतः  गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 


-यात मृतक प्रियकराची प्रेयसी  गंभीर जखमी झाली अजून तिच्यावर एका रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 


-शहरातील खराळवाडी परिसरात असलेल्या राज लॉजमध्ये हा प्रकार घडला आहे. 


-नितेश नरेश मिनेकर असं आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे. 


-हा सर्व प्रकार प्रेम प्रकरणातून झाला असावा असा पिंपरी पोलिसांनी वर्तविला आहे.


-यात  नितेश मिनेकर हा आपल्या प्रियसी सोबत लॉजमध्ये जात असताना सीसीटीव्ही कॅमेरात दिसत आहे. लॉजमध्ये गेल्यानंतर काही वेळाने नितेश मिरेकर याने आपल्या प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे. व त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली आहे.  या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलिस करत आहेत.

लातूरमध्ये प्रसूतीदरम्यान अति रक्तस्राव झाल्याने महिलेचा मृत्यू

वाशिम : अगोदरच हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असतांना प्रसूतीदरम्यान अति रक्तस्राव झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना  वाशिमच्या धनज बु, प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली. मृत महिलेचं नाव वनिता  चंदणे वय वर्ष २७असून  या गर्भवती महिलेला प्रसूतीपूर्व कळा आल्याने  दोन दिवसा पूर्वी  धनज बु, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भरती केले. त्यावेळी तपासणी केली असता, हिमोग्लोबीनचे प्रमाण ७.२ एवढे आढळून आले. संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी तिला अमरावती येथे उपचार करीता हलवण्या साठी   डॉक्टरांना विनंती केली. डॉक्टरांनी महिलेची तिथेच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. प्रसूती झाली ..महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला; मात्र,आधीच हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असताना त्यात प्रसूती दरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने महिलेची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी अमरावती येथे पुढील उपचारासाठी नेण्याचा सल्ला  दिला अमरावती येथे नेताना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने प्रकृती अधिकच बिघडली. १० ऑक्टोबर रोजी सकाळी वानिता चंदणे हीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

भूमिसेना, आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक ज्येष्ठ नेते काळुराम काका धोदडे यांचे दुःखद निधन

आदिवासी समाजाला स्वाभिमानाने जगायला शिकवणारे, जल, जंगल जमीन यावर आदिवासी, भूमिपुत्र शेतकऱ्यांचे अधिकारासाठी लढणारे, आदिवासी बांधवांचे प्रेरणास्थान तसेच भूमीसेना व आदिवासी एकता परिषदचे संस्थापक काळूराम का. धोदडे उर्फ काका यांची १० ऑक्टोबर रात्री १०.५२ वाजता यांचे मुंबई येथील रुग्णालयात प्राणज्योत मालवली. त्यांचे अंतिम दर्शन व अंतिम संस्कार भूमिसेना, आदीवासी एकता परिषदेचे मनोर (दामखिंड) कार्यालयात ११ ऑक्टोबर, रोजी दुपारी २.०० वाजता करण्यात येणार आहे.

कागल विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून मंडलिक पिता-पुत्रांमध्ये मतमतांतर


कागल विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून मंडलिक पिता-पुत्रांमध्ये मत मतांतर


माजी खासदार मंडलिक मात्र हसन मुश्रीफ यांच्या व्यासपीठावर


संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांच्याकडून निवडणूक लढवण्याची तयारी


राज्यात पुन्हा महायुतीचा शासन यावं आणि त्यात हसन मुश्रीफ असावेत


त्यासाठी अत्यंत ताकतीन हसन मुश्रीफ यांना मदत करा


संजय मंडलिक मौजे सांगाव मधील जाहीर सभेत वक्तव्य


संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी मात्र महायुतीकडून उमेदवारीसाठी धरला आहे आग्रह


हसन मुश्रीफ यांनी लोकसभा निवडणूक मंडलिक यांना प्रामाणिकपणे मदत केली नसल्याचाही वीरेंद्र मंडलिक यांनी केला होता आरोप

मराठवाड्यात गूळ पावडर कारखानदारांची लॉबिंग, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी 

मोठी बातमी :


मराठवाड्यात गूळ पावडर कारखानदारांची लॉबिंग, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी 


कोणत्याही कारखान्याने स्वतंत्र भाव जाहीर करू नये असा कारखाना असोसिएशनचा ठराव 



गूळ पावडर कारखाने उसाला अडीच हजार प्रतिटन असा भाव देणार, कारखाना आपल्या क्षमतेनुसार एकरकमी किंवा दोन टप्प्यात पैसे देणार



धाराशिव इथ गूळ पावडर कारखानदारांची बैठक, बैठकीत ऊस दराचा निर्णय 


गूळ पावडरला बाजारभाव मिळत नसल्याने दरा बाबत निर्णय घेतल्याचं कारखानदारांच म्हणण 


मुबलक पाऊस मात्र आता बाजार भावाचे शेतकऱ्यांसमोर संकट

पुण्यात पुन्हा हिट अँड रनची गटना, कारच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

पुण्यात पुन्हा हिट अॕण्ड रन


कारचालक दारुच्या नशेत असल्याची शक्यता


कोरेगाव पार्क परिसरातील गुगल बिल्डींग समोर रात्री १ वाजता घटना घडली.


अपघात झाल्यावर चालक भरधाव पळून गेला.


रौफ अकबर शेख असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव.


या आलिशान कारच्या चालकाने २ दुचाकींना धडक दिली या अपघातात शेख याचा मृत्यू झाला

ईडीकडून ज्ञानराधा मल्टिस्टेट कंपनीची 1 हजार कोटींची मालमत्ता जप्त

ईडीकडून ज्ञानराधा मल्टिस्टेट कंपनीची मालमत्ता जप्त.


तब्बल १ हजार कोटींची मालमत्ता करण्यात आली जप्त.


मुंबई, संभाजीनगर, बीड, जालना येथील मालमत्ता करणायत आली जप्त. 


सुरेश कुटे यांच्याशी सबंशीत मालमत्तेवर ईडीकडून टाच.


आतापर्यंत १ हजर ९७ कोटींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई

पार्श्वभूमी

मुंबई : सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोणत्याही क्षणी राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते, त्यामुळे राजकीय पक्षांकडून पूर्ण ताकदीने तयारी केली जात आहे. दुसरीकडे राज्यात परतीच्या पावसाने मुंबईसह उपनगरांत हजेरी लावली आहे. मुंबईत 10 ऑक्टोबरच्या रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. आजदेखील अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...   

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.