Maharashtra Breaking LIVE: 'लाडक्या सूनेचं रक्षण, हेच शिवसेनेचं वचन' मोहीम सुरू, सासरी छळ होणाऱ्यांच्या मदतीला धावणार : एकनाथ शिंदे
Maharashtra LIVE Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यातील पावसाचे अपडेट्स मिळवा एका क्लिकवर.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking Live Updates: या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेतला जातो... तुम्हाला सर्व अपडेट्स फक्त एका क्लिकवर मिळतील... बारामतीतील PDCC बँक रात्री अकरा वाजता उघडी; अजितदादांचे पीए, भरणेंचे सहकारी...More
यापुढे राज्यात सूनांचा छळ होणार नाही. त्यांच्या रक्षणासाठी शिवसेनेने 'लाडक्या सूनेचं रक्षण, हेच शिवसेनेचं वचन' ही मोहीम सुरू केली आहे. ज्या ठिकाणी सूनांचा छळ होईल त्या ठिकाणी आमच्या रणरागिणी धावून जातील. शिवसेनेच्या शाखा लाडक्या सूनांसाठी हक्काचं ठिकाण असेल.
राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा यांचा जीव बीएमसीच्या तिजोरीत आहे. सध्या मुंबईचा लढा कॅम्पेन सुरू केलं आहे. हा लढा आता आठवला, सत्तेत असताना काय केलं? लढायला घराबाहेर तर पडायला हवं. घरात बसून काही होत नाही. आता जे काही घरातून बाहेर पडत आहात त्या मागे एकनाथ शिंदे आहे. मुंबई महाराष्ट्राची आहे आणि कुणाचा बाप जरी आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून कुणी तोडू शकणार नाही.
'कम ऑन किल मी' असं उद्धव ठाकरे म्हणाले. अरे मेलेल्यांना कोण मारणार? महाराष्ट्राच्या जनतेने यांचा मुडदा आधीच पाडला आहे. पण नुसताच शोर करून मनगटात जोर येत नाही. वाघाचं कातडं पांघरून लांडग्याला वाघ होता येत नाही. नुसता तोंडाच्या वाफा सोडून उपयोग नाही, मनगटात दम असावा लागतो. आमच्या नादाला लागू नका तुम्ही. तुम्हाला तीन वर्षांपूर्वी दाखवलंय.
- मराठी माणसच्या नावानं खोटे गळे काढतील.
- बाळासाहेबांनंतर तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं.
- तुमच्या नाकर्तेपणामुळं मराठी माणूस बाहेर फेकला गेला.
- हे तुमचं पाप आहे.
आता यांना मराठी माणूस आठवेल. मराठी माणसाच्या नावाने खोटे गळे काढतील. यांच्यामुळे मराठी माणूस मुंबईबाहेर गेला. बदलापूरच्या बाहेर गेला.
- बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला विरोध केला त्याच्या दावणीला सत्तसाठी कोणाला बांधलं
- सत्तेसाठी लाचारी पत्करली
- बाळासाहेबांचा त्यांच्या विचाराचा विश्वास घात केला
- मराठी माणसाचा,हिंदुत्वाचा विश्वास घात केला
- सरडाही रंग बदलतो मात्र इतक्या वेगानेही रंग बदलणारा सरडा देशाने पहिल्यांदा बघितला
- मुख्यमंत्री पदासाठी झाले लाचार ते काय नेणार पुढे बाळासाहेबांचा विचार
- वारसदार म्हणणाऱ्यांनी लाचारी पत्करली
बाळासाहेबांच्या विचारांचा आणि शिवसेनेचा विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केला. सरडाही रंग बदलतो, पण यांच्या इतके लवकर नाही. बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार गमावला, पण हिंदुत्व सोडलं नाही. पण त्यांचे वारसदार म्हणवणारे सत्तेसाठी लाचार झाले. बाळासाहेब असते तर यांना उलटं टांगून खालून मिर्चीचा धूर दिला असता.
- 59वर्षात अनेक आवाहनांना शिवसेनेला सामोरे जावं लागलं
- देशात आज बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना फोफावतेय
- 7 राज्यातील पदाधिकारी मला भेटले इतर राज्यातील नेतेही शिवसेनेत येऊ इच्छित आहेत
- विधानसभेच्या 3 निवडणुकात काय झालं
- 282 जागा लढवल्या 63 जागा जिंकल्या
- 2019 मध्ये 124 जागा लढवल्या 54 जागा जिंकल्या
- 2024 ला 80 जागा लढवल्या 60 जागा जिंकल्या
- उबाठाने 85 जागा लढवल्या 20 जिंकल्या
- आपल्या पक्षाच्या 1/3 मतंही मिळाली नाहीत
- महाराष्ट्राच्या जनतेने त्याना थड दिला
आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे. आपण बाळासाहेबांचा विचार जिवापाड जपलं. त्यामुळेच शिवसेनेची घोडदौड जोरात सुरू आहे.
