= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आरबीआयकडून सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात आरबीआयकडून सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात
आरबीआयकडून रेपो रेट ५० बेसिस पॉइंट्सनं कमी केला
रेपो रेट ५.५ टक्क्यांवर
कर्जाचा व्यजदरात कपात होणार
पॉलिसी रेपो रेट आता जवळजवळ ३ वर्षांतील सर्वात कमी पातळीवर
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील झाडावर चढून वारकऱ्यांकडून आंदोलन बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील झाडावर चढून वारकऱ्यांकडून आंदोलन केले जात आहे
केज तालुक्यातील सासुरा येथील एकनाथ महाराज मठ संस्थानात झालेल्या भ्रष्टाचारा विरोधात मागील तीन दिवसांपासून उपोषण सुरू आहे
मात्र प्रशासनाकडून उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने वारकऱ्यांनी झाडावर चढून टाळ वाजवून हरिनामाचा गजर करत आंदोलन सुरू केले आहे
अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची धांदल उडालीय
केशव महाराज गित्ते आणि शांताबाई पळवदे यांचे उपोषण सुरू आहे
अग्निशामक दलाचे जवान देखील याठिकाणी दाखल झाले आहेत
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
साताऱ्यातील मंडलाधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात, 75 हजाराची लाज घेताना रंगेहात पकडले सातारा- साताऱ्यातील खिंडवाडी येथील मंडलाधिकारी अजित घाडगे यांना शेतजमिनीची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी ७५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांनी तक्रारदाराकडून एकूण १ लाखाची लाच मागितली होती. यापैकी ७५ हजार स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांना अटक केली आहे. घाडगे यांच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Gadchiroli news: वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; आरमोरी तालुक्यातील पाेर्ला वनपरिक्षेत्राच्या देलाेडा जंगलातील घटना गडचिरोली : मोह टोळ वेचणीकरता जंगलात गेलेल्या महिलेला वाघाने ठार केले. ही घटना आरमोरी तालुक्यातील पाेर्ला वनपरिक्षेत्राच्या देलाेडा जंगलात गुरुवारी घडली. मीरा आत्माराम कोवे (५५,रा. सुवर्णनगर, देलोडा ) असे मृत महिलेचे नाव आहे. मीरा कोवे या गावाला लागून असलेल्या जंगलातील कक्ष क्र. (१०) मध्ये टोळी वेचण्यासाठी गेल्या होत्या. टोळी वेचण्यात त्या मग्न असताना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले. पोर्ला ते वडधा मार्गावरून ये -जा करणाऱ्या नागरिकांना वाघाचे दर्शन झाले. तेव्हा बराच वेळ उलटूनसुद्धा महिला घरी परत आली नाही म्हणून कुटुंबाला संशय आला. जंगल परिसरात शोधाशोध सुरु केली असता मीरा कोवे यांचा मृतदेह आढळून आला. वनविभागाने पंचनामा करुन मृतदेह रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मिठी नदी घोटाळा प्रकरणातला आरोपी जय जोशीला जामीन मंजूर मिठी नदी घोटाळा प्रकरणातला आरोपी जय जोशीला जामीन मंजूर.
सत्र न्यायालयाने दिला अटकेत असलेल्या जय जोशीला जामीन.
मिठी नदी घोटाळा प्रकरणात जय जोशी आणि केतन कदमला झाली होती अटक.
महानगर दंडाधिकारी कोर्टाने दोघांचाही जामीन अर्ज फेटाळत जामीन नाकारला होता.
मात्र सत्र न्यायालयाने जय जोशीला जामीन दिलेला आहे.
एक लाखांच्या जाचमुचलक्यावर कोर्टाने आरोपी जय जोशीला जामीन मजूर करत तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिलेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वांद्रे येथील खेरवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 3 पोलिसांवर निलंबनाची कारवाई वांद्रे येथील खेरवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दोन व्यक्तींच्या आर्थिक वाद कर्तव्यावर उपस्थित नसतानाही वैयक्तीक फायद्यासाठी हाताळल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
याप्रकरणी विभागीय चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक व दोन पोलीस शिपायांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
हे सर्वजण खेरवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) यांच्या आदेशानुसार, तक्रारदार मुफ्ती नसीमुद्दीन सुखानु शेख व मेहूल मेहता ऊर्फ शफी सुर्या यांच्यात आर्थिक व्यवहारांबाबत वाद आहेत.
त्या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिवसपाळीला कर्तव्यावर नसतानाही ते प्रकरण हाताळले, असा आरोप आहे.
