- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशासह राज्यातील क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशासह राज्यातील क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर... MI vs PBKS Qualifier 2 : श्रेयस अय्यरने केला मुंबई इंडियन्सचा गेम, पंजाब किंग्ज 11 वर्षानंतर आयपीएल...More
विदर्भाचे पंढरीनाथ म्हणून ओळखला जाणाऱ्या संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावहून पंढरपूरच्या दिशेने रवाना झालीय. या पालखीचं यंदा ५६ वं वर्ष आहेय. सकाळी शेगावहून निघालेल्या या पालखी नागझरीमार्गे अकोला जिल्ह्यात प्रवेश केलाये. पालखीचा आजचा मुक्काम पारस येथे आहेय. तर उद्या भौरद येथे मुक्काम केल्यानंतर पालखी अकोल्यात प्रवेश करणारेय.
ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतील टेमघर जल शुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब उपकेंद्रातील पावसाळ्या पूर्वीची अत्यावश्यक देखभाल, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आदी कामे बुधवार ०४ जून रोजी करण्यात येणार आहेत. त्यामुळे, बुधवार, ०४ जून रोजी स ९.०० ते रा. ९.०० या काळात १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी, बुधवार ०४ जून रोजी स. ९.०० ते रा. ९.०० वाजेपर्यंत घोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिध्दांचल, समता नगर, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन आणि कळव्याचा काही भाग येथे १२ तासासाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील. इतर भागात, स्टेम प्राधिकरणामार्फत येणारा पाणी पुरवठा झोनिंग करुन सुरू ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, पाणीपुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. तरी, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा, पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.
प्लास्टिक बंदी अभियाना अंतर्गत वैद्यनाथ मंदिरात कापडी पिशवी वेंडिंग मशीन चे मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन
राज्यात सुरू असलेल्या प्लास्टिक बंदी अभियानांतर्गत वैद्यनाथ मंदिर येथे कापडी पिशवी वेडिंग मशीनचे उद्घाटन पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
प्लास्टिक वापर व त्यापासून होणाऱ्या प्रदूषणाचे निर्मूलन व्हावे याच संकल्पनेतून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वैद्यनाथ मंदिरासह विविध ठिकाणी कापडी पिशवी व वेंडिंग मशीनचे बसवण्यात आल्या आहेत.दहा रुपयात ही कापडी पिशवी घेता येणार आहे.
सध्या मान्सून राज्यात दाखल झालाय. बळीराजाची पेरणीची लगबग सुरू आहे. शेत मशागतीची कामे जोमात सुरू आहे. अशातच वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे शेतशिवारात शेती मशागत करतांना एक वेगळी घटना घडली. एका शेतकऱ्यानी आपल्या शेत मशागत करण्यासाठी नातेवाईकांच ट्रॅक्टर आणलं. मात्र, नवशिक्या ड्रायव्हरने स्टेरिंग हातात घेतले आणि ट्रॅक्टरने शेत मशागत करतांना ब्रेकऐवजी अँक्सिलेटर दाबल्यामुळे ट्रॅक्टर विहिरीच्या दिशेने धावायला लागले. काही कळायच्या आत ट्रॅक्टर विहिरीत कोसळणार तितक्या नवं शिक्या चालकाने बाहेर उडी घेतली. मात्र यावेळी ट्रॅकटर विहिरीत कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नाही. परंतु ट्रकटरच मोठं नुकसान झालं..
उजनी धरणातून सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या दुहेरी जलवाहिनीची चाचणी सुरु
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गांवरील लांबोटी गावाजवळील चंदननगरपर्यंत पाणी पोहोचले
काही दिवसापूर्वी उजनी धरण ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झालेय
या जलवाहिनीची चाचणी सोलापूर महापालिकेच्या वतीने घेतली जातेय
लांबोटी जवळ सोलापूर मनपाच्या वतीने नव्या पाईपलाईनचे वॉशआउट करण्यात आले
या पुढे लांबोटी ते सोरेगाव दरम्यान चाचणीचे कामं केले जाणार
सोलापूर महानगरपालिका पाणीपुरवठा अधिकारी व्यकटेश चौबे यांची माहिती
कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही मार्गावरील लोकल गाड्या १५ ते २० मिनिटांनी उशिराने सुरु .