- आपल्या शिवसनेचा ५९ वा वर्धापन दिन
- आज दुसराही कुठेतरी मेळावा सुरूआहे
- मात्र हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे
- दुसरा सत्तेसाठीच्या लाचारांचा आहे
- अस्सल शिवसेना आपली आहे धनुष्यबाण आणि जनतेचा आशीर्वाद आपल्याकडे आहे
तुमच हिंदुत्व काय आहे हे भाजपला मला विचारायचे आहे. सिंदूर वाटणाऱ्या त्या भाजप नेत्याला चाबकाने फोडायला हवे. कर्नल कुरेशी यांना पाकिस्तानची बहीण म्हणतो. अशा अवलादी भाजपच्या आहेत.
ट्रम्प फोन आल्यानंतर यांचा आवाज गेला. वॉर रुखवा दी पापा. चार अतिरेकी आत आले कसे? संरक्षण मंत्री, गृहमंत्री गेले कुठे? पातळात गेले, आकाशात गेले की भाजपमध्ये गेले? आता केवळ दाऊदला पक्षात घायच बाकी आहे. भाजपने जेलच्या बाहेर सदस्य नोंदणीसाठी स्टॉल टाकले आहेत
आधी भ्रष्टचाराचे आरोप केले, एसआयटी लाऊ म्हणाले. आता कुठे गेली एसआयटी… एसटीत गेली की काय?
विधानसभेला त्यांनी बटेंगे तो कटेंगे नारा दिला, हिंदू-मुस्लिम केलं. आता हिंदू-हिंदू मध्ये मारामाऱ्या होतील अशी परिस्थितीत यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाडक्या सूनेचं रक्षण, शिवसेनेचे वचन याचा लोगो लाॅन्च करण्यात आला आहे. हुंडामुक्त महाराष्ट्रासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
गुलाबराव पाटील
- कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे आहेत त्यामुळे सर्वांची नावे घेत नाही
- ४० वर्षापासून वर्धापन दिनाला उपस्थित राहतोय
- वर्धापन दिन हा सभेपूरता नसतो तर भविष्याची रचना असते
- ४ महिन्यात लोकसभेच्या १७ जागा जिंकल्या त्याच ठिकाळी विधानसभा २०० च्यावर जिंकलो
- नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत शिंदेसाहेबांच्या भाषणाची आतुरतेने वाट बघत आहेत
- माझा पिवर माल आहे संजय राऊत त्यावर ताई बोलून झाल्या
- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज ठाकरेसोबत युतीचा प्रस्ताव दिला
- तेव्हा हाच संजय राऊत संपलेला पक्ष बोलले होते आता बोलतो आयलव्हयू
- आम्ही शिंदेंसोबत आयोध्येला गेलो
- एका खोलीत गट करून बाहेर पडूया
- संजय राऊत तेव्हा बोलले हा पक्ष हायजॅक करूयात
आमचे शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूरचे मेसेज घेऊन गेलो होता. आम्ही कोणत्याही प्रकारचे शॉपिंग करण्यासाठी गेलो नव्हतो असे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. माझ्या मतदारांमुळं मला ही संधी मिळाल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले. मी विचार कधी केला नव्हता की देशाची बाजू मांडण्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर मला संधी मिळेल असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही सर्वजन गेलेल्या दौऱ्यावर लक्ष होते. आमच्या शिष्टमंडळाने मला भाऊ म्हणून नाव दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मला भाऊ म्हणाले. तसेच चांगल काम केल्याचे शाब्बासकी देखील त्यांनी दिल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले.
इस्लामिल राष्ट्रांनी पाकिस्तानला पाठिंबा देऊ नये म्हणून आमचा दौरा होता. मौजमजा करण्यासाठी आमचा दौरा नव्हता असेही खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे महाराष्ट्राचे असीम मुनीर असल्याचे मह्टले आहे. असीम मुनीर हे पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची आर्थिक प्रगती होत असल्याचे मत खासदार मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले.
कार्यकर्त्यांच्या आणि राज्याच्या मनात जे आहे तेच मी करणार. पण हे होऊ नये म्हणून यांच्या मालकाचे लोक इकडे तिकडे, हॉटेलमध्ये भेटी घेत आहेत. मुंबई पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर यांच्या मालकाचे काय होणार? मुंबईत मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून हे प्रयत्न करत आहेत. मुंबई आम्हचीच. ठाकरे ब्रँड संपवायला गेला तर तुमचे नामोनिशाण ठेवणार नाही.
