- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Breaking LIVE Updates: पनवेलमध्ये सख्ख्या भावाचा दगडाने ठेचून खून; आरोपी एका तासात पोलिसांच्या ताब्यात
Maharashtra Breaking LIVE Updates:देश-विदेशातील, गावा-खेड्यातील महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील, गावा-खेड्यातील महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर...MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकला, सध्या विद्यार्थ्यांची मानसिकता नाही; जयंत पाटलांची सरकारकडे मोठी मागणीराज्यातील अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात असून बळीराजाची पुण्यात, मुंबईत (Mumbai) असलेली लेकरंही व्याकुळ झाली आहेत. स्पर्धा परीक्षेची...More
पनवेल : शहर पोलीस ठाणे हद्दीत करंजाडे सेक्टर 7 परिसरात सख्ख्या भावाने भावाचाच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे ही गंभीर घटना घडल्यानंतर केवळ एका तासाच्या आत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या बिट मार्शल पथकाने प्रसंगावधान दाखवत आरोपीला ताब्यात घेतले. मृत दत्तु वाल्या काळे याचे चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. यावरून आरोपी नागेश वाल्या काळे (वय 28) याने दगडाने ठेचून भावाचा खून केला. यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी वाल्या काळेला पोलिसांनी अटक केली. प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
मालेगाव : तालुक्यातील माळमाथा करंजगव्हाण आणि अस्ताने परिसरात अतिवृष्टीमुळे झालेले शेतीपिकांचे नुकसान पाहण्यासाठी मंत्री दादा भुसे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. या भागात 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून, नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करत भुसे यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य जनतेचे झालेले नुकसानीची एनडीआरएफ च्या निकषानुसार शासनाकडून भरपाई दिली जाईल, असे आश्वासनही मंत्री भुसे यांनी दिले.दरम्यान, नुकसान पंचनामे शासनाकडे पोहोचत असून आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एकीकडे मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीने उध्वस्त झालाय त्याला धीर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून सर्वच मंत्रिमंडळ अधिकारी काम करत असताना ज्या शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषी विद्यापीठ आहेत त्याच परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राष्ट्रीय परिसंवादाच्या नावाखाली उधळपट्टी करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत कुलगुरूंवर कारवाई करण्याची मागणी एका पत्राद्वारे व व्हिडिओ सह याच विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य प्रवीण देशमुख यांनी थेट राज्यपालांकडे केली आहे.
धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेने आज धुळे शहरातील मोहाडी परिसरात एमडी ड्रग्सवर मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल 17 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी दोन संशयित आरोपींना एका कारसह ताब्यात घेण्यात आले आहे.
धुळे स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून ही कारवाई केली. धुळ्यात प्रथमच जप्त केलेला एवढ्या महागड्या एमडी ड्रग्सचा साठा नेमका कोणाकडे जाणार होता, हे अद्याप पर्यंत समजू शकलेले नाही... सदरची धुळे स्थानिक गुन्हे शाखेने केली असून कारवाईच्या तपासाअंती हे उघड होईल, अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली...
