Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशासह राज्यातील क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Advertisement

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 May 2025 02:55 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशासह राज्यातील क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...वैष्णवी हगवणे आत्महत्या (Vaishnavi Hagwane Case) प्रकरणात अटकेत असलेल्या हगवणे भावांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार असल्याचं दिसून...More

140 दिवस उलटूनही बुलढाणा केस आणि नख गळतीच्या रुग्णांचा अहवाल गुलदस्त्यात

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अनेक गावात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक अजब प्रकार उघडकीस आला होता. या परिसरातील जवळपास 20 ते 22 गावातील नागरिकांना अचानक केस गळतीचा व टक्कल पडण्याचा त्रास सुरू झाला. "एबीपी माझा"ने सर्वात प्रथम ही बातमी उजेडात आणल्यानंतर आरोग्य प्रशासन खळबळून जागं झालं. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी तात्काळ देशातील सर्वोच्च संशोधन संस्था असलेल्या आयसीएमआरच्या (ICMR) पथकाला या परिसरात संशोधन करण्यासाठी पाठवलं. लाखो रुपये खर्च करून आयसीएमआरच पथक या परिसरात आलंही. त्यांनी रुग्णांचे नमुने ही घेतले. मात्र अद्यापही आयसीएमआरचा अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही. यामुळे मात्र आयसीएमआर च पथक फक्त पर्यटनासाठी तर नाही आलं नव्हतं ना...? असा सवाल उपस्थित राहत आहे.

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.