Maharashtra Breaking Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी; एका क्लिकवर...
Maharashtra Breaking Live Updates: महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. आता संदेश नाही थेट बातमी देणार असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking Live Updates: मनसेशी युती करणार का? या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी काल मोठं वक्तव्य केलं. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. आता संदेश नाही थेट बातमी देणार, असं उद्धव...More
नंदुरबार: गुजरात राज्याच्या बसमधून महाराष्ट्रात बोगस बियाण्याची तस्करी...
गुजरात सीमेलगत असलेल्या अक्कलकुवा बस स्थानकात कृषी विभागाची धडक कार्यवाही....
महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले एचटीबीटी कापूस बियाणाची गुजरात बसमधून चोरटी वाहतूक.....
दीड लाख रुपये किमतीचे एसटीबीटी कापूस कृषी विभागाने केले जप्त....
एचटीबीटी कापसाचे बियाणे हे महाराष्ट्र सीमा लागत असलेल्या गुजरातच्या निझर गावात पुरवठा होत असून तिथून महाराष्ट्रात विक्री केली जाते असल्याचा गुप्त माहितीचा आधारावर कार्यवाही ...
आतापर्यंतची जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सलग 5 वी कारवाई ....
कृषि संचालक गुणनियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार चेतन कुमार ठाकरे या पथकाने केली कार्यवाही
नंदुरबार: गुजरात राज्याच्या बसमधून महाराष्ट्रात बोगस बियाण्याची तस्करी...
गुजरात सीमेलगत असलेल्या अक्कलकुवा बस स्थानकात कृषी विभागाची धडक कार्यवाही....
महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले एचटीबीटी कापूस बियाणाची गुजरात बसमधून चोरटी वाहतूक.....
दीड लाख रुपये किमतीचे एसटीबीटी कापूस कृषी विभागाने केले जप्त....
एचटीबीटी कापसाचे बियाणे हे महाराष्ट्र सीमा लागत असलेल्या गुजरातच्या निझर गावात पुरवठा होत असून तिथून महाराष्ट्रात विक्री केली जाते असल्याचा गुप्त माहितीचा आधारावर कार्यवाही ...
आतापर्यंतची जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सलग 5 वी कारवाई ....
कृषि संचालक गुणनियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार चेतन कुमार ठाकरे या पथकाने केली कार्यवाही
धाराशिव: स्वागतासाठी हार नको, तर आकरा कापडी पिशव्या द्या पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
तुळजाभवानी मंदिरात पंकजा मुंडेकडून स्वच्छता मोहीम
पंकजा मुंडेंनी हाती झाडू घेत केली मंदिर परिसरात स्वच्छता
प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत, भाविकांना कापडी पिशव्यांचे वाटप
"नो प्लास्टिक" मोहिमेसाठी पंकजा मुंडे यांचा आज संकल्प दौरा
परळी वैजनाथ, तुळजापूर, अक्कलकोट , येथील तीर्थक्षेत्रावर करणार प्लास्टिक वापरा बाबत जनजागृती
सिंगल युज प्लास्टिक बॅग वापराच्या निर्बंधाच्या अनुषंगाने तुळजापुरात बैठक
सिंगल यूज प्लॅस्टिक बंद करण्याची गरज, त्या मुळे देवस्थानाच्या ठिकाणी ते वापरू नये या पंकजा मुंडेंच्या सूचना
मंत्रालयात सिंगल प्लॅस्टिकचा उपयोग बंद केला -
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील लांडेवाडी आणि भोसरी midc हद्दीत ही पाणीचपाणी
सकाळी 10 वाजता काही मिनिटांसाठी झालेल्या पावसाने प्रशासनाची पोलखोल
दोन्ही ठिकाणि नाल्यांमुळे ही अवस्था आहे.
पावसाळी नियोजनाच्या नावाखाली बैठका आणि त्याच्या प्रेसनोट एवढंच सुरू दिसतंय.
