- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यासह, देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: संतोष देशमुख हत्या प्रकरण, महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील गोंधळ या महत्त्वाच्या घडामोडी राज्यात, तर विदेशात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निर्णय चर्चेचा विषय ठरत आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra 4th February Breaking News Live Updates: राज्यासह, देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये एका क्लिकवर आपल्याला पाहता येणार आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरण, महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील गोंधळ...More
Solapur News :उजनी धरणावर होणारे जल पर्यटन स्थळ रद्द करावे, यासाठी धरणग्रस्त शेतकरी कुटुंबांसह उजनी धरणात आंदोलन करत आहेत. एक तासापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उजनी धरणावर मंजूर केलेले नियोजित जल पर्यटन केंद्र रद्द करण्याच्या मागणीसाठी धरणग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहेत.
CM Devendra Fadnavis : अमेरिकेचे भारतातील महावाणिज्यदूत माईक हँकी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेघदूत या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी हँकी यांनी दावोस येथील गुंतवणूक करारांच्या यशासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केले.
BMC Budget 2025 : आज आशिया खंडातील सर्वात मोठ्या महापालिकेचे बजेट जाहीर झालं आहे. महापालिका दिवाळखोरीत निघाली आहे हे स्पष्ट झालं आहे. कारण यंदाचे आकडेच सांगत आहेत. आता पालिकेला आपल्याकडे ज्या ठेवी आहेत त्या तोडण्याची वेळ आली आहे. 2 लाख 32 हजार 400 कोटी रुपयांचे वर्क ऑर्डर केल्या आहेत मात्र देण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही आता ठेवी तोडायची वेळ यांच्यावर आली आहे.
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी चेतन चंद्रकांत अहिरे यांची ही रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, भारतीय संघ, भारतीय निवडणूक आयोग, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी या याचिकेतील प्रतिवादी आहेत. निवडणुकीत शेवटच्या क्षणाला आणि मतदानाची अधिकृत वेळ संपल्यानंतरही मतदानाच्या प्रमाणापेक्षा वाढलेल्या टक्केवारीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
शिवाय, अधिकृत वेळ संपल्यानंतर उपस्थित असलेल्या मतदारांना वाटण्यात आलेले पूर्व-क्रमांकित टोकन उघड न करणे, निवडणूक आयोग त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर या विसंगतींबद्दल तपशीलवार डेटा जाहीर करण्यात अपयशी ठरणे आणि त्यांच्याकडे संबंधित डेटा नसल्याची लेखी प्रतिज्ञा देणे गंभीर आहे.
या चुकांमुळे ईव्हीएमद्वारे घेतल्या जाणाऱ्या निवडणूक प्रक्रियेची सुरक्षा, अचूकता, विश्वासार्हता आणि पडताळणीबाबत गंभीर शंका निर्माण होत असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.
Maharashtra News : मंत्रालयातील 'फेस रिडिंग' एफआरएस प्रणालीचे पडसाद राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकित उमटण्याची शक्यता
मंत्रालयातील 'एफआरएस' प्रणालीने मंत्री आणि आमदारही त्रस्त
एफआरएस प्रणालीचा प्रशासकिय अधिकार्यांनाही फटका
अनेक अधिकारी कॅबिनेट बैठकिसाठी उशिरा आल्याने मंत्र्यांची झाली पंचायत
एफआरएस प्रणालीमुळे मंत्रालयात प्रवेश न मिळाल्याने नागरिकांची मंत्रालयाबाहेर मोठी गर्दी
Pune News : पुण्याच्या देहूतील भंडारा डोंगरावर नामदेव शास्त्री महाराजांचे कीर्तन येत्या 7 फेब्रुवारी ला होणार आहे. मात्र हे कीर्तन रद्द करावे, अशी मागणी अखिल मराठा समाजाने भंडारा डोंगर सप्ताह समितीकडे करण्यात आलीये. भंडारा डोंगर मंदिर समिती याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष आहे. या मागणीला दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची किनार आहे. भंडारा डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताह सुरुये, या सप्ताहात शास्त्री महाराजांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलंय. बीड मधील परिस्थिती पाहता आता भंडारा डोंगर सप्ताह समिती काय निर्णय घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. संस्थान उद्यापर्यंत याबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहे. दुसरीकडे मराठा समाजाने मात्र हा कीर्तन सोहळा संस्थानने रद्द केल्याचा दावा केलाय.