उंची पेग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा, डोळे कुणासारखे ते माहिती नाही. अरे तुझा जीव किती, तू बोलतो किती? तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय? एक कुणीतरी बाप ठरवं आणि मग बोल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली.
संजय राऊत आणि असीम मुनीरला कोणीही गांभीर्यान घेत नसल्याची टीका खासदार मिलिंद देवरा यांनी केली आहे.
जेव्हापासून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले, तेव्हापासून प्रत्येक हल्ल्याला त्यांनी प्रतित्युत्तर दिल्याचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. मागच्या काळात असे कधी होत नव्हते असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसवर टीका केली.
आपल्याला भांडून चालणार नाही. मुंबईत हिंदू- हिंदूमध्ये मारामाऱ्या लावायच्या, हिंदी सक्ती करायची असेल तर देवेंद्र करुन बघा, ज्या हिंदी लोकांना 1993 मध्ये वाचवलं, त्यांना आपल्या विरुद्ध उभं करतात. हिंदी सक्तीवरुन मुंबईत मराठी अमराठी वाद लावायचा आणि ते भ्रष्टाचार करायला मोकळे
हिंदी सक्तीचा करण्याची गरज काय? हिंदीला आमचा विरोध नाही, पण हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर मराठी आणि अमराठीमध्ये भांडण लावण्याचा कार्यक्रम भाजपने केला. म्हणजे हे भ्रष्टाचार करायला मोकळे.
आतापर्यंत त्यांनी जे वादे केले होते ते फसवे केले होते. निवडणुकीत त्यांनी जनतेशी वादा यांनी पाळला नाही. मग मला केलेला वादा, अडीच वर्षाचा मुख्यमंत्रिपदाचा तो तरी यांनी कसा पाळला असता. हे पणवती सरकार आहे. आम्ही इंडिया आघाडी स्थापन केली त्यावेळी इंडियन मुजाहिद्दीन सोबत तुलना करताना तुम्हाला लाज वाटली नाही. देशद्रोह्यांसोबत आमची तुलना करता आणि तुम्ही काय केले ते सांगायला आमचेच खासदार जगभर पाठवता.
आज आपल्या देशाला पंतप्रधानाची गरज आहे. आज भाजपचा पंतप्रधान आहे. देशाला गृहमंत्र्याची गरज आहे, घरफोड्या अमित शाहांची नाही. आज देशाला संरक्षण मंत्र्याची गरज आहे, गुंडांना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची नाही.
ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर आपल्या देशाचा मेसेज जगापर्यंत पोहोचवण्यासाठी शिष्टमंडळ नेमलं. त्याचा मला एक भागा होता आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यातील सर्वात मोठी संधी दिल्याचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्यासपीठावर आगमन झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आजच्या या वर्धापन सोहळ्याला सुरुवात झाली.
भारतीय सैन्य आक्रमक असताना, विजयाच्या उंबरठ्यावर असताना अचानक अमेरिकेचा फोन येतो आणि नरेंद्र मोदींनी माघार घेतली. त्याच ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना जेवायला बोलावतात आणि आय लव्ह यू पाकिस्तान म्हणतात. हे नरेंद्र मोदी यांचे मित्र आहेत. आणि हे मोदी आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवतात?
आज कोणताही मनोरंजनाचा कार्यक्रम नाही तर फक्त विचार देण्याचा कार्यक्रम आहे. मनोरंजनाची जबाबदारी सरकारने घेतली आहे. रोज काहीतरी नवीन देत आहेत. कुणीतरी एक मंत्री अघोरी विद्या करताना व्हिडीओ आला. हा हॉरर सिनेमा आपण पाहिला. या चित्रपटाचे निर्माते यांचाही कार्यक्रम सुरू आहे.
60 वर्षांच्या शिवसेनेला सातत्याने बाळासाहेबांनी एक कार्यक्रम दिला आणि तो म्हणजे या राज्याचा विचार देण्याचा असं संजय राऊत म्हणाले. त्यामुळे हम किसी से कम नही हे निश्चित.
यांचा पक्ष स्थापन झाला गुजरातमध्ये, अमित शाह यांचे पक्षप्रमुख, मग बाळासाहेबांचा फोटो का लावता? असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला.
सोलापूर : तुळजापुर ड्रग्ज तस्करी प्रकरणात सोलापूरातून आणखी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींची संख्या 38 वर पोहचली आहे. राजू उर्फ पिट्टा काशीनाथ सुर्वे या आरोपीला तामलवाडी पोलिसांनी सोलापूरातून अटक केली आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना सोलापुरातून अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींची संख्या 38 झाली असुन आतापर्यंत 22 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 16 जण अद्याप फरार आहेत.
