Maharashtra News Live Updates : नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची एकनाथ शिंदेंकडून गंभीर दखल, डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 01 Oct 2024 01:44 PM
नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची एकनाथ शिंदेंकडून गंभीर दखल, डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले असून पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे.


डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे  आदेश


 मुख्यमंत्र्यांनी बीएमसी आयुक्त श्री. भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येतील, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.


मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, "आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करू. रुग्णालयातील सर्वांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आमचे कर्तव्य आहे."

सोलापुरात काँग्रेस सरकारविरोधात आक्रमक, एकीकडे अर्धनग्न आंदोलन तर दुसरीकडे संग्राम मोर्चा!

सोलापूर ब्रेकिंग 
---


एकीकडे प्रणिती शिंदे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी संग्राम मोर्चा काढतायत



तर दुसरीकडे अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या काँग्रेस कार्यालयसमोर शेतकरी अर्धनग्न आंदोलन करतायत 


धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असून काँग्रेसचे माजी आमदार सिद्धारम म्हेत्रे यांच्या मातोश्री कारखान्याने ऊस बिल दिले नसल्याचा आरोप या शेतकऱ्यांचा आहे 


मागील 28 दिवसापासून हे सर्व शेतकरी काँग्रेस कार्यालयाच्या समोर आंदोलन करतायत

सोलापुरात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकांच्या विविध मागण्यासाठी महाविकास आघाडीचा संग्राम मोर्चा 

सोलापूर ब्रेकिंग 
----


सोलापुरात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकांच्या विविध मागण्यासाठी महाविकास आघाडीचा संग्राम मोर्चा 


काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेच्या नेतृत्वाखाली चार हुतात्मा चौक ते जुने जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत जाणार मोर्चा 


शेतीमालला हमीभाव, सरसकट कर्जमाफी, 24 तास पुरवठा, वाढीव पाणीपट्टी कमी करा 


मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण द्या या सह अनेक मागण्या घेऊन आज महाविकास आघाडी रस्त्यावर 


महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते, शेतकरी मोर्चात सहभागी

परळच्या के ईएम रुग्णालयात 5 वर्षीय मुलीचा विनयभंग, चुकीचा स्पर्श करण्याचा प्रयत्न

बदलापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची घटना ताजी असताना परळच्या के ईएम रुग्णालयात ५ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचे समोरआले आहे


या प्रकरणी इरफान रमजान खान असे या आरोपीचे नाव आहे


परळ येथील केईएम रुग्णालयाच्या वाॅर्ड क्रमांक १३ च्या समोरील मोकळ्या जागेत मुलगी एकटी असल्याचे पाहून तिला चुकीचा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला


या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे


बदलापूरच्या घटनेनंतरही अशा घटनान वारंवार होत असल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

राज्यातील होमगार्ड्सचा कर्तव्य भत्ता थेट दुप्पट, 795 कोटीच्या खर्चास मान्यता!

राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात


भरीव वाढ, ४० हजार होमगार्डना लाभ


राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयाचा लाभ चाळीस हजार होमगार्डंना होईल.


सध्या या होमगार्डंना कर्तव्य भत्ता म्हणून दररोज ५७० रुपये मिळतात. ते आता १ हजार ८३ रुपये करण्यात येईल. याशिवाय उपहार भत्ता दोनशे रुपये, कवायत भत्ता १८० रुपये, खिसा भत्ता शंभर रुपये, भोजन भत्ता २५० रुपये अशी जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे. यासाठी येणाऱ्या सुमारे ७९५ कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली

महाविकास आघाडीत 250 जागांवर एकमत, अद्याप 38 जागांचा तिढा कायम 

महाविकास आघाडीत 250 जागांवर एकमत


अद्याप 38 जागांचा तिढा कायम 


आज होणाऱ्या बैठकीत याबाबत चर्चा होणार 


38 जागांमध्ये काही ठिकाणीं 2 पक्ष तर काही ठिकाणीं 3 पक्षांचा दावा 


आज दुपारी महाविकास आघाडीची पुन्हा बैठक


अद्याप मुंबईतील जागांचा देखील निर्णय झाला नाही


सूत्रांची माहिती

राहुल गांधी यांना नाशिक जिल्हा न्यायालयाचे समन्स

राहुल गांधी यांना नाशिक जिल्हा न्यायालयाचे समन्स
-
स्वातंत्र्यवीर  सावरकर यांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान केल्याच्या विरोधात नाशिकच्या जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती


निर्भय फाऊंडेशनचे देवेंद्र भुतडा यांनी सावरकरांचा अपमान केल्या प्रकरणी  दाखल केली होती याचिका


2022 मध्ये महाराष्ट्रमध्ये येऊन हिंगोली च्या सभेत सावरकरांची बदनामी केल्या प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आली होती याचिका
-
याचिकेत तथ्य असल्याचे न्यायालयाचे निरीक्षण


सावरकरांची बदनामी केल्या प्रकरणी आणि आक्षेपार्ह विधान करून दोन समाजात तेढ निर्माण केल्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाचे राहुल गांधी यांना समन्स

अजित पवारांची बीडच्या माजलगावात जनसन्मान यात्रा 

अजित पवारांची बीडच्या माजलगावात जन सन्मान यात्रा 


आज माजलगाव आणि परळी मध्ये जनसन्मान यात्रा 


अजित पवार माजलगाव मध्ये दाखल 


बाईक रॅलीला सुरुवात 


अजित पवारांसोबत धनंजय मुंडे सुनील तटकरे यांची उपस्थिती

शिंदे समितीकडून आज धनगर आरक्षणाच्या संदर्भात अहवाल सरकारकडे सुपूर्द करण्यात येणार

शिंदे समितीकडून आज धनगर आरक्षणाच्या संदर्भात अहवाल सरकारकडे सुपुर्द करण्यात येणार


हा धनगर आरक्षणाचा अहवाल ओबीसी मंत्रालयाच्या सचिव विनिता सिंघल यांच्याकडे सुपुर्द करण्यात येणार


सुधाकर शिंदे यांच्या ९ जणांच्या समितीने ९ महिने ५ राज्यात जाऊन धनगर आरक्षणच्या संदर्भात अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे


आज हा अहवाल शिंदे समितीकडून ओबीसी मंत्रालयाच्या सचिव विनीता सिंघल यांना सुपुर्द करण्यात येणार

मुंबईच्या सत्र न्यायालयात मनोरूग्ण महिलेने घातला गोंधळ, आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबईच्या सत्र न्यायालयात मनोरूग्ण महिलेने घातला गोंधळ


महिलेवर आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून ती कोर्टात चकरा मारत राहते


३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा मनोरूग्ण महिला सत्र न्यायालयाच्या कोर्ट नंबर १० मध्ये आली


त्यावेळी महिलेने अचानक कोर्टात आरडा ओरडा करण्यास सुरूवात करत गोंधळ घातला


एवढ्यावरच न थांबता महिलेने स्वत:चे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत न्यायाधीशाच्या खूर्चीवर जाऊन बसली


तसेच न्यायाधीशांच्या न्याय आसनासमोरील काचही महिलेने फोडली


या घटनेची माहिती मिळताच महिला पोलिसांनी मनोरूग्ण महिलेला ताब्यात घेण्यास गेले असता.


मनोरूग्ण महिला ही महिला पोलिस शिपाईंच्या हातालाही चावल्याची माहिती सूत्रांनी दिली


या प्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात मनोरूग्ण महिले विरोधात कलम 132,121(1), 296,324(3), 223,352 बी.एन.एस.202, 3 सह कलम 110 महाराष्ट्र पोलिस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजी राजेची 'स्वराज्य संघटना' आता 'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष', निवडणूक आयगाने नवं चिन्हही दिलं!

छत्रपती संभाजीराजेंकडून फेसबुक पोस्ट करत माहिती याबाबत माहिती दिली आहे.


आनंदवार्ता…! 
स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविणेस अत्यंत आनंद होतो की, ०९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. अर्थातच, स्वराज्य संघटना आजपासून “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून ओळखला जाईल.


याचबरोबर, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे.


मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवलीच आहे, आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. 


महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत, परिवर्तन महाशक्तीस सत्तास्थानी घेऊन जाईल, हे निश्चित !

गोविंदाच्या पायाला गोळी लागली, बंदूक पोलिसांनी घेतली ताब्यात, चुकून गोळी झाली होती फायर

गोविंदा गोळीबार अपडेट


अभिनेता गोविंदा याची लायसनची बंदूक आहे.


पहाटे पावणे पाच वाजता गोविंदा बंदूक साफ करत होता,


ट्रिगरवर चुकून बटन दाबला गेला आणि एक राउंड बंदुकीतून फायर झाली आहे.


जुहू पोलिसांनी बंदूक ताब्यात घेतली


सध्या गोविंदावर क्रिटी केअर रुग्णालयात ICU वॉर्डात उपचार सुरू


ICU मधून बाहेर आल्यावर पोलीस गोविंदाचा जवाब नोंदवणार आहे.

राज्यात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा 126 टक्के पावसाची नोंद 

राज्यात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा १२६ टक्के पावसाची नोंद 


राज्यात जून ते सप्टेंबर दरम्यान ९९४.५ मिमी पावसाची नोंद होत असते मात्र यंदा प्रत्यक्षात १२५२.१ मिमी पाऊस बरसला आहे 


सर्वाधिक पावसाची नोंद मध्य महाराष्ट्र होताना पाहायला मिळत आहे 


मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १३९ टक्के पावसाची नोंद झाली आहे, साधारण ७४७.४ मिमी पाऊस चार महिन्यात कोसळत असतो, यंदा मात्र यात अधिक भर पडत १०३५.८ मिमी पाऊस बरसला आहे 


कोकणात देखील सरासरीहून अधिक पाऊस बरसला आहे, कोकणात २८७०.८ मिमी सरासरी पावसाची नोंद होत असते, मात्र, यंदा ३७१०.६ मिमी पाऊस झाला आहे 


कोकणात सरासरीपेक्षा १२९ टक्के पावसाची नोंद झाली आहे 


मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देखील यंदाच्या मान्सूनमध्ये दिलासा मिळाला आहे 


मराठवाड्यात सरासरी ६४२.८ मिमी पाऊस होत असतो 


मराठवाड्यात मात्र ७७२.५ मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरीपेक्षा १२० टक्के पाऊस अधिक झाला आहे 


विदर्भात सरासरी इतका पाऊस झाला आहे, जवळपास ११७ टक्के अधिक सरासरीच्या पाऊस झाला 


विदर्भात ९३७.३ मिमी पाऊस सरासरी होत असतो मात्र प्रत्यक्षात १०९८.५ मिमी पाऊस झाला आहे 


देशात यंदा सरासरीपेक्षा १०८ टक्के अधिक पावसाची नोंद

नागपूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षेत वाढ, खबरदारी म्हणून निर्णय

नागपूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली  ...


पुण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी सांगितले..


लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षेचा आढावा घेत  पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात कोणत्याही क्षणात विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. हीच शक्यता लक्षात घेता राज्यातील सर्वच पक्ष आणि नेतेमंडळी तयारीला लागले आहेत. दुसरीकडे अभिनेता गोंविदा यांच्या पायाला बंदुकीची गोळी लागली आहे.  अनावधानाने त्याच्यावर मिसफायर झालं आहे. ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यपान केल्याचा आरोप मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी केला होता. मात्र त्यांनी मद्यपान केले नव्हते, असे प्रथामिक चाचणीतून स्पष्ट झाले आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.