= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अंबाजोगाईतील फर्निचर दुकानाला आग, आगीत दुकानाचे लाखोंचे नुकसान, जीवितहानी नाही अंबाजोगाईतील फर्निचर दुकानाला आग, आगीत दुकानाचे लाखोंचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही
Ac - बीड च्या अंबाजोगाईत असलेल्या एका फर्निचर च्या दुकानाला लागलेल्या आगीमुळे दुकानातील सामान जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कसलीही जिवितहानी झालेली नाही.अंबाजोगाईतील मंडी बाजार या ठिकाणी फेमस फर्निचर या दुकानाला आग लागल्याने या आगीमध्ये कुलर,कपाट यासह विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या विविध वस्तू दुकानाला आग लागल्याने जळून खाक झाल्या आहेत.यामुळे दुकान मालकाचे मोठे नुकसान झाले आहे.घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
छत्रपती संभाजीनगर मैत्रिणीवर गोळीबार प्रकरणातील आरोपीची पोलीस ठाण्यात मुजोरी छत्रपती संभाजीनगर मैत्रिणीवर गोळीबार प्रकरणातील आरोपीची पोलीस ठाण्यात मुजोरी दिसून आली,
मेडिकल साठी नेले जात असताना कॅमेऱ्यासमोर त्याने
और दो तीन लडकीयोंको गोली मारता बाहेर आणे के बाद असे बोलला, त्यामुळं आरोपी किती मुजोर आहे हेच या निमित्ताने पुढं आलं आहे... याच सय्यद फैजल ऊर्फ तेजाने रात्री मैत्रिणीवर गोळी झाडली. गोळी तिच्या हाताला लागल्याने ती जखमी झाली. हल शहरातील किलेअर्क परिसरात ही घटना घडली, सय्यद फैजल रात्री १२ वाजेच्या सुमारास तिथे गेलेला, राखी असे जखमी मैत्रिणीचे नाव आहे. तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले आणि त्यांनी आरोपीला अटक केली आहे...
बाईट- रत्नाकर नवले , डीसीपी क्राईम
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
चार दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात पुन्हा बरसला मुसळधार चार दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात पुन्हा बरसला मुसळधार
भातपिकांना तारक ठरला पाऊस
Anchor : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा भंडाऱ्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून पावसानं उसंत घेतल्यानं भातपीक संकटात सापडलं होतं. मात्र, पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून भातपिकांना नवसंजीवनी देणारा हा पाऊस झाला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
खाटीक समाजाचे चिकन मटण कत्तल आणि विक्री निर्णयावर पालिका आयुक्त यांना निवेदन खाटीक समाजाने चिकन मटण कत्तल आणि विक्री निर्णयावर पालिका आयुक्त यांना निवेदन दिले असून या संदर्भात चर्चा करून निर्णय घेतला जाईल अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांची माहिती
या सर्क्युलर मध्ये कत्तलखाने बंद ठेवणे हा उद्देश आहे कुठल्याही व्यक्तीच्या खाण्यावर बंदी नाही दरवर्षीप्रमाणे हे सर्क्युलर उपायुक्तांनी जाहीर केले आहे मास विक्री बंद करण्याचा हा निर्णय बऱ्याच दिवसांचा आहे
अशा पद्धतीचे निर्णय घेणे मागील काही वर्षापासून प्रशासकांना दिले होते त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे विविध स्तरावर स्थानिक महापालिका परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकते
हा निर्णय मागील 1988 पासून घेण्यात आलेला आहे दरवर्षीप्रमाणे तो राबविण्यात येत आहे हा निर्णय नव्याने घेतलेला नसून यावर्षी लोक भावना लक्षात घेऊन आयुक्तांच्या निदर्शनात आणून देऊन त्याप्रमाणे पुढील निर्णय घेण्याची आवश्यकता असेल तर निर्णय घेऊ
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांना दहा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक धुळे पंचायत समिती कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती रोहिणी नांद्रे यांना तब्बल दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली असून या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे
धुळे तालुक्यातील चांदे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांनी भेट देऊन पाहणी केली असता या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या त्यांना कमी आढळून आली होती याबाबत वरिष्ठांना शाळेचा प्रतिकूल अहवाल सादर न करण्याच्या मोबदल्यात तसेच शाळेला समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यात शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांनी स्वतः करिता आणि शिक्षण अधिकारी श्रीमती कुवर यांच्या करिता तब्बल दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे...