मुंबई ठाणे रायगड तीन जिल्ह्यांना हवामान विभागाकडून 27 28 आणि 29 सप्टेंबर दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी
रायगडला 28 सप्टेंबरला रेड अलर्ट
तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी 27 आणि 28 सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट पालघर जिल्ह्यासाठी 28 आणि 29 सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट
पुढील तीन ते चार दिवस मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी पालघर या जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज
सतीश उर्फ खोक्या भोसले याने एका तरुणाला बॅटने मारहाण केलेल्या प्रकरणात न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला
बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ याला बॅटने मारहाण केल्याचा प्रकार सोशल माध्यमावर व्हायरल व्हिडिओतून समोर आला होता
चकलांबा पोलिस ठाण्यात या प्रकरणी खोक्या विरोधात गुन्हा दाखल होता
दरम्यान आता बीड जिल्हा सत्र न्यायालयाने खोक्याला चार महिन्यानंतर जामीन मंजूर केला
एकीकडे मोठ्या दिमाखात शासन फळबागा लागवड करण्याच्या घोषणा करते. मात्र, शेतात फळ लागवड केल्यानंतर निसर्गाच्या लहरीपणामुळे अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही. ही परिस्थिती दरवर्षीची असल्याने शेतीसाठी काढलेले कर्ज फेडायची चिंता शेतकऱ्यांना सतावत असते. हीच परिस्थिती माण तालुक्यातील देवापूर येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यावर ओढावल्याने एक एकर उभ्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली आहे. दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या माणला फळबागांच्या पंढरीचे स्वप्न खुणावत आहे. अशा परिस्थितीत माणमधील शेतकरी शाश्वत पाण्याचा अभाव असल्याने भुसार पिके टाळत
अलीकडच्या काळात फळबागांकडे वळले आहेत. द्राक्ष, आंबा, सीताफळ, डाळिंब, पेरू, ड्रॅगन फ्रूट अशा फळबागा दुष्काळी पट्टयातील माळरानावर बघायला मिळतात. मात्र, निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या आड येत आहे. परिणामी फळबागा तोट्यात जाऊन कर्जबाजारी होण्याची वेळ येत आहे. देवापूर गावातील युवा शेतकरी दिलीप शामराव बाबर यांची एक एकर द्राक्ष बाग होती. यामध्ये सुपर सोनाका वाणाची द्राक्ष उत्पादित केली जात होती. द्राक्ष शेतीमधून चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र एक वर्ष उत्पन्न घेतले की दुसऱ्या वर्षात आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत होते. त्यातच लहरी निसर्ग, वातावरणातील बदल, महागाई, द्राक्षाचे कमी होणारे दर, वाढलेले औषधाचे भाव, आवाक्याबाहेर असलेले मजुरीचे दर, वाढता उत्पादन खर्च या कारणामुळे द्राक्ष शेती तोट्यात जात आहे. यामुळे दर वर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत होते. या सर्व परिस्थितीमुळे बागेसाठी काढलेले कर्ज भरणे सुद्धा मुश्कील झाले आहे. कर्ज काढून बाग पिकवून नफा शिल्लक राहत नव्हता, मागील चार-पाच वर्षांपासून द्राक्ष शेती समोर संकटाची मालिका सुरू आहे.
Mumbai Crime : मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरातील जुलीयस वाडीत मोठी घटना टळली आहे. तीन वर्षीय मुलाची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस मालवणी पोलिसांनी वेळेतच पकडून चिमुकल्याचा जीव वाचवला.
माहितीनुसार, आरोपी हा मुलाच्या आईवर एकतर्फी प्रेम करत होता. महिलेनं त्याचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतापलेल्या आरोपीनं सूडाच्या भावनेतून तिच्या मुलाचा गळा वायरच्या साहाय्यानं आवळून हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाची आई वेळ न दवडता थेट मालवणी पोलिस ठाण्यात पोहोचली आणि तक्रार दिली.तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला रंगेहात पकडलं. सध्या आरोपीविरुद्ध खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मालवणी पोलीस करत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार मराठवाड्याचा दौरा
अतिवृष्टी झालेल्या भागांना राज ठाकरे देणार भेट
उद्या आणि परवा राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा
लातूर धाराशिव बीड येथे राज ठाकरे जाणार
नाशिकमध्ये 24 तासात झालेल्या दोन खून प्रकरणी 11 जण पोलिसांनी घेतले ताब्यात
नाशिक च्या पाथर्डी आणि सातपूर आशा दोन ठिकाणी घडल्या होत्या खुनाच्या घटना
गुरुवारी दुपारी आणि बुधावरी रात्री घडली होती खुनाची घटना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यांसाह उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मंत्री वरिष्ठ पोलीस अधिकारी शनिवारी नाशिक मध्ये येणार आहे
त्या अधिच नाशिकच्या कायदा सुव्यवस्था ची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत
पकडण्यात आलेल्या आरोपीमध्ये 6 ते 7 अल्पवयीन आरोपी
- शहरात गेल्या काही दिवसांपासून खून गाड्यांची तोडफोड, चैन स्नॅचिंग,हाणामारी अशा गुन्हेगारीच्या घटना वाढले
- एकीकडे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर तर दुसरीकडे नाशिक मध्ये कायदा सुव्यवस्था उरली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय.