तांत्रिक बिघाडामुळे सेवा विस्कळीत झाल्याची प्राथमिक माहिती असून, रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू
कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही मार्गावरील लोकल गाड्या १५ ते २० मिनिटांनी उशिराने सुरु .
तांत्रिक बिघाडामुळे सेवा विस्कळीत झाल्याची प्राथमिक माहिती असून, रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू
यवतमाळ जिल्ह्यात बोगस बियाणे तसेच खतांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे अशातच यवतमाळच्या पुसद तालुक्यातील सावंगी येथे अनधिकृत पणे खते असलेला ट्रक कृषी विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला आहे एका शेतामध्ये ट्रक मधील खतांच्या बॅगा उतरवित असताना पथकाने ही कारवाई केली आहे यामध्ये दोन लाख 78 हजार रुपये किमतीच्या खतांच्या बॅगा तसेच पंधरा लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 17 लाख 78 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे त्यामुळे जिल्ह्यात बोगस खते आणि बियाणे दाखल होऊ शकते त्यामुळे कृषी विभागाने भरारी पथकाची नेमणूक केली आहे अशातच सावंगी येथे एका शेतामध्ये अनधिकृत पणे खताचा साठा साठवणूक करून ठेवत आहे या माहितीवरून कृषी विभागाने धाडसत्र राबवून ही कारवाई केली आहे.
Vaishnavi Hagawane Suicide Case : तक्रारदार प्रशांत येळवंडे यांच्याकडून जप्त केलेला जेसीबी हगवणेंकडे कसा आला? याचा शोध म्हाळुंगे पोलिसांकडून घेतला जातोय. येळवंडे यांच्याकडून जप्त करणारे अन ज्या गोडाऊनमध्ये हा जेसीबी होता, त्या मालकाकडे ही आता संशयाची सुई आहे. उद्या शशांक आणि लता हगवणेंना अटक केल्यावर होणाऱ्या चौकशीत याचा खुलासा होणार आहे.
भंडारा : सध्या भंडारा जिल्ह्यात उन्हाळी भातपीक कापणीचा हंगाम सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील कोच्छी गावाच्या शेतशिवारात धान कापणी सुरू असताना झुडूपात दबा धरून बसलेल्या एका बिबट्यानं शेतमजुरांवर हल्ला करून दोघांना जखमी केलं. यावेळी तिथं उपस्थित अन्य शेतमजुरांनी आरडाओरड केल्यानं बिबट्यानं शेतातून धूम ठोकल्यानं या जखमी मजुरांचे जीव वाचले. दोन्ही जखमी मजुरांना तातडीनं लाखांदूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. रमेश शेंडे (40) आणि गोपाल राऊत (45) असं जखमींचं नावं आहे.
भंडारा : सध्या भंडारा जिल्ह्यात उन्हाळी भातपीक कापणीचा हंगाम सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील कोच्छी गावाच्या शेतशिवारात धान कापणी सुरू असताना झुडूपात दबा धरून बसलेल्या एका बिबट्यानं शेतमजुरांवर हल्ला करून दोघांना जखमी केलं. यावेळी तिथं उपस्थित अन्य शेतमजुरांनी आरडाओरड केल्यानं बिबट्यानं शेतातून धूम ठोकल्यानं या जखमी मजुरांचे जीव वाचले. दोन्ही जखमी मजुरांना तातडीनं लाखांदूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. रमेश शेंडे (40) आणि गोपाल राऊत (45) असं जखमींचं नावं आहे.
