Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् फक्त एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking Updates: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी विविध अपडेट्स समोर येत आहे. पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी अद्यापही काश्मीरच्या जंगलात लपून बसल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून पाकिस्तानविरोधात...More
राज्यातील काही भागात पुढील ३-४ दिवसात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा
उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
विदर्भात काही भागात ५०-६० किमी प्रति तासाने वेगाने वारे वाहण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
- नाशिकमध्ये उष्माघाताने शेतकर्याचा मृत्यू, शेतात काम करतांना शेतकऱ्याला आली होती भुरळ...
- नाशिक जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, कडक उन्हामुळे नाशिककर हैराण...
- नाशिक जिल्ह्यातील शेवगे दारणा येथील घटना, जगदीश रघूनाथ कासार वय ४५ असे मृत शेतकऱ्याचे नाव......
- शेतात पाइपलाइन दुरुस्त करताना शेतकर्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना...
- शेतकऱ्याला शेतात काम करताना चक्कर आल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी तपासून केले मृत घोषित ...
- नाशिक जिल्ह्यात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार, नाशिककरांना जाणवतेय उष्णतेची तीव्र झळ
नाशिकच्या मराठा हायस्कूल नीट परीक्षा केंद्रावर वेळेत परीक्षा होणार सुरू...
- नीट परीक्षेचा वेळेत सुरू व्हावी यासाठी बायोमेट्रिक बाकी असलेल्या विद्यार्थ्यांचे ब्लॉक मध्येच होणार तपासणी
- नीट परीक्षा देण्यासाठी बायोमेट्रिक केल्यानंतरच विद्यार्थ्यांना दिला जात होता प्रवेश...
- परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांचे परीक्षा हॉलमध्ये होणार बायोमेट्रिक...
- ठरलेल्या वेळेत परीक्षा होणार सुरू...
पाकिस्तानच्या दोन मोठ्या नेत्यांना भारताचा झटका
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे ट्विटर खात भारतात बंद
बिलावल भुट्टो झरदारीने कालच भारताबद्दल ओकली होती गरळ
पाकिस्तानच्या पंतप्रधानच खात दोन दिवसांपूर्वीच केलं होत बंद
नाशिक : वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा महत्त्वाची मांडली जाते आणि आज संपूर्ण राज्यघरामध्ये नीट परीक्षा दोन ते पाच या वेळेमध्ये पार पडत आहे. नाशिकच्या मराठा हायस्कूल या ठिकाणी 480 विद्यार्थी नीट परीक्षा देणार आहेत. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संपूर्ण तपासणी करून त्यांना परीक्षा हॉलपर्यंत प्रवेश दिला जात आहे. हातातील दोरे, पाण्याच्या बाटलीचे स्टिकर आणि पायातील चप्पल देखील काढून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आत सोडले जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्रावर नजर असणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी उन्हापासून बचाव व्हावा यासाठी परीक्षा केंद्रावर प्राथमिक उपचार साधनसामुग्री देखील ठेवण्यात आली आहे.
हिंगोली : येथील तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचले आहे. तापमान वाढल्यामुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढते तापमान आणि विजेची मागणी वाढल्यामुळे विद्युत रोहित्र गरम होत आहे. परिणामी अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे महावितरणच्या वतीने आता विद्युत रोहित्राला सुद्धा माणसाप्रमाणेच कुलरचा गारवा दिला जातोय. हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी महावितरणच्या वतीने विद्युत रोहित्राला कुलरचा गारवा देत रोहित्राचं तापमान स्थिर ठेवून वीजपुरवठा केला जातोय.
मनसेच्या तीव्र विरोधानंतर उल्लू ॲप कडून मनसेची जाहीर माफी मागितली
मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्या शिस्ट मंडळाकडून कडून आंबोली पोलीस स्टेशनमध्ये उल्लू अँप चा विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
या तक्रारीनंतर उल्लू ॲप कडून मेल द्वारे मनसेची जाहीर माफी मागितली आहे.
ओटीपी प्लॅटफॉर्म उल्लू चैनल वरील हाऊस अरेस्ट या एजाज खान नावाच्या वादग्रस्त कलाकाराकडून करण्यात येणाऱ्या अश्लील कार्यक्रमास महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्सोवा यांनी तीव्र विरोध करण्यात आला होता,
यानंतर सदर उल्लू टीव्ही कडून हाऊस अरेस्ट हा कार्यक्रम स्थगित करून सर्व कंटेंट ओटीपी प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला व मनसेची जाहीर माफी मागितली आहे.....
Crime News : दिल्लीहून शिर्डीला येणाऱ्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने एअर होस्टेसचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात हा प्रकार घडला असून विमान शिर्डीत उतरल्यानंतर एअरलाइन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राहाता पोलिसांनी आरोपी प्रवासी संदीप सुमेर सिंग याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.. हा प्रवाशी लष्करी जवान असल्याचे पोलिस तपासात समोर आले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे...
माजलगाव जवळील खानापुर येथे बापानेच केली मुलाची हत्या
रोहित (काळु) गोपाळ कांबळे या 20 वर्षीय तरुणाची हत्या.
दारू पिऊन त्रास देत असल्याने गोपाळ विठ्ठल कांबळे नामक बापानेच केली हत्या,राहत्या घरातच खोऱ्याचा दांडा डोक्यात घालून खुन
माजलगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल
आरोपी घटनास्थळाहुन थेट पोलिस ठाण्यात झाला हजर
खासदार संजय राऊत यांनी घेतली शरद पवार यांची भेट
संजय राऊत यांच्याकडून शरद पवार यांना 'नरकातला स्वर्ग' पुस्तक भेट
संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचं 17 मे रोजी प्रकाशन
शरद पवार या सोहळ्याला राहणार उपस्थित
मुंबई गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी
उन्हाळी सुट्टीसाठी हजारो पर्यटक कोकणाच्या दिशेने दाखल
मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर शहरात प्रचंड वाहतूक कोंडी
ममाणगाव ते मुगवली फाटा परिसरात वाहनांच्या 3 किमी पर्यंत रांगा तर तिकडे इंदापूर शहरात सुधा मोठी वाहतूक कोंडी
उन्हाळी सुट्टीकरिता कोकणात आलेल्या राज्यातील पर्यटकांना करावा लागतोय वाहतूक कोंडीचा सामना
Beed News : मागील 115 दिवसात बीड जिल्ह्यातील 90 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबायचं नाव घेत नाहीय. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटामध्ये शेतकरी कर्जाच्या ओजाखाली दबत आहे.
यातूनच शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असल्याच प्रमुख कारण सांगितले जाते. दरम्यान एवढी गंभीर परिस्थिती असतानाही आत्महत्याग्रस्त कुटूंबियांच्या वारसांना शासकीय मदत वेळेवर मिळत नाही..
शेतकरी आत्महत्या सन 2025
जानेवारी - 19
फेब्रुवारी - 25
मार्च - 27
एप्रिल - 19
एकूण - 90
Latur News : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या वतीने वैद्यकीय प्रवेशासाठी आज 'नीट'ची परीक्षा घेण्यात येणार आहे.. लातूर जिल्ह्यातून वीस हजार 801 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.. जिल्ह्यात51 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत असून, प्रत्येक परीक्षा केंद्रासाठी एक केंद्रप्रमुख आणि एक उपकेंद्रप्रमुख देण्यात आला आहे. तसेच 60 निरीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आलीय. पहिल्यांदाच जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या नेतृत्वात ही परीक्षा होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या परीक्षेची जय्यत तयारी केलीय. दरम्यान, ही परीक्षा निर्वीघ्नपणे पार पाडण्यासाठी लातूर पोलिस दलाकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक पोलीस अधिकारी आणि इतर पोलिस अमलदारांचा बंदोबस्त देण्यात आला असून, याकरिता जिल्ह्यातील पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, 60 पोलीस अधिकारी, 391 पोलीस अंमलदार आणि 300 होमगार्ड यांची तैनाती करण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिलीय.
Beed News : बीड जिल्ह्यात भाजपाच्या तालुकाध्यक्ष आणि मंडळ अध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार स्वतः पंकजा मुंडे यांनी केला. परंतु आष्टी मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी मात्र अद्याप झालेल्या नाहीत.
गत काही दिवसात भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्यात सुप्त संघर्ष पाहायला मिळतोय.. या संघर्षामुळेच या निवडी देखील लांबल्याची चर्चा आहे.. आजवर बीड जिल्ह्यातील भाजपमध्ये पंकजा मुंडे यांचा शब्द अंतिम असायचा परंतु प्रथमच आमदार सुरेश धस यांनी थेट त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने आता पदाधिकाऱ्यांच्या निवडी देखील रखडल्या आहेत.
आता या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये मुंडे आणि धस यांच्यात कोण बाजी मारतो. यावरूनच पक्ष नेमका कोणाच्या पाठीशी आहे. हे देखील स्पष्ट होऊ शकणार आहे. बीड जिल्ह्यात भाजपाचे 24 मंडळ अध्यक्ष जाहीर झाले. त्यापैकी 20 मंडळ अध्यक्षांची निवड जाहीर झाली. मात्र आष्टी मतदार संघात तांत्रिक अडचणीमुळे या निवडी झाल्या नसल्याचं जिल्हाध्यक्षांनी म्हटलं. तर पंकजा मुंडे आणि भाजपाचे वरिष्ठ नेते या निवडी लवकरच जाहीर करतील असे म्हणत मुंडे धस वादावर अधिकचे बोलणे जिल्हाध्यक्षांनी टाळले..
मागील सहा दिवसांपासून भंडाऱ्यात वादळीवारा आणि गारपीटसह अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वादळामुळं हातातोंडाशी आलेलं अनेक शेतकऱ्यांचं उन्हाळी भातपीक जमीनदोस्त झालेलं आहे. वादळी वारा आणि गारपीटमुळं भातपिकाची लोंबी गळाली असून शेतशिवारामध्ये पाणी साचलेलं आहे. यामुळं भात पिकाचं उत्पादन घटणार आहे. या सोबतचं बागायती शेतकऱ्यांनाही या अवकाळीचा फटका बसला असून शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला आहे. महसूल विभागानं प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतबांधावर जाऊन तातडीनं नुकसानीचे पंचनामे करावे आणि राज्य सरकारनं त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आ. संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी दाखल....
संग्राम जगताप यांच्या घरी अजित पवार सांत्वनपर भेटीला...
आ. संग्राम जगताप यांचे वडिल माजी आमदार अरुण जगताप यांचे दोन दिवसांपूर्वी झाले निधन...
अजित पवार यांच्यासह आ.काशीनाथ दाते, आ. शिवाजीराव कर्डीले यांची जगताप यांच्या घरी उपस्थिती...
धोडिया समाजाच्या समृद्ध परंपरेच पहिलं राज्यस्तरीय सांस्कृतिक संमेलन बोईसर खैरे पाडा क्रांतिवीर बिरसा मुंडा मैदानात आज आयोजित करण्यात आलं आहे. 2005 साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय आदिवासी धोडिया समाज मंडळाच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने हे संमेलन 4 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत पार पडणार आहे.निसर्ग पूजक धोडिया समाजाची निसर्गाशी नाळ जोडलेली आहे. पारंपरिक सण-समारंभ, वेशभूषा आणि वाद्ये ही त्यांच्या संस्कृतीची ओळख आहे.‘तुरथाळी’ सारख्या नृत्यांमधून आणि सुतारकामातील नक्षीकामातून ही परंपरा आजही जिवंत आहे.समाजाच्या तरुणांसाठी रोजगार व शिक्षणाच्या संधी निर्माण करण्यासाठी मंडळ कार्यरत आहे. मात्र अद्यापही महाराष्ट्रात या समाजाला आदिवासी मान्यता मिळालेली नाही.पालघर, मुंबई, गुजरात, नवसारी, दादरा नगर हवेली येथून पारंपरिक वेशात समाजबांधव मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी होणार आहेत.
पालकमंत्री विखे पाटील आज राजूर गावाला भेट देणार..
अकोले तालुक्यातील राजूर गावात काविळचा प्रादुर्भाव ...
काविळने घेतले दोन बळी...
प्रियंका शेंडे ( वय 22 ) आणि मिझबा शेख ( वय 10 ) यांचा काविळने झालाय मृत्यू ...
गावातील 140 हून अधिक नागरिकांना काविळचा प्रादुर्भाव...
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज स्वत: राजूरला भेट देऊन घेणार आढावा...
गेल्या 15 दिवसांपासुन काविळचे थैमान...
ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात रोष...
उद्यापासून महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच 57 व दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन
रायगड जिल्ह्यातील माणगाव मध्ये अधिवेशनाचे आयोजन
50 हजार एसटी कर्मचारी संघटनेतील कर्मचारी राहणार उपस्थित
महत्वाच्या प्रमुख चार मागण्यांसाठी सरकारचे वेधणार लक्ष
उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याची एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षांची माहिती.
आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास हा चित्रपटातुन कळतोय ही बाब दुर्दैवी आहे आणि याचे आज आम्हाला दुःख वाटते असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हंटलेय. सांगली मधील विसावा मंडळाच्या शिवोत्सव २०२५ या सोहळ्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हे विधान केले. काही महिन्यापूर्वी 'छावा'चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यातून मग आपल्या नवीन पिढीला छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम कळला हे एकप्रकारे खेदाची बाब आहे असे शिवेंद्रराजे भोसले म्हणालेत.
नांदेडचे तापमान 44 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचल्याने त्याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. काढणीनंतर साठवलेला कांदा उष्णतेने नासुन जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान होतंय. तर बाजारात कांदा विक्रीला न्यावा तर कांद्याला अवघा पाचशे ते सातशे रुपये क्विंटल इतकाच बाजार भाव मिळतोय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून कांदा उत्पादनासाठी केलेला खर्च ही निघण अशक्य झाल्याचे शेतकऱ्याने स्टार महाराष्ट्र न्यूज वृत्त वाहिनी चे पत्रकार तानाजी शेळगावकर यांना बोलताना सांगितलंय.
चे तापमान 44 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचल्याने त्याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. काढणीनंतर साठवलेला कांदा उष्णतेने नासुन जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान होतंय. तर बाजारात कांदा विक्रीला न्यावा तर कांद्याला अवघा पाचशे ते सातशे रुपये क्विंटल इतकाच बाजार भाव मिळतोय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून कांदा उत्पादनासाठी केलेला खर्च ही निघण अशक्य झाल्याचे शेतकऱ्याने स्टार महाराष्ट्र न्यूज वृत्त वाहिनी चे पत्रकार तानाजी शेळगावकर यांना बोलताना सांगितलंय.
गोकुळचे दूध उद्यापासून दोन रुपयांनी महागणार
पुणे आणि मुंबईत म्हैस दूध प्रतिलिटर 74 रुपये दर होणार
तर कोल्हापूरसह उर्वरित महाराष्ट्रात म्हैस दूध 68 रुपये प्रतिलिटर होणार
गायीच्या दूध दरात देखील प्रति लिटर दोन रुपयांनी केली वाढ
मुंबई आणि पुण्यामध्ये गाईचे दूध प्रति लिटर 58 रुपये तर कोल्हापूरचं उर्वरित महाराष्ट्रात गाईचे दूध प्रति लिटर 50 रुपये
भंडाऱ्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन तोडून भाजपात प्रवेश केला. भाजपाचे आमदार परीणय फुके यांच्या नेतृत्वात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे भंडारा तालुकाप्रमुख, भंडारा शहर प्रमुख, भंडारा समन्वयक, भंडारा विभाग प्रमुख, वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्यासह असंख्य कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीपासून ठाकरेंच्या शिवसेनेची आउटगोइंग वाढली असून पक्षासाठी चिंतेचा विषय आहे.
पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात अलर्ट देण्यात आला होता.. मात्र जगभरातील भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा संस्थानला साई मंदिर उडवून देण्याचा धमकीचा मेल आलाय.. साई मंदिर भिषण पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी या मेलद्वारे देण्यात आलीये.. धमकीचा मेल साई संस्थानला प्राप्त झाला असून धमकीच्या मेलनंतर साई संस्थानसह पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे.
देश पातळीवरील नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे घेण्यात येणारी "वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा" अर्थात NEET होत आहे , या परीक्षेसाठी देशातील ५५२ तर इतर १२ देशात १४ अशी ५६६ शहरातील ५ हजार केंद्रावर ही परीक्षा होत आहे. दुपारी २.०० ते ५.०० यावेळेत ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार असून देशभरात प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. यावर्षी या परीक्षेसाठी २३ लाख ३३ हजार २९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.एकूण ७२० गुणांसाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेनंतर वैद्यकिय प्रवेशाचा मार्ग खुला होतो त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा या परीक्षेसाठी बघायला मिळते.
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी घेतली भेट
राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी अमित शहा यांच्या निवासस्थानी दिल्ली येथे घेतली भेट
लोणी बुद्रुक जिल्हा अहिल्यानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरणासाठी
एन.सी.डी.सी. लोन मुळे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरानगर या कारखान्याचे नूतनीकरण
नवीन गाळप हंगाम सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रमुख उपस्थिती लाभावी अशी विनंती केली आहे
अमित शहा यांनी देखील दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याबद्दल सहमती दर्शवली आहे
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, पाहा एका क्लिकवर...