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Beed News : वैद्यनाथ बँकेची मतमोजणी प्रक्रिया; मंत्री पंकजा मुंडेंचे पारडे जड Beed News : बीडच्या परळी येथील वैद्यनाथ बँकेची नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. आतापर्यंत 17 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.. सध्या तरी मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनलचे पारडे जड आहे.. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे पॅनल पिछाडीवर आहे. अनेक ठिकाणी पवार गटाच्या उमेदवारांना खाते देखील उघडता आले नाही. सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होईल. तर निवडणुकीपूर्वीच माजी खासदार प्रीतम मुंडे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बीड कारागृहातील गांजा प्रकरण भोवले; सतीश भोसलेची छत्रपती संभाजीनगरच्या हरसुल कारागृहात रवानगी बीड जिल्हा कारागृहात बेकायदेशीर रित्या गांजा आणत त्याच्या वाटणीवरून इतर कैद्यांसोबत वाद घालणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला संभाजीनगर येथील हरसुल कारागृहात हलवण्यात आले आहे.. गांजा आणण्याबरोबरच त्याच्या वाटणीवरून वाद घालणाऱ्या या चौघांवर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.. दरम्यान या चौघांचा ताबा मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज देखील करण्यात आलेला आहे.. तत्पूर्वीच कारागृह प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून खोक्याला हरसूल कारागृहात हलवले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाशिकच्या अंबड परिसरात टवाळखोरांची दहशत; दुकानात शिरुन दुकानदाराला मारहाण, घटना CCTV मध्ये कैद Nashik News : नाशिकच्या सिडको परिसरात असलेल्या सदर पारस कलेक्शन नावाच्या दुकानांमध्ये परिसरात असलेल्या मद्यप्राशन केलेल्या टवाळखोर दुकानदारासह कर्मचाऱ्याला जबर मारहाण केलाचा धक्कादायक प्रकार घडलाय... हे चार-पाच संशयित मद्यप्राशन केल्या असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आला आहे... मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे...मात्र यामुळे परिसरात एकच घबराट निर्माण झाले असून या टवाळखोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.... याबाबत अंबड पोलिसांनी दोन ते तीन जणांना ताब्यात घेतला असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे... जुन्या वादातून हा प्रकार घडलेल्या असल्याचं पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.... मात्र या घडलेल्या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाला आहे....गेल्या अनेक दिवसांपासून सिडको परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असताना पाहायला मिळत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
महाराष्ट्रातील तरुणांसाठी खुशखबर; पोलीस भरती संदर्भात आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार मोठा निर्णय महाराष्ट्रातील तरुणांसाठी खुशखबर
पोलीस भरती संदर्भात आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार मोठा निर्णय
14000 पदांना आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळणार मंजुरी
थोड्याच वेळात पोलीसभरती संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब
गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीसाठी तरुणांची प्रतिक्षा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सह्याद्री राज्य अतिथीगृह समोर अपघात; बेस्टच्या इलेक्ट्रिक बसची रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला धडक सह्याद्री राज्य अतिथीगृह समोर अपघात
बेस्टच्या इलेक्ट्रिक बसची रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला धडक
बस आणि कारमध्ये चिरडून एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू
महिलेला जे जे रुग्णालयात हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम यांच्या तक्रारीची दखल; फेसबुक पोस्ट शेअर करत दिली माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम यांच्या तक्रारीची दखल
सहकार सचिव प्रवीण दराडे आणि एसआरएचे सीईओ महेंद्र कल्याणकर यांनी लक्ष घालण्यास सूचित केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती
मुख्यमंत्र्यांकडून किशोर कदम यांची फेसबुक पोस्ट शेअर करत दिली माहिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
