Maharashtra Breaking LIVE Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही अडकवण्याचा करण्याचा प्रयत्न, परमबीर सिंह यांचा खळबळजनक दावा
Maharashtra Breaking 10th August LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
महिला आयोगाच्या सदस्य तथा शिवसेना उबाठाच्या नेत्या संगिता चव्हाण यांचा पक्षाला रामराम
अंधारेंवर आरोप करत पक्षाला दिली सोडचिठ्ठी
महिला आयोगाच्या सदस्य तथा शिवसेना उबाठाच्या नेत्या संगिता चव्हाण यांचा पक्षाला रामराम ठोकलाय.
यावेळी त्यांनी शिवसेना उभा टागटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केलेत.
आमदारांमुळे शिवसेना नाही तर अंधारसेना झाली आहे असे त्या म्हणाल्या आहेत.
पुणे ड्रग्स प्रकरण पुण्यातील विश्रांतवाडी मध्ये 1 कोटी रुपये किमतीचे सापडल्यानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची एक टीम तातडीने मुंबईकडे रवाना
अटक केलेल्या तीन आरोपींकडून चौकशीत मोठी माहिती उघड
ड्रग्स प्रकरणाच मुंबई कनेक्शन निघण्याची शक्यता
पुणे पोलीस तातडीने तापसासाठी मुंबईकडे रवाना
मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा खळबळजनक दावा
मी तीन वर्षात कोणावर कधीही बोललो नाही
मी राजकारणापासून खूप दूर असतो
आरोप प्रत्यारोपाची सुरुवात ही त्यांनी सुरुवात केली
माझ्यावर उलट सुलट आरोप अनिल देशमुख यांनी लावले
यापूर्वी देखील मी जे मला बोलायचं होतं ते मी कोर्टात बोललो
कुठल्याही राजकारणाला प्रेरित हे सर्व सुरू नाही
सगळं खरं सत्य मी सर्वांसमोर मांडलं आहे
एनआयए किंवा कोणत्याही यंत्रणेला घाबरून मी काही केलं नाही
मी तीन वर्षात कोर्टात मांडलं त्यानंतर, पुढे कधीही काही बोललो नाही. मात्र त्यांनी बोललं त्यानंतर मी आता बोलायला सुरुवात केली
मग आता त्यांना ते खुपत आहे
मी नार्को करायला तयार आहे अनिल देशमुख,सलील देशमुख हे नार्को करायला तयार आहेत की नाही यावर बोला?
पुरावे असतील तर द्या ना
मी पुन्हा सांगतोय नार्को टेस्ट करायला त्यांनी समोर यावं, संजय पांडेला देखील घेऊन या
हिम्मत असेल तर नार्को फेस करा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील अडकवण्याचा आणि अटक करण्याचा प्रयत्न होता
ठाण्यात एका प्रकरणी तत्कालीन मंत्री शिंदे यांनादेखील अडकवण्याचे आदेश होते
हे सर्व आदेश संजय पांडे यांनी कोणाच्यातरी सांगण्यावरून सीपीला दिले होते
माझ्याकडे यासंदर्भात देखील पुरावे आहेत, योग्य वेळी हे पुरावे सगळे बाहेर आणेन
स्वतः संजय राऊतदेखील आरोपी आहेत, अनिल देशमुख आरोपी आहेत
माझ्याकडे सर्व संदर्भात व्हिडिओ पुरावे आहेत
कोण काय बोलतय त्यांनी पहिल्यांदा आपल्या मध्ये झाकून पहावे
माझा भाजपशी काही आणि राजकारणाशी काही संबंध नाही
सुरुवातीला कधीच आरोप केले नाही मी फक्त डिफेंड केले
निवडणुकीशी याचा काही संबंध नाही
अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सिन्नर विधानसभा मतदारसंघात पोहोचली
आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघात पोहोचली यात्रा
midc मधील कामगारांशी अजित पवार हितगुज साधणार आहेत
प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, रूपाली चाकणकर उपस्थित
त्यानंतर विकासकामाचे उद्घाटन होईल
उदघाटन समारंभनंतर शेतकरी मेळाव्याला हजेरी लावतील
आशिष शेलार
उद्धव ठाकरे याना दिल्लीला जाऊन मिळाले काय
माझा दावा आहे महाविकास आघाडी फुटणार
जेव्हा निकाल येतील तेव्हा महाविकास फुटणार
आशिष शेलार यांचे भाकीत
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून एक कोटीचे अमली पदार्थ जप्त..
३ तरुण अटकेत..
लोहगाव येथील विघ्नहर्ता अपार्टमेंट मधून तीन तरुणांना ताब्यात घेतले..
त्यांच्या ताब्यातून एक कोटी रुपयाचे 471 मेफे dron ग्राम हस्तगत..
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई..
श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित शांताराम बेंडे आणि निमिश सुभाष अभनावे अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे..
विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात बनावट पदवी आढळल्याने खळबळ
- दोन आरोपी बनावट ट्रान्स्क्रिप्ट तयार करण्यासाठी बनावट पदवी घेऊन विद्यापीठात पोहचले होते
- दस्तावेज साक्षांकित करण्याच्या प्रक्रियेदरम्यान विद्यापीठ प्रशासनाला ही बाब लक्षात आली आणि या प्रकारचा भांडाफोड झाला
- आंध्र प्रदेशातील एका आरोपीला रंगेहात पकडण्यात आले असून एक जण फरार होण्यात यशस्वी झाला
- गुंटूर येथील रमनकुमार बंगारु आणि रतनबाबू मेकातोटी कांचरला कोटेश्वर अशी आरोपींची नावे आहेत
- गुरुवारी हे आरोपी कांचरला रोशन या बॅचलर ऑफ इंजिनिअर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांच्या आठ ट्रांसस्क्रिप्ट, एक कोन्सोललीडेट ट्रान्स्क्रिप्ट आणि पदवीच्या साक्षांकनासाठी आले होते
- कागदपत्रांची पडताळणी केली असता नागपुर विद्यापीठाने जारी केलेल्या रेकॉर्डवर त्याची कुठलीच नोंद नसल्याची बाब समोर आली
- आरोपींची चौकशी केली असता उडवाडीची उत्तरे मिळाल्याने विद्यापीठ प्रशासनाने अंबाझरी पोलिसांना माहिती दिली
मुंबई काँग्रेसची आज मुंबई जोडो यात्रा
खासदार व मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात ही यात्रा असेल
यामध्ये गायकवाड आणि काँग्रेसचे मुंबईतील पदाधिकारी मुंबईतील विविध ठिकाणी जाऊन भेटी घेतील
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील काही महिन्यांपूर्वी भारत जोडो यात्रा काढली होती, याच पार्श्वभूमीवर आता मुंबई मुंबई काँग्रेसची मुंबई जोडो यात्रा होतेय
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील लोकांशी संवाद साधण्यावर मुंबई काँग्रेसने भर दिलाय
आजचा यात्रेचा कार्यक्रम कसा असेल
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेली तथाकथित शिवस्वराज्य यात्रा म्हणजे निव्वळ निवडणूक नजरेसमोर ठेवून केलेला फार्स आहे.
अन्यथा ज्या छत्रपती शिवरायांच्या नावावर मतं मिळवण्याचा मनसुबा यांनी रचलेला आहे, त्याच शिवरायांच्या वाघनखांवर यांनी शंका घेतली नसती.
छत्रपतींच्या अजोड पराक्रमाचं आणि औरंगजेबाच्या नामुष्कीचं प्रतीक असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरचं महायुती सरकारनं केलेलं नामकरण यांच्या पोटदुखीचं कारण ठरलं नसतं.
अगदी ताजे उदाहरण असलेला वक्फ बोर्डाच्या कारभारात पारदर्शकता आणणारा नवा कायदा पाहून यांना पोटशूळ उठला नसता.
कौतुक आक्रमकांचं आणि यात्रा शिवरायांच्या नावाने, असला स्वराज्यद्रोही प्रकार यांनी केला नसता.
याउलट, ‘मऱ्हाटा पातशाह एवढा छत्रपती जाला, ही गोष्ट काही सामान्य जाहली नाही’ हा देदीप्यमान इतिहास स्मरणात ठेवून महायुती सरकारने छत्रपती शिवरायांचा ३५० वा शिवराज्याभिषेक दिन मराठी गौरवाला साजेशा इतमामाने राज्यभरात मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला.
शिवरायांच्या शिकवणुकीप्रमाणे रयतेची काळजी वाहणारा राज्यकारभार आमच्या सरकारकडून सुरू आहे. सर्व समाजघटकांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवून शिवरायांच्या कल्याणकारी राज्याची संकल्पना आम्ही प्रत्यक्षात उतरवली.
नुकतीच राज्यातल्या माय-माऊलींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली; पण विरोधक मात्र रांझ्याच्या पाटलाप्रमाणे या योजनेत मोडता घालण्याचा प्रयत्न करताहेत, ही बाब लपून राहिलेली नाही. म्हणूनच म्हंटलं की, शिवरायांच्या विचारांची पालखी महायुतीने समर्थपणे आपल्या खांद्यांवर पेललीय; तर महाविकास आघाडी नुसतीच शब्दांची भोई बनलीय.

टीव्ही मालिका क्षेत्रात खळबळ!
लोकप्रिय मालिका निर्माता, लेखकाला अटक;
निर्मात्याला कोट्यवधींना फसवल्याचा आरोप
२.६५ कोटीं रुपयांची निर्मात्याची केली फसवणूक
निर्माता व लेखकावर निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप
महेश पांडे असे अटक करण्यात आलेल्या निर्माता, लेखकाचे नाव
आंबोली पोलिसांनी निर्माता, लेखकाला केली अटक
लोकप्रिय टीव्ही मालिका 'कसौटी जिंदगी के'या मालिकेच्या कथेचे महेश पांडे लेखक

- अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी शरद पवारांच्या भेटीला
- नगर जिल्ह्यातील बारा जागांपैकी सात जागांवर काँग्रेसचा दावा
- राष्ट्रवादीच्या ताब्यात असणारा श्रीगोंदा आणि नगर शहर दोन्ही जागा आम्हाला मिळाव्यात
- या दोन्ही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद आहे
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 21 ऑगस्ट पासून विदर्भ दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे. या दौऱ्यात ते विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या बैठका घेणार असून जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची ही चर्चा करणार आहे. एक वर्षांपूर्वी राज ठाकरे आणि नागपूरचा दौरा केला होता. तेव्हा त्यांनी विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांची खांदेपालट केली होती. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली. त्यानंतर गेल्या काही दिवसात मनसेच्या निरीक्षकांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. आता राज ठाकरे यांचा 21 ऑगस्ट पासून विदर्भ दौरा होणार आहे.
संतोष पोळने घेतला अॅड. उज्ज्वल निकम यांच्यावर आक्षेप
साताऱ्यातील वाई न्यायालयात घेतला आक्षेप
उज्वल निकम हे संतोष पोळ विरोधात सरकारी वकील म्हणून पहात आहेत कामकाज
डॉक्टर म्हणून प्रचलित झालेल्या संतोष पोळ याने केले होते खून
न्यायालयाने पोळच्या हरकतीचा अर्ज फेटाळला

वरळी हिट अॅड रन अपघातात मुख्य आरोपी मिहीर शहाला ओळख परेडमध्ये साक्षीदाराने ओळखले
वरळी अपघातातील मुख्य आरोपी मिहीर शहाची ओळख परेड शुक्रवारी आर्थर रोड कारागृहात पार पडली.
दरम्यान, या प्रकरणात मिहीर शहाचा वैद्यकीय चाचणीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात मिहीर शहाच्या रक्तामध्ये अल्कोहोलचा अंश सापडला नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.
कावेरी यांचे पती प्रदीप नाखवा यांनी आरोपी मिहीर शहाच मोटरगाडी चालवत असल्याचा जबाब दिला होता.
त्यानंतर नुकतीच आर्थररोड तुरुंगात शहाची ओळख परेड झाली. त्यात नाखवा यांनी आरोपीला ओळखल्याचे सूत्रांनी सांगितले.
अपघातानंतर पलायन केलेल्या शहाला 9 जुलैला अटक झाली होती. त्यावेळी त्याच्या रक्ताची चाचणी करण्यात आली होती. त्यात शहाच्या रक्तात अल्कोहोलचे अंश सापडले नसल्याचे सूत्रांनी सांगितले
तिरुमला ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे यांच्या छत्रपती संभाजीनगरातील आणि बीडमधील ज्ञानराधा मल्टिस्टेट सोसायटीच्या कार्यालयावर शुक्रवारी ईडीच्या पथकाने छापा टाकला. इंडीने महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. राज्यभरातील शेकडो ठेवीदारांचे पैसे या पतसंस्थेत अडकलेले असून या प्रकरणी राज्यात विविध ठिकाणी कुटेंवर 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. सध्या कुटे तुरुंगात आहे. संभाजीनगरमध्ये ईडीच्या 6 अधिकाऱ्यांनी ज्ञानराधा पतसंस्थेच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रांची तपासणी केली. तेवढेच अधिकारी त्याच इमारतीत तिसऱ्या मजल्यावर असलेल्या विभागीय कार्यालयातील दस्तऐवज, संगणक, इतर गोष्टींची तपासणी करीत होते. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
पार्श्वभूमी
मुंबई : राज्यात सध्या राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटांनी आपापल्या यात्रा चालू केल्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जनसन्मान यात्रा तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सत्ताधारी महायुतीचे घटकपक्ष राज्यातील महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. तर विरोधक राज्यातील नोकरी, उद्योग, शेतीप्रश्नांवर सरकारला वेगवेगळ्या सभा, पत्रकार परिषदांच्या माध्यमातून घेरत आहेत. दुसरीकडे केंद्रात वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेत सादर करण्यात आले असून या विधेयकावर सर्वांगीण चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या विधेयकामुळे केंद्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रमुख घडामोडींसह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर....
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -