Maharashtra Breaking News Live Updates : राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्र, देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर..

स्नेहल पावनाक Last Updated: 19 Jan 2025 12:45 PM
समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकमधून डिझेलची चोरी; घटना मोबाईल मध्ये कैद

वाशिम : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रक मधून डिझेल चोरीचा प्रकार समोर आला असून या संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे. समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसापासून डिझेल चोरीच्या घटना सातत्याने समोर येत आहे. मात्र, वाशिमच्या कारंजा येथील समृद्धी महामार्गावर टोलनाका परिसरात उभ्या असलेल्या ट्रक मधून मध्यरात्री ट्रकच्या डिझेल टाकी मधून मशीनच्या सहाय्याने डीजल चोरीचा प्रकार समोर आला आहे. या परिसरातीलच हे डिझेल चोर असल्याचं समोर येत आहे. गेल्या अनेक वेळा हा प्रकार एका ट्रक चालकाला दिसला. त्यानंतर त्यांनी मोबाईल द्वारे हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करत याबद्दलची माहिती दिली आहे. आता नेमकं पोलीस या प्रकरणाची कशी दखल घेणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र खरोखरच समृद्धी महामार्ग हा प्रवासासाठी सुखकर आहे का? असा प्रश्न आता निर्माण व्हायला लागलाय. 

सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी ठाण्यात होता कामाला; हॉटेल मालकही ताब्यात 

सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शेहजाद हा दादरहून वरळीला गेला होता


वरळीतील एका हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी तो यापूर्वी कामाला होता,त्या ठिकाणी सकाळी नाष्टा त्याने केला.


तिथे त्याने जी-पेने पैसे ही दिल्याची माहिती पुढे आली आहे. 


तिथून पून्हा आरोपी शेहजाग हा दादरला आला. त्यानंतर तो दादरहून ठाण्याला गेल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. 


ठाण्यातील एका हॉटेलमध्ये तो काम करत होता. याच हॉटेलमध्ये चांगलं काम केल्याचा पार्श्वभूमिवर त्याचे कौतुकही केले होते. 


दरम्यान या प्रकरणी, पांडे नावाच्या व्यक्तीने त्याला कामावर ठेवल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या मुकादम पांडेलाही ताब्यात घेतले आहे. 


त्याचाही जबाब या प्रकरणात पोलीस नोंदवणार आहे. 


 

Chandrapur News : पॅसेंजर ट्रेनची वाघाला जोरदार धडक, वाघाचा मृत्यू

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यात बल्लारशा - गोंदिया रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झालाय. सिंदेवाही - आलेवाही स्टेशनच्या दरम्यान आज सकाळी बल्लारपूरकडून गोंदियाकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनने वाघाला धडक दिली, मृतक वाघ अंदाजे एक वर्षाचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

Nashik News : चांदवडच्या रेणुका देवी मंदिर घाटात ट्रेलरला भीषण आग

नाशिक : मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवडच्या रेणुका देवी मंदिर घाटात एका टेलरला अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. कारखान्यांसाठी लागणाऱ्या अवजड मशीन घेऊन जाणाऱ्या या ट्रेलरला ५० हून अधिक टायर आहेत. घाट उतरताना अचानक इंजिनने पेट घेतला. वाहनाच्या चालक व इतर सहकाऱ्यांनी प्रसंगावधानाने ट्रेलरचे इंजिन वेगळे करून काही अंतरावर आणून उभे केल्याने मोठी दुर्घटना टळली  या घटनेने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सोमा टोल कंपनीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टेलरचे इंजिन जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

Jalgaon News : बैलगाडीसह बैलजोडी विहिरीत पडली, बैलांचा दुर्दैवी अंत

जळगाव : जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या खांडवे येथे बैलगाडीसह बैलजोडी विहिरीत पडल्याची घटना घडली असून या घटनेत दोनही बैलांचा मृत्यू झाला आहे. खांडवे येथील शेतकरी अरुण पर्वते हे चारा आणण्यासाठी बैलगाडीसह शेतात गेलेले असताना त्यांनी बैलगाडी शेतात उभी केली. त्याचवेळी नील गाईचा कळप धावत आल्याने त्या भीतीने बैलगाडीला जोडलेली बैलजोडी पळत सुटली आणि थेट बैलगाडीसह विहिरीत जाऊन पडली. दरम्यान या घटनेत बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्या असून जेसीबीच्या सहाय्याने बैलगाडी व बैलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

Buldhana Crime : बुलढाण्यात डॉक्टर दाम्पत्याच्या घरावर सशस्त्र दरोडा

बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील दाभाडी येथील डॉक्टर दाम्पत्याच्या घरावर सशस्त्र दरोडा.


दरोडेखोरांच्या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू तर डॉ. गजानन टेकाडे गंभीर जखमी.


मध्यरात्री दरोडेखोरांनी डॉक्टरांच्या घरावर दरोडा टाकत दाम्पत्याला मारहाण केली, यात डॉ. माधुरी टेकाडे यांचा जागीच मृत्यू झाला. 


गंभीर जखमी असलेल्या डॉ.गजानन टेकाडे यांच्यावर मलकापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती.


जिल्ह्यात अलीकडच्या काळात लुटमार , दरोड्याच्या घटनेत वाढ झाल्याने नागरिकांत दहशत.

Beed Accident : बीड-परळी महामार्गावर भीषण अपघात; पोलीस भरती करणाऱ्या तीन तरुणांचा मृत्यू 

बीड : बीड-परळी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात तीन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. पहाटे व्यायाम करण्यासाठी हे तरुण नियमित जात होते. आज सकाळी एसटी बसने या तीन तरुणांना चिरडले. यात तिघांचा मृत्यू झालाय. बालाजी मोरे, ओम घोडके आणि विराज घोडके, अशी या तरुणांची नावं आहेत. हे सर्व तरुण पोलीस भरतीची तयारी करत होते. घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे.

Shivshahi Bus : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर शिवशाही बसला भीषण आग

मुंबई : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर तळेगाव टोलनाक्याजवळ शिवशाही बसला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. 

Buldhana Crime News : अवैध रेती वाहतूक, रेती महामार्गाच्या मध्यभागी टाकून ट्रक चालक पसार, रेतीवर दुचाकी धडकून अपघात

बुलढाणा : नांदुरा -  जळगाव जामोद महामार्गावर अवैध रेतीच्या ट्रकचा तहसीलदाराच्या वाहनाने पाठलाग केला. मात्र तहसीलदाराचे वाहन आपला पाठलाग करत असल्याचे पाहून ट्रक चालकाने ट्रकमधील रेती महामार्गाच्या मध्यभागी टाकून ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला. अंधारात महामार्गाच्या मध्यभागी रेती टाकल्याने या रेतीवर धडकून अनेक दुचाकींचा अपघात झाला. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अंधार असल्याने अनेक दुचाकी या रेतीच्या ढिगाऱ्यावर धडकून जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र या अपघाताना आणि जखमींना तहसीलदार जबाबदार असल्याचा ठपका ठेवत रात्री महामार्गावर नागरिकांनी मोठा गोंधळ घातला काही. काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mumbai News: धारावीत बॉम्बच्या अफवेने खळबळ

धारावीत बॉम्बच्या अफवेने खळबळ. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन. फोन करणाऱ्या व्यक्तीने धारावीच्या राजीव गांधी नगर येथे बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. या घटनेने धारावी पोलिसांनी तपासला सुरूवात केली. मात्र, तपासात पोलिसांना काहीही संशयास्पद आढळून आलं नाही. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात फोन करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Solapur Jayant Patil : जयंत पाटील यांनी महेश कोठे यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली

Solapur Jayant Patil : शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली. काही दिवसापूर्वी माजी महापौर महेश कोठे यांचं निधन झालं होतं. त्यानंतर जयंत पाटील यांनी कोठे परिवाराची भेट घेऊन सांत्वन केलं. महेश कोठे हे दूरदृष्टीचे नेते होते. त्यांच्या जाण्याने सोलापूरकराना मोठी पोकळीक जाणवेल. मात्र शरद पवार पक्षाची मोठी हानी कोठे यांच्या जाण्याने झाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

Tomato Price : टोमॅटोचे भाव घसरले, टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात, भाव मिळत नसल्याने टोमॅटो गुरांना खायला घातले

Tomato Price Drop : हिंगोलीच्या बासंबा शिवारात असलेल्या शेतकरी शेख शफिक शेख अहमद या शेतकऱ्याने त्याच्या दोन एकर शेतामध्ये टोमॅटोची लागवड केली आहे. या टोमॅटोची जोपासना करत असताना शेतकऱ्याला साधारणतः दोन लाख रुपये खर्च आला. शेतकऱ्याच्या मेहनतीने टोमॅटोचे उत्पादन सुद्धा चांगलं हाती येत असताना मात्र, बाजारात टोमॅटोचे भाव घसरले टोमॅटोला कवडीमोल दराततही खरेदी करायला कोणी समोर येईना. शेतकऱ्याला हे टोमॅटो तोडून बाजारात विक्री करायला नेणं सुद्धा परवडत नाहीय. 30 किलोचे एक कॅरेट बाजारात ठोक किमतीमध्ये 30 ते 40 रुपयाला मागितले जात आहे, त्यामुळे संकटात सापडलेले शेतकरी शेख शफीक यांनी त्यांच्या शेतातील टोमॅटो शेतातील गुरांना खायला टाकले आहेत.

Raigad Palak Mantri Vad : रायगड पालकमंत्री वाद, महामार्गावर तुफान राडा 

Raigad Guardian Minister Issue : भरत गोगावले समर्थकांचा पालकमंत्री पदावरून महामार्गावर तुफान राडा 


महाड जवळील नांगलवाडी फाट्यावर टायर जाळून भरत गोगावले समर्थक आक्रमक 


भरत गोगावलेंना पालकमंत्री न दिल्यास आमचा आंदोलन सुरूच राहणार - कार्यकर्ते 


भरत गोगावले समर्थक मुंबई-गोवा महामार्गावर एकवटले 


कोकणात सर्व आमदार सेना आणि भाजपचे असताना एकमेव राष्ट्रवादीला रायगडचे पालकमंत्री का दिलं? या मुद्द्यावर गोगावले समर्थकांचा आक्रोश 


आंदोलनकर्त्यांच्या घटनास्थळी महाड अग्निशमन दल दाखल 


मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळून गोगावले समर्थकांकडून आंदोलन पालकमंत्री पदाबाबतच्या निर्णयाचा निषेध


आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा पोलिसांचा प्रयत्न 

Tata Marathon 2025 Winner : सँझिन दोलकर टाटा मुंबई हाफ मैरेथॉनच्या विजेत्या

टाटा मुंबई हाफ मैरेथॉनचे विजेते (महिला)


1. सँझिन दोलकर
2. स्कर्मा इदो अलांझिस
3. ताशी लडोल

Mumbai Tata Marathon Winner : समन बरवाल हाफ मैरेथॉनचे विजेते

टाटा मुंबई हाफ मैरेथॉनचे विजेते


समन बरवाल - 1 तास 04 मिनिटे 37 सेकंद
हरमिन ज्योत सिंह -
डॉ. किर्तिक कार्केय -

Vasai Crime News : पेल्हार पोलिसांना मोठं यश, अपघाताच्या बनावाखाली खून करणारा आरोपी अटकेत

वसई  : वसईच्या  पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा खून, अपघाताचा बनाव करून लपवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  8 जानेवारी रोजी रस्त्यावर आढळलेल्या मृतदेहाच्या तपासादरम्यान पोलिसांना खुनाचा संशय आला. तांत्रिक विश्लेषण, सrसीटीव्ही फुटेज आणि मृताच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी करून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. तपासात हा खून वैयक्तिक वादातून नियोजित पद्धतीने घडवून आणल्याचे उघड झालं आहे. आरोपीने खून करून घटनेला अपघाताचे रूप देण्यासाठी मृतदेह रस्त्यावर टाकला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून अन्य संशयितांची चौकशी  आणि खुनासाठी वापरलेल्या शस्त्राचा शोध सुरू आहे. या प्रकरणात पेल्हार पोलिसांना मोठं यश मिळालं आहे.

Saif Ali Khan Case : सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अटकेत

Saif Ali Khan Attack, Accuse Arrested : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ठाण्यातून आरोपीला अटक केली आहे. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी विजय दास याला शनिवारी रात्री अटक करण्यात आली आहे. ठाण्याच्या कासारवडवली हिरानंदानी पूर्व परिसरातून पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Tata Marathon 2025 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून फुल मॅरेथॉनला हिरवा झेंडा

Tata Marathon 2025 : टाटा मुंबई फुल मॅरेथॉनला सुरुवात झाली असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फुल मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. 17 हजार 17 स्पर्धकांनी या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे. टाटा मुंबई मॅरेथॉन दहा किलोमीटर स्पर्धेला सकाळी सहा वाजेच्या सुमारास सुरुवात झाली यामध्ये 7184 धावपटूंनी सहभाग घेतला.

Tata Marathon 2025 : टाटा मॅरेथॉनला सुरुवात, स्पर्धेचे 20वं वर्ष

Mumbai Tata Marathon 2025 : मुंबईत टाटा मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. यंदा मुंबई टाटा मॅरेथॉन स्पर्धेचे विसावं वर्ष आहे. पहाटे 5 वाजता फुल मॅरेथॉनला सुरूवात झाली आहे, त्यानंतर हाफ मॅरेथॉन तसेच ड्रीम रन मॅरेथॉन सुरू होईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी पाच वाजता फुल मॅरेथॉनला सुरुवात झाली. टाटा मॅरेथॉन दरम्यान, फुल मॅरेथॉन हौशी (ॲम्युचर), फुल मॅरेथॉन (इलाईट), अर्ध मॅरेथॉन आणि पोलीस कप, 10 किलोमीटर रन, चॅम्पीयन्स विथ डिसअॅबीलीटी रन, सिनीयर सिटीझनस रन, ड्रिम रन अशा सात स्पर्धांचा समावेश आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News Live Updates : राज्यात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडल्या आहेत. राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.