गोंदिया जिल्ह्यातील तब्बल 5 हजार 844 धान उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत; 1 लाख 35 हजार 13 शेतकरी पात्र पण... गोंदिया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20 हजार रुपये बोनस जाहीर केला. त्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील 1 लाख 35 हजार 13 शेतकरी पात्र ठरले होते. 7 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शासनाकडून जिल्हा पणन कार्यालयाला बोनस साठी निधी देण्यात आला.. मात्र, आता गोंदिया जिल्ह्यातील 5 हजार 844 शेतकरी बीम पोर्टलने ब्लॉक केल्याने बोनसच्या प्रतीक्षेत आहेत.. शेतकऱ्यांची कागदपत्र व सातबारा तपासण्यासाठी बोनस देण्यात आला नसल्याचे कारण समोर केल्या जात आहे... तर या शेतकऱ्यांचे सातबारे व फेरफार तपासल्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे वळते करण्यात येतील, अशी माहिती गोंदियाचे जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी दिली आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पुण्याच्या कुंडेश्वर अपघातात 10 महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या चालकाला अटक पुण्याच्या खेडमधील कुंडेश्वर अपघातात 10 महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या चालकाला अटक करण्यात आलीये. हृषीकेश करंडे असं त्याचं नाव आहे. हृषीकेश वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोबतच जखमी 30 महिला आणि लहानग्यांच्या जीव धोक्यात आणला. तीव्र चढाई असल्याची कल्पना असताना दुसऱ्यांचा जीवास कारणीभूत ठरेल अशी अवैध वाहतूक, निष्काळजीपणे वाहतूक करणे, अशा वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही गुन्हा दाखल करण्यात आलाय. रात्रीचं त्याला म्हाळुंगे पोलिसांनी अटक केलीये.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात उंदराचा संचार, ऑनलाइन दर्शनादरम्यान दिसून आले उंदीर, प्राचीन अलंकारांचा नुकसान होण्याची भीती तुळजाभवानी मंदिरात उंदरांनी धुमाकूळ घातला असून मंदिर बंद केल्यावर थेट तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात उंदराचा संचार असल्याचं तुळजाभवानी मातेचे ऑनलाइन दर्शनादरम्यान दिसून येत आहे. गुजरात मधील भावनगर येथील हितेश भाई जानी या भाविकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली असून उंदरांना तात्काळबद्ध्वस्त करण्याची मागणी केली आहे. मंदिर बंद केल्यानंतर रात्रभर उंदीर तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात वावरत असल्याचं ऑनलाइन दर्शनातून स्पष्ट दिसून येत आहे या उंदरांमुळे तुळजाभवानी मातेच्या प्राचीन अलंकाराचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वसई-विरारमध्ये परिवहन ठप्प; कर्मचाऱ्यांचा अचानक संप, नागरिकांचे हाल वसई : वसई-विरार परिसरातील महापालिका परिवहन सेवा आज मंगळवारी सकाळपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिवहन कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक संप पुकारल्यामुळे महापालिकेची एकही बस रस्त्यावर धावताना दिसली नाही.
वेतनवाढीचा निर्णय होत नसल्याने आणि विद्यमान वेतनही वेळेवर मिळत नसल्याच्या आरोपावरून कर्मचाऱ्यांनी हा संप केला आहे. या बंदबाबत महापालिकेला कोणतीही कल्पना न दिल्याने प्रशासन गाफील राहिले.
संपामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि शाळकरी मुलांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. खासगी वाहन, रिक्षाचा आधार घेण्याशिवाय पर्याय नसल्याने प्रवाशांना सकाळीच आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
ठाकरे गटाच्या आमदाराने मतदारांघासाठी मागितले पाणी, विखे पाटीलांची महायुतीत येण्याची खुली ऑफर धाराशिवच्या उमरगा-लोहारा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भरसभेत महायुतीत प्रवेशाची खुली ऑफर दिली. लोहारा तालुक्यातील करजखेडा येथे जलसंपदा विभागाच्या कामाच्या उद्घाटनावेळी ही घटना घडली. प्रवीण स्वामी यांनी मतदारसंघातील कामाची मागणी केली असता, “पाणी कुठल्या वळणावर आहे हे तुम्हालाही कळलं पाहिजे… पाणी तर आम्हीच देणार,” असे म्हणत विखे पाटील यांनी उपस्थितांना हात वर करून स्वामींना निर्णय घेण्याचे आवाहन केले. या वक्तव्यामुळे जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, यापूर्वी शिवसेनेचे मंत्री आणि धाराशिव चे पालकमंत्री असलेल्या प्रताप सरनाईक यांनी थेट स्वामींच्या घरी जात सत्कार स्वीकारला होता यावेळी ही जवळीकही चर्चेत आली होती.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची केली कान उघडणी, प्रश्नांची सरबत्ती डॉक्टर पायल तडवीच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची केली कान उघडणी
या प्रकरणातील विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्याकडून तडकाफडकी खटला काढून घेतल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती
खटला पुन्हा लढवण्यासंदर्भात प्रदीप घरत यांना विचारणा करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला सूचना
७ मार्चला प्रदीप घरत यांच्याकडून पायल तडवी आत्महत्या प्रकरण तडकाफडकी काढून घेण्यात आल होता
या विरोधात पायलची आई आबेदा तडवी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती
घरत त्यांची बदली करण्याचा निर्णय अनाकलनिय आणि अवैध असून त्यामुळे खटल्याला विलंब होत असल्याचा आबेदा तडवी यांचा दावा
फेब्रुवारी महिन्यात घरत यांनी नायर रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाच्या प्रमुखांना पायलने केलेल्या छळाच्या तक्रारींकडे कानाडोळा केल्याप्रकरणी आरोपी करण्याचा अर्ज केला होता
त्यानंतर काही दिवसातच कोर्टाने स्त्रीरोग विभागाच्या प्रमुखांना देखील आरोपी बनवले होते
मात्र त्यानंतर तडकाफडकी घरत यांची उचल बांगडी करण्यात आली होती
मुंबई उच्च न्यायालयाने घरत यांनी राज्य सरकारसाठी आजवर केलेल्या कामांचा तसेच पत्रकार जे डे यांच्या हत्या प्रकरणातील त्यांनी केलेल्या कामाची राज्य सरकारला आठवण करून दिली
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पुण्यात वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना धडे; येरवड्यात वाहतूक प्रशिक्षण संस्था उभारणार पुण्यात वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना धडे
येरवड्यात वाहतूक प्रशिक्षण संस्था उभारणार
वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी येरवडा भागात प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येणार आहे
मुंबई पोलीस दलाच्या धर्तीवर वाहतूक शाखेत रोजी होण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे
नागरिकांबरोबर संवाद सौजन्यशीलता याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे
शहरातील वाहतूक कोंडी बेशिस्त वाहन चालकांकडून केले जाणारे नियमभंगाचे प्रकार वाढले आहेत
गेले वर्षभरापासून वाहतूक विषयक सुधारणा करण्यासाठी विविध उपाय केले आहेत पोलीस कर्मचारी अधिकारी रस्त्यावर असतात त्यांची थेट नागरिकांशी संबंध येतो.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
'खालिद का शिवाजी' चित्रपटाला होणारा विरोध वाढला; शिवप्रेमी संघटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार 'खालिद का शिवाजी' चित्रपटाला होणारा विरोध वाढला
चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी आणा
शिवप्रेमी संघटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन करणार मागणी
मागणी करण्यासाठी आज शिवप्रेमी संघटना मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छावा, अखिल भारतीय मराठा महासंघ व इतर संघटनांचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
सकाळी सह्याद्री अतिथीगृह येथे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांची भेट होण्याची शक्यता
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
ट्रक व मोटारसायकलची धडक; दुचाकी चालक जागीच ठार, नागपुर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील घटना नागपुर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील 53 वरील हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत धामणा शिवारात ट्रक व मोटारसायकलची जबर धडक झाल्याने दुचाकी चालक रामेश्वर विठ्ठल गावंडे हा 30 वर्षाचा तरुण जागीच ठार झाला. काल दुपारी वेदांता धाब्याजवळ ट्रकने नागपूरच्या दिशेने जाण्यासाठी युटर्ण घेत असतांना मागून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने दुचाकी स्वराचा यात मृत्यू झाला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra News: पालकमंत्रीपदाचा वाद विकोपाला? 15 ऑगस्टला ध्वजारोहण कोण करणार? Maharashtra News: पालकमंत्रीपदाचा वाद शिगेला पोहोचला असताना, आता 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोण करणार याबाबतचा निर्णय जाहीर झाला आहे, 15 ऑगस्टला मंत्री आदिती तटकरे ध्वजारोहण करणार आहेत. राज्यसरकारकडून याबाबतच परिपत्रक जारी करण्यात आलयं. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे विरुद्ध शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्यात संघर्ष आहे. त्यामुळे पुन्हा पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Beed News: बीडच्या वैद्यनाथ बँकेसाठी मतदान, आज निकाल Beed News: बीडच्या वैद्यनाथ अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या 17 पैकी चार जागा बिनविरोध आल्याने उर्वरित 13 जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडलीय.. आज सकाळी 8:00 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मतमोजणी प्रक्रिया सुरू होणारेय, 108 मतदार केंद्रापैकी बीड जिल्ह्यातील 67 मतदार केंद्रावर सदस्यांनी मतदान केले. बँकेच्या 43 हजार 962 सदस्य मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही बिनविरोध निवडणूक होणार होती पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजाभाऊ फड यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरत एक पॅनल उभा केला.त्यामुळे या निवडणुकीमध्ये मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागलीय