Maharashtra Breaking LIVE Updates: अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कोणी अहवाल मागवतं का? नीलम गोऱ्हेंनी सभागृहात भाजपच्या मंत्र्याला सुनावले खडेबोल
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर... ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भाजपच्या संपर्कात? सरकारने जाहीर केलेल्या हिंदीसक्तीच्या निर्णयाविरोधात सुमारे दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले.. यावेळी...More
विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मंत्री अतुल सावे यांना सुनावले खडे बोल
शेवटच्या क्षणाला अहवाल कसा काय मागवता... सभागृहात यायच्या आधीच माहिती घ्यायची असते...
लक्षवेधी संदर्भात मंत्री अतुल सावे यांच्याकडे अपुरी माहिती असल्याने त्यांनी सभागृहात अहवाल मागवतो असं सांगितलं
दिव्यांग मंत्रालय उभारणी संदर्भात लक्षवेधी लावली होती
त्या लक्षवेधी बदल अर्धवट माहिती आणि अहवाल उपलब्ध नसल्याने अतुल सावे यांनी तात्काळ अहवाल मागवतो असं म्हटलं
मात्र शेवटच्या क्षणी अधिवेशनाच्या दिवशी अहवाल कसा काय मागवता असा खडा सवालभर सभागृहात नीलम गोरे यांनी मंत्री अतुल सावे यांना विचारला
रायगड : 15 जून 2022 रोजी अलिबागमधील आगीत भस्मसात झालेले पीएनपी नाट्यगृह अखेर तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा नव्याने उभे राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे आज अलिबागमध्ये उद्घाटन पार पडले. महाराष्ट्रातील एकमेव सहकार तत्वावर चालणारे हे नाट्यगृह आता पुन्हा एकदा मराठी कलाकारांना नवीन संधी देण्यासाठी सज्ज झाले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी पुढाकार घेऊन हे नाट्यगृह उभारले आहे. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार निलेश लंके, शिवसेनेच्या सुषमा अंधारे उपस्थित होत्या.
वाशिम : जिल्ह्यात 25-26 जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मालेगाव आणि रिसोड तालुक्यात शेतीचं मोठं नुकसान झालं होतं. त्याचा फटका भरून न निघणारा असल्याचं चित्र आहे. रिसोड तालुक्यातील मसाला पेन शेतशिवरात याच अतिवृष्टीमुळे शेतात जाणारा रस्ता उखडून गेल्याने जवळ पास 100 शेतकऱ्यांची खरिपाची पेरणी थांबली आहे. त्यामुळे शेतीचा रस्ता तयार करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. .
बच्चू कडू यांची कर्जमाफीसाठी "सातबारा कोरा" यात्रा सुरू...
स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांच्या जन्मभूमी पापळ येथून डॉ पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला नतमस्तक होत बच्चू कडू यांची भर पावसात पायदळ पदयात्रा सुरू...
आज पासून बच्चू कडू यांच्या 7/12 कोरा.. कोरा..कोरा.. 7 दिवस पदयात्रा...
स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या अमरावती जिल्ह्यातील पापळ या जन्मभूमी पासुन ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या देशातील पहिली शेतकरी आत्महत्याग्रस्त गावात याचा समारोप..
एकूण 7 दिवसाची 138 किलोमीटर पायी पायदळ यात्रा बच्चू कडू काढणार आहे....
या सात दिवसाच्या पदयात्रेत बच्चू कडू हे गावागावात शेतकऱ्यांशी संवाद साधून सभा देखील घेणार आहे...
आमच सरकार आलं तर आम्ही 3100 रूपये देऊ म्हटलं होत
तुम्ही सांगितल होत की 2100 देऊ
पण प्रत्यक्षात मात्र 500 वर तुम्ही आला आहेत
सत्तेत असताना तिजोरीचा अंदाज आला नाही
लाडक्या बहिणीला 2100 रूपये दिलेच पाहिजे
नाना पटोले यांची सभागृहात मागणी
शरद पवार राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे माढाचे आमदार अभिजित पाटील यांनी मांडला सरकारच्या अभिनंदनाचा ठराव
मुख्यमंत्री फडणवीस आणि सोलापूर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच तोंडभरून कौतुक
शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे आमदार यांनी पंढरपूर आषाढी वारी नियोजन यावरून कौतुक अभिनंदन ठराव केल्याने वेगळीच चर्चा
गेले काही दिवसांपासून शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अभिजित पाटील असले तरी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीकता वाढल्याची चर्चा सुरु आहे.
भंडारा : भंडारा जिल्ह्यात काल रात्रीपासून सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. याचा फटका रुग्णालयातील नवजात अर्भकांसह त्यांच्या मातांनाही बसतोय. भंडाऱ्याच्या तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयातील डिलिव्हरी वार्डात प्रसूतीनंतर ठेवण्यात आलेल्या महिलांच्या कक्षात ही गळती सुरू आहे. पाण्याची गळती होत असल्यानं महिलांच्या या वार्डात फरशीवर पाणी असल्यानं तिथून चालताना नवजात बाळांसह मातांनाही धोका निर्माण होतोय. फरशीवर पाणी असताना आणि वॉशरूमकडं जाण्याच्या मार्गात हीच परिस्थिती असल्यानं पाय घसरून कुणी पडल्यास त्याला जबाबदार कोण? असा संतप्त प्रश्न रुग्णाचे नातेवाईक विचारत आहेत.
कौटुंबिक वादातून पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे आषाढी एकादशी दिवशी 25 वर्षाची पत्नी मोनाली , सहा वर्षाचा मुलगा कार्तिक आणि चार वर्षाची मुलगी प्रगती यांनी आपल्याच शेतातील विहिरीत आत्महत्या केली. मोनाली हिने आपल्या दोन मुलांना घेऊन विहिरीत उडी टाकल्याचे समजतात पती म्हमाजी याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
याची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी तातडीने या विहिरीतून मोनाली आणि तिच्या दोन चिमूरड्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कालपासून सातत्याने विहिरीतले पाणी उपसणे सुरू असून आत्ता केवळ सहा वर्षाच्या मुलगा कार्तिक याचा मृतदेह सापडला आहे. बाकीचे मृतदेह शोधण्यासाठी पंढरपूरची आपत्कालीन यंत्रणा विहिरीत उतरून शोध घेत आहे. याची नोंद पंढरपूर तालुका पोलिसात झाली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान या कुटुंबाचा प्रमुख असलेला आणि गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या म्हमाजी आसबे याचा मृतदेह पोलिसांनी खाली काढला आहे. कौटुंबिक पती-पत्नीच्या वादातून ही धक्कादायक घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. यातील म्हमाजी असबे याची शेती असून त्याच्या द्राक्ष बागेत असलेल्या विहिरीतच पत्नी मोनाली हिने दोन मुलासह आत्महत्या केली आहे.
बीड व नागपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुली गर्भवती होण्याच्या संख्येत वाढ
बीड जिल्ह्यात बालविवाहामुळे २०२४-२५ दरम्यान बारा मुलींची गर्भवती म्हणून नोंद करण्यात आली
नागपूर शहर आणि जिल्ह्यात १२४ पैकी ६७ अल्पवयीन मुली गर्भवती
नागपूर जिल्ह्यात अविवाहित मुली आणि महिलांचे गर्भवती होण्याचे प्रमाणही वाढले
महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांची लेखी उत्तरात कबुली
कोल्हापूर मधील राधानगरी धरण 80 टक्के भरलं
धरणाच्या स्वयंचलित दरवाजापर्यंत पोहोचलं पाणी
राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला मात्र धरणाच्या पाणीसाठ्यातली वाढ कायम
धरणातून 3100 क्यूसेक्सचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू
धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पांझरा नदी दुधडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणीपातळी वाढली असून, अक्कलपाडा प्रकल्पात पाण्याची वाढती आवक लक्षात घेता प्रकल्पाचे सात दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत... सध्या अक्कलपाडा प्रकल्पातून 5 हजार 230 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून, पहाटे ४ वाजल्यापासून टप्प्याटप्प्याने हा विसर्ग वाढवण्यात आला आहे. पाण्याची आवक पुढेही वाढल्यास, पूर्वसूचनेनुसार विसर्गाचे प्रमाण वाढवले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे...
पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे आणि अक्कलपाडा प्रकल्पाच्या वरच्या बाजूस असणाऱ्या पांझरा, मालनगाव व जामखेडी प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने अक्कलपाडा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची भर पडत आहे. नदीच्या दोन्ही तीरावरील गावांतील नागरिक तसेच धुळे शहरवासीयांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे...
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 जुलै रोजी होणार
वाल्मीक कराडसह इतर आरोपींच्या प्रॉपर्टी जप्ती बाबतच्या अर्जावर झाला युक्तिवाद
वाल्मीक कराडला दोष मुक्त करण्याच्या अर्जावर तसेच प्रॉपर्टी सील करण्याच्या अर्जावर 22 जुलै रोजी न्यायालय निर्णय देणार
वाल्मीक कराड याचे बँक अकाउंट सील करण्याची कारवाई रद्द करावी अशी आरोपीच्या वकिलाची मागणी
धक्कादायक, विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभारलेल्या भाविकाला बीव्हीजी कंपनीच्या खासगी सुरक्षा रक्षकाची काठीने बेदम मारहाण....
मारहाणीत भाविक जखमी ...
गोपाळपूर रोडवरील पत्राशेड येथील दर्शन बारीतील आज सकाळची घटना...
नागपूर येथील भाविकाच्या दंडावर आणि पाठीवर केली काठीने मारहाण...
भाविकाला झालेल्या मारहाणीचा भाविकांमधून तीव्र संताप,
कारवाईची मागणी ...
सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती...
नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचा परिणाम भाजीपाल्यांच्या दरात होताना पाहायला मिळत आहे पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारपेठेत आणण्यासाठी अडचण होत असल्याने अवघी 30% आवक नाशिकच्या बाजारपेठेत होत आहे आणि त्यामुळे पालेभाज्यांच्या दरात 50 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक हुन मुंबई सह गुजरात कडे जाणाऱ्या भाजीपाल्यांच्या पुरवठ्यात देखील घट दिसून येत आहे
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील एका शेतकऱ्याने म्हशी घेण्यासाठी 7 लाख रुपये बँक खात्यात साठवले होते. पण सहावीत शिकणाऱ्या त्यांच्या मुलाने मोबाइलवर 'फ्री फायर' गेम खेळताना नकळत काही अॅप घेतले आणि काही क्षणात बँक खात्यातील पाच लाखांची रक्कम गायब झाली. खात्यातील पैसे गेल्याच्या मेसेजमधील ट्रान्झेक्शन आयडीवरून सायबर पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला. बँक खात्याशी कनेक्ट असलेला मोबाइल नंबर लहान मुलांच्या हाती दिल्यानंतर काय होऊ शकते, याचा धडाच पालकांना मिळाला. राधानगरी तालुक्यातील एका शेतकऱ्याने म्हशींचा गोठा करून चांगला जम बसवला होता. नवरा-बायको दोघे काबाडकष्ट करून गोठा आणखी वाढविण्याच्या विचारात होते. यासाठी ते बँक खात्यात पैसे साठवत होते. मे महिन्यात ते हरयाणातून चार म्हशी आणणार होते. यासाठी बँकेत जाऊन खात्यात साठवलेल्या पैशांची माहिती घेताच त्यांना धक्का बसला. खात्यावर फक्त दोन लाख रुपये शिल्लक होते. स्टेटमेंट काढल्यावर खात्यातून ऑनलाइन पैसे गेल्याचे लक्षात आले. बँकेने हात झटकून पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. शेतकऱ्याने सायबर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी शेतकऱ्याच्या मोबाइलपासून तपासाला सुरुवात केली. बँकेतील स्टेटमेंटनुसार मोबाइलमधील मेसेज तपासले. मात्र, त्यात एकही मेसेज नव्हता. ट्रान्झेक्शन आयडीवरून शोध घेतल्यानंतर काही रक्कम फ्री फायर गेममधील आभासी शस्त्र खरेदीसाठी गेल्याचे लक्षात आले.
- ठाकरे गटातून हकालपट्टी केलेले सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या जामीनावर आज सुनावणी....
- घरात घुसून हाणामारी करत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुनील बागुल,मामा राजवाडे यांच्यासह सात जणांवर गुन्हे दाखल...
- मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर संजय राऊतांनी केलेल्या एक्स पोस्टने भाजपकडून प्रवेश करण्यात आला होता रद्द...
- जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर आज होणार सुनावणी...
- मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्या जामीनानंतर भाजप प्रवेश होण्याची शक्यता...
वसई : विरारकडे जाणाऱ्या महिला विशेष लोकलमध्ये जून महिन्यात दोन महिलांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर वसई रोड जीआरपी ठाण्यात एकमेकींविरोधात क्रॉस एफआयआर दाखल करण्यात आली होती. याप्रकरणात वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ माने यांनी पैशांची मागणी करत ५,००० रुपये घेतल्याचा आरोप कविता मेदाडकर या महिलेनं केला होता. तिच्या म्हणण्यानुसार, त्यांनी फक्त २,००० रुपये औषधासाठी दिले, उर्वरित ३,००० रुपये कॉन्स्टेबलने स्वतःकडे ठेवले. प्राथमिक चौकशीत माने दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
कविता मेदाडकर हिने एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे आभार मानले असून, त्यांच्या माध्यमातून न्याय मिळाल्याचे तिने सांगितले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतला काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची हजेरी
काँग्रेसचे माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती दिलीप मानेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह माजी आमदार दिलीप माने यांनी घेतली मुखमंत्र्यांची भेट
दिलीप माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकिय वर्तुळात चर्चाना उधाण
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीप मानेंनी निवडणूक लढवत विजय मिळवला होता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल आषाढी एकादशी निमित्ताने कार्यक्रम आटपून परत निघताना सोलापूर विमानतळवर भेट
Beed : बीडच्या परळी येथील येथील वैद्यनाथ अर्बन को.ऑप.बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला आज पासून प्रारंभ होणार आहे.आजपासून या बँकेच्या निवडणुकीकरिता अर्ज स्वीकारले जाणार असून 11 जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहेत.10 ऑगस्ट रोजी मतदान तर 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. ही बँक दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यात होती.त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ बँकेवर निवडून आलेले आहे.
सध्या पंकजा मुंडे व धनंजय मुंडे या बंधू-भगिनी मधील दुरावा संपलेला असल्याने या बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.यापूर्वीही पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती.आता या बँकेत देखील बिनविरोधचा हा पॅटर्न राबवला जातो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
मेट्रो वन मधील एक मेट्रो मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मेट्रो लाईन वर परिणाम झाला होता
या मुळे मेट्रो उशिराने धावत होत्या, मात्र आता सुरळीत झाल्याची माहिती
आझाद मैदान येथे आज आझाद मैदान येथे सकाळी दहा वाजल्यापासून शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती त्रिभाषा सूत्र विरोधात धरणे आंदोलनाला बसले आहेत
पाचवी पर्यंत कोणतीही तिसरी भाषा नको, डॉक्टर नरेंद्र जाधव समिती तात्काळ रद्द करा, बालभारतीची शैक्षणिक स्वायत्तता अबाधित ठेवा, शिक्षण मंत्री दादा भुसे आणि एस सी आर टी संचालक राहुल रेखावार यांची तात्काळ हाकालपट्टी करा या प्रमुख मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन केले जाणार आहे
या धरणे आंदोलनाला राजकीय पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिला असून शिवसेना ठाकरे गट काँग्रेस मनसे भाकप यासारखे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सुद्धा या धरणे आंदोलनात आज सहभागी होणार आहेत
सकाळी दहा वाजल्यापासून शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती त्रिभाषा सूत्र विरोधात धरणे आंदोलनाला बसले आहेत
पाचवी पर्यंत कोणतीही तिसरी भाषा नको, डॉक्टर नरेंद्र जाधव समिती तात्काळ रद्द करा, बालभारतीची शैक्षणिक स्वायत्तता अबाधित ठेवा, शिक्षण मंत्री दादा भुसे आणि एस सी आर टी संचालक राहुल रेखावार यांची तात्काळ हाकालपट्टी करा या प्रमुख मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन केले जाणार आहे
या धरणे आंदोलनाला राजकीय पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिला असून शिवसेना ठाकरे गट काँग्रेस मनसे भाकप यासारखे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सुद्धा या धरणे आंदोलनात आज सहभागी होणार आहेत
विजेचा शॉक लागून दोन जनावरांचा मृत्यू
माणगावच्या तिलोरे गावातील घटना
शेतकरी श्री. संजय बबन बेंदुगडे यांचे 2 बैल शेतात नांगरणी साठी जात असताना शेतात विजेचा शॉक लागून मृत्यू
मंत्री भरत गोगावले यांच्याकडून शेतकरी बेंदुगडे यांना आर्थिक मदत
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज मंत्र्यांसोबत बैठक
भाजपच्या मंत्र्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रात्री ८ वाजता बैठक
अधिवेशनातील कामकाज, मंत्र्यांची कामगिरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार मार्गदर्शन
घाटकोपर वर्सोवा मेट्रो वन मेट्रो तांत्रिक कारणाने उशिराने धावत आहे,
यामुळे घाटकोपर सह इतर स्थानकात ही प्रवाशांची गर्दी झाली आहे
पालघर औद्योगिक कार्यक्षेत्रातील धनसार मधील प्लॅटिनम पॉलिमर्स या पीव्हीसी पावडर बनवणाऱ्या कारखान्याला लागलेली आग आटोक्यात आली असून मोठ्या प्रमाणात कारखाना आणि कारखान्यातील साहित्य जळाल्यामुळे कारखान्याचे लाखो रुपयांचं नुकसान झाल आहे. सध्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल असून कुलींगच काम सुरू करण्यात आला आहे.
गोसीखुर्द धरणाचे आता केवळ २ दरवाजे अर्धा मीटरनं सुरू ठेवून त्यातून १३, ६८३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. काल गोसेखुर्द धरणाचे १५ गेट सुरू होते. आज ४८,४५६ एवढा क्युसेक पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. हवामान खात्यानं आज भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळं गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस मुसळधार कोसळल्यास परिस्थिती बघून गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गात आणखी वाढ करण्याची शक्यता, गोसेखुर्द धरण प्रशासनानं व्यक्त केली आहे.
खडकवासला धरण साखळी क्षेत्रात जोरदार पाऊस
सकाळी खडकवासला धरणातून ४ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
खडकवासला वरसगाव पानशेत आणि टेमघर या चार धरणात एकूण ६६ टक्के पाणीसाठा
गेल्या वर्षी च्या तुलनेत तीन पट पाण्यासाठी जास्त
सकाळपासून पुणे शहरात काही ठिकाणी पाऊस सुरू
नागपूर महापालिका क्षेत्रात शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख म्हणून सतिश हरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे..
- सतिश हरडे ठाकरे गटाचे नेते आणि माजी जिल्हाप्रमुख आहे...
- दुष्यंत चतुर्वेदी शिंदे गटात गेल्यानंतर रिक्त असलेल्या पदावर सतिश हरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे...
- मनपा निवडणुकीपूर्वी संघटनात्मक पदे भरण्याच्या मालिकेत ही नियुक्ती करण्यात आली आहे...
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी धरणाचे पायथा विद्युतगृहाचे दुसऱ्या युनिटमधून 1 हजार 50 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात सुरुवात करण्यात आली आहे.
त्यामुळे आता कोयना धरणातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.कोयना धरणात सध्या 67.20 टीएमसी पाणीसाठा साठला आहे.
पंढरपूर वरून परतणाऱ्या एस टी बसचा अपघात ..
चिखली जवळ महाबीज कार्यालयासमोर एस टी बस दुभाजकावर आढळून झाली पलटी. .
अपघातात जवळपास 30 प्रवाशी भाविक जखमी ..
जखमीवर चिखली आणि बुलढाणा रुग्णालयात उपचार सुरू ..
बस पंढरपूर वरून खामगाव जात होती ..
बसमध्ये 51 भाविक प्रवास करत होते.
पंढरपूर सोहळा आटोपून भाविक घरी जात असताना घडली घटना ..
अपघातात कोणतीही जीवितहानी नाही ..
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी भाविकांना तत्काळ मदत केलीय ..
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील पश्चिम भागामध्ये पावसाची संततधार सुरू असून नदी नाले ओसंडून वाहू लागले तर तालुक्यातील सहाही धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढल्याने पुणेगाव धरण 75% भरले आहे..या धरणातून उनंदा नदीत 100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे..त्यामुळे वणी व चांदवड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेला मोठा दिलासा मिळाला आहे..
ठाण्यात पुन्हा उद्धव ठाकरे यांना डीवचणारे बॅनर झळकले
शनिवारी झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाच्या एकजुटीचा नारा दिला होता याचेच व्यंगचित्र रेखाटत उद्धव ठाकरेंना युवा सेनेने डीवचले
मुंबई महापालिकेची तिजोरी आणि महापौर खुर्ची यांचा व्यंगचित्रात समावेश
Maharashtra Political Updates: लोकसभा निवडणुकीत एक तिसरी ताकद म्हणून पुढे आलेली प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि ओवेसींची एमआयएम यांची युती तुटली. वंचितशी बिघडल्यानंतर आता एमआयएमने नवा भिडू शोधलाय. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षाच्या सरचिटणीसांसोबत बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दलित मुस्लीम मतांची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान लवकरच दोन्ही पक्षांचा एकत्रित मेळावा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय.
दरम्यान, इम्तियाज जलील आणि आझाद समाज पक्ष महाराष्ट्र प्रभारी गौरी प्रसाद उपास यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी
Maharashtra Political Updates: लोकसभा निवडणुकीत एक तिसरी ताकद म्हणून पुढे आलेली प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि ओवेसींची एमआयएम यांची युती तुटली. वंचितशी बिघडल्यानंतर आता एमआयएमने नवा भिडू शोधलाय. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षाच्या सरचिटणीसांसोबत बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दलित मुस्लीम मतांची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान लवकरच दोन्ही पक्षांचा एकत्रित मेळावा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय.
दरम्यान, इम्तियाज जलील आणि आझाद समाज पक्ष महाराष्ट्र प्रभारी गौरी प्रसाद उपास यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी
Nashik Rains: नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील पश्चिम भागामध्ये पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले तर तालुक्यातील सहाही धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. पुणेगाव धरण 75 टक्के भरले आहे. या धरणातून उनंदा नदीत 100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे वणी आणि चांदवड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेला मोठा दिलासा मिळाला आहे.
Nashik News Updates: नाशिकच्या गोदावरी नदीची पूरस्थिती कायम, दोन दिवसांपासून नाशिक शहर परिसरात सतंतधार
काल दिवसभरात 31 मिलिमीटर पावसाची नोंद
गोदा काठावरील मंदिरं आजही पाण्याखाली
गंगापूरसह जवळपास 12 धरणातून पाण्याचा विसर्ग
गोदावरी नदी आजही दुथडी भरून वाहत आहे
गोदा काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Maharashtra News: अभिनय सम्राट अशोक सराफ आणि सुलेखनकार अच्युत पालव यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. यावेळी अशोक सराफांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानलेत. तर आपण अशोक मामांचे फॅन असल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी अशोक सराफांचं कौतुक केलंय.
Congress Committee: मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसकडून समिती स्थापन करण्यात आलीये. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण समितीच्या अध्यक्षस्थानी आहेत. सात जणांच्या समितीत प्रफुल्ल गुडदे पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, धनंजय चौधरी, परिक्षित जगताप आहेत. तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड समितीचे समन्वयक आहेत.. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून समितीची स्थापना करण्यात आलीये. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांची आज दुपारी चार वाजता महत्वाची बैठक आहे.
Saamana Editorial ON Devendra Fadnavis: सामना वृत्तपत्रातून देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या 'रुदाली'टीकेनंतर सामनातून प्रतिटीका केली गेलीय.
देशात गेल्या दहा वर्षांपासून नरेंद्र मोदी यांची 'रुदाली' सुरू आहे, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे. तर, एवढी सत्ता हाती मिळूनही नेहरू, गांधी कुटुंबाच्या नावानं खडे फोडतात, असंही सामनामध्ये म्हटलं गेलं आहे.
भारतासारख्या महान देशाच्या मर्द गर्जनेची यांनी 'रुदाली' केली, फडणवीसांची 'रुदाली' म्हणजे, महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांचा आवाज नाही, असंही सामनात म्हटलं आहे.
Palghar Fire: पालघरमधील धनसार औद्योगिक क्षेत्रातील प्लॅटिनम पॉलिमर्स या कंपनीला भीषण आग लागली आहे. पहाटे तीन वाजताच्या सुमारास आग लागली असून आगीने रौद्ररूप धारण केले आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल असून आग विझवण्याचे प्रयत्न सरू आहेत. आगीनंतर कामगार सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पीव्हीसी पावडर बनवणारी ही कंपनी असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking LIVE Updates: अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कोणी अहवाल मागवतं का? नीलम गोऱ्हेंनी सभागृहात भाजपच्या मंत्र्याला सुनावले खडेबोल