= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Yavatmal Crime: पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून निर्घुण हत्या Yavatmal Crime: कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून निर्घुण हत्या केली. ही गंभीर घटना यवतमाळ शहरातील वाघापूर परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इंद्रकला विजय जयस्वाल असे मृत महिलेचे नाव आहे. तर विजय जयस्वाल असे मारेकरी पतीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून पती विजय हा पत्नीवर संशय घेत होता. यामुळे दोघांमध्ये नेहमी वादाचे खटके उडत होते. दरम्यान, पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने संतप्त झालेल्या विजयने पत्नी इंद्रकलाच्या डोक्यात सिलेंडर घातले. यात ती जागेवरच कोसळली. प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Bhandara Rains : भंडाऱ्यात अतिवृष्टीनंतर पावसाची उसंत, पूर ओसरायला सुरुवात Bhandara Rains : भंडाऱ्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. वैनगंगा नदीच्या कारधा पुलावर पाणी आलं होतं. मात्र पावसाने उसंत घेतल्याने पूर ओसरायला सुरुवात झालीय. तसंच जिल्ह्यातील अनेक बंद असलेले मार्गही आता हळूहळू सुरू होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Sangali Crime: सांगलीतील शाळकरी मुलीच्या आत्महत्येची राज्य महिला आयोगाकडून दखल Sangali Crime: सांगलीतील शाळकरी मुलीच्या आत्महत्येची राज्य महिला आयोगाने दखल घेतलीय. दहावीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला आत्महत्येत प्रवृत्त केल्याचा प्रकार आटपाडी तालुक्यात घडला होता. या प्रकरणी चार आरोपींपैकी तिघांना अटक केली असून चौथा आरोपी हॉस्पिटलमध्ये आहे. चारही आरोपींवर पॉक्सोसह भारतीय न्याय संहितेच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल आहे. महिला आयोगाने पोलीस अधीक्षकांकडून सविस्तर अहवाल मागितला आहे. आरोपींनी अन्य मुलींना छळले का त्याचाही तपास करण्याचे निर्देश दिले
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Nagpur Rains: चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची उसंत Nagpur Rains: चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाने उसंत घेतलीय. पाऊस नसल्याने पूरपरिस्थिती नियंत्रित होण्यास मदत होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलीय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Public Security Bill: जनसुरक्षा विधेयक आज विधानसभेत मांडणार Public Security Bill: अनेक दिवसांपासून वादात अडकलेलं जनसुरक्षा विधेयक आज विधानसभेत मांडलं जाणार आहे. या विधेयकावर आक्षेप घेतल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीचा अहवाल काल विधानसभेत पटलावर ठेवण्यात आला होता. या विधेयकावर अनेक संघटनांनी आक्षेप घेतला होता. आज हे विधेयक मांडल्यानंतर विरोधकांची काय भूमिका असणार हे पहाणं महत्त्वाचं ठराणार आहे. दरम्यान जनसुरक्षा विधेयकाच्या वादानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली संयुक्त समिती स्थापन केली. या समितीत 25 सर्वपक्षीय सदस्य आहेत. जितेंद्र आव्हाड, सतेज पाटील, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, शशिकांत शिंदे, अजय चौधरी सदस्य आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Sanjay Gaikwad Controversy: आमदार संजय गायकवाडांचा आमदार निवासातील राड्याप्रकरणी 33 तासांहून अधिक काळ लोटला तरी कारवाई नाही Sanjay Gaikwad Controversy: शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची गुंडगिरी संपूर्ण राज्याने पाहिले. कॅन्टिनमधील मारहाणीला आता 33 तास उलटूनही अजूनही संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. गायकवाड यांच्यावर गुन्हा कधी दाखल होणार असा सवाल संपूर्ण राज्यातून विचारला जातोय. गायकवाडांवर गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारला नेमका कोणता पुरावा हवाय. कर्मचाऱ्याला केलेली मारहाण संपूर्ण राज्याने पाहिलीय. त्याचा व्हिडीओ आहे. गायकवाड स्वतः कबुलीही देत आहेत. मग अजूनही गुन्हा का दाखल नाही असा सवाल केला जातोय. आकाशवाणी आमदार निवासातल्या कॅन्टिनमध्ये गायकवाडांना निकृष्ट जेवण मिळालं. त्यामुळे संतापलेल्या गायकवाडांनी थेट कॅन्टिन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. त्यांच्या राड्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उडवली. यावेळी ते चक्क बनियानवर होते, यावरही विरोधकांनी आक्षेप घेतला. हा सत्तेचा माज असल्याचा आरोप विरोधकांनी केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली मात्र अद्याप गायकवाडांवर गुन्हा का दाखल झाला नाही असा सवाल उपस्थित होतोय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Delhi Earthquake: दिल्लीत भूकंपाचे मोठे धक्के; तब्बल 10 सेकंद जाणवले धक्के Delhi Earthquake: देशाची राजधानी दिल्लीत भूकंपाचे मोठे धक्के जाणवले आहेत. तब्बल 10 सेकंदांपर्यंत भूकंपांचे मोठे धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे. भूकंपाती तीव्रता 5.3 रिश्टर स्केल असल्याचं सांगितलं जातंय. दिल्ली, नोएडा आणि गाजियाबादमध्ये मोठे धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Teachers Strike Called Off: गुरुपौर्णिमेची भेट! 50 हजार शिक्षकांना आठ दिवसांत पगार Teachers Strike Called Off: अंशतःअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला मोठं यश, अधिवेशन संपेपर्यंत 8 महिन्यांचा 20 टक्के वाढीव पगार जमा करण्याची सरकारची घोषणा, इथून पुढं ठरलेल्या तारखेला पगार देण्याचंही निश्चित.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Mumbai News: मुंबईतील आमदार निवासात दोन वेटरमध्ये हाणामारी Mumbai News: आमदार निवासस्थानाच्या कॅन्टीनमधील वादंग काही केल्या थांबायला तयार नाही. निकृष्ट जेवणावरून आमदार संजय गायकवाड यांच्या राड्यानंतर आणि एफडीएच्या तपासणीनंतर आता कॅन्टीनमध्ये काम करणारे वेटरच आपसात भिडले किरकोळ वादातून या दोन्ही वेटरने एकमेकांना मारहाण सुरू केली या वादात काही नागरिकांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. कॅन्टीनमधील अंतर्गत वातावरण किती बिघडले आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Vile Parle News: जैन मंदिराचे पाडकाम योग्यच-उच्च न्यायालय Vile Parle News: मुंबईत विलेपार्लेमधल्या जैन मंदिरावरची पाडकामाची कारवाई योग्यच, उच्च न्यायालयानंही लावली मोहोर, पाडाकामानंतरचे ढिगारे उचलण्याचा खर्चही ट्र्स्टकडून घेण्याचे निर्देश.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Mohan Bhagwat: पंच्याहत्तरीची शाल पडली की थांबावं असा अर्थ; मोहन भागवतांनी केलेल्या वक्तव्यानं चर्चांना उधाण Mohan Bhagwat: 'जेव्हा 'पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावे असा असतो'. पंच्याहत्तरीनंतर माणसाने बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे, असा संघकार्याचा वस्तुपाठ मोरोपंत पिंगळेंनी घालून दिला होता याची आठवण सरसंघचालक मोहन भागवत यांनी काढली..'मोरोपंत पिंगळे, आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मोहन भागवतांनी ही आठवण सांगितली. मोहन भागवतांनी केलेल्या या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलं
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Sanjay Gaikwad Controversy: आमदार संजय गायकवाडांचा आमदार निवासातील राड्याप्रकरणी 30 तासांहून अधिक काळ लोटला तरी कारवाई नाही Sanjay Gaikwad Controversy: नेहमी वादाच्या भोवऱ्यात असणारे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आता गुंडगिरीचा नमुना दाखवला. तोही थेट लोकप्रतिनिधींचं वास्तव्य असलेल्या आमदार निवासात. मात्र 30 तास उलटूनही अद्याप संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. आकाशवाणी आमदार निवासातल्या कॅन्टिनमध्ये गायकवाडांना निकृष्ट जेवण मिळालं. त्यामुळे संतापलेल्या गायकवाडांनी थेट कॅन्टिन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. त्यांच्या राड्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उडवली. यावेळी ते चक्क बनियानवर होते, यावरही विरोधकांनी आक्षेप घेतला. हा सत्तेचा माज असल्याचा आरोप विरोधकांनी केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली मात्र अद्याप गायकवाडांवर गुन्हा का दाखल झाला नाही असा सवाल उपस्थित होतोय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Guru Purnima 2025, Shirdi: गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भक्तांची साईंच्या दर्शनासाठी गर्दी Guru Purnima 2025, Shirdi: गुरुपौर्णिमा उत्सवाचा आज मुख्य दिवस असून आज सकाळपासूनच शिर्डीत साई भक्तांनी साईंच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. साईबाबांना गुरु स्वरूप म्हणून लाखो साई भक्त आज शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतील. पहाटे काकड आरती नंतर ग्रंथ व विना मिरवणूक पार पडली आणि यानंतर सर्वसामान्य साई भक्तांसाठी दर्शन देखील सुरू झाला आहे. अनेक पायी पालख्या शिर्डीत दाखल झाले असून राज्यस नव्हे तर देशभरातून आलेल्या साई भक्तांमुळे शिर्डीत साई नामाचा गजर दिसून येतोय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Nagpur Rains: नागपूरमधल्या पावसानं शहरात मोठं नुकसान Nagpur Rains: मंगळवार आणि बुधवारच्या दरम्यानच्या रात्री नागपुरात झालेल्या मुसळधार पावसाचे दुष्परिणाम आता नागपूर शहरात ठीकठिकाणी दिसू लागले आहे. नागपूरच्या रामदास पेठ भागात कॅनल रोडवर नाग नदीची सुरक्षा भिंत अनेक ठिकाणी तुटली आहे. सेवा सदन शाळा आणि महाविद्यालयाच्या पाठीमागे नाग नदीची सुरक्षा भिंत कित्येक मीटर लांबीपर्यंत माती खचल्याने नाग नदीत कोसळली आहे. या घटनेत महाविद्यालयाचा मोठा जनरेटर सुद्धा नागनदीत कोसळला आहे. शाळा आणि महाविद्याल याची सुरक्षा भिंत अशा पद्धतीने खचल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Beed Rains : बीडमध्ये दोन दिवसांपासून पावसाची संततधार;बिंदुसरा धरणात पाण्याची आवक वाढली Beed Rains : बीड : बीड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसानं बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसरा धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली असून धरण पुन्हा पूर्ण क्षमतेने भरले आहे.. जिल्ह्यात मे महिन्यात दमदार पाऊस झाला.. या पावसाने 11 पाणी प्रकल्प ओव्हरफ्लो झाले.. मात्र जून आणि जुलै महिन्यात अद्याप म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. 167 पाणी प्रकल्पात केवळ 28% पाणीसाठा शिल्लक असून 45 पाणी प्रकल्प जोत्याखाली आहेत. इतर मोठे पाणी प्रकल्प भरण्यासाठी आजही जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तर संततधार सुरू असलेल्या पावसानं खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Guru Purnima 2025, Buldhana: आज गुरुपौर्णिमेनिमित्त विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावातही श्री संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी Guru Purnima 2025, Buldhana: बुलढाणा: आज गुरुपौर्णिमा.... गुरु शिष्य परंपरेची आठवण करून देणारा दिवस... आजच्या दिवशी शिष्य आपल्या गुरूंप्रति त्यांनी दिलेल्या ज्ञान आणि मार्गदर्शन याप्रति कृतज्ञता व्यक्त करत असतो.... आज गुरुपौर्णिमेनिमित्त विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावातही श्री संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी, आपल्या गुरून प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे. आज गुरुवार व त्यातच गुरु पौर्णिमा असल्याने हजारो भाविक श्री संत गजानन महाराजांच्या समाधीस्थळी दर्शन घेण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी "गण गण गणात बोते" च्या गजरात गर्दी करत आहेत.