भंडारा: रद्दी पेपर घेऊन तुमसर इथून भंडाऱ्याकडं येत असलेल्या ट्रकला अचानक आग लागली. धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याचं चालकाच्या लक्षात येताचं त्यानं समयसूचकता दाखवतं ट्रक थांबविला आणि नागरिकांच्या मदतीनं पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. बर्निंग ट्रकचा हा थरार भंडारा - तुमसर महामार्गावरील मोहाडी इथं मध्यरात्री घडला. आगीचं नेमकं कारण करू शकलं नाही. या आगीत कुठलेही जीवितहानी झाली नसली तरी, ट्रक मालकाचं मोठं नुकसान झालं आहे.
संजय राऊत मानहानी प्रकरणी मंत्री नितेश राणेंना दिलासा
राणे यांना न्यायालयात उपस्थित न राहण्याबाबत सशर्त परवानगी
सिंधुदुर्गातील पोलिस स्थानकात जात २ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन
मागील दोन सुनावणीच्या वेळी नितेश राणे अनुपस्थित राहिल्याने जामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते
सत्तांतराच्या नाट्यकाळात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं
२०२३ मे महिन्यात केलेल्या वक्तव्यात नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा उल्लेख साप म्हणून केला होता
यानंतर संजय राऊतांनी नितेश राणेंविरोधात अब्रू नुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला... याची सुनावणी माझगाव दंडाधिकारी कोर्टात सुरू आहे
- नाशिकच्या पेठ रोड भागात एका इसमाची हत्या ...
- मध्यरात्री अज्ञात लोकांनी केली हत्या संजय सासे या व्यक्तीची हत्या...
- संजय सासे ही व्यक्ती बाबागिरी करत असल्याची स्थानिकांची माहिती ...
- पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अधिक तपास सुरू...
पुणे: जेसीबी व्यवहारात फसवणूक झालेल्या प्रकरणात पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांनी हस्तक्षेप केला. त्यामुळं मे 2024 च्या तक्रारीवेळी अपेक्षित कारवाई झाली नाही. असा आरोप तक्रारदार प्रशांत येळवंडे यांनी आरोप केलाय. शशांक आणि लता हगवणेंनी प्रशांतची 11 लाख 70 हजारांची फसवणूक केली अन बंदुकीचा धाक दाखवून कुटुंब संपवण्याची धमकी दिली. या विरोधात प्रशांतने मे 2024मध्ये गुन्हा दाखल केला होता. पण माझा मामा मोठा अधिकारी आहे, त्यामुळं माझ्यावर कारवाई करण्याची कोणात हिंमत नाही. असा दम शशांकने दिल्याचं प्रशांत सांगतात. वैष्णवीच्या प्रकरणानंतर मात्र जागे झालेल्या पोलिसांनी आता गुन्हा ही दाखल केला, जेसीबी ही ताब्यात घेतला अन उद्या अटक ही केली जाणारेय. या संबंधी प्रशांत येळवंडे यांनी अनेक खुलासे केलेत.
पुणे: जेसीबी व्यवहारात फसवणूक झालेल्या प्रकरणात पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांनी हस्तक्षेप केला. त्यामुळं मे 2024 च्या तक्रारीवेळी अपेक्षित कारवाई झाली नाही. असा आरोप तक्रारदार प्रशांत येळवंडे यांनी आरोप केलाय. शशांक आणि लता हगवणेंनी प्रशांतची 11 लाख 70 हजारांची फसवणूक केली अन बंदुकीचा धाक दाखवून कुटुंब संपवण्याची धमकी दिली. या विरोधात प्रशांतने मे 2024मध्ये गुन्हा दाखल केला होता. पण माझा मामा मोठा अधिकारी आहे, त्यामुळं माझ्यावर कारवाई करण्याची कोणात हिंमत नाही. असा दम शशांकने दिल्याचं प्रशांत सांगतात. वैष्णवीच्या प्रकरणानंतर मात्र जागे झालेल्या पोलिसांनी आता गुन्हा ही दाखल केला, जेसीबी ही ताब्यात घेतला अन उद्या अटक ही केली जाणारेय. या संबंधी प्रशांत येळवंडे यांनी अनेक खुलासे केलेत.