- भर रस्त्यात दिवसाढवळ्या हातात कोयता घेऊन टवाळखोरांचा हैदोस
- परवा रात्री नाशिकच्या सातपूर परिसरात गाडीला कट लागल्याचे किरकोळ कारणावरून एका तरुणाची करण्यात आली हत्या
- तर काल दिवसाढवळ्या पाथर्डी फाटा परिसरात पूर्व वैमान्यातून एका कॅफेत केली तरुणाची हत्या
- काही तासात झालेल्या या दोन घटनेत रशीद शेख आणि जगदीश वानखेडे या दोन तरुणांचा मृत्यू
Beed News: बीडच्या टोकवाडी येथे आत्माराम भांगे यांनी ओबीसी आरक्षण संपल्याच्या दिवंचनेतून घरातच गळफास घेत आत्महत्या केली आहे.गेल्या काही दिवसापासून ओबीसी आरक्षण संपल्याच्या विचाराने ग्रासले असल्याने ते गप्प असल्याचे कुटुंबाकडून सांगण्यात आले.भांगे हे ऑटोचालक होते त्यांना आदित्य व आदर्श असे दोन मुले असून त्यांचे शिक्षण झाले असून ते पोलीस भरतीची तयारी करत होते.मात्र आपली दोन्ही मुले पोलीस भरतीची तयारी करत असताना ओबीसी आरक्षण संपल्याने आता माझ्या मुलांना नोकरी लागत नाही या विचाराने ग्रासलेल्या आत्माराम भांगे यांनी मुलगा व पत्नी शेतात गेल्यावर राहत्या घरी साडी ने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ओबीसी आरक्षण संपल्याच्या धक्क्यातून आपल्या वडिलांनी आत्महत्या केल्याची माहिती परळी ग्रामीण पोलिसाना दिली आहे. त्याप्रमाणे त्यांच्या खिशात आपले ओबीसी आरक्षण संपल्यामुळे आत्महत्या केली असल्याची चिठ्ठी आढळून आल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी आता परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिकचा तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.
मुंबई : महिला व बालविकास विभागामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना यंदाच्या दिवाळी निमित्त भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रूपये देण्यास शासनाने मान्यता दिली असून यासाठी एकूण रू. ४०.६१ कोटी रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. तसा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनिल तटकरे यांनी दिली आहे.
या निर्णयाबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनिल तटकरे यांनी “अंगणवाडी सेविका व मदतनीस या महिला व बालकांच्या संगोपनासाठी, पोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्वाची सेवा बजावत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी व सणासुदीच्या काळात आनंदाचा क्षण निर्माण व्हावा म्हणून भाऊबीज भेट स्वरूपात शासनाने ही रक्कम मंजूर केली आहे. राज्यातील प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस ही आपल्या समाजातील खरी ‘शक्ती’ आहे. त्यांचा सण आनंदी व्हावा हीच आमची भूमिका आहे, असे सांगितले.
पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणी मोक्का कारवाई..
पुणे पोलिसांकडून थेट टोळी प्रमुखावर कारवाई
गुंड निलेश घायवळ वर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल
घायवळ टोळीतील सदस्यांनी केला होता कोथरूड मध्ये एकावर गोळीबार
घायवळ टोळीचा प्रमुख निलेश घायवळ यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे
घायवळ याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०९ अन्वये गुन्हा दाखल
घायवळ याच्यावर मोक्का सह बी एन एस १०९ आणि बी एन एस ६१ अन्वये गुन्हा दाखल
MIG 21 Retirement : भारतीय वायुदलातील (Indian Air Force) मिग-21 (MiG-21) विमानांच्या सुवर्ण युगाची आज अखेर होत आहे. गेली बासष्ट वर्ष (62 years) दैदिप्यमान कामगिरी करणारी ही विमानं आज ताफ्यातून निवृत्त होणार आहेत. आज चंदीगड (Chandigarh) येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh), वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह (AP Singh) आणि वायुदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मिग-21 (MiG-21) ला सन्मानानं निवृत्त केलं जाईल. स्क्वॉड्रन लीडर प्रिया शर्मा (Priya Sharma) आज मिग-21 (MiG-21) च्या अखेरच्या सॉर्टीचे सारथ्य करणार आहेत. "गेली बासष्ट वर्ष भारतीय वायुदलाचा मिग ट्वेंटीवन ही विमानं अक्षरशः कणा होती," असे या विमानांच्या योगदानाबद्दल म्हटले आहे. या निवृत्ती सोहळ्यामुळे भारतीय हवाई दलाच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या अध्यायाची सांगता होत आहे.
MIG 21 Retirement : भारतीय वायुदलातील (Indian Air Force) मिग-21 (MiG-21) विमानांच्या सुवर्ण युगाची आज अखेर होत आहे. गेली बासष्ट वर्ष (62 years) दैदिप्यमान कामगिरी करणारी ही विमानं आज ताफ्यातून निवृत्त होणार आहेत. आज चंदीगड (Chandigarh) येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh), वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह (AP Singh) आणि वायुदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मिग-21 (MiG-21) ला सन्मानानं निवृत्त केलं जाईल. स्क्वॉड्रन लीडर प्रिया शर्मा (Priya Sharma) आज मिग-21 (MiG-21) च्या अखेरच्या सॉर्टीचे सारथ्य करणार आहेत. "गेली बासष्ट वर्ष भारतीय वायुदलाचा मिग ट्वेंटीवन ही विमानं अक्षरशः कणा होती," असे या विमानांच्या योगदानाबद्दल म्हटले आहे. या निवृत्ती सोहळ्यामुळे भारतीय हवाई दलाच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या अध्यायाची सांगता होत आहे.
Dharashiv Rain : धाराशिव जिल्ह्यात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी हाहाकार निर्माण झाला होता. सकाळपासून ढगाळ वातावरण होते आणि त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. यामुळे धाराशिवकरांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला होता. विशेषतः विदर्भामध्ये पावसाचा अंदाज होता, तर मराठवाड्याच्या काही भागांमध्येही काही प्रमाणात पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. या अंदाजानुसार धाराशिवमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. आधीच पुरामुळे त्रस्त झालेल्या धाराशिवकरांना पुन्हा एकदा पावसाने दर्शन दिले आहे. दिवसभर पाऊस कसा राहतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
मुंबई विमानतळावरील इंडिगो एअरलाइन्स कर्मचाऱ्यांच्या समस्यांनंतर शिवसेनेनं दिला दणका...
ठाकरेंच्या एयरपोर्ट कामगार सेनेला शिंदेंचेया शिवसेनेचा दणका ...
ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन असोसिएशनचं टि २ आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर कार्यालय ऊभारण्याचं काम सुरू
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जपान दौर्यावरून येताच केली कार्यालयाची पाहणी
निवेदन दिल्यानंतर मंत्री महोदयांनी तत्काळ हस्तक्षेप करून मुंबई आणि दिल्लीतील अधिकाऱ्यांशी केली चर्चा आणि समस्याही केल्या दूर.
आमदार मुरजी पटेल, राष्ट्रीय सचिव कुणाल सरमळकर आणि युनियन पदाधिकाऱ्यांनी मंत्री सामंत यांच्यांसोबत केला कामाचा पाहणी दौरा .
हवामान विभागांनं पुढील दोन दिवसपर्यंत विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यात काल गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. तर, नागपुर, चंद्रपूर, यवतमाळमध्ये काल दुपारनंतर पावसानं जोरदार हजेरी लावली. याव्यतिरिक्त विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्ये काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची हजेरी बघायला मिळाली. काल गडचिरोलीत आणि लगतच्या छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड तालुक्यातील 50 गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय. तर भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, लाखांदूर, लाखनी या तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं भातपिकाचं मोठं नुकसान झालं असून अनेक ठिकाणी भातपीक हे कापणीला आलेलं असताना भुईसपाट झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय.
रत्नागिरी- लांजा तालुक्यातील कुर्णे येथील राखीव जंगलातून साग झाडाची चोरी
राजापूर तालुक्यातील कुंभवडे येथील सात जणांना वनविभागाने घेतले ताब्यात
सागाचे 31 ओणके वनविभागाकडून करण्यात आले जप्त
28 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक क्रेन देखिल वनविभाच्या ताब्यात
Solapur Floods: शेतकऱ्यांना तातडीने 50 हजारांची तातडीने मदत करा, अन्यथा विधानसभेत आवाज उठवणार असा इशारा
कोणतेही निकष न लावता पूरग्रस्त शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी सरकारने तातडीनं 50 हजार रुपयांची मदत करावी, माढा तालुक्याचे आमदार अभिजीत पाटील यांची मागणी
माढा तालुक्यातील 16 गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे
नवरात्र उत्सवातील कार्यक्रम रद्द करा, पूरग्रस्तांना मदत करा, अभिजीत पाटलांचे आवाहन
शेतीबरोबर दुकान व्यवसायिकांना देखील मदत मिळावी, शाळांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांनाही मदत करावी
कोल्हापूर-सांगलीच्या धर्तीवर मदत करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याची अभिजीत पाटील यांची माहिती
पूरग्रस्तांना मदत मिळाली नाहीतर सभागृहात आवाज उठवणार
पूरग्रस्त नागरिकांना जेवणासाठी लागणाऱ्या वस्तूंची मागेल तेव्हा मदत करणार
Marathwada Flood: अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने त्यामुळेच एमआयडीसी भागातही नुकसान झाल्याने आढावा यांनी घेतला
छत्रपती संभाजीनगर, जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील औद्योगिक क्षेत्रातील संलग्न भागात पाणी जाऊन झालेल्या नुकसानीचा यामध्ये मुख्यत्वे आढावा घेण्यात आला
अतिवृष्टिमुळे औद्योगिक वसाहतीच्या संलग्न भागात गावात, शेतात पाणी शिरल्याचे प्रकार घडले. ते भविष्यात घडू नये यासाठी तात्काळ उपाययोजना राबवा. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले
त्यात कामगार चौक ते आंबेडकर चौक या रस्त्यासाठी 16 कोटी रुपये देण्याचा निर्णय
तसेच रांजणगाव शेणपुंजी येथे 600 मिटर रस्ता खराब असून त्याबाबत ग्रामस्थांची मागणी आहे. ही समस्या तात्काळ निकाली काढावी असे निर्देश दिले.
वाळूज एमआयडीसीतील साजापूर रस्त्यालाही मंजूरी देण्यात आली.
औद्योगिक वसाहतीतून संलग्न भागात जाणारे पावसाचे पाणी तात्काळ वळविण्याचे निर्देशही देण्यात आले.
औद्योगिक वसाहतींचा काही ठिकाणी खंडीत झालेला वीज पुरवठा पुर्ववत सुरु झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
वाळूज एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन बदलणे आवश्यक असुन त्यासाठी सिडको सोबत हे काम करण्यात यावे तसेच टाटा संस्थेच्या सहयोगातून ७००० विद्यार्थी शिकू शकतील असे कौशल्य विकास केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे सुरु करण्याबाबतही उद्योग विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगितलं.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking LIVE Updates: पनवेलमध्ये सख्ख्या भावाचा दगडाने ठेचून खून; आरोपी एका तासात पोलिसांच्या ताब्यात