बाकी अर्धा तास जोरात पाऊस आला की ही अवस्था होते.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील लांडेवाडी आणि भोसरी midc हद्दीत ही पाणीचपाणी
सकाळी 10 वाजता काही मिनिटांसाठी झालेल्या पावसाने प्रशासनाची पोलखोल
दोन्ही ठिकाणि नाल्यांमुळे ही अवस्था आहे.
पावसाळी नियोजनाच्या नावाखाली बैठका आणि त्याच्या प्रेसनोट एवढंच सुरू दिसतंय.
बाकी अर्धा तास जोरात पाऊस आला की ही अवस्था होते.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील लांडेवाडी आणि भोसरी midc हद्दीत ही पाणीचपाणी
सकाळी 10 वाजता काही मिनिटांसाठी झालेल्या पावसाने प्रशासनाची पोलखोल
दोन्ही ठिकाणि नाल्यांमुळे ही अवस्था आहे.
पावसाळी नियोजनाच्या नावाखाली बैठका आणि त्याच्या प्रेसनोट एवढंच सुरू दिसतंय.
बाकी अर्धा तास जोरात पाऊस आला की ही अवस्था होते.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील लांडेवाडी आणि भोसरी midc हद्दीत ही पाणीचपाणी
सकाळी 10 वाजता काही मिनिटांसाठी झालेल्या पावसाने प्रशासनाची पोलखोल
दोन्ही ठिकाणि नाल्यांमुळे ही अवस्था आहे.
पावसाळी नियोजनाच्या नावाखाली बैठका आणि त्याच्या प्रेसनोट एवढंच सुरू दिसतंय.
बाकी अर्धा तास जोरात पाऊस आला की ही अवस्था होते.
पुणे: अवघ्या काही मिनिटे आलेल्या दमदार पावसामुळे हिंजवडी परिसरातील रस्ते पाण्याने तुंबले आहेत. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दुचाकी वाहन देखील वाहून गेले आहेत. पावसाळ्यापूर्वी हिंजवडी परिसरामध्ये ड्रेनेज लाईन आणि नालेसफाई योग्य पद्धतीने न झाल्याने आज आयटी पार्क हिंजवडी वाटर पार्क हिंजवडी झाल्याची वेळ ओढवली आहे.
Nitesh Rane: अभिनेता डिनो मोरिया (Dino Morea) प्रकरणावरून नितेश राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाला टार्गेट केलंय. उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो, अस म्हणत मंत्री नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांच्या अटकेचे संकेत दिलेत. डिनो मोरिया प्रकरणात होणाऱ्या कारवाया आणि एकंदरीत या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठीच एकत्रीकरणाची चर्चा असल्याचही राणे म्हणाले. डिनो मोरिया प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा मुलगा जेलची वारी करू शकतो, अशी माहिती असल्याचा मोठा दावा नितेश राणेंनी केला. डिनो मोरिया कोणासोबत बसायचा, कोणासोबत भावनिक आणि शारीरिक संबंध आहेत हे सगळ्यांना माहीत असल्याचही त्यांनी सांगितलं. राणे यांच्या आरोपाला आता ठाकरे काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नांदेड : शहरातील कैलाशनगर भागातील प्रतिभा निकेतन शाळेच्या छतावर अचानकपणे आग लागली. या आगीत शाळेतील जुने फर्निचर जळाले आहे. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी येत या आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग इतरत्र पसरली नाही. दरम्यान या आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे. आज सुट्टी असल्याने शाळेत कुणीही नव्हते, त्यामुळे आग लागल्याचा प्रकार लवकर लक्षात आला नाही.