नाशिक : गोदावरी नदीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. भांडी बाजार परिसरात पुराचे पाणी शिरले असून, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने भांडी बाजार परिसरात असलेल्या अनेक दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. व्यापाऱ्यांनी तातडीने आपले साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. अनेक दुकाने अर्धवट बंद करून सामान बाहेर काढले जात आहे. पुराच्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली आहे.
शहापूर : तालुक्यातील विहिगाव दऱ्याची वाडी येथील नागरिक अजून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहापूर तालुक्यातील गावपाड्यातील नदी नाल्यांना पुराचे स्वरूप आले आहे. त्यातच दऱ्याची वाडी येथील शाळकरी व अंगणवाडी विद्यार्थ्यांना केटी बंदरावरून प्रवास करावा लागतो. मुसळधार पावसामुळे येथील केटी बंधाऱ्यावरून ओसंडून पाणी वाहत आहे. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा या बंधाऱ्यावरून जीव मुठीत धरून प्रवास सुरू आहे. या ठिकाणी लवकरात लवकर एक साकव मंजूर करण्यात यावा व त्याचे काम हे लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
मुंब्रा रेल्वे अपघातात ज्युपिटर रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये दोन जणांपैकी अनिल मोरे यांचा उपचारदरम्यान मृत्यू....
डोक्याला मोठा मार लागला होता....
14 पैकी आतापर्यंत पाच जणांचा मुंब्रा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे
कळवा रुग्णालयात एक जण उपचार घेत आहे
तसेच जे जे रुग्णांमध्ये देखील एक आणि जुपिटर रुग्णांमध्ये देखील एक जण सध्या उपचार घेत आहे इतरांना उपचार करून सोडून देण्यात आले आहे....
पाटण,सातारा
पाटण तालुक्यात जानुगडेवाडी येथे एसटी बसचा अपघात..
समोरून येणाऱ्या ट्रॅव्हलला वाचवताना चालकाचा ताबा सुटून एसटी बस झाडाला धडकली..
एसटी बसमधील विद्यार्थ्यांसह 30 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती..
जानूगडेवाडी नजीक एका धोकादायक वळणावर हा अपघात झाला आहे..
एसटी बस च्या अपघातामध्ये शालेय विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती.
अपघातातील चार जण गंभीर जखमी असल्याने त्यांना कराड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे....
- इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग
-
- दारणा धरण 50 टक्के भरल्याने आज दुपारी 3 वाजता धरणातून केला जाणार पाण्याचा विसर्ग
- गेल्या दोन ते तीन दिवसांपासून इगतपुरी परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ
- दारणाच्या पॉवर हाऊस मधून 1100 क्युसेक पाण्याचा होणार विसर्ग
*दारणा नदी परिसरात राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा
- काल रात्रीपासून नाशिकसह त्रंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी परिसरात सुरू आहे पावसाचा जोर
ब्रेकिंग
मुंबईला अलर्ट जारी करताना भारतीय हवामान विभागाचा सावळा गोंधळ
मागील ६ तासात ३ वेळा मुंबईचा अलर्ट बदलला
सकाळी ६ः३० वाजता बुलेटिन जारी करत आजसाठी दिला होता आॅरेंज अलर्ट
मात्र, तो पुन्हा १२ः३४ मिनिटांनी डिग्रेड करत यलो अलर्ट करण्यात आला
आता, पुन्हा एकदा दुपारी १ वाजून ०३ मिनिटांनी अलर्ट बदलवत आॅरेंज अलर्ट जारी
मुंबई आणि उपनगरात पुढील २४ तासात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून जारी
मुंबई आर्थिक राजधानी असतानाही हवामान विभागाकडून अलर्ट संदर्भात गांभीर्य नाही
इम्तियाज जलील टिक टॅक
मी संजय शिरसाठ यांच्यावर बिन बुडाचे आरोप केलेले नाहीत मी सगळे डॉक्युमेंट्स दाखवलेले आहेत
फक्त जमीन हडपण्याचा प्रकरण नाही अनेक प्रकरण आहेत
एवढे सगळे नियम डावडून मंत्र्यांसाठी किती तुम्ही फायदा करून देत आहात?
व्हिट्स हॉटेलचं प्रकरण आहे एमआयडीसी च प्रकरण आहे एमआयडीसी च आरक्षित जमीन असताना ती अनारक्षित करून त्यांच्या मुलाच्या नावाने केली
कुठल्याही प्रकारची जाहिरात या संदर्भात आली नव्हती...
