Maharashtra Breaking LIVE: काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी केला भाजपमध्ये प्रवेश
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Dec 2025 09:59 AM
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर... माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांकडे, मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा कधी पोहोचणार? नवी अपडेट समोरमाणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई...More
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर... माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांकडे, मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा कधी पोहोचणार? नवी अपडेट समोरमाणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. कोकाटे यांच्या याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्ष असेल. माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम राहिल्यास अजित पवार माणिकराव कोकाटे यांनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करतील. अद्याप मुख्यमंत्र्यांकडे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा पत्र प्राप्त झालं नसल्याची माहिती आहे. नवाब मलिक यांना ज्या प्रकारे बिन खात्याचं मंत्री म्हणून महाविकास आघाडीमध्ये ठेवलं होतं अगदी त्याच प्रकारे माणिकराव कोकाटे यांची सुद्धा खाती काढून घेण्यात आली आहेत. अजित पवार हे शुक्रवारी या सगळ्या प्रकरणात होणाऱ्या सुनावणी कडे लक्ष ठेवून असतील. हर्षवर्धन पाटलांनी लेकीसह घेतली नितीन गडकरींची भेट, दिल्लीत घडामोडींना वेग, नेमकी काय झाली चर्चा? सध्या ठीक ठिकाणची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत यासह पालखी मार्ग सुधारणे संदर्भातील अनेक मागण्या आज केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री ना.नितीनजी गडकरी यांच्याकडे नवी दिल्ली येथे भेट घेऊन पत्राद्वारे केल्या आहेत. या भेटी प्रसंगी मा.जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे उपस्थित होत्या. दरम्यान, पालखी मार्गाच्या निकृष्ट दर्जांच्या कामांची चौकशी करून, अपूर्ण कामे पूर्ण करणे व पत्रातील इतर मागण्या संदर्भात तातडीने संबंधितांना आदेश देण्यात येतील, असे नितीन गडकरी यांनी या भेटीत नमूद केल्याची माहिती देण्यात आली आहे. संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. या कामाची तातडीने चौकशी करावी अशा प्रकारची मागणी हर्षवर्धन पाटील यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. त्यामुळं आता हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या मागणीवर नितीन गडकरी काय निर्णय घेणार? खरच या मार्गात झालेल्या निकृष्ट कामांची चौकशी करणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pune News: वाहनांची तोडफोड करणाऱ्या 'भाईं'ची पोलिसांनी जिरवली मस्ती; हात जोडून मागितली माफी
Pune News: पिंपरी चिंचवड शहरातील दत्त मंदिर रोड परिसरात कोयत्याने वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांना वाकड पोलिसांनी अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत. "आम्ही इथले भाई आहोत" अशी फुशारकी मारणाऱ्या या तरुणांची गुंडगिरी पोलिसांनी चांगल्याच प्रकारे उतरवली असून, आता या आरोपींचा पोलिसांची आणि जनतेची माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.