प्राथमिक चौकशीत त्या संदर्भात अहवालही प्राप्त झाला होता. त्यानंतर तिघांनाही सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
यंदा माऊलींच्या पालखी प्रस्थानाची वेळ बदलली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं यावेळचं पालखी प्रस्थान किमान दीड ते दोन तास उशिरा होणार आहे. म्हणजे रात्री आठ वाजता प्रस्थानाला सुरुवात होईल असं आळंदी देवस्थानने जाहीर केलंय. यंदा प्रस्थान सोहळा गुरुवारी होत असल्यानं हा वेळेत बदल झालाय. प्रत्येक गुरुवारी देऊळ वाड्यात माऊलींची पालखी निघते, ही पालखी सूर्यास्तानंतर निघण्याची परंपरा आहे. मात्र यंदा गुरुवारची पालखी सुद्धा साडे पाचच्या सुमारास निघेल अन सूर्यास्तानंतर आरती होईल. गुरुवारच्या पालखीत खंड पडू न देता पालखी प्रस्थान सोहळा पार पाडण्याचे नियोजन देवस्थानने केलेलं आहे. त्यामुळं यंदा किमान दीड ते दोन तास प्रस्थान उशिरा होणार आहे. त्यानुसार वारकऱ्यांनी नियोजनात बदल करण्याचं आवाहन देवस्थानने केलेलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
गडचिरोलीत आज माओवादी सामूहिक विवाह सोहळा गडचिरोलीत आज एक आगळावेगळा विवाह सोहळा पार पडणार आहे.. हा विवाह सोहळा आत्मसमर्पण केलेल्या आणि बंदूक खाली ठेवलेल्या माओवाद्यांचा आहे.. विशेष म्हणजे या सामूहिक विवाह सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित राहणार आहेत.. गडचिरोली पोलिसांच्या जिल्हा मुख्यालय परिसरात आज दुपारी दोन वाजता 12 माओवादी जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे.. गेल्या काही महिन्यात माओवाद सोडून, शस्त्र खाली ठेवून हे माओवादी समाजाच्या मुख्य प्रवाहात परत आले आहे.. आता जीवनाची नव्याने सुरुवात करण्यासाठी त्यांनीच आपापले जोडीदार निवडले असून पोलीस प्रशासनाच्या मदतीने आज हे 12 माओवादी जोडपे लग्नबेडीत अडकणार आहे... यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गडचिरोली जिल्ह्याचे सह पालकमंत्री आशिष जयस्वाल आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी ही उपस्थित राहतील.. शासकीय नियमानुसार सर्व 12 माओवादी जोडप्यांना त्यांचा कौटुंबिक संसार सुरू करण्यासाठी आवश्यक साहित्यही आज त्यांना दिलं जाणार आहे...
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईच्या मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी EDची मुंबईत विविध ठिकाणी छापेमारी सुरू मुंबईच्या मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी EDची मुंबईत विविध ठिकाणी छापेमारी सुरु आहे. आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ED नेही स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपासाला सुरूवात केली होती. आता पर्यंत ED ने कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीशी संबधिक लोकांचे या प्रकरणी जबाब नोंदवले होते .या माहितीच्या आधारे ही छापेमारी सुरू असल्याची सूत्रांची माहिती.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्या पूर्वी तुळजाभवानी गाभाऱ्यात शिवराज्याभिषेक पूजा सुरु आहे. प्रशासनानेही तुळजाभवानी मंदिरात शिवराज्याभिषेक साजरा करावा ही मराठा मोर्चाची मागणी आहे. आई तुळजाभवानीने शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिल्याची पूजा मांडण्याची मागणी केली जात आहे. धाराशिव-तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून आज 6 जुन चे औचित्य साधुन शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवत असल्याने या पूजेला महत्त्व आहे. त्यामुळे देवीच्या गाभाऱ्यात शिवराज्याभिषेक केल्याचं मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच गतवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रशासनाकडून अभिषेक पूजा करावी. तसेच भवानी तलवार पूजा मांडावी अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा कडून करण्यात आली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Beed News: बीडच्या आष्टी येथे झालेल्या भांडणाची तक्रार पोलीस ठाण्यात का दिली? असा जाब विचारत दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याची एका कुटुंबाला बेदम मारहाण Beed News: बीडच्या आष्टी येथे झालेल्या भांडणाची तक्रार पोलीस ठाण्यात का दिली? असा जाब विचारत दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यांनी एका कुटुंबाला बेदम मारहाण केली. मारहाणीत या कुटुंबातील सदस्य जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे वास्तव्यास असणाऱ्या ढोबळे कुटुंबातील शारदा ढोबळे यांचे जमिनीच्या वादातून शेजारील नरवडे कुटुंबाशी भांडण झाले.. आणि याच भांडणाची तक्रार आष्टी पोलीस ठाण्यात देऊन घरी परतताना ढोबळे कुटुंबावर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून रस्त्यात गाडी आडवी लावून कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण केली.
टोळक्याकडून झालेल्या मारहाणीत शारदा ढोबळे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य जखमी आहेत.. दरम्यान या प्रकरणाची दाखल घेऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप पसार आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Uddhav Thackeray, Raj Thackeray: दोन भावांनी बोललं पाहिजे, उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेवर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया Uddhav Thackeray, Raj Thackeray: शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? राष्ट्रवादी विलीन होणार का या प्रश्ना इतकीच चर्चा उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का या प्रश्नाची होत असते. राष्ट्रवादीचा निर्णय पुढची पिढी घेईल म्हणजे सुप्रिया सुळे आणि अजित पवार ठरवतील असं उत्तर शरद पवारांनी देऊन झालंय. सेना आणि मनसेमध्येही पुढची पिढी एकीकरणाच्या प्रश्नावर बोलू लागली आहे. आदित्य उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठा अमित राज ठाकरेंनी आज ठाकरे एकीकरणाच्या शक्यतेवर भाष्य केलं.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Shivrajyabhishek Sohala 2025: किल्ले रायगडावर आज 352वा शिवराज्याभिषेक सोहळा Shivrajyabhishek Sohala 2025: किल्ले रायगडावर आज 352वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार. सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल. शिवभक्तांसह संभाजीराजे छत्रपतींचीही उपस्थिती