सरकार म्हणत आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहोत मात्र जी भ्रष्टाचार होत आहे त्यावर ती काहीच करत नाही... त्यामुळे आता आम्ही सीबीआय कडे आलो आहोत
यानंतर डीजी अँटी करप्शन ला सुद्धा मी भेटणार आहे आणि हे सगळे डॉक्युमेंट्स देणार आहे
मी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना दोन वेळेस विनंती करून भेटीची वेळ मागितली होती... हे सगळे डॉक्युमेंट्स मला सुद्धा द्यायचे आहेत
त्यांनी मला वेळ दिला नाही बहुतेक त्यांना सरकार चालवायचा आहे त्यांना सत्ता टिकवायची आहे म्हणून मला वेळ दिला नाही
अब्रू नुकसानीचा दावा करण्याची मी वाट बघत होतो... मी कोर्टात जाणार होतो आता माझ्यासाठी सोप झाला आहे... आता ते कोर्टात गेले... वेळ काढू पण ते आता करतील मी सगळं कोर्टात सगळे सिद्ध करेल
100% सगळे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत
पुणे- बंगळुरू महामार्गावरील सांगली फाटा ते उचगाव त्याचबरोबर तावडे हॉटेल ते शिवाजी पूल आणि दाभोळकर कॉर्नर ते परिख पूल या तीन उड्डाणपूलांचे प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवण्यात आले आहेत...त्याचबरोबर पंचगंगा नदीवरील बास्केट ब्रिज आणि कागल शहरातील उड्डाणकुलाचाही प्रस्तावामध्ये समावेश करण्यात आला आहे....कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्याने याबाबत माहिती सांगितली आहे...सांगली फाटा ते उचगाव या मार्गावर भराव टाकून रस्ता उंच करण्यात येणार होता, मात्र सध्याच्या भरावामुळे कोल्हापूर शहराला पुराचा धोका निर्माण होतो.. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल करावा अशी मागणी करण्यात आली.. ती मागणी मान्य झाल्यानंतर पुन्हा डीपीआर तयार करण्यात आला... याच बैठकीमध्ये दाभोळकर कॉर्नर ते परिख पूल मार्गावरील उड्डाणपुलाची ही सूचना करण्यात आली होती... त्यानुसार त्या पुलाचा देखील प्रस्ताव तयार करण्यात आला आहे... त्यामुळे कोल्हापूर शहरात येताना वाहतुकीची कोणतीच समस्या निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न केला जात आहे... केंद्र सरकार याला लवकरच मान्यता देईल अशी कोल्हापूरकरांना आशा आहे...
मुंबईचा आॅरेंज अलर्ट डिग्रेड करत पुन्हा यलो अलर्ट जारी
पुढील २४ तासात मुंबईत साधारण ७० मिमीपर्यंत पावसाची नोंद होण्याचा अंदाज
मात्र, उद्यासाठी मुंबईत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज
उद्या मुंबईसाठी आॅरेंज अलर्ट
कोकणात मुंबई आणि सिंधुदुर्ग सोडता इतर जिल्ह्यांना आॅरेंज अलर्ट
मुंबई आणि सिंधुदुर्गासाठी यलो अलर्ट जारी
मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
रायगड, ठाणे, पालघर आणि रत्नागिरीत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
सातारा आणि पुण्यातील घाट परिसरात देखील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, आॅरेंज अलर्ट जारी
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन
अंबादास दानवे ऑन भरत गोगावले पूजा
पूजा करून काही होतं नाही त्यासाठी मन स्वच्छ असायला हव. पूजा करून मंत्री होता आल असतं तर मग आमदारांची गरजच पडली नसती.
ऑन शिंदे पोस्टर बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे नाहीत
त्याठिकाणी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो लावायचा ते विसरले असावेत म्हणून हे फोटो गायब आहेत
ऑन वर्धापनदिन सोहळा
शिवसेना प्रमुखांचा आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व घेऊन येणाऱ्या महापालिका निवडणुकांना सामोरे जायच आहे. कोणती खुर्ची मिळवण्यासाठी नाही. हे मी शिवसैनिकांना सांगू इच्छितो. निष्ठावंताचा हा मेळावा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला विचार घेऊन पुढे जात आहोत. मधल्या काळात मोठी गद्दारी पक्षात झाली. परंतु मराठी लोकांसाठीचा आमचा लढा सुरूच आहे. ५९ वर्धापन दिन साजरा होत असताना संयक निष्ठा आपण ठेवली तर येणारा काळ उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचाच असेल
उदय सामंत मनसे बोलनी सुरू आहे
उदय सामंत शिंदे बरोबर राहतात का हाच प्रश्न आहे. मागच्या काळातील घडामोडी बघितल्या तर उदय सामंत भाजप साठी काम करतात की एकनाथ शिंदेंसाठी काम करतात हे तुम्हाला लक्षात येईल.
