Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्र, देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर..

Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्र, देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर..

ज्योती देवरे Last Updated: 18 Jan 2025 02:23 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात सध्या मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. एकीकडे सोमनाथ सूर्यवंशींच्या आरोपींवर कारवाई न झाल्यानं आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे राज्यातील थंडीचा जोर काहीसा...More

खोट्या गुन्ह्यात फसवल्याचे प्रकरण, माजी नगर सेवकाच्या मुलावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

Nashik News : दरोडेच्या गुन्ह्यात खोट्या पद्धतीने अडकवल्या प्रकरणी माजी नगरसेवक शिवाजी चुंबळे यांच्या मुलासह तिघांन विरोधात नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा  गुन्हा दाखल करण्यात आलाय. यश गरुड या 28 वर्षीय तरुणाच्या विरोधात जबरी चोरी केली अशी खोटी माहिती देऊन अडकवण्याचा प्रयत्न केला. तसेच नाशिक शहरातील पवन पवार या राजकीय व्यक्तीचा कार्यकर्ता असल्याने तसेच दलित समाजाचा असल्याने त्याला मोठी शिक्षा व्हावी, या हेतूने ही खोटी तक्रार देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी प्रताप शिवाजी चुंबळे, सुनील शहा ,रवींद्र जैन यांच्या विरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.