रायगड : आयुष्यात माझ्या शिवसैनिकांच्या पायावर डोकं ठेवेन. परंतु, राष्ट्रवादी समोर कधीही नतमस्तक होणार नाही, असं वक्तव्य कर्जत खालापूर मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केले आहे. कर्जतमधील शिवसेनेचा संवाद मेळावा काल पार पडला. या संवाद मेळाव्यात ते काल जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. मी शिवसेनेचा शिवसैनिक आहे. आतापर्यंत मी अनेक संघर्ष केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी समोर मी कधीही झुकलेलो नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला राष्ट्रवादीशी लढायचं आहे, असे म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
बीड : मुलगी नकोय या मानसिकतेने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मुलगी जन्मला आली म्हणून बीडच्या माहेरवासिनीला चक्क 15 दिवस उपाशीपोटी डांबून तिचा छळ करण्यात आला. ही घटना सुसंकृत मानल्या जाणाऱ्या पुण्यात घडली. संधी मिळताच बाळाला घेऊन विवाहितेने बीड गाठले आणि बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
धुळे : शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वाहन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करत तब्बल 3 लाख 60 हजार रुपयांच्या 9 मोटारसायकलींसह दोन आरोपींना अटक केली आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. फिर्यादी राधेश्याम रमेश पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मालकीची बजाज पल्सर मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. यावरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान, शिरपूर येथे पेट्रोलिंग करत असताना दोन तरुण विनानंबरच्या पल्सर मोटारसायकलवर संशयास्पद हालचाली करताना आढळले. त्यांना थांबवून विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे दिनेश आपसिंग पावरा आणि विशाल सचिन भिल दोघेही रा. वाडी, ता. शिरपूर अशी सांगितली. त्यांच्याकडील मोटारसायकलची चौकशी केली असता ती वरील गुन्ह्यातील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. शिरपूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून चौकशीत त्यांनी शिरपूर व परिसरातून इतर मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार, वाघाडी-वाडी दरम्यानच्या कोरड्या नाल्यात लपवून ठेवलेल्या एकूण 9 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
मालेगाव : बकरी ईद सणाच्या निमित्ताने कुर्बाणी दिली जात असताना अवैध कत्तलखान्यांचे रक्तमिश्रित पाणी थेट मोसम नदीत सोडले जात असल्याने या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचे चित्र मालेगावात बघायला मिळत आहे. बेकायदेशीर कत्तलीचे नदीपात्रात येणारे रक्तमिश्रीत पाणी थांबविण्यासाठी कुठल्याही प्रकारची उपाययोजना मनपाकडून केली जात नसल्याने हे पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. गेल्या 15 वर्षांपासून या प्रश्नावर आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे हे आवाज उठवत आहे. मात्र, त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. मोसम नदीत रक्तमिश्रित पाण्यापासून होणारे जल प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
राज - उद्धव एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असताना मनसे पक्षाचे एकमेव माजी नगरसेवक करणार मनसे ला जय महाराष्ट्र
शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेचा नगरसेवक आपल्याकडे वळविण्यात यश
मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती
सोमवारी शिवसेना शिंदे गटात संजय तुर्डे करणार प्रवेश
संजय तुर्डे सोबत कलिना परिसरातील मनसेचे पदाधिकारी ही करणार शिवसेना शिंदे गटात प्रवेश
गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर होते. रात्री पोलीस रेस्ट हाऊस मध्ये मुक्कामी राहिल्यानंतर आज सकाळी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर हेलिकॉप्टरद्वारे ते नागपूरला रवाना झाले आहेत.
पुण्यात पावसाळा सुरूवात
शिवाजीनगर परिसरात पावसाला सुरुवात
सकाळपासून पुण्यात ढगाळ वातावरण
तुरळक पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज
संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात जंगली डुकरांचा हैदोस.
गावाच्या शेजारी असलेल्या वस्तीत घुसून नागरिकांवर डुकरांचा हल्ला.
हल्ल्यात एक दहा वर्षाच्या बालकासह चार जण गंभीर जखमी.
जखमींमध्ये बालकाची व एकाची प्रकृती चिंताजनक.
पातुर्डा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात पाठविण्यात आलं.
ज्येष्ठ शुद्ध भागवत एकादशीनिमित्त पंढरीत आज जवळपास चार लाख भाविकांनी गर्दी केल्याने पंढरपूर ओवर पॅक झाले आहे . आज झाल्या पहाटेपासून चंद्रभागा स्नान आणि विठुरायाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे . विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग चंद्रभागा तीरावरील सारडा भवन च्या पुढे पोचली असून देवाच्या दर्शनाला नऊ ते दहा तास एवढा वेळ लागत आहे. तर मुखदर्शनासाठी देखील चार ते पाच तासांचा वेळ लागत आहे. आषाढीपूर्वी मोठ्या संख्येने भाविक विठ्ठलाच्या दर्शनाला आले असून सध्याची संपत आलेली उन्हाळी सुट्टी आणि एकादशी यामुळे पंढरपूरला यात्रेचे स्वरूप आले आहे . महाद्वार, पश्चिमदार, प्रदक्षिणामार्ग, चंद्रभागा नदी या भागात भावी मिळाली असेल ज्यांना देवाच्या पायाचे दर्शन मिळू शकत नाही ते नामदेव पायरी आणि मंदिर कळसाचे दर्शन घेताना दिसत आहेत.
चिपळूण कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात संरक्षक कोसळल्याने रस्ता खचण्याचा धोका.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटातली घटना.
रस्ता खचल्यास घाटातील वाहतूक बंद होण्याची भीती.
खोल दरी असलेल्या ठिकाणी असलेली संरक्षक भीत कोसळून रेलिंग देखील निखळले.
घटनास्थळी केवळ दगड लावण्यात आल्याने अपघाताचा धोका.
प्रशासनाकडून घटनेकडे दुर्लक्ष ??? घटनास्थळी लावलेत केवळ दगड.
घाटातून मोठ्या प्रमाणात सुरू असते अवजड वाहतूक..... तत्काळ उपाययोजना करण्याची गरज.
यवतमाळच्या वणी येथे अनेक कोळसा खाणी आहे या कोळसा खाणीतून हजारो ट्रक कोळसा वाहतूक करतात अशातच एका कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. बघता बघता आगीत ट्रकची संपूर्ण कॅबिन जळून खाक झाली. ही घटना ब्राह्मणी गावाजवळ घडली. चालकाने प्रसंगावधान राखल्याने पुढील अनर्थ टळला. ट्रकची वायरिंग शॉर्ट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही .
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे म्हणून गिरगाव मध्ये बॅनर बाजी
परप्रांतीयांचे महाराष्ट्र मिळवायचे पूर्ण होण्याआधी एकत्र या आणि मराठी माणसाला वाचवा, 8 करोड मराठी जनता दोघे एकत्र येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे असा बॅनरवर आशय
आम्ही गिरगावकर यांच्याकडून ही बॅनर बाजी करण्यात आलेली आहे
बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज-उद्धव यांचे फोटो
Pune News : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल उभारण्यात येत आहे. त्यामुळे हा पूल ६ जून पर्यंत बंद ठेवण्यात येणार होता. मात्र मात्र, प्रत्यक्षात या पादचारी पुलाचे काम केवळ २० टक्केच पूर्ण झाल्याने महामेट्रोने १५ ऑगस्टपर्यंत पूल बंद ठेवण्याची मागणी वाहतूक पोलीस तसेच महापालिकेकडे केली आहे.या कामासाठी आता भिडे पूल आणखी दीड महिना बंद ठेवला जाणार आहे.
संभाजीनगरच्या दरोडा प्रकरणात मोठी अपडेट
'एन्काउंटरमध्ये मृत्यू झालेल्या आरोपी अमोल खोतकरनेच पहिली गोळी झाडली'
दरोड्याचा मुख्य सूत्रधार अमोल खोतकरच्या मैत्रीणीचा जबाब : सूत्र
एन्काऊंटरवेळी अमोलची मैत्रीण खुशी गाडीत सोबत होती
अमोलच्या मैत्रिणीचा जबाब पोलिसांसाठी महत्त्वाचा
अमोलच्याच मैत्रिणीचा जबाब पोलिसांना क्लीनचिट मिळवून देऊ शकतो
गडचिरोली : राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस काल गडचिरोली दौऱ्यावर होते. त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर रात्री गडचिरोलीतच मुक्काम केला. या मुक्कामादरम्यान त्यांनी गडचिरोली भाजप पदाधिकाऱ्यांचा क्लास घेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हेवेदावे दूर करून पक्ष संघटन मजबूत करण्याचे मंत्र दिल्याची माहिती आहे. यामध्ये भाजपचे आजी-माजी पदाधिकारी यांच्याशी फेस टू फेस चर्चाही त्यांनी केली.
