Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर... वैष्णवी हगवणेचे सासऱ्याला अटकवैष्णवी हगवणेच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेला तिचा सासरा राजेंद्र हगवणे अखेर गजाआड गेलाय...सात दिवस पोलिसांना हुलकावणी देणारा राजेंद्र हगवणे...More
Budhana: मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने आज सकाळी गोपनीय माहितीच्या आधारे मलकापूर रेल्वे स्थानकात कारवाई करत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन दलालांना बेड्या ठोकल्या. या दोघांकडून दहा लाख रुपयांपेक्षा अधिकची 182 रेल्वे तिकीट जप्त करण्यात आली. संजय चांडक व प्रसाद काळे अशी या दोघांची नावे असून प्रसाद हा अल्पवयीन आहे. मुंबईत कुप्रसिद्ध असलेल्या व रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ठाकूर गँगशी संबंधित हे दोघे असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.दोघांवर रेल्वे कायद्या अंतर्गत कलम १४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा बंदूकधारी निलेश चव्हाण पोलिसांच्या चुकांमुळं फरार झाला. असा आरोप वैष्णवीचे काका मोहन कस्पटे यांनी केलाय. राजेंद्र हगवणे पवना धरणावरील बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर होता, याची माहिती पोलिसांना दिली होती. परंतु हगवणे तिथं नव्हते असं पोलिसांना कळवलं, अटकेनंतर मात्र हगवणे त्याचं फार्म हाऊसवर होते. हे समोर आलं. त्यामुळं हगवणे पसार झाले, अगदी तसंच काहीसं निलेश बाबतीत घडलं. पोलीस त्याच त्या चुका वारंवार करतंय. प्रत्येक वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलिसांना आदेश देण्याची वेळ का येते? अशी खंत ही वैष्णवीच्या कुटुंबायांनी केली.
Monsoon in Kerla: राज्यात गेल्या आठवड्यापासून पूर्वमान्सूनने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता मान्सूनने केरळमध्ये आठ दिवस आधीच सरप्राईज एन्ट्री घेतली आहे. मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने (IMD) केली आहे. यापूर्वी 2009 मध्ये मान्सून केरळात 23 मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर 15 वर्षांनी मान्सून इतक्या लवकर केरळात दाखल झाला आहे. आता पुढील चार ते पाच दिवसांत कोकणात दाखल होण्याची शक्यता असून कोकणात सध्या जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरु असून. मुंबईत 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो. (Monsoon)
गेल्या काही दिवसांपासून तळकोकणात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला वळीवाच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. या मान्सूनपूर्व पावसामुळे आणि वादळी वाऱ्यांमुळे सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.
Beed News: बीडच्या लिंबागणेश परिसरात पवनचक्कीचे साहित्य चोरणाऱ्या चोरट्यावर सुरक्षारक्षकाने गोळीबार केला होता.यामध्ये ठार झालेल्या चोरट्याची ओळख पटली आहे.राजू उर्फ चीच्या विष्णू काळे असे या चोरट्याचे नाव असून तो तुळजापूर येथील रहिवासी होता. त्याच्यावर पवनचक्कीच्या साहित्यासह इतर मिळून असे 18 गुन्हे दाखल असल्याची माहिती नेकनूर पोलिसांनी दिली.आता या चोरीमध्ये आणