Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स; वाचा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह देशभरातील इतर महत्वाचे अपडेट्स

मुकेश चव्हाण Last Updated: 10 Feb 2025 01:15 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News Live Updates: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याचं आज प्रयागराज कुंभमेळ्यात पवित्र स्नान आहे. संगमातील पवित्र स्नानानंतर अक्षयवट आणि हनुमान मंदिरातही दर्शन द्रौपदी मुर्मू दर्शन घेणार आहेत. तसेच दिल्लीचा...More

पोलीसच निघाले दरोडेखोर; 7 किलो सोने नागपूरच्या व्यापाऱ्याला अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उघड

Raigad Crime News: अलिबाग-पेण मार्गावर असणाऱ्या तिनविरा परीसरात काल दरोडा टाकून 7 किलो सोने लुटण्यात आले. या दरोड्यात चक्क पोलिसांनीच डल्ला मारला असुन या दरोडेखोराकडून आतापर्यंत पोलीसांनी 1 कोटी 50 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. पोलिस तपासानंतर सापडलेल्या दरोडेखोरांमध्ये आश्चर्यची बाब म्हणजे या पाच आरोपींमध्ये 3 जन हे रायगड पोलिस दलातीलच पोलिस कर्मचारी असून उर्वरित 2 आरोपी हे अलिबाग मधील असल्याची माहिती मिळाली आहे.


तब्बल सात किलो वजनाचे सोने घेऊन या दरोडेखोरांनी नागपूरच्या एका सराईत व्यापाऱ्याला हे सोने अवघ्या दीड कोटी रुपयांमध्ये विकण्याचा घाट आखला होता. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मोठा शिताफीने या दरेदेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांना पकडण्यात यश मिळवल आहे. यामध्ये चौघा आरोपींना पोलिस कोठडी देण्यात आली असून उर्वरीत एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.