Maharashtra Breaking LIVE Updates: वेळेआधीच मान्सून राज्यात दाखल, अनेक जिल्ह्यात पावसाची कोसळधार, देश-विदेशातील महत्त्वाच्या घटना एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: राज्याला मान्सूननं व्यापलं, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर,सांगली, साताऱ्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट... पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीची शक्यता
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यात मान्सूनचं आगमन झालं असून यंदा मान्सूननं वेळेआधीच आगमन केलं आहे. या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगानं सुरू असल्यामुळे तो 25मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे,...More
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी
राज्यात मान्सून यंदा सरासरीहून अधिक, भारतीय हवामान विभागाचे भाकित
राज्यात यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या ११० टक्के पावसाचा अंदाज
कोकण आणि गोव्यात यंदा सरासरीच्या १०७ टक्के, मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या ११० टक्के
मराठवाड्यात सरासरीच्या ११२ टक्के तर विदर्भात सरासरीच्या १०९ टक्के पावसाची शक्यता
कोणत्या विभागात किती होतो पाऊस
(सरासरी)
कोकण आणि गोवा - २ हजार ८७१ मिमी
मध्य महाराष्ट्र - ७४७ मिमी
मराठवाडा - ६४३ मिमी
विदर्भ - ९३७ मिमी
देशात जून ते सप्टेंबर दरम्यान यंदा मान्सून चांगला राहणार, आयएमडीनं याआधीचा सरासरीच्या १०५ टक्के पावसाचा अंदाज बदलला
देशात यंदा मान्सूनच्या सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज
जून महिन्यात सरासरीच्या १०८ टक्के पावसाची शक्यता
अल-निनोची आत्ता न्यूट्रल स्थितीत, अशात मोसमी वाऱ्यांवर परिणाम नाही
अँकर - सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. सलग पडलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील शेतकरी मल्लिनाथ पटणे यांचे पपई बागेचे मोठे नुकसान झाले आहे. पटणे यांनी डिसेंबर 2024 रोजी पाच एकरात पपईची लागवड केली होती. लागवड, औषध फवारणी, खत इत्यादी मिळून चार ते साडे लाख रुपये पर्यंत खर्च आला होता. परंतु या मुसळधार पावसामुळे पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या पपईच्या बाग शेतकरी मल्लिनाथ पटणे यांच्यासमोर पपईच्या झाड उन्मळून पडली आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या
स्थानिक गुन्हे शाखा,आणि रेवदंडा पोलीसांची संयुक्त कारवाई
Anchor - अलिबाग तालुक्यातील थेरोंडा फाटा इथं पोलीसांनी टाकलेल्या धाडीत दीड लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेवदंडा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे.
अर्चना तळेकर आणि आशीष तळेकर अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या अलिबाग तालुक्यातील थेरांडा फाटा येथील घरी गांजा विक्रीचा अवैध व्यवसाय सुरू होता पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिस श्वान पथकासह तळेकर यांच्या घरी पोहचले याठिकाणी धाड टाकण्यात आली. यावेळी तीन वेगवेगळया पिशव्यांमध्ये साडेपाच किलो वजनाचा गांजा सापडला. या गांजाची अंदाजे किंमत दीड लाख रूपये इतकी आहे. पोलीसांनी गांजासह वजन काटा, स्टेपलर पिनांचे बॉक्स, प्लास्टीकच्या पिशव्यांचे बंडल असा 1 लाख 52 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या गुन्ह्यातील आरोपी आशीष तळेकर याच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत.स्थानिक गुन्हे शाखेच्या हवालदार भाग्यश्री पाटील यांनी तक्रार दिली असून रेवदंडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस. आर. नंदगावे गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
ठाणे स्थानकात फलाट क्रमांक पाच वर विद्युत वाहिन्या उघड्यावर
फलाट क्रमांक पाच छताविना, पावसात प्रवाशांची तारेवरची कसरत
Anchor :- सध्या मान्सूनपूर्व पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला असून मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकलवर याचा मोठ्या प्रमाणात फटका पडलेला पाहायला मिळाला , ठाणे स्मार्ट सिटी म्हणून उदयास येत असताना ठाणे रेल्वे स्थानकात मात्र दयनीय अवस्था असलेली पाहायला मिळत आहे ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर मोठ्या प्रमाणात कचाऱ्याचे साम्राज्य आहे तर प्रवाशांच्या जीवाशी रेल्वे प्रशासन खेळतय की काय असा देखील सवाल उपस्थित होतोय कारण फलाट क्रमांक पाचवर विद्युत वाहिन्या उघड्यावर आहेत तर प्रवाशांना या विद्युत वाहिन्यांच्या खाली भर पावसात तारे वरचे कसरत करताना पाहायला मिळत आहे याचा आढावा घेत प्रवाशांची बातचीत केले आमचे प्रतिनिधी हितेश पांचाळ यांनी..
माझे आरोप मी मागे घेत आहे यावर कोणीही राजकारण करू नये
मला हे प्रकरण वाढवायचं नाहीय
मला या प्रकरणाचा फुलस्टॅाफ द्यायचा आहे
हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे मलाही पुढे जायचं आहे
माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारण करू नये
सोशल मीडियावर किंवा माझ्या नावाने कोणीही राजकारण केलं तर मी कायदेशीर कारवाई करणार
मी नोटिस पाठवली ती कोणाची मदत घेतली नाही
मी शिरसाट साहेबांचा सन्मान करतेय त्यांनी मला कधीही त्रास दिला नाही त्यांनी कधीही फोन केला नाही
मी परत एकदा सांगते मला हे प्रकरण थांबावायचं आहे
मला हे प्रकरण संपवायचं आहे
मुंबई विमानतळ सोबत मरोळ गावदेवी आणि सातबाग परिसर बॉम्ब ने उडून देण्याचं धमकी
धमकी देणारा आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी केली अटक,
मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूम मध्ये आज सकाळी 9 च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ बॉम्ब ब्लास्ट करून उडवण्याचा धमकी देण्यात आला,
धमकीनंतर एमआयडीसी पोलिसांनी साकीनाका परिसरा मधून मंजीत कुमार गौतम या धमकी देणारा 35 वर्षाचा आरोपीला अटक करण्यात आला आहे.
आरोपी मंजीत कुमार गौतम हा गारमेंट कंपनीमध्ये टेलर चा काम करतो
पत्नी गावावरून मुंबई येण्याचे प्रेशर करत असल्यामुळे आरोपी मनजीत गौतम यांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये कॉल करून धमकी देण्याचा प्रकार केला.
सध्या एमआयडीसी पोलिसांकडून आरोपीत मनजीत कुमार गौतम यांच्या संदर्भात अधिक तपास सुरू आहे...
धाराशिव ब्रेकिंग-*
पावसामुळे शेतीतील पक्की बांधलेली विहीर खचल्याने शेतकरी श्रीकांत गोविंदराव भिसे यांचं मोठं नुकसान
एकुरका गावासह परिसरात सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे खचली विहीर
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष
Anc: धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसात धुवाधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होताना पाहायला मिळते. पावसामुळे शेतीतील पक्की बांधलेली विहीर खचल्याने शेतकरी श्रीकांत गोविंदराव भिसे यांचं मोठं नुकसान. धाराशिव मधील एकुरगा येथील शेतकऱ्याच मोठ नुकसान झालं आहे.
धाराशिव ब्रेकिंग-*
पावसामुळे शेतीतील पक्की बांधलेली विहीर खचल्याने शेतकरी श्रीकांत गोविंदराव भिसे यांचं मोठं नुकसान
एकुरका गावासह परिसरात सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे खचली विहीर
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष
Anc: धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसात धुवाधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होताना पाहायला मिळते. पावसामुळे शेतीतील पक्की बांधलेली विहीर खचल्याने शेतकरी श्रीकांत गोविंदराव भिसे यांचं मोठं नुकसान. धाराशिव मधील एकुरगा येथील शेतकऱ्याच मोठ नुकसान झालं आहे.
Sulg-दौंड तालुक्यातील हातवळणमध्ये वादळी वाऱ्याने आणि मुसळधार पावसाने शेतकऱ्याचे पोल्ट्री शेड जमीनदोस्त..शेडच्या भिंती आणि पत्रे पडल्याने 18 हजार कोंबड्या मेल्या...80 ते 85 लाखांचं मोठं नुकसान...!
अँकर- दौंड तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे... दौंड तालुक्यातील हातवळण गावातील शुभम गोगावले यांचे वादळी वाऱ्याच्या पावसाने पोल्ट्री शेडचे पत्रे आणि भिंती कोसळून पोल्ट्री शेड मधील 18000 कोंबड्या मृत पावले त्यामुळे शेतकऱ्याचे 80 ते 85 लाखांचे मोठे नुकसान झाले आहे.. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी तसेच तलाठी दाखल होऊन पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.. दौंड तालुक्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा पावसाला जोर धरल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे..
Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यासह ग्रामीण भागात गेल्या आठ दिवसापासून अवकाळी पावसाने अक्षरशः जोडपून काढलं आहे.. विशेषतः ग्रामीण भागात पावसाचा जोर अजूनही कायम असल्यामुळे शेतीच्या मशागतीची आणि पावसाळी पिकाच्या पेरणीची काम पूर्णतः ठप्प झाली आहेत.. शेतात पाणी साचून राहिल्यामुळे अजूनही पुढचे आठ ते दहा दिवस पेरण्या करता येऊ शकणार नाहीत अशी स्थिती निर्माण झाली आहे.. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यासाठी पुढचे तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.. त्यामुळे पाऊस थांबणार कधी आणि त्यानंतर स्वागत आणि पेरण्या करायच्या कधी असा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे... लक पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे भात सोयाबीन भुईमूग अशा पिकांची हजारो हेक्टर वरची पेरणी सध्या थांबली आहे... पाऊस थांबला नाही तर यावर्षी पावसाळी पिकांची पेरणीच करता येणार नाही अशी भीती आता शेतकऱ्यांना वाटतेय.. का बाजूला उन्हाळी पिकाच झालेलं नुकसान आणि दुसऱ्या बाजूला पावसाळी पिकासाठी मशागत करण्याआधीच सुरू झालेला पाऊस यामुळे शेतकऱ्यांचं यावर्षी मोठा आर्थिक नुकसान होणार असून सरकारनं याकडे गांभीर्याने पहावं अशी अपेक्षा शेतकरी करताहेत.
Washim : वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्या पासून बरसत असलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या तडाख्यात उन्हाळी पिकाचं मोठं नुकसान झालंय...जिल्ह्यात अनेक भागात काढणीला आलेलं उन्हाळी ज्वारीचे पिकाच मान्सूनपूर्व पावसामुळे कणस काळवंडली असून या पांढरी शुभ्र दिसणारे ज्वारीच्या दाण्याला आता बाजारात कवडीमोल दर ही मिळणार नसल्याने शेतकरी चिंतेत सापडलाय..
कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजित अहवालनुसार जवळपास 1 हजार 248 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
यामध्ये प्रामुख्याने आंबा, केळी, कलिंगड, खरबूज या फळपिकासह भुईमूग, उडीद, उन्हाळी कांदा इत्यादी पिकांचे मोठे नुकसान
सोलापूर जिल्ह्यात झालेल्या या नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनाम्याना सुरुवात
कृषी आणि महसूल विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर आणि नुकसानस्थळी जाऊन प्रत्यक्ष पंचनामे सुरु
कोल्हापूरसोबतच घाट माथ्यावर रेड अलर्ट,
अतिवृष्टीची शक्यता
सोबतच, साताऱ्यातील घाट माथ्यावर देखील रेड अलर्ट
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात देखील अतिवृष्टीचा इशारा
दोन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी
सिंधुदुर्ग: कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मे महिन्यात वर्षा पर्यटनाचा आनंद पर्यटक लुटत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधील सावडाव धबधबा प्रवाहित झाला असून पर्यटक वर्षा पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. गर्द हिरव्यागार वनराईतून फेसाळत कोसळणारा सावडाव धबधबा 60 ते 70 फूट रुंदीचे आणि 30 फूट उंचीच्या काळ्या कातळावरुन फेसाळत कोसळतो. गर्द वनराईतून वाहत या धबधब्याचं रुपांतर पुढे ओहळात होते. मुंबई-गोवा महामार्गावरुन सावडाव धबधबा जवळ असल्याने पर्यटकांचं आवडीचं ठिकाण आहे. वर्षा पर्यटनाचा आनंद लुटल्यासाठी आता सावडाव धबधब्यावर मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत,
बीड : बीडच्या माजलगाव सह परिसरातही मान्सूनपूर्व पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली असून गेल्या तासाभरापासून पाऊस कोसळू लागला आहे.पाण्याचा निचरा होत नसल्याने आता शहरातील मुख्य रस्त्यावर पाणी जमा होऊ लागले आहे.यामुळे नगरपालिकेच्या मान्सूनपूर्व स्वच्छतेची पोलखोल झाली आहे. यासह माजलगाव परिसरात तेलगाव, नागडगाव सह ग्रामीण भागातही दमदार पाऊस पडताना दिसून येत आहे यामुळे अद्यापही शेतकऱ्यांना खरीप हंगामा ची पूर्वतयारी देखील करता येत नाहीये.
अतिवृष्टीच्या काळात आपत्ती उद्भवल्यास मदत कार्यासाठी NDRF ची टीम चिपळूणमध्ये.
महापूर आल्यापासून सलग तीन वर्षे जून महिन्याच्या अखेरीला चिपळूण मध्ये केलं जातं पाचारण.
यावर्षी मे महिन्यातच NDRF ची टीम चिपळूण मध्ये.
Hingoli News : हवामान विभागाच्या वतीने हिंगोली जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट दिला होता त्यानुसार आज दुपारी बारा वाजल्यापासून शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे सकाळपासूनच जिल्हाभरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळाले होते त्यानंतर आता शहरामध्ये जोरदार पाऊस बरसताना पाहायला मिळतोय जो दस रुपयाच्या पावसामुळे हिंगोली शहरात रस्त्यावरून पाणी वाहत आहे तर सकल भागाला सुद्धा पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे या पावसामुळे शेतात सुरू असलेल्या पेरणीपूर्व मशागतिचे कामे ठप्प आहेत पडली आहेत.
पहिल्याच पावसात परशुराम घाटातल्या गॅबिलीयन वॉल ढासळण्याच्या स्थितीत.
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर.
मुसळधार पावसामुळे प्रचंड पाण्याच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात माती वाहून गेल्याने गॅबिलीयन वॉल अनेक ठिकाणी निखळली.
मातीचा भराव खचू लागल्यामुळे परशुराम घाटाच्या सुरक्षेचा प्रश्न बनलाय गंभीर.
मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागायतदरांचे मोठे नुकसान
मे महिन्यात द्राक्ष पिकांच्या गर्भधारणेच्या फवारणीच झाली नसल्याने संपूर्ण वर्ष वाया जाण्याची भीती
बार्शी तालुक्यातील तडवळे गावातील शेतकरी प्रदीप जाधव यांच्या शेतात अद्याप ही पाणी साचून
मे महिन्यात सलग पाऊस झाल्याने पिकावर गर्भधारणाची फवारणी करताच आली नाही
आतापर्यंत 6 पैकी 3 फवारणी होणं अपेक्षित होतं मात्र सलग सुरु असलेल्या पावसामुळे अद्याप एक ही फवारणी झाली नाही
त्यामुळे संपूर्ण वर्ष वाया जाण्याची भीती शेतकरी प्रदीप जाधव व्यक्त करतायत.
सध्या सुरू असलेल्या वादळी वारा आणि पावसाच्या धुमशानी मध्ये करमाळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा जमीन दोस्त झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. करमाळा तालुक्यातील शेटफळ नागोबाचे तुकाराम रंगनाथ पोळ व परिसरातील केळी बागा जमीन दोस्त झाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल आहे.
वादळीवारा व पावसाने चिखलठाण परिसरातील केळी बागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अनेक केळी बागांमध्ये पाणी साचल्याने केळीच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होणार आहे. आता शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करून तातडीने भरपाई मिळावी व केळी पिकाच्या भरपाई रकमेमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
Satara Rain: सातारा जिल्ह्यात दुष्काळी भागातील मान तालुक्यामध्ये मान्सून पूर्व अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे या ठिकाणचे अनेक बंधारे तलाव मे महिन्यातच भरून ओसंडून वाहू लागले आहेत. यापैकी महत्त्वाचा समजला जाणारा मानगंगा नदीवरील आंधळी धरण हे देखील ओसंडुन वाहू लागले आहे. 0.267 अब्ज घनमीटर का पाणीसाठा या आंधळी धरणामध्ये असून या पाण्याचा उपयोग या ठिकाणी परिसरातील सिंचन आणि शेतीसाठी केला जातो.
Sindhudurg Rain : तळकोकणात पावसाची संततधार सुरू असून आज जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. तर कणकवलीत वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्यामुळे कणकवली मधील जाणवली येथे घरावर फणसाच्या झाडाची मोठी फांदी पडून नुकसान झाले आहे. सुदैवाने सर्वजण बचावले आहेत. पण घराचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं बार्शीतून वाहणारी भोगावती नदी मे महिन्यातच प्रवाहित
मागील चार महिन्यापासून कोरडी ठाक असलेली भोगवती नदी दुथडी भरून वाहतेय
मागील पन्नास वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा
दुथडी भरून वाहणाऱ्या या नदीचे रूप सुखावणारे वाटतं असले तरी मुसळधार पावसाने मोठं नुकसान या ग्रामस्थांचं केलंय
Satara Rain: सातारा- ठोसेघर मार्गावर बोरणे गावानजीक अतिवृष्टीने दरड ढासळली असून या मार्गावरील वाहतूक रात्री उशिरा पासून बंद आहे रात्री मुक्कामी असलेल्या जांभे चाळकेवाडी राजापुरी या गाड्या पलीकडेच तर अलीकडच्या एसटी बसेस अलीकडेच अडकले आहेत . दुधाचे टेम्पो ही रस्त्यावरच अडकून पडले आहेत.यामुळे प्रवासी विद्यार्थी तसेच मुंबईला जाणारे लोक गाडीतच अडकले आहेत. सकाळी दहा वाजेपर्यंत या ठिकाणी कोणतीही यंत्रणा पोहोचली नव्हती. या परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे येथील अल्हाददायक निसर्गरम्य वातावरण धबधबे पवनचक्क्यांचे पठार पाहण्यासाठी पर्यटकांची सतत वर्दळ सुरू असते. पडलेली दरड तात्काळ बाजूला सारून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी या परिसरातील वाहनधारक ग्रामस्थ पर्यटक करीत आहेत.
गुहागर मधील पाचेरी सडा येथे डोंगर खचला. मोठ्या प्रमाणात दगड आणि माती रस्त्यावर.
प्रशासनाकडून ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देत स्थलांतराच्या केल्या सूचना.
गुहागर मधील प्रशासनाने घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांशी केली चर्चा.अतिवृष्टी काळात काळजी घेण्याच्या केल्या सूचना.
मुसळधार पावसामुळे डोंगर खचण्याची प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ.
Nashik Rain : नाशिकच्या लासलगावमध्ये काल सायंकाळी वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने शेतीपिकांसह कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर वादळी वाऱ्याने मनोज जैन या कांदा व्यापाऱ्याचे कांदा शेड कोसळल्याने त्याखाली साठवून ठेवलेला शेकडो क्विंटलपेक्षा जास्त कांदा भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
राज्यासह मुंबई आणि उपनगरात रविवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बदलापुरातील प्रसिद्ध कोंडेश्वरचा धबधबा प्रवाहित झालाय. पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची पावलं कोंडेश्वरकडे वळू लागली आहेत.
व्हीओ : बदलापूर पासून ७ किलोमीटर अंतरावर कोंडेश्वर धबधबा आहे. पावसाळ्यात या ठिकाणचं निसर्गसौंदर्य पर्यटकांना खुणावत असतं. जून महिन्यात पावसाचं आगमन झाल्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये कोंडेश्वर धबधब्यावर गर्दी पाहायला मिळते. मात्र यावेळी पहिल्यांदाच मे अखेरीस हा धबधबा ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय. त्यामुळं पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी कोंडेश्वर धबधब्यावर गर्दी केलीय. या धबधब्यात आतापर्यंत अनेकांचा बुडून मृत्यू झालाय. त्यामुळे प्रशासनाकडून पर्यटकांना इथे येण्यास मनाई केली जाते. मात्र यंदा मान्सूनचं लवकर आगमन झाल्यामुळे बंदी आदेश लागू होण्यापूर्वीच पर्यटकांची पावलं कोंडेश्वर धबधब्याकडे वळू लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
सोमवारी मुंबईसह महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर आज सकाळपासून मात्र पावसाने उसंत घेतली आहे. रात्रभर मात्र पावसाची रिपरिप सुरू असल्याचं पाहिला मिळाल. मुंबईत सध्या रस्ते वाहतूक सुरळीत आहे. रेल्वे वाहतुकीवर थोड्या फार प्रमाणात परिणाम पाहिला मिळत आहेत. मध्य रेल्वे 15 मिनिट उशिराने तर वेस्टर्न रेल्वे आणि हार्बर मार्गावर पाच ते दहा मिनिटं उशिराने वाहतूक सुरू आहे. तर काल वरळी येथील आचार्य अत्रे स्थानकात पाणी शिरल्याने भुयारी मेट्रो आज बंद ठेवण्यात आली आहे. आज मुंबईला येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे आज देखील पावसाची शक्यता आहे. पालिकेच्या वतीने नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून सकाळपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. तर रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या 24 तासांत १०० मिमी पावसाची नोंद आली आहे. पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे.
दोडामार्ग 34 mm
सावंतवाडी 72 mm
वेंगुर्ला 116 mm
कुडाळ 88 mm
मालवण 86 mm
कणकवली 128 mm
देवगड 180 mm
वैभववाडी 66 mm
सोलापुरात मागील काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. बार्शी तालुक्यातील तडवळे गावात शेतकऱ्यांच्या घरात पाणी घुसल्याने शेतमालाचे नुकसान.काढणी झाल्यानंतर बाजार विकण्यासाठी पोत्यात भरून ठेवलेली ज्वारी, मका पाण्यात भिजल्याने मोठे नुकसान. तडवळे गावातील शेतकरी गोवर्धन जाधव यांचे कालच्या पावसात साधारण तीस पोती ज्वारी आणि दहा पोती मका भिजला. घरात संपूर्ण चिखल झाल्याने घरातील लोकांना पलंगावर बसून काढावी लागली रात्र
हवामान खात्याने आज कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. काल दिवसभर देखील पावसाने उघडीप दिली होती.. मात्र मध्यरात्री गगनबावडा, भुदरगड, आजरा, कागल, चंदगड या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 19 फूट 8 इंच इतकी आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरणे जवळपास 45 ते 50 टक्के भरली आहेत. त्यामुळे आगामी काळात पाण्याच्या विसर्गाचे नियोजन करावे लागणार आहे.
(सकाळी ८३० पर्यंत मिमीमध्ये)
कुलाबा - १६२ मिमी
सांताक्रुज - १४४.२ मिमी
रत्नागिरी - १२० मिमी
हरनाई - ११६.४ मिमी
माथेरान - १५२ मिमी
धाराशिव - ५१ मिमी
बीड - ५२.४ मिमी
पुणे - ४२ मिमी
ठाणे - ३६.६ मिमी
ठाण्यातील किसन नगर -1 परिसरातील नंददीप इमारत तळ अधिक तीन मजली 50 ते 60 वर्ष जूने बांधकाम तिसऱ्या मजल्याच्या जिन्याचा गॅलरीचा काही भाग मध्यरात्री कोसळला. कोणातीही जीवितहानी नाही. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अग्निशमन दल दाखल झाले होते. एकूण 17 कुटुंबांना सुरक्षेच्या दृष्टीने हाजुरी रेंटल या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित कार्यवाही प्रभाग समिती व बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. तीन दुचाकींचं नुकसान.
पुण्यातील घाट माथ्यावर रेड अलर्ट तर पुणे शहराला ऑरेंज अलर्ट; नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. पुणे जिल्ह्यातील २१ मंडळांना अतिवृष्टी; मी महिन्यातच जिल्हयात २२२.८ मिमी पावसाची नोंद. खडकवासला धरण साखळीत मंदगतीने वाढ सुरू; दिवसभरात ०.३ टीएमसी पाण्याची भर
कालच्या मुसळधार पावसामुळे भुयारी मेट्रोच्या वरळी येथील आचार्य अत्रे स्थानकात पाणी शिरले होते. यामुळे राज्य सरकार आणि पालिकेची नाचक्की झाली होती. त्यामुळे आज अॅक्वा लाईन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बीड शहरात मध्यरात्री झालेल्या पावसाने बिंदुसरा नदीवरील दगडी पुलावरून पाणी वाहत आहे. दरम्यान सकाळी या पुलावरील पाणी ओसरल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम हाती घेतली. मे महिन्यात झालेल्या पावसाने पालिका प्रशासनाची मान्सूनपूर्व कामाची पोलखोल झाली. अशातच मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले, तर मध्यरात्री झालेल्या पावसाने बिंदुसरा नदी पात्रात पाण्याचा प्रवाह सुरू झाला. तर ठीक ठिकाणचा कचरा इथे अडकून पडल्याने पात्रातील पाणी तुंबले होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने जेसीबीच्या माध्यमातून ही स्वच्छता सुरू केली आहे.
Maharashtra Monsoon Updates: राज्यभरात काल पावसाने झोडपल्यानंतर आजही रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात आज रेड अलर्ट
जारी करण्यात आलाय. तर मुंबई रायगड, पुणे, बीड, हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पालघर, नाशिक वगळता उर्वरित महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. दरम्यान मुंबईत पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. रस्ते वाहतूक सुरळीत आहे. लोकलच्या मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं तर हार्बर मार्गावरील गाड्या पाच ते दहा मिनिटं उशिराने सुरु आहेत. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत आहे.
Matheran Rains: सध्या सुरू असलेल्या पावसाचा माथेरानच्या पर्यटनावर देखील मोठा परिणाम झालाय. दरवर्षी मे अखेरीस पर्यटनाला बहर येणाऱ्या माथेरान मध्ये शुकशुकाट आहे. अशातच आता पावसाचा वाढता जोर लक्षात घेत पर्यटकांसाठी निसर्गाची सफर घडवणारी नेरळ माथेरान मिनिट्रेन सेवासुद्धा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. स्थानिक व्यावसायिक देखील नाराज झालेत. माथेरानच्या घाटात दोन दिवसांपासून दाट धुके आणि प्रचंड पाऊस असल्यामुळे आयडब्ल्यू विभागाला हा निर्णय घ्यावा लागला आहे.दुसरीकडे उंच घाट माथा असल्याने या घाटात दरडी कोसळण्याची भीती असल्याने हा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे जून मध्ये बंद होणारी मिनिट्रेन यंदा पाऊस लवकर सुरू झाल्यामुळे मे अखेरीसच बंद ठेवण्यात आली आहे.
Mumbai Rains : सोमवारी मुंबईसह महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर आज सकाळपासून मात्र पावसाने उसंत घेतली आहे. रात्रभर मात्र पावसाची रिप रिप सुरू असल्याचं पाहिला मिळाल. मुंबईत सध्या रस्ते वाहतूक सुरळीत आहे. रेल्वे वाहतुकीवर थोड्या फार प्रमाणात परिणाम पाहिला मिळत आहेत. मध्य रेल्वे 15 मिनिट उशिराने तर वेस्टर्न रेल्वे आणि हार्बर मार्गावर पाच ते दहा मिनिटं उशिराने वाहतूक सुरू आहे. आज मुंबईला येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे आज देखील पावसाची शक्यता आहे. पालिकेच्या वतीने नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत
Mumbai Goa Expressway LIVE: दोन दिवस मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडू लागले आहेत. त्यामुळे या खड्ड्यांचा नाहक त्रास प्रवाशी आणि वाहनचालकांना होतोय. मध्यरात्री मुंबई गोवा महामार्गावरील खांब जवळ एक दोन बस अशाच काही खड्ड्यात अडकून पडल्यानं जवळजवळ एक तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या बसेसना आता क्रेनच्या सहाय्यानं काढण्यात आलंय. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
Maharashtra Rains LIVE: राज्यात आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, रायगड, पुणे, बीड, हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, नाशिक वगळता उर्वरित महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मच्छिमारांना 27 मे 2025 पर्यंत पूर्व-मध्य आणि दक्षिण अरबी समुद्र आणि लगतच्या ईशान्य-अरबी समुद्र, लक्षद्वीप आणि कोमोरिन क्षेत्रात आणि केरळ, कर्नाटक आणि कोकण-गोवा किनाऱ्यालगत आणि बाहेरील भागात जाऊ नये, असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.
Maharashtra Rains LIVE: मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर,सांगली, साताऱ्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking LIVE Updates: वेळेआधीच मान्सून राज्यात दाखल, अनेक जिल्ह्यात पावसाची कोसळधार, देश-विदेशातील महत्त्वाच्या घटना एका क्लिकवर...