मुंबईत पुन्हा ठाकरेंच्या आणखी दोन शिलेदारांनी सोडली ठाकरेंची साथ
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता पक्षप्रवेशाची मालिका सुरूच
मुंबईतील ठाकरेंच्या सेनेतील माजी नगरसेवक अजित भंडारी आणि शाखाप्रमुख संजय जंगम शिंदेंच्या सेनेत करणार प्रवेश
विशेष म्हणजे माजी नगरसेवक अजित भंडारी काल झालेल्या मातोश्री वरील माजी नगरसेवकांच्या बैठकीला होते उपस्थित
शिवसेनेच्या वर्धापन दिना दिवशी ठाकरेंना शिंदे यांचा धक्का
खडकवासला धरण, ता. हवेली, जि. पुणे
*दि. 19/06/2025
आज दि. 19/06/2025 रोजी धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज ठीक दुपारी . 1.00 वा. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 1920 क्युसेक ने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी.सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. माहिती साठी सविनय सादर.
उपविभागीय अभियंता
खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प
Sangli: 24 तासात 99 मिलिमीटर पावसाची नोंद : सांगलीतील चांदोली धरण परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी झालीये. 24 तासात 99 मिलिमीटर पाऊस पडलाय. चांदोली परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाल्यामुळे चांदोली करण्यात 11 हजार 939 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे चांदोली धरणात झपाट्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. चांदोलीत 17.15 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून धरण 49.84 टक्के भरलेय. त्यामुळे चांदोली धरणातून 1 हजार 219 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पुढील चार दिवस असणार जिल्ह्यात मुक्काम
Ac - संत श्रेष्ठ गजानन महाराजांचे पालखीचे आगमन आज बीड जिल्ह्यात झाले असून पुढील चार दिवस पालखीचा मुक्काम बीड जिल्ह्यात असणार आहे.यंदा गजानन महाराजांच्या दिंडीचे हे 56 वे वर्ष असून दिंडीत सातशे वारकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे.परभणी जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात प्रवेश करताना दादाहरी वडगाव जवळच भाविकांनी गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी भाविक दाखल झालेत
सोलापूर ब्रेकिंग
---
अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी आलं ठेवण्यात
मारुती चितमपल्ली यांचं काल रात्री वृद्धकाळामुळे झालं होतं निधन..
माजी आमदार नरस्सया आडम, सोलापूर पोलीस अधिकाऱ्यांसह असंख्य नागरिकांनी मारुती चितमपल्ली यांना श्रद्धांजली वाहत पुष्प अर्पण केले..
माजी आमदार नरस्सया अडम यांनी मारुती चितमपल्ली यांच्या आठवणींना उजाळा दिला..
अरण्यऋषी, पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्यावर आज होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..
सोलापुरातील मनिधारी एम्पायर सोसायटीपासून ते रूपा भवानी मंदिराजवळील हिंदू स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा दुपारी एक वाजता घरापासून निघणार
Vasai: वसईच्या नवघर पूर्वेकडील औद्योगिक वसाहतीत एका गाळ्यात मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीहि जीवीतहानी झाली नसली तरी गाळ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
वसई पुर्वेकडे औद्योगिक वसाहत आहे.या वसाहतीत मनीष इंडस्ट्री नंबर १ मधील पहिल्या मजल्यावरील गाळा नंबर ११४ मध्ये सकाळी ८:३० च्या सुमारास अचानक एक मोठा धमाका झाला.प्रथमदर्शनी वातानुकूलित यंत्रणेत हा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की गाळाच्या ग्रील,सज्जे उडून शेजारील दुस-या इमारतीवर वर जाऊन धडकले.शेजारील ११३ नंबर तसेच इतर गाळ्यांचे ही अतोनात नुकसान झाले आहे.याबाबतची खबर मिळताच पालीका अग्निशमन दल, रुग्णवाहिका, महावीतरण तसेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले ठाण्यात तक्रार दाखल केली.
या घटनेत एकजण जखमी झाला असून, पाच जणांना वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.घटनेची माहिती कळताच शिवसेना शाखा प्रमुख गणेश पाटकर यांनी सहका-यांसह घटनास्थळी धाव घेतली .
सदर इंडस्ट्री इस्टेट इमारत हि धोकादायक बनली आहे .सज्जे,स्लॅब, भिंती देखील हलल्या आहेत ज्या कोसळण्याची पूर्ण शक्यता आहे.याबाबत महिला जिल्हा संघटक किरण चेंदवणकर यांनी घटनास्थळी भेट देत परीस्थीतीची पहाणी केली .
Maharashtra Political Updates: कुठल्या शिवसेनेला राज ठाकरे देणार टाळी?
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पडद्यामागून अनेक राजकिय खलबतं..
ठाकरे बंधु एकत्र येण्याची चर्चा आणि बॅनरबाजी जोर धरत असताना शिंदेंच्या शिवसेनेकडूनही युतीसाठी होत आहेत विशेष प्रयत्न.
शिवसेना मनसे युतीबाबत मंत्री उदय सामंतांकडून विशेष प्रयत्न सुरू असून चर्चा अंतिम टप्यात असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती
हि चर्चा पूर्णत्वाला नेहण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंना लवकरच स्नेहभोजनासाठी निमंत्रण पाठवले जाणार असल्याचीही माहीती मिळत आहे
त्यामुळे ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना पून्हा पूर्णविराम मिळणार ?
उबाठा आणि मनसेच्या पदाधिकार्यांमध्ये जरी दोन्ही भाऊ एकत्र येण्याबाबतची इच्छा असली तरी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये तसा उत्साह नसल्याची माहिती सूत्रांनी दिली
त्यामुळे मनसे पुढे दोन्ही शिवसेनेचे पर्याय असताना, मनसे दोघांपैकी एकासोबत युती करणार की ''एकला चलो रे'' ची भूमिका स्विकारतात हे पाहणं महत्वाचे राहणार
Palghar Rain Updates: पालघर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार सुरूच
सध्या पाऊस थोडासा हलका झाला असला तरी पावसाचा जोर कायम असून अधून मधून मुसळधार तरी बरसात आहेत.
तर हवामान खात्याकडून येत्या तीन तासात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Political Updates: शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेला सोबत घेण्याच्या जोरदार हालचाली सुरू
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना शिंदेंकडूनही मनसेला सोबत घेण्यासाठी प्रयत्न
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पडद्यामागून अनेक राजकिय खलबतं..
ठाकरे बंधु एकत्र येण्याची चर्चा आणि बॅनरबाजी जोर धरत असताना शिंदेंच्या शिवसेनेकडूनही युतीसाठी होत आहेत विशेष प्रयत्न.
शिवसेना मनसे युतीबाबत मंत्री उदय सामंतांकडून विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती
हि चर्चा पूर्णत्वाला नेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंना लवकरच स्नेहभोजनासाठी निमंत्रण पाठवले जाणार असल्याचीही माहीती मिळत आहे
त्यामुळे मनसे पुढे दोन्ही शिवसेनेचे पर्याय असताना, मनसे दोघांपैकी एकासोबत युती करणार की ''एकला चलो रे'' ची भूमिका स्विकारतात हे पाहणं महत्वाचे राहणार
Mumbai Rain Updates: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मागील 24 तासांत मुसळधार पाऊस
वैतरणा आणि तानसामध्ये अतिवृष्टीची नोंद, वैतरणा धरण क्षेत्रात 235 मिमी इतका तर तानसामध्ये 218 मिमी पावसाची नोंद
भातसा परिसरात देखील 141 मिमी पावसाची नोंद, मध्य वैतरणात 170 मिमी पाऊस
मागील 24 तासात घाट परिसरात अतिवृष्टी
ताम्हिणी घाटात अतिवृष्टी, 230 मिमी इतक्या पावसाची नोंद
मागील 24 तासात लोणावळ्यात 187 मिमी पाऊस
भिवपुरी, डुंगरवाडी, दावडी, अंबोणे येथे मागील 24 तासांत अतिवृष्टी
Aashadhi Wari 2025: तुकाराम महाराजांच्या पालखीने काल पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केल्यानंतर आज रात्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीतून प्रस्थान होणार आहे. ज्ञानोबा माऊलींची पालखी आज रात्री आठ वाजता आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करेल. माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली आहे.
Mumbai Rain Updates: मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. अशातच पावसाचा परिणाम लोकल वाहतुकीवरही झाला आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक मंदावली आहे. पावसामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे.
Monsoon Updates: पावसाळ्यात बहरणाऱ्या निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी काही पर्यटक आपल्या स्वतःची परवा न करता नको त्या थरापर्यंत पोहोचतात. त्यामुळे यंदा पर्यटकांची खबरदारी म्हणून माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधबा"सिक्रेट पॉईंट" व "ताम्हिणी घाट"बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन कडून घेण्यात आला आहे. वरील भागांमध्ये अनेक तरुण बेधुंद होऊन जातात आणि यामध्ये त्यांचा प्राण जातो हीच बाब टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून या तीनही स्थळांवर 30 सप्टेंबर पर्यंत जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
Mumbai Rain Updates: मुंबई आणि उपनगरमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. पुढील तीन ते चार तास मुंबई आणि परिसरात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालीय. मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मि उशिराने सुरू आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालीय. नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाण्यातही रात्रीपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईकरांनो सावधान, पाऊसमान बघूनच घरातून बाहेर पडा.
