Maharashtra Breaking LIVE Updates: बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणातील संशयित आरोपीला नेपाळमधून अटक
Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर... ...More
भंडारा : मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पावसानं परत एकदा भंडारा जिल्ह्यात हजेरी लावली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी भंडारा शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात दुपारी पावसानं जोरदार हजेरी लावली. पाण्याअभावी भातपीक करपायला लागलं होतं. या पावसानं भात पिकाला नवसंजीवनी मिळणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे : सिंहगड रोड परिसरात अंधाराचा फायदा घेत एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याची घटना घडली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी अवघ्या 48 तासांत दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे गोविंदा कुमार ओमप्रकाश आणि राहुल कुमार श्यामकुमार अशी आहेत. संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली असून, दोघांनी याआधीही अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत.
प्रतिवर्षी प्रमाणे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या समवेत रक्षाबंधन साजरे केले. यावेळी अदिती यांनी राखी बांधत धनंजय मुंडे यांचे औक्षण केले. यावेळी आ. अनिकेत तटकरे हे देखील उपस्थित होते.
बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात संशयित आरोपी सलीम शेख उर्फ सलीम पिस्टल याला नेपाळमधून अटक
दिल्ली पोलिस स्पेशल सेल आणि भारतीय सुरक्षा एजन्सी यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे
सलीम पिस्टल हा भारतातील सर्वात मोठा हत्यार तस्कर करणारा म्हणून ओळखला जातो
अनेक वर्षांपासून सलीम हा पाकिस्तानमधून अवैध रित्या भारतात हत्यारांची तस्करी करत असून त्याचे पाकिस्तान, ISIS आणि डी गॅगशीही संबध असल्याचे अनेक पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागले आहेत
तपासात लाॅरेन्स बिष्णोई आणि हाशिम बाबा सारख्या कुख्यात गुंडटोळींना हतियारं सलीम पुरवत होता.
सिधू मुसेवाला हत्या प्रकरणातील एका आरोपीचा सलीम हा गुरू असल्याचे ही तपासात समोर आले आहे
यापूर्वी २०१८ मध्ये दिल्ली पोलिसांनी सलीमला अटक केली होती. त्यानंतर सलीम परदेशात पळून गेला होता
पुणे : मानवी तस्करीच्या अनुषंगाने खराडी प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून चौकशी व्हावी असे पत्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलिस महासंचालक यांना दिले आहेत. प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडीओ आणि फोटो आढळले होते. त्यामुळे हे सगळं मानवी तस्करीचा प्रकार असल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं होतं. आता याच प्रकरणी त्यांनी थेट पोलीस महासंचालकाला पत्र देत सखोल चौकशी करुन महिलांचे मूळ गाव, वय, वैद्यकीय अहवाल आणि ओळख दस्तऐवजांची खातरजमा व्हायला हवी. पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंध पथकाकडून (AHTU) महिलांना कशा प्रकारे आणले गेले, फसवणूक, दबाव टाकून या महिलांना पार्टीसाठी बोलवण्यात आलंय का?, याच्या चौकशीची मागणीदेखील पत्राद्वारे केली आहे. त्यासोबतच महिला अधिकाऱ्याचा समावेश आलेली एसआयटी स्थापन करून गोपनीयता बाळगून सखोल चौकशी करुन योग्य कारवाई करण्याच यावी, असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
सोलापूर शहरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु
मागील अर्धा तासापासून सोलापूर शहरात तुफान पावसाची हजेरी
आज सकाळपासूनच सोलापुरात ढगाळ वातावरण होते
त्यामुळे प्रचंड उकाडा जाणवतं होता, मात्र पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सोलापूरकर सुखावलेत
उत्तराखंडच्या उत्तरकाशी भागात मुसळधार पावसामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील सुमारे 172 हून अधिक नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. धराली, हर्षिल या आपत्तीग्रस्त भागातून राज्यातील सर्व नागरिकांना जॉली ग्रँड विमानतळ तसेच मताली कॅम्प या सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले आहे.
त्यातील बहुतांश पर्यटक आज महाराष्ट्रात परतणार असल्याचे महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी बेस कॅम्प येथून दिले आहे.त्यांनी सांगितले की, "आजच सर्वांना महाराष्ट्रात परत आणले जाणार असून कोणीही शिल्लक राहणार नाही. सर्वजण सुखरूप आहेत, याचा आम्हाला आनंद आहे."
महाजन पुढे म्हणाले, "आपले लोक अडचणीत आहेत, ही आपली जबाबदारी आहे. उत्तराखंड सरकार, स्थानिक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि आमच्या महाराष्ट्रातील अधिकारी – सगळे मिळून प्रयत्नशील आहेत. आम्ही सतत संपर्कात राहून सर्वांना सुरक्षित स्थळी आणले आहे."
शासनाने विशेष नियंत्रण कक्ष सुरू करून नातेवाईकांकडून माहिती घेतली आणि नागरिकांना मदत पोहोचवली. "ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना प्राधान्याने हलवले गेले. सर्वजण सुरक्षित आहेत, कोणीही घाबरू नये," असा विश्वास महाजन यांनी दिला. काही पर्यटक त्यांच्या पुढील यात्रांकरिता देखील रवाना झाल्याचे श्री महाजन यांनी सांगितले. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नागरिकांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात आणण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे उत्तरकाशी येथे अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांमध्ये दिलासा पसरला असून, सर्वांची नजरे आता आपल्या प्रियजनांच्या स्वागताकडे लागल्या आहेत.
मंत्री उदय सामंत जम्मू मध्ये दाखल
ऑपरेशन सिंदूर महा रक्तदान शिबिर साठी कॅबिनेट मंत्री उदय सामंत जम्मू मध्ये होणाऱ्या महासभेची तयारी पाहण्यासाठी पोहोचले.
उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरला दाखल होणार
आर्मीच्या मिलिटरी कॅम्प मध्ये महाराष्ट्राच्या हजारो पैलवानांसोबत करणार रक्तदान.
पहेलगाम हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तिसरा दौरा
बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस.
सिंदखेड राजा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक नदी ओढ्याना पूर.
अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर बुलढाणा जिल्ह्यातील आज सर्वच तालुक्यात सकाळपासून कुठे मध्यम तर कुठे मुसळधार पावसाला सुरुवातझाली आहे. आज सकाळपासून चिखली सिंदखेडराजा तालुक्यात मुसळधार पाऊस बरसत आहे अनेक ठिकाणी शेतातील पिके पाण्यात बुडाली असून अनेक नदी आणि ओढ्यांना पूर आले आहे सिंदखेड राजा तालुक्यातील सेनगाव जहांगीर येथील नदीला आलेल्या पुरामुळे सीनगाव जहागीर ते सिंदखेड राजा मार्ग बंद पडला आहे.
राज ठाकरे यांच्या घरी रक्षाबंधन
जयवंती देशपांडे यांच्याकडून राज ठाकरे यांना बांधण्यात आली राखी
तसेच राज ठाकरे यांचे मित्र नयन शाह यांच्या पत्नीकडून हेतल शाह यांनी राज ठाकरे यांना राखी बांधण्यात आली आहे
गडचिरोली : महावितरणमध्ये सहायक अभियंता पदावर कार्यरत असलेल्या एटापल्ली तालुक्यातील कारमपल्लीच्या युवा अभियंत्याचा शेतालगत असलेल्या नाल्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. दलसु कटिया नरोटे (37 वर्ष) असे अभियंत्याचे नाव आहे. जागतिक आदिवासी दिन आणि रक्षाबंधनानिमित्त काही दिवसांच्या सुट्या घेऊन ते पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांसह आपल्या गावाकडे आले होते. दलसू हे नांदेड तालुक्यातील मुखेड येथे महावितरण विभागात सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत होते. शुक्रवारी शेतात रोवणीचे काम सुरू असल्याने ते शेतावर गेले. दरम्यान फिरत ते लगतच्या नाल्यावर गेले. पण तिथे फिट (मिर्गी) आल्याने ते पाण्यात पडले. बऱ्याच वेळपासून ते परत न आल्याने घरच्यांनी शेताकडील नाल्याकडे शोध घेतला. त्या ठिकाणी ते नाल्याच्या पाण्यात पडून असल्याचे आढळले.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशी प्राण्यांची तस्करी सुरूच
बँकॉकवरून आलेल्या प्रवाशाला अटक
आरोपीकडून मोठ्या प्रमाणात परदेशी प्राणी जप्त
अल्बिनो रेड-ईयर्ड स्लायडर जातीची ५० कासव, सेब्युएला प्रजातीची २ पिग्मी मर्मोसेट माकड आणि २ किंगकाजू जप्त
ट्रॉली बागेतून सुरू होती प्राण्यांची अवैध तस्करी
शाहरुखखान मोहम्मद हसीअन नावाच्या प्रवाशाला वन्यजीव संरक्षण अधिनियम तसेच कस्टम कायद्यांतर्गत अटक
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मंदावला आहे. रक्षाबंधन साजरा करण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने आपापल्या गावी निघालेत. परिणामी वाहनांची संख्या वाढलीये. यामुळं अमृतांजन पुलाजवळ वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यामुळं बोरघाटात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहे. ही कोंडी फोडण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून दोन्ही दिशेने पुण्याकडे वाहतूक सोडली जाऊ शकते. 10-10 मिनिटांच्या टप्याटप्याने असे ब्लॉक घेण्याची तयारी यंत्रणांकडून केली जातीये.
वर्धा जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंददायी बातमी समोर आली आहे. नागपूर ते हडपसर (पुणे) दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला वर्धा स्थानकावर थांबा मिळाला असून, ही सेवा 10 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या निर्णयामुळे वर्ध्याच्या प्रवाशांना आता पुणे, औरंगाबाद, नागपूर अशा प्रमुख शहरांमध्ये जलद, आरामदायक आणि आधुनिक प्रवासाची सुविधा मिळणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसला वर्ध्यात थांबा मिळावा यासाठी माजी खासदार रामदास तडस यांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश मिळालं असून वर्धेकरांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
दादर येथील कबूतर खाना बंद झाल्यानंतर आता गाडीच्या छतावर कबुतरांसाठी खाद्य
कोर्टाच्या निर्णयानंतर मुंबईतील कबूतर खाने बंद करण्यात आले आहेत
महापालिका आणि पोलीस प्रशासन कबुतरांना खाद्य टाकण्यासाठी मनाई करत आहे
अशातच आता दादर येथे गाडीच्या छतावर कबुतरांना खाद्य टाकण्यात आले आहे
सोलापुरातील शरणू हांडे अपहरण प्रकरणात आणखी दोन संशयित आरोपीना पोलिसांनी घेतले ताब्यात
राकेश भीमाशंकर कुदरे, श्रीकांत बाबुराव सुरपुरे या दोन संशयितना पोलिसांनी ताब्यात घेतलेय.
या दोघांना कर्नाटकातील इंडी तालुक्यातून ताब्यात घेतलेय
आमदार गोपीचंद पडळकर समर्थक शरणू हांडेचे अपहरण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 4 आरोपी पोलिसांच्या अटकेत होते
आरोपी अमित सुरवसेसह 4 आरोपीना काल न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती
त्यानंतर काल रात्रीच्या सुमारास सोलापूर पोलीसांनी आणखी दोन संशयिताना ताब्यात घेतले
या दोन्ही संशयितांचा गुन्ह्यात सहभाग होता? याची तपासणी करून अटकेची कायदेशीर कारवाई पूर्ण केली जाणार आहे
अमरावती : अमरावतीच्या मोर्शी शहरात उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार यांच्या शासकीय बंगल्याच्या टीन शेड मध्ये उभी केलेल्या खाजगी कारची काच फोडून त्यात ठेवलेली रिव्हाल्व्हर चोरट्यांनी चोरून नेली, अज्ञात चोराने कार मध्ये ठेवलेल्या चाव्या उचलल्या आणि शासकीय बंगल्याची गेट उघडून आत प्रवेश केला.. पण तिथून काही चोरीला गेले नाही.. या घटनेने मात्र खळबळ उडाली आहे.. उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार हे शासकीय कामानिमित्त वरुड येथे गेले होते मात्र इकडे त्यांच्या शासकीय मोर्शी येथील बंगल्यावर चोरीची घटना झाली, आता शासकीय अधिकाऱ्यांच्या बंगल्यात देखील चोराने चोरीची हिंमत केल्याने नागरिक सुरक्षित आहेत का हा सवाल देखील प्रामुख्याने उपस्थित होतो, तूर्तास मोर्शी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी एसडीओच्या शासकीय बंगल्याकडे धाव घेऊन पंचनामा सुरू केला.. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास चालू केला आहे.
Ganeshotsav 2025: गणेशोत्सव जसजसा जवळ येतो आहे, तसतशी सार्वजनिक मंडळांची तयारीही जोरात सुरू झाली आहे. मात्र, यंदा मंडप उभारणीच्या कामात एक मोठा अडथळा समोर आला आहे – तो म्हणजे मुंबई महापालिकेचा नवा ‘दंड नियम’.
महानगरपालिकेने परिपत्रक काढून स्पष्ट केलं आहे की, रस्त्यावर किंवा पदपथावर मंडपासाठी खड्डा खणला, तर त्या प्रत्येक खड्ड्याबाबत तब्बल 15 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
Ganeshotsav 2025: गणेशोत्सव जसजसा जवळ येतो आहे, तसतशी सार्वजनिक मंडळांची तयारीही जोरात सुरू झाली आहे. मात्र, यंदा मंडप उभारणीच्या कामात एक मोठा अडथळा समोर आला आहे – तो म्हणजे मुंबई महापालिकेचा नवा ‘दंड नियम’.
महानगरपालिकेने परिपत्रक काढून स्पष्ट केलं आहे की, रस्त्यावर किंवा पदपथावर मंडपासाठी खड्डा खणला, तर त्या प्रत्येक खड्ड्याबाबत तब्बल 15 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
BEST Employees Credit Society Election, Uddhav Thackeray Raj Thackeray: मराठी भाषेच्या मुद्यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे एकत्र आले होते. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन निवडणूक लढतील अशा चर्चा सुरु असतानाच मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडीट सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या सोसायटीसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार सेना एकत्र आले आहेत. या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking LIVE Updates: बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणातील संशयित आरोपीला नेपाळमधून अटक