Bhiwandi News : भिवंडी महानगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बी एन एन कॉलेज ते वराळदेवी तलाव अशा तीन किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेत प्रथम व द्वितीय पारितोषिक पटकावणाऱ्या विध्यार्थ्यांना रोख रक्कम देण्यात आली.
Pune News : पुण्याच्या देहूतील भंडारा डोंगरावर नामदेव शास्त्री महाराजांचे कीर्तन येत्या 7 फेब्रुवारी ला होणार आहे. मात्र हे कीर्तन रद्द करावे, अशी मागणी अखिल मराठा समाजाने भंडारा डोंगर सप्ताह समितीकडे करण्यात आली आहे. भंडारा डोंगर मंदिर समिती याबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचं लक्ष आहे. या मागणीला दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची किनार आहे. भंडारा डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताह सुरुये, या सप्ताहात शास्त्री महाराजांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलंय. बीड मधील परिस्थिती पाहता आता भंडारा डोंगर सप्ताह समिती काय निर्णय घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. संस्थान उद्यापर्यंत याबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहे. दुसरीकडे मराठा समाजाने मात्र हा कीर्तन सोहळा संस्थानने रद्द केल्याचा दावा केला आहे.
Beed news : पोलीस अधीक्षकांकडून निलंबित पोलिस कर्मचारी तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. वाळूचे ट्रॅक्टर पकडून कारवाई न करता सोडून दिल्याचा ठपका ठेवत बीडच्या गेवराई पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांना पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी निलंबित केले होते. मात्र, यातील एक कर्मचारी अशोक हंबर्डे हे तीन दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांचा फोनही बंद असल्याने कुटुंबीय हवालदिल आहे.
Buldhana News : बुलढाण्यातील उद्विग्न भाजपाच्या बूथ प्रमुखाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो सांगतोय की, 'बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात नाफेडअंतर्गत धान्य खरेदीत मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. मी स्वतः भाजपचा बूथ प्रमुख असून मला सुरुवातीला वाटले होते की ,भाजप हा सर्वसमावेशक पक्ष आहे. मात्र भाजपा शेतकरी विरोधी पक्ष आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजपच्या सदस्य नोंदणीत सहभागी होऊ नये, भाजपचा सदस्य होऊ नये', असं वक्तव्य करणारा चिखली तालुक्यातील भाजपच्या बूथ प्रमुखाचा व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर विश्वनाथ वानखेडे असे या भाजपच्या बूथप्रमुखाचं नाव असून त्यांनी चिखली तालुक्यात नाफेड अंतर्गत सुरू असलेल्या धान्य खरेदीत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचं म्हटलं आहे.
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 'धर्मोपासक' पुरस्कार प्रदान करण्यात आला. सद्गगुरू सेवा परिवार ट्रस्टच्या वतीने केंद्रीय मंत्री गडकरी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजकारण हे राष्ट्रकारण, समाजकारण आणि धर्मकारण आहे,आणि राजसत्तेला धर्मगुरूंचा आशीर्वाद असतो, त्यामुळे या पुरस्कारामुळे उत्तम कार्य करण्याचा आशीर्वाद मिळत असल्याचे नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
नागपूरमध्ये दोन वेगवेगळ्या घटनेत विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचा प्रकार पुढे आला आहे
पहिल्या घटनेत आईने मोबाईलसाठी रागावल्याने पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनुष्का लांगडे या 17 वर्षीय विद्यर्थिनीने आत्महत्या केली
तर दुसऱ्या घटनेत जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अभ्यासाच्या तणावातून प्रणव बोरकर या 15 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली.
दोन्ही घटनेत पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Jalana News : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आलापूर गावात आंतरधर्मीय विवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या आई-वडिलांनी मुलीसह तिच्या 4 वर्षाच्या मुलाला साखळदंडांनी घरातच दाबून ठेवल्याचं उघड झालं आहे. आपल्या बहिणीला भेटण्यासाठी माहेरी गेलेल्या या महिलेस घरच्यांनी घरात कोंडून ठेवलं होतं, पूर्वीच्या कौटुंबिक कलाहामुळे पतीने याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली न्यायालयाचे पीडित महिलेला हजर करण्याचे आदेश दिले असता, माहितीनुसार पोलिसांनी घरी जाऊन पाहणी केली असता सदर महिला साखळदंडात बांधल्याचं निदर्शनास आलं. यावेळी पोलिसांनी सदर विवाहितेला ताब्यात घेऊन छत्रपती संभाजीनगर येथील तिच्या पतीच्या स्वाधीन केलं.
Beed News : नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज आणि देशमुख कुटुंबीयांची आज मस्साजोग गावात भेट होणार आहे. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट झाल्यानंतर आज नारायणगडाचे महंत नामदेव शास्त्री आणि देशमुख कुटुंबीयांची भेट होणार आहे. रविवारी भगवानगडावर जाऊन देशमुख कुटुंबाने महंत नामदेव शास्त्री यांना काही पुरावे सादर केले. यानंतर शास्त्री यांनी भगवानगड देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असल्याचं जाहीर केले. यानंतर देशमुख कुटुंबाने नारायण गडावर जाऊन दर्शन घेतले. मात्र काही नियोजित कार्यक्रमामुळे महंत शिवाजी महाराज यांची भेट झाली नाही. परंतु आज शिवाजी महाराज आणि धनंजय देशमुख वैभवी देशमुख आणि देशमुख कुटुंबाची मस्साजोग गावात ही भेट होणार आहे. या भेटीदरम्यान महंत शिवाजी महाराज आणि देशमुख कुटुंब काय भूमिका घेते? हे पाहणं महत्त्वाचं असेल.
Sharad Pawar NCP Party State Secretary Death : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सचिव श्रीहरी काळे यांचे अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघाती निधन झाले आहे. माजलगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर उभे असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत काळे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. श्रीहरी काळे आपल्या मित्रांसह लग्न समारंभ आटोपून घरी येत असताना ही घटना घडली आहे. श्रीहरी काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार गटात कार्यरत आहे. त्यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. तर अज्ञात वाहनधारका विरोधात गुन्हा नोंदवून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Pimpari News : पिंपरी चिंचवड शहरात बुलेटच्या सायलेन्सरमधून कर्णकर्कश आवाज काढणाऱ्यांच्या कानाखाली मनसेने फटाके फोडलेत. बुलेटराजांनी शहरात हैदोस माजवला आहे, या रोडरोमिओंचा उच्छाद काही केल्या कमी होत नाहीये. मग शेवटी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले आणि समर्थकांनी या बुलेटराजांना धडा शिकवायचं ठरवलं. महाविद्यालयीन परिसरात बुलेटचे फटाके फोडणाऱ्यांनापकडून त्यांच्या कानाखाली फटाके फोडले. बुलेटराजांची मस्ती उतरवल्यानं सर्व सामान्यांमधून मनसेचे कौतुक होत असलं तरी मनसेने कायदा हातात घेणं ही चुकीचं आहे. खरं तर अशा बुलेटराजांचा बंदोबस्त पोलिसांनी लावणं अपेक्षित आहे. आशा आहे पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस बुलेटराजांवर योग्य ती कडक कारवाई करतील.
Dhananjay Munde News : मंत्री धनंजय मुंडे यांच्या आरोपावरील "प्रमा" जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्हा नियोजन समिती चौकशी समितीला सादर करणार आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्या आरोपावरील चौकशीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय समिती गठित केली. याच समितीला आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्हा नियोजन समिती या सगळ्या कामांच्या प्रशासकीय मान्यता प्रत देणार आहे. 30 जानेवारी रोजी पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीनंतर बीड जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत 2023-24 आणि 2024-25 या कालावधीत झालेल्या 877 कोटींच्या कामाच्या चौकशीसाठी त्रीसदस्य समिती स्थापन करण्यात आली. या समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतल्यानंतर दोन वर्षांच्या काळात झालेल्या सर्व कामाच्या प्रमा मागविल्या, त्या प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्हा नियोजन समिती चौकशी समितीला देणार आहे.
Mumbai Saki Naka Fire : मुंबईच्या साकीनाका परिसरात पाईपलाईन रोडवर असलेल्या दुकानाला भीषण आग लागली. सोमवारी संध्याकाळी पावणे नऊच्या सुमारास गारमेंट दुकानाला मोठे आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार ते पाच गाड्या घटनास्थळी दाखल होत तब्बल अर्धा तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगी मध्ये कोणतेही जीवित हानी झालेली नसून मात्र दोन दुकाने जळून खाक झाली. आग कशामुळे लागली या संदर्भात अधिक तपास अग्निशमन दलाच्या जवान आणि साकीनाका पोलीस करत आहेत.
Mumbai Crime News : महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आर्थिक फसवणुकीत आघाडीवर आहे.
महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात राज्यात 2,19,047 आर्थिक फसवणुकीचे गुन्हे नोंदवले गेले.
मुंबईत 51,873 प्रकरणे तर पुण्यात 22,059 प्रकरणे नोंदवली गेली.
मुंबई पुणे पाठोपाठ ठाणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, सोलापूर आणि इतर जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे तपासात समोर.
पुणे जिल्ह्यात दाखल गुन्ह्यांची संख्या 43 हजार 802 इतकी असून त्यातील 12 हजार 115 प्रकरणं पिंपरी-चिंचवडमधील आहेत.
तर फसवणुकीची रक्कम 3 हजार 291 कोटी 25 ला इतकी आहे
पुणे ग्रामीण भागात आर्थिक फसवणुकीमुळे झालेल्या नुकसानाचा आकडा 434 कोटी 35 लाख इतका आहे.
ठाणे जिल्ह्यात आर्थिक गुन्ह्याची तब्बल 35 हजार 388 प्रकरणं गेल्या वर्षभरात नोंद झाली आहेत.
यापैकी ठाणे शहरात 20 हजार 892, नवी मुंबईत 12 हजार 260 तर ठाणे ग्रामीणमध्ये 1236 प्रकरणांची नोंद झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात आर्थिक फसवणूक गुन्ह्यांमध्ये नुकसान झालेल्या रकमेचा आकडा 8 हजार 583 कोटी 61 लाख आहे.
मीरा भाइंदर आणि वसई-विरारमध्ये एकूण 11 हजार 754 आर्थिक फसवणुकीचे प्रकार नोंद झाले असून त्यातून 1431 कोटी 18 लाखांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.
तर मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात नागपूर शहरात आर्थिक फसवणुकीचे 11 हजार 875 गुन्हे नोंद झाले आहेत.
नागपूर ग्रामीणमध्ये हीच संख्या 1620 इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीतून नुकसान झालेली रक्कम 1491 कोटी 7 लाख इतकी आहे.
वसई : वसई पूर्वेतील मिठाघर येथील स्मशानभूमीजवळील पुलाजवळ एका दुचाकीचा तोल गेल्याने ती थेट 25 फूट खोल नाल्यात कोसळली. पुलाच्या कडेला रेलिंग नसल्याने हा अपघात घडला. अपघातग्रस्त दुचाकीवर दोन जण होते. ते पेट्रोल भरण्यासाठी जात असताना गाडी स्लिप झाली आणि थेट नाल्यात पडली. मात्र, नाल्यात पाणी आणि दलदल असल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि दोघेही सुदैवाने बचावले आहेत. मात्र, पालिकेने सुरक्षेसाठी रेलिंग बसवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Malegaon News : भाजप नेते किरीट सोमय्या आज बांग्लादेशी आणि रोहिंग्याविरोधात मालेगाव पोलिस ठाण्याला भेट देणार
मालेगाव पोलिस ठाण्यात मालेगावमध्ये अवैध राहणार्या 1000 बांग्लादेशी आणि रोहिंग्यांविरोधात पुरावे सादर करणार
यात त्यांची नावे, 300 कागदपत्र, जन्म प्रमाणपत्रे यांचा समावेश आहे
Pune News : दिवसेंदिवस जीबीएस फोफावत असल्यानं शुद्ध पाण्याबाबत सगळेच गांभीर्यानं विचार करतायेत. अशातच पिंपरी चिंचवड शहरात तेरा ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल समोर आला अन एकचं खळबळ उडाली. वैद्यकीय विभागाने जीबीएसची लागण झालेल्या रुग्णांच्या घरातील पाण्याच्या नमुने घेतले अन त्याचं परीक्षण राज्य आरोग्य प्रयोगशाळेतून करुन घेतलं होतं. मात्र पुन्हा त्याच ठिकाणचे नमुने पाणी पुरवठा विभागाने घेतले. ज्यातून वैद्यकीय विभागाचा अहवाल चुकीचा असल्याचं अन सर्व ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य असल्याचा दावा पाणी पुरवठा विभागाने केला. या दोन अहवालांमुळं पालिकेच्या वैद्यकीय आणि पाणी पुरवठा विभागातील समन्वयाचा अभाव दिसून आला. दुसरीकडे या दोन्ही अहवालांपैकी खरा कोणता मानायचा अन खोटा कोणता? असा मोठा संभ्रम शहरवासीयांमध्ये निर्माण झालाय. यानिमित्ताने पालिका आयुक्त शेखर सिंह यांचं या गंभीर बाबीकडे लक्ष नव्हतं का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking News Live Updates: राज्यासह, देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...