Maharashtra Politics: ठाकरेंची शिवसेना आगामी महापालिका निवडणुकीसाठी आपला प्रचाराचा नारळ आज षण्मुखानंद सभागृहातून फोडेल. पक्षफुटीनंतरचा हा तिसरा वर्धापनदिन मेळावा. उद्धव ठाकरे षण्मुखानंद सभागृहातून आज शिवसैनिकांना मनपा निवडणुकीचा मंत्र देतील. राज ठाकरेंच्या मनसेसोबतच्या युतीवर ते आज महत्त्वपूर्ण भाष्य करण्याची दाट शक्यता आहे. काल माजी नगरसेवकांच्या बैठकीत त्यांनी या युतीबाबत सकारात्मक भाष्य करत महत्त्वाचे संकेत दिले होते. आता आज ते पुन्हा या विषयावर काय बोलतात याची तमाम महाराष्ट्राला उत्सुकता आहे. दुसरीकडे शिंदे, फडणवीसांसह महायुतीवर उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून कोणते आसूड ओढतात याचीही उत्सुकता आहे.
Shiv Sena Vardhapan Din: शिवसेनेचा आज 59 वा वर्धापन दिन. मात्र शिवसेनेत उभी फूट पडल्यावर दोन्ही शिवसेना दोन वर्धापनदिन साजरे करतात. ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुंबईत सायनच्या षण्मुखानंद सभागृहात वर्धापनदिन साजरा होत आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचा वरळी डोम इथे मेळावा होत आहे. दोन्ही शिवसेना आज खऱ्या अर्थाने मनपा निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडतील. महापालिका निवडणुकांना कसं सामोरं जायचं याचं मार्गदर्शन शिंदे आणि ठाकरे आपापल्या शिवसैनिकांना करतील.
Mumbai Rain Updates: मुंबईमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता, सध्या अधून मधून पावसाचा जोर वाढत आहे. तर, ठाण्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, आता सुद्धा पावसाची संततधार सुरु आहे. पश्चिम उपनगरात सध्या पाऊस अगदीच रिमझिम आहे. पावसाचा जोर वाढू शकतो. कल्याण डोंबिवली भागात सुद्धा अधून मधून मुसळधार सरी कोसळत आहेत मात्र सध्या सध्या मोठा पाऊस नाही.
Shiv Sena Anniversary: मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत मोजके नेते उरले आहेत. त्यातले किती नेते. आणखी किती दिवस सोबत राहतील; याची कोणतीही खात्री; कोणीही देऊ शकत नसेल. अशा स्थितीत उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. 55 पैकी 49 माजी नगरसेवक हजर झाले तर 6 जण पक्षाची परवानगी घेऊन गैरहजर राहिले. पक्षाची सध्याची अवस्था, संभाव्य गळती, युतीच्या चर्चा, शिवसेना वर्धापनदिनाच्या तयारीचा आढावा अशा विविध विषयांचा उहापोह झाला
Hindi Lamguage Complation In Schools: शाळा सुरू होताच हिंदीवरून राज्यात पुन्हा एकदा संघर्ष पेटलाय. पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याचा जीआर राज्य सरकारनं तीव्र विरोधामुळे मागे घेतला होता. पण आता नवा जीआर काढलाय. त्यात हिंदी सक्तीची नसली तरी पहिलीपासून त्रिभाषा सूत्र राबवण्यात आलंय. त्यामुळे मागच्या दारानं हिंदी सक्तीची केल्याचा आरोप केला जातोय. याविरोधात राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारला संघर्षाचा इशारा दिलाय. हिंदीविरोधात मनसे कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर उतरलेत.
Hindi Language Competition In Schools: हिंदीवरून राजकारण सुरू झालं असलं तरी खरा मुद्दा आहे तो पहिलीपासून त्रिभाषा सूत्राचा. सरकारनं नव्या शैक्षणिक धोरणावर बोट ठेवत शाळांमध्ये तीन भाषा शिकवण्याचा निर्धार दाखवून दिलाय...पण त्यावरूनच राज ठाकरेंनी सरकारला धारेवर धरलंय. पहिल्या इयत्तेपासून विद्यार्थ्यांवर तीन भाषांचं ओझं लादायचं का, हा प्रश्न यानिमित्तानं ऐरणीवर आलाय.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking LIVE: 'लाडक्या सूनेचं रक्षण, हेच शिवसेनेचं वचन' मोहीम सुरू, सासरी छळ होणाऱ्यांच्या मदतीला धावणार : एकनाथ शिंदे