Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्र, देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर..

ज्योती देवरे Last Updated: 20 Jan 2025 12:26 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News Live Updates : राज्यात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडल्या आहेत. राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना...More

मरीनड्राईव्हच्या ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये 60 वर्षीय महिलेचा मृतदेह;परिसरात खळबळ

मरीनड्राईव्हच्या ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे.  


विनती मेहतानी असे या महिलेचे नाव असून रविवारची ही घटना आहे.  


हाॅटेलच्या 27व्या माळ्यावर ही महिला खोलीत होती. 


हाॅटेलचे कर्मचारी रुम सर्विससाठी गेल्यावर महिला दरवाजा उघडत नव्हती. 


मास्टर चावीने खोलीचा दरवाजा उघडला असता. महिलेचा मृतदेह सापडला. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला पेडररोवरील चेलाराम हाऊस परिसरात रहाते


मृत महिला हाॅटेलमध्ये कधी आली होती त्याच बरोबर इतर माहिती पोलिस घेत आहेत


मृत महिला ही आजारी असल्याची माहिती मिळाली असून संशयास्पद काही आढळून आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली


या प्रकरणी मरीनड्राईव्ह पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलिस करत आहे