Maharashtra Breaking Updates LIVE : नालासोपाऱ्यात 30 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, तिघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी 

Breaking News Live Updates : महाराष्ट्र, देश-विदेशातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 10 Sep 2024 02:26 PM
नाशिकच्या शिंदे गावात असलेल्या फटाक्याच्या गोडाऊनला भीषण आग

- नाशिकच्या शिंदे गावात असलेल्या फटाक्याच्या गोडाऊनला भीषण आग
- आग कशामुळे लागली कारण अस्पष्ट
- पोलीस आणि अग्निशामक विभागाच्या कर्मचारी घटनास्थळी दाखल
- आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू
- आग मोठ्या प्रमाणात असल्याने गोडाऊन मधून धुराचे लोट  येत आहेत बाहेर

पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बसने  घेतला पेट

पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बसने  घेतला पेट


वाढे फाटा जवळ असणाऱ्या वेण्णा नदी जवळ अचानक घेतला पेट 


बसमधील प्रवासी तात्काळ खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला 


अग्निशामक दलाच्या वतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू

पुढच्या 24 तासासाठी भंडारा व गोंदिया जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट...

पुढच्या 24 तासासाठी भंडारा व गोंदिया जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट ...


नागपूर वेधशाळेकडून देण्यात आला हा  रेड अलर्ट ...


तर नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट ...

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील 17 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसणार

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत. जरांगे यांनी आज माध्यमांशी बोलताना ही घोषणा केलीय. मनोज जारंगे यांनी याआधी आपण 29 सप्टेंबरला आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र आता मनोज जरांगे हे 17 सप्टेंबर पासून आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केल आहे...

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर, वसाहेब दानवे अध्यक्ष

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर


रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षते खाली समिती जाहीर


किरीट सोमय्या याना पुन्हा पक्षाचं काम देण्यात आलं


निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांच्याकडे जबाबदारी


तर विशेष आमंत्रित म्हणून नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, नारायण राणे, पियुष गोयल, गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांच्या नावाची घोषणा

नालासोपाऱ्यात 30 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, तिघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी 

नालासोपारा  : नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीत एका ३० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. 


महिलेच्या तक्रारीवरून आचोळे पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४, ७०(१) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नरेंद्र मोर्या (वय ३१), प्रकाश सिंग (वय २६) आणि पंचराज सिंग (वय 35) असे तिघां अटक आरोपींची नावे  आहेत.  


आचेळे पोलिसांनी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिघां आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहीती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुनावणी पुन्हा लांबणीवर

शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुनावणी पुन्हा लांबणीवर


आजची सुनावणी आठवडाभराने पुढे ढकलली


पुढील बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता 


पहिल्या क्रमांकाच्या केसवरच दिवसभर सुनावणी होणार


त्यामुळे शिवसेना - राष्ट्रवादी केस बाबत सुनावणी होणार नाही.

प्रसिद्ध चित्रकार एस एच रझा यांचे कोट्यावधी रुपयांचे पेटिंग चोरीला

प्रसिद्ध चित्रकार एस एच रझा यांचे कोट्यावधी रुपयांचे पेटींग चोरीला


एस एच रझा यांनी १९९२ मध्ये अॅक्रेलिक आॅन कॅनवसवर बनवलेले 'प्रकृती' हे पेटींग अज्ञात व्यक्तीने चोरल्याची घटना समोर


प्रकृती या पेटींगची किंमत २.५ कोटी इतकी आहे


गुरू आॅक्शन हाऊस प्रा लि, बेलाॅर्ड पिअर येथे हे चित्र विक्रीसाठी गोडाऊनमध्ये ठेवण्यात आले होते.


अज्ञात व्यक्तीने गोडाऊनमध्ये प्रवेश करून या चित्राची चोरी केल्याची माहिती समोर येत आहे


या प्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात कलम ३८० भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

शिवसेनेचे माजी आमदार आप्पासाहेब साळवी यांचे निधन

शिवसेनेचे माजी आमदार आप्पासाहेब साळवी यांचे रत्नागिरी शहरातील लोटलीकर हॉस्पिटलला निधन झालेले आहे. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून पॅलेस रोड येथून सायंकाळी चार वाजता निघेल. बाळासाहेबांचे निष्ठावंत, कडवट शिवसैनिक, शिवसेनेचे पहिले रत्नागिरी जिल्हाप्रमुख..   राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार अशी त्यांची ओळख होती.

योग्य उमेदवाराच्या निवडीसाठी काँग्रेसचे विधानसभा निहाय स्वतंत्र सर्वेक्षण, नितीन राऊत यांची माहिती

विधानसभा निवडणुकीसाठी योग्य उमेदवाराची निवड व्हावी यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमेटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विधानसभा निहाय स्वतंत्र सर्वेक्षण सुरु ...


दोन्ही सर्वेक्षणाचा अहवाल तपासूनच काँग्रेस विधासभाचे उमेदवार देणार


संपूर्ण अहवाल गोपनीय राहणार असून काँग्रेस वर्किंग कमेटी त्यावर अंतिम निर्णय घेईल ..


दरबारी राजकारणावर लगाम लावण्यासाठी  काँग्रेस पक्ष श्रेष्ठीचा निर्णय.


या सर्वेक्षणाचे काम खाजगी कंपन्यांकडून सुरु असून बऱ्यापैकी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती काँग्रेसचे जेष्ठ नेते नितीन राऊत यांनी सांगितले. 

योग्य उमेदवाराच्या निवडीसाठी काँग्रेसचे विधानसभा निहाय स्वतंत्र सर्वेक्षण, नितीन राऊत यांची माहिती

विधानसभा निवडणुकीसाठी योग्य उमेदवाराची निवड व्हावी यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमेटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विधानसभा निहाय स्वतंत्र सर्वेक्षण सुरु ...


दोन्ही सर्वेक्षणाचा अहवाल तपासूनच काँग्रेस विधासभाचे उमेदवार देणार


संपूर्ण अहवाल गोपनीय राहणार असून काँग्रेस वर्किंग कमेटी त्यावर अंतिम निर्णय घेईल ..


दरबारी राजकारणावर लगाम लावण्यासाठी  काँग्रेस पक्ष श्रेष्ठीचा निर्णय.


या सर्वेक्षणाचे काम खाजगी कंपन्यांकडून सुरु असून बऱ्यापैकी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती काँग्रेसचे जेष्ठ नेते नितीन राऊत यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आज पुणे दौऱ्यावर


अजित पवार शासकीय विश्रामगृहावर दाखल झालेत 


कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि विविध विषयांवर बैठका सुरू आहेत..


नंतर अजित पवार हडपसर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांची करणार पाहणी...


दुपारनंतर अजित पवार मानाच्या पाच गणेश मंडळांसह इतर प्रमुख गणेश मंडळांना देणार भेटी...

माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख शरद पवारांच्या भेटीला

माजी सनदी अधिकारी आणि पुण्याचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त राहिलेले प्रभाकर देशमुख शरद पवारांच्या भेटीला. प्रभाकर देशमुख सातारा जिल्ह्यातील माण - खटाव विधानसभा मतदारसंघातून तुतारी चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत.

हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेमार्ग पुन्हा चालू, वायरमध्ये बिघाड झाल्याने दोन्ही मार्ग होते बंद

नवी मुंबई - हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्ग परत सुरू झाला आहे


नेरूळ येथे ओव्हरहेड वायर मध्ये बिघाड झाल्याने दोन्ही मार्ग बंद होते


आर्ध्या तासानंतर लोकल सुरू झाल्या आहेत


सकाळच्या वेळी रेल्वे बंद झाल्याने चाकरमान्यांनी गैरसोय झाली होती

गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासूनच पावसाची जोरदार हजेरी....

गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासूनच पावसाची जोरदार हजेरी....


पुजारीटोला धरणाच्या सर्व 13 गेट मधून पाण्याच्या विसर्ग सुरू.....


13 गेटमधून 92548 क्युसेक्नेस पाण्याचा विसर्ग सुरु.... 


तर सिरपूर धरणाचे ही सर्व 7 दरवाजे उघडले.....


नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा...

शिवसेना ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला

शिवसेना ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला


पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश ए.सी. डागा यांचे निर्देश


कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीनं केलीय सूरज चव्हाण यांना अटक


17 जानेवारी 2024 पासून सूरज चव्हाण कैदेत


प्रत्येक पैकेटमध्ये कमी खिचडी भरल्याचे पुरावे जरी नसले तरी कंत्राट मिळवताना पालिकेची फसवणूक केल्याचं स्पष्ट आहे - कोर्ट


तसेच आरोपीचा हे कंत्राट मिळवताना पहिल्यापासून शेवटपर्यंत सहभाग असल्याचे पुरावे असल्याचंही कोर्टाकडून मान्य


कंत्राटाच्या 3.64 कोटी रूपयांपैकी 1.25 कोटी रूपये सूरज चव्हाणच्या वैयक्तिक खात्यात तर 10 लाख रूपये अन्य कंपनीच्या खात्यात जमा केल्याचे तपासयंत्रणेकडे पुरावे

अपघात पाहताच अजित पवारांनी ताफा थांबवला, ताफ्यातील डॉक्टरांना उपचार करण्यास सांगितले

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा व्हीआयपी सर्किट हाऊस च्या दिशेने जात असताना. पुण्यातील संचेती हॉस्पिटल जवळ एका रिक्षा चालक आणि दुचाकीचा अपघात झाला होता. हे पाहताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा ताफा थांबला. आणि त्यांच्या ताब्यातील ॲम्बुलन्स मधील डॉक्टरांना या अपघात ग्रस्त झालेल्या व्यक्तीचा उपचार करण्यास सांगितले. अजित पवारांनी देखील या लोकांची विचारपूस केली.. आणि जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी सोडलं..

विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट ...

नागपूर : आज विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट ...


नागपूर वेध शाळेचा इशारा ...


सकाळपासून नागपूर मध्ये पावसाची संततधार सुरु ...

हार्बर लाईन गेल्या पाऊण तासा पासून ठप्प, तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल रखडल्या 

मुंबई : हार्बर लाईन गेल्या पाऊण तासा पासून ठप्प 


नेरुळ दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल रखडल्या 


गेल्या अर्ध्या तासापासून अनेक गाड्या मध्येच रेल्वे ट्रॅक आणि स्थानकात उभ्या

पार्श्वभूमी

मुंबई : सध्या देशासह राज्यातही मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रात राजकीय पक्षांना सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. लवकरच या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वच पक्ष या निवडणुकीची तयारी करण्यात व्यग्र आहेत. दुसरीकडे राज्यात पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाची धूम आहे. या प्रमुख घडामोडींसही आंतरराष्ट्रीय, देश तसेच राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर....

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.