विसाव्या शतकातील संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांच्या 25 व्या पुण्यतिथीनिमित्त आज पासून बीड मधील चाकरवाडी येथे सप्ताहास सुरुवात होत आहे.. तर उद्यापासून प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा होणार आहे.. ही कथा श्रावणासाठी चार लाख भाविक बसतील एवढा अडीच लाख स्क्वेअर फुटात वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलाय. या भव्य दिव्य मंडप व्यवस्थेची खास ड्रोन दृश्य.. दरम्यान सहा ठिकाणी 150 एकर मध्ये पार्किंगची व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने 240 पोलीस सात हजार स्वयंसेवक असणार आहेत.. आठ ते 14 जून दरम्यान दररोज दुपारी एक ते चार वेळी शिवमहापुराण कथा होणार आहे.
रायगडचा रोहा मधील कुंडलिका नदी संवर्धन येथे रायगड जिल्ह्यातील पहिल्या शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनी रोहा नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आला.या शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळ्याचे काही महिन्यांपूर्वी लोकार्पण झाले होते.आता त्याच जागेत रायगड, शिवनेरी, प्रतापगड व सिंधुदुर्ग या किल्ल्याच्या हुबेहूब प्रतिकृती सकारलेली रायगड जिल्ह्यातील पहिली शिवसृष्टी उभारण्यात आली आहे.यावेळी खा. सुनील तटकरे व मंत्री आदिती तटकरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवभक्त नागरिक उपस्थित होते.
बीड जिल्ह्यात मे महिन्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली.. मागील आठवडाभरात पावसाने विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांनी मशागतीची कामे करून पेरणी पूर्ण करून घेतलीय.. जिल्ह्यात बऱ्याच वर्षानंतर मृग नक्षत्रात खरिपाची पेरणी झालीय.. यंदा कापूस, सोयाबीन आणि तूर याच्या पेऱ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.. दरम्यान वेळेवर पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय.
देशासाठी महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या वाढलीय याच अनुषंगाने राज्याच्या आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यात कोरोना कक्षाची स्थापना करून तपासण्या करण्याचे निर्देश देण्यात आल्यानंतर परभणी जिल्ह्यात कोरोनाचा कक्ष सुरू करण्यात आला आहे परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात अँटी जेन तपासण्या केल्या जात आहे याच तपासण्या दरम्यान पुण्याहून परभणीत आलेल्या एका डॉक्टरला कोरोना ची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही कोरोनाचा नवीन व्हेरीयंट हा घातक नसुन याचे सिम्टमस हे नार्मल आहे परंतु नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे असे जिल्हा शल्य चिकित्सकांनी आवाहन केले आहे.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात सेवन गटातील आरोपी माजी नगराध्यक्षाचे पती असलेले विनोद उर्फ पिटू गंगणे यास पोलिसांनी न्यायालयाच्या आवारातून ताब्यात घेतलं. विनोद गंगणे यांनी न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. शुक्रवारी उशिरापर्यंत जामीन अर्जावर युक्तिवाद झाला. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अनेक दिवसांपासून फरार असलेल्या गंगनेला पोलिसांनी अटक केली. त्यामुळे ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 20 आरोपी अटकेत आहेत. तर अजूनही सतरा आरोपी फरार आहेत.
कृष्णा वेण्णेच्या संगमावर वसलेल्या आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मराठ्यांच्या राजधानीत 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्यासाठी 'मसाप च्या शाहूपुरी शाखेकडून निमंत्रण पाठवण्यात आला आहे आज स्थळ निवड समिती साताऱ्याला भेट देणार आहे. यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून समितीच्या सदस्यांचा सत्कार केला जाणारा असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर 99 साहित्य संमेलन साताऱ्यात हवं असा आग्रह देखील मंत्री शिवेंद्रराजे भोसले करतील आणि त्या नंतर समितीचे सदस्य रविवारी पुण्यात संमेलन स्थळाची घोषणा करणार आहेत.
कल्याणच्या लाल चौकी परिसरात तणावाचं वातावरण, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना प्रार्थनेची परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेकडून ‘घंटा नाद’ आंदोलन
हे आंदोलन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली वर्षानुवर्षे सुरू आहे.
आजच्या दिवशी मुस्लिम बांधव किल्ला परिसरात नमाज अदा करत असल्याने संभाव्य तणाव टाळण्यासाठी पोलिसांकडून किल्ल्याकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत.
लाल चौकी परिसरात पोलीस बॅरिगेड्स लावून आंदोलनकर्त्यांना थांबवण्यात येत आहे.
बकरी ईद आणि छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी एकाच दिवशी येत असल्याने बीड जिल्ह्यात 7 ते 20 जून पर्यंत मनाई आदेश लागू असणार आहे. या दरम्यान आंदोलने होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने मनाई आदेश लागू केले.. या काळात पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणे, मोर्चे, आंदोलने, शस्त्रे बाळगणे आक्षेपार्ह फलक आणि घोषणाबाजी यास बंदी राहील... आदेश मोडणाऱ्यावर प्रशासनाने कारवाईचा इशारा दिला आहे.
गडचिरोली : राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीत मुक्कामी आहेत. इथे मुक्कामी राहणारे कदाचित ते पहिलेच मुख्यमंत्री असून त्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री असताना ते दुसऱ्यांदा नक्षलग्रस्त गडचिरोलीत मुक्कामी आहे. यापूर्वी 2019 च्या निवडणुकीदरम्यान ते गडचिरोली येथे मुक्कामी राहिले होते. गडचिरोली पोलीस दलाच्या रेस्ट हाऊस मध्ये त्यांचा मुक्काम असून उद्या कुठलाही कार्यक्रम गडचिरोली येथे आयोजित नसताना ते गडचिरोलीत मुक्कामी असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मोर्चे बांधणी आणि पक्ष अंतर्गत असलेली गटबाजी दूर करण्यासाठी तर हा मुक्काम नाही ना असे बोलले जातोय.
धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली होती. पण या घोषणेला 5 महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्यापही शेतकऱ्यांना बोनस मिळालेला नाही. राज्यातील 5 लाख 48 हजार 782 शेतकरी आहेत जे बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. गोंदिया जिल्ह्यातही 1 लाख 52 हजार 313 शेतकरी आहेत जे बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून शासनाकडून प्रतिहेक्टर बोनस दिला जातो. यावर्षी राज्य सरकारने धानाला प्रतिहेक्टर 20 हजार रुपये बोनसची घोषणा केली. यासाठी दोन हेक्टरपर्यंतची मर्यादा निश्चित केली. मात्र ही घोषणा करून आता 5 महिन्यांचा कालावधी लोटला मात्र, अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून शासनाने लवकरात लवकर बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कॅनडाच्या पंतप्रधानांचे जी7 देशाच्या सम्मेलनाचं निमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कॅनडाचे पंतप्रधान मार्क जे कार्नी यांचा फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मार्क जे कार्नी यांचं विजयासाठी केलं अभिनंदन
कनानास्किस इथं या महिन्यात जी 7 सम्मेलन होणार आहे
मनसेच्या उपाध्यक्षांची आज बैठक
सकाळी ९ वाजता ही बैठक शिवतीर्थ या ठिकाणी पार पडणार
राज ठाकरे यांच्या उस्थितीत बैठक पार पडेल
राज-उद्धव एकत्र येण्याच्या चर्चा राजकारणात रंगल्या असतानाच राज ठाकरे यांच्याकडून बैठकीचं सत्र सुरू
राज ठाकरे यांनी नव्याने दिलेल्या नियुक्त्या नंतर राज ठाकरे आढावा आणि कानमंत्र देताना पाहयाला मिळत आहे
या कानमंत्रात युतीचे सूर येणार का? याकडे लक्ष
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी; एका क्लिकवर...