पुणे: शशांक आणि लता हगवणेला म्हाळुंगे पोलीस अटक कारणारेत. न्यायालयाने आज तशी परवानगी दिल्यानं उद्या येरवडा तुरुंगातून पोलीस आई-लेकाचा ताबा घेणारेत. हगवणे आई-लेकाने जेसीबी विक्री करताना फसवणूक केलीये. पुण्याच्या खेड तालुक्यातील निगोजे गावचे प्रशांत येळवंडे यांनी तसा गुन्हा दाखल केलाय. मार्च 2022पासून ऍडव्हान्स आणि कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी प्रशांत यांनी 11 लाख 70 हजार रुपये लता हगवणेंच्या खात्यावर टाकलेत. मात्र काही महिन्यांतच बँकेने प्रशांत यांच्याकडून जेसीबी ताब्यात घेतली. मग प्रकरण म्हाळुंगे पोलिसात गेलं पण तिथं ही पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांनी या प्रकरणात ही हस्तक्षेप केला, त्यामुळं तेंव्हा अपेक्षित कारवाई झाली नाही. असा आरोप प्रशांत यांनी केला. वैष्णवीच्या प्रकरणानंतर मात्र जागे झालेल्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला अन जेसीबी ताब्यात घेतली. आता न्यायालयाने अटकेची परवानगी दिल्यानं उद्या म्हाळुंगे पोलीस येरवडा तुरुंगातून हगवणे आई-लेकाला बेड्या ठोकणार आहेत.
Bhandara: घरात कुणीही नसल्यानं दारावर लागलेलं कुलूप बघून, बंद घरात मध्यरात्री चोरट्यानं कुलूप तोडून प्रवेश केला. कपाटांमध्ये साहित्य अस्ताव्यस्त करून लॉकरतोडीत त्यात ठेवलेले एक लाख रुपये रोख आणि चार लाखांपेक्षा अधिकची सोन्या-चांदीची दागिने घेऊन चोरट्यानं पळ काढला. ही घटना भंडारा शहरातील वरठी रोड मार्गावरील शनाया नगर इथं रवी चौरसिया यांच्या घरी घडली. चौरसिया हे एका राष्ट्रीयकृत बँकेत नोकरीवर असून शनिवार, रविवार सुट्टी असल्यानं ते कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते. घटनेची माहिती मिळताचं त्यांनी रात्रीचं घर गाठलं आणि पोलिसांना याची माहिती दिली. घरपोडी करणारा चोर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून भंडारा पोलिसांनी स्वान पथकासह फिंगर प्रिंट एक्सपर्टला बोलविलं असून चोराचा शोध घेण्यात येत आहे.
Dhule News : धुळे कृषी विभागाच्या वतीने आज गुजरात हून येणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्समधून लाखो रुपयाचे कपाशीचे बनावट बियाणं जप्त करण्यात आलं. वेशभूषा बदलत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी रात्रभर गस्त घालत होते मिळालेल्या माहितीनुसार वाहनांवर छापा टाकून जवळपास 20 लाख रुपयांचं बनावट बियाणं व महाराष्ट्रात प्रतिबंध असलेले बियाणं जप्त करण्यात आलं..
जवळपास या कारवाईमध्ये बाराशे ते तेराशे बनावट कपाशीचे बियाणं जप्त करण्यात आले.. ही सर्व बियाणं गुजरात मधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आली होती. अंकुर कंपनीच्या नावाने बनावट बियाणे तयार करण्यात आली होती तर पीनगार्ड, राशी 659 5g अशी बनावट पाकीट तयार करून बनावट बियाणे महाराष्ट्रात दाखल होत असतानाही मोठी कारवाई कृषी विभागाने केली आहे..
Beed News : बीडच्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक झालीय.. गावरान आणि लाल कांद्याची 50 हजार गोण्यांची विक्रमी आवक झाली असून कांदा उत्पादकांना झालेल्या लिलावात मालाच्या दर्जानुसार 800 ते 1200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.. मागील पंधरा दिवसांपासून झालेल्या पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने बाजार समितीत ही आवक वाढलीय.. कांद्याला दर देखील चांगला मिळत असल्याने शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले..
Beed News: बीड जिल्ह्यात मे महिन्यात झालेला पाऊस आष्टी तालुक्यात सर्वाधिक बरसला. परिणामी फळ बागायतदार शेतकरी आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय.. आष्टी तालुक्यातील फळबागा आणि कांद्याचे पीक आजही पाण्यात आहे.. मात्र याचे पंचनामे करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी फिरकले देखील नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय..
आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील शेतकरी राजकुमार चौधरी यांनी दोन एकरवर केळीची बाग आणि संत्र्याची बाग जोपासली होती. मात्र सध्या ही बाग पूर्णपणे पाण्यात आहे.. ही परिस्थिती केवळ याच शेतकऱ्याची नसून आष्टी तालुक्यातील बहुतांश फळ बागातदार शेतकऱ्यांची सारखीच आहे..
नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी शेतात यावे.. यासाठी शेतकरी प्रशासकीय पाठपुरावा करत आहेत.. मात्र फळबागेचे पंचनामे करण्यासाठी कोणतेही आदेश नसल्याचं उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळत आहे..
दरम्यान कृषी मंत्री कोकाटे यांनी केलेल्या विधानाबाबत संताप व्यक्त करत ढेकळाचे पंचनामे न करता किमान नुकसान झालेल्या पिकांबाबत मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत..
Beed News: बीड जिल्ह्यात मे महिन्यात झालेला पाऊस आष्टी तालुक्यात सर्वाधिक बरसला. परिणामी फळ बागायतदार शेतकरी आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय.. आष्टी तालुक्यातील फळबागा आणि कांद्याचे पीक आजही पाण्यात आहे.. मात्र याचे पंचनामे करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी फिरकले देखील नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय..
आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील शेतकरी राजकुमार चौधरी यांनी दोन एकरवर केळीची बाग आणि संत्र्याची बाग जोपासली होती. मात्र सध्या ही बाग पूर्णपणे पाण्यात आहे.. ही परिस्थिती केवळ याच शेतकऱ्याची नसून आष्टी तालुक्यातील बहुतांश फळ बागातदार शेतकऱ्यांची सारखीच आहे..
नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी शेतात यावे.. यासाठी शेतकरी प्रशासकीय पाठपुरावा करत आहेत.. मात्र फळबागेचे पंचनामे करण्यासाठी कोणतेही आदेश नसल्याचं उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळत आहे..
दरम्यान कृषी मंत्री कोकाटे यांनी केलेल्या विधानाबाबत संताप व्यक्त करत ढेकळाचे पंचनामे न करता किमान नुकसान झालेल्या पिकांबाबत मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत..
Beed News: बीड जिल्ह्यात मे महिन्यात झालेला पाऊस आष्टी तालुक्यात सर्वाधिक बरसला. परिणामी फळ बागायतदार शेतकरी आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय.. आष्टी तालुक्यातील फळबागा आणि कांद्याचे पीक आजही पाण्यात आहे.. मात्र याचे पंचनामे करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी फिरकले देखील नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय..
आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील शेतकरी राजकुमार चौधरी यांनी दोन एकरवर केळीची बाग आणि संत्र्याची बाग जोपासली होती. मात्र सध्या ही बाग पूर्णपणे पाण्यात आहे.. ही परिस्थिती केवळ याच शेतकऱ्याची नसून आष्टी तालुक्यातील बहुतांश फळ बागातदार शेतकऱ्यांची सारखीच आहे..
नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी शेतात यावे.. यासाठी शेतकरी प्रशासकीय पाठपुरावा करत आहेत.. मात्र फळबागेचे पंचनामे करण्यासाठी कोणतेही आदेश नसल्याचं उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळत आहे..
दरम्यान कृषी मंत्री कोकाटे यांनी केलेल्या विधानाबाबत संताप व्यक्त करत ढेकळाचे पंचनामे न करता किमान नुकसान झालेल्या पिकांबाबत मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत..
दोन वेगवेगळ्या विवाहसोहळा निमित्ताने नाशिकमधे आज नेत्यांची मांदियाळी
पुतण्याच्या विवाह सोहळा निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक मुक्कामी फडणवीस यांच्या सह दोन्ही परिवाराचे स्नेही असणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन ही मुक्कामी
-
राज्यपाल सी पी राधाकृष्णन ही फडणवीस यांच्या कुटुंबातील विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहणार
ठाकरे गटाचे महानगर प्रमुखच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये येणार
एकनाथ शिंदे दुपारी नाशिकमधे दाखल होणार
याच विवाह सोहळ्यासाठी खासदार संजय राऊत नाशिक मुक्कामी
ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदें यांच्या कन्याच्या विवाह सोहळा निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी , नेते एकत्र येणार
Maharashtra News: येत्या 8 दिवसांत राज्यासमोर येणार एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका
एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका काढण्याची केली होती मंत्र्यांनी घोषणा
स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सादर करणार श्वेतपत्रिका
पहिल्यांदा अशा प्रकारे काढली जाणार श्वेतपत्रिका, नेमकं श्वेतपत्रिकात काय असणार याकडे लक्ष
एसटी महामंडळाची स्थिती, तोटा आणि होणारे नुकसान कशामुळे याचा खुलासा होण्याची शक्यता
Solapur News: आजीसोबत चालत जात असताना दुचाकीने धडक दिल्याने सोलापुरात एका 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. शिवांशू ऊर्फ बंटू लक्ष्मीनारायण बोद्धूल असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. 31 मे रोजी दुपारी सोलापुरातल्या गेंट्याल चौक ते शास्त्री नगर रस्त्यावर हा अपघात झाला. जखमी अवस्थेत शिवांशू याला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी एका अद्यात महिला दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
शिवांशू हा आपल्या आजीसोबत रिक्षातून घराकडे जात होता. रिक्षा थांबल्यानंतर तो रस्ता क्रॉस करत होता, तेव्हा समोरून दोन मुली डबलशीट दुचाकीवर आल्या त्यांनी शिवांशूला जोरात धडक दिली. यात त्यांच्या डोक्यात जबर मार लागला. नागरिकांनी लगेच त्याला रिक्षात घालून ताबडतोब हॉस्पिटल येथे नेले. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू होता. त्या गोंडस बाळाचा उपचारादरम्यान झालाय. शिवांशूच्या मृत्यूच्या बातमीनंतर सोलापुरात हळहळ व्यक्त केली जातेय.
Chandrapur News: चंद्रपूर ते मोहर्ली व मोहर्ली ते चंद्रपूर अशी 40 आसनाची विशेष बस सेवा पर्यटकांच्या सेवेत वनविभागाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते या बसला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. ही बससेवा क्रुझर सफारी तिकीटचे बुकिंग आहे त्यांच्यासाठीच आहे. दरम्यान क्रुझरला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या दोन वर्षात 58 हजार पर्यटकांनी क्रुझर मधून ताडोबात जंगल सफारीचा आनंद लुटला आहे. ताडोबा सफारी करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी विशेष क्रूझर सफारी सुरु करण्यात आली आहे मात्र चंद्रपूर ते मोहर्ली हे अंतर गाठायसाठी सामान्य लोकांना मोठी आर्थिक झळ बसत होती. त्यामुळे वनविभागाच्या वतीने ही विशेष पिक अप आणि ड्रॉप सेवा सुरु करण्यात आली आहे.
Nanded News: अवकाळी पावसानं आता विश्रांती घेतल्याने शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त झालाय. खरिप हंगामासाठी शेतकरी युद्धपातळीवर मशागत करताना दिसतोय. गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नांदेड जिल्ह्यात तब्बल बाराशे एकर क्षेत्रावरच्या पिकांचे नुकसान झालेय. हाथासी आलेल्या ज्वारीच्या पिकाला शेतातच मोड फुटले आहेत. ज्वारीसोबतच पशूंच्या कडब्याचे देखील या अवकाळी पावसाने नुकसान झालेय. तर भाजीपाल्याच्या बागा या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात नष्ठ झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी केलेली भाजीपाल्याची लागवड नाहक वाया गेलीय. दरम्यान नांदेडमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात येणार आहेत.
RBI Repo Rate: येत्या बुधवारपासून आरबीआयच्या पतधोरणाची बैठक आयोजिक केली जाणार आहे. सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात होणार आहे. महागाई दर आटोक्यात आणि विकासदरात घट होण्याची शक्यता आहे. सलग तिसऱ्यांदा 25 बेसिस पाॅईंटनं रेपो रेट घटण्याची शक्यता अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. शुक्रवारी आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरण जाहीर करणार आहेत.
Accident News: खामगाव - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर नित्रुड गावाजवळ मध्यरात्री टेम्पो आणि ॲपे रिक्षाची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झालेत.मध्यरात्री 12 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झालाय.अपघातातील जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात मयत व जखमी हे सिरसाळा गावातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.गेल्या काही दिवसात या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रविवारी दुपारी याच महामार्गावर ट्रकने एका दुचाकी स्वाराला चिरडले होते.
Bhandara Accident: चारचाकी वाहनानं कुटुंबासह नागपूरकडं जाणाऱ्या परिवाराच्या वाहनाला समोरून आलेल्या भरधाव ट्रॅकनं जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चारचाकी वाहनातील पती - पत्नी आणि मुलगी असे तीन जण गंभीर जखमी झालेत. ही घटना नागपूर - कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील भंडाऱ्याच्या बायपासवर रात्री घडली. जखमींना तातडीनं उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अजय जयस्वाल (55), कविता अजय जयस्वाल (50) आणि सुहानी जयस्वाल (22) असं जखमींचं नावं आहे.
Dharashiv News: तुळजाभवानी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचा फायदा घेत काही अनधिकृत विक्रेते मंदिर परिसरात नियमबाह्य पद्धतीने पूजेसाठी लागणारे साहित्य विक्री करत असताना मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा विभागाने छापा टाकत कारवाई केली. यावेळी 21 पूजेचे ताट व फळ विक्रीचे कॅरेट जप्त केले . मंदिर संस्थाने अचानक केलेल्या कारवाईमुळे मंदिरातील अनधिकृत विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मंदिरात पूजेचे साहित्य नैवेद्य विक्री करणाऱ्या आठ ते दहा विक्रेता असून एका कॉलवर मंदिरात हवे त्या जागेवर पूजेचे साहित्य नैवेद्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. मंदिरात खुलेआम सुरू असलेल्या अनधिकृत विक्रीवर सातत्याने कारवाईची मागणी होत आहे.
Pune Politicle Updates: येत्या 9 जून रोजी शरद पवार आणि अजित पवार पुण्यात पुन्हा एकत्र येणार आहेत. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक येत्या 9 तारखेला पार पडणार आहेत. या बैठकीला राज्यातून सर्व साखर कारखान्याचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. साखरेच्या उत्पादनात AI तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीनं वापर करता येईल, याबाबत प्रत्यक्षिके दाखवली जाणार आहे. पायलट प्रोजेक्टबद्दल सुद्धा या कार्यक्रमातून साखर कारखान्याच्या मालकांना माहिती दिली जाणार आहे.
Jitendra Awhad On Waqf Board: वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड देशभर जनजागृती करत असून, त्याचाच भाग म्हणून भिवंडीत शांतीनगर येथे 'तहफ्फूज-ए-अवकाफ कॉन्फरन्स' सभेचे आयोजन भिवंडी शाखेच्या वतीने करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रमुख मौलाना महमूद अहमद खान होते. वक्फ मालमत्तांवर सरकारी हस्तक्षेप वाढवणाऱ्या विधेयकाचा या वेळी तीव्र निषेध करण्यात आला. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. सय्यद कासिम रसूल इलियास यांनी प्रमुख मार्गदर्शन केले, तर खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा, कळवा-मुंब्रा आमदार जितेंद्र आव्हाड, मालेगावचे आमदार मुफ्ती इस्माईल कासमी, भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख, मुंबईचे आमदार अमीन पटेल, मौलाना जहीर अब्बास रिजवी आणि मौलाना अब्दुल जब्बार महीरुल कादरी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. वक्त्यांनी वक्फ मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी समाजाने एकत्र येण्याचे आवाहन करत विधेयकाला विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला.
IPL 2025 Finals, RCB vs PBKS: पंजाब किंग्सनं क्वालिफायर टू सामन्यात मुंबई इंडियन्सचा पाच विकेट्सनी पराभव करून, दुसऱ्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली. मुंबईनं विजयासाठी दिलेलं 204 धावांचं आव्हान पंजाबनं सहा चेंडू राखून पार केलं. त्यामुळं यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब अशी फायनल पाहायला मिळेल. या दोन्ही संघांनी एकदाही आयपीएल जिंकलेली नाही, हे विशेष. कर्णधार श्रेयस अय्यरनं 41 चेंडूंत केलेली नाबाद 87 धावांची खेळी पंजाबच्या विजयात निर्णायक ठरली. श्रेयसनं निहाल वढेराच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी रचलेली 84 धावांची भागीदारी मोलाची ठरली. वढेरानं 48 धावांची खेळी उभारली. त्याआधी, या सामन्यात मुंबई इंडियन्सनं 20 षटकांत सहा बाद 203 धावांची मजल मारली होती. मुंबईकडून जॉनी बेअरस्टोनं 38, तिलक वर्मानं 44, सूर्यकुमार यादवनं 44 आणि नमन धीरनं 37 धावांची धडाकेबाज खेळी उभारली.
IPL 2025, MI vs PBKS: श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सनं यंदाच्या आयपीएल प्लेऑफ्समधला दुसरा क्वालिफायर सामना जिंकून स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अहमदाबादच्या मैदानात पंजाबनं माजी विजेत्या मुंबईचा 5 विकेट्सनी पराभव केला. या विजयासह पंजाबनं 2014 नंतर पुन्हा एकदा स्पर्धेची फायनल गाठली आहे. या सामन्यात मुंबई पंजाबसमोर विजयासाठी 204 धावांचं मोठं लक्ष्य उभं केलं होतं. पण श्रेयस अय्यरच्या वादळी खेळीच्या जोरावर पंजाबनं हे आव्हान सहा चेंडू राखून पार केलं. श्रेयसनं अवघ्या 41 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 87 धावा फटकावल्या. त्यानं नेहाल वढेरासह चौथ्या विकेटसाठी केलेली 84 धावांची भागीदारी निर्णायक ठरली. वढेरानं 48 तर जॉश इंग्लिसनं 38 धावांचं योगदान देत पंजाबच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याआधी मुंबई इंडियन्सनं 20 षटकांत सहा बाद 203 धावांची मजल मारली होती. मुंबईकडून जॉनी बेअरस्टोनं 38, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवनं प्रत्येकी 44 तर नमन धीरनं 37 धावांची खेळी केली होती. दरम्यान 3 जूनला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब संघात विजेतेपदासाठी लढत होईल. महत्वाचं म्हणजे आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात या दोन्ही संघानी ही स्पर्धा एकदाही जिंकलेली नाही. त्यामुळे यंदाच्या मोसमात पंजाब किंवा बंगळुरुच्या रुपानं आयपीएलला नवा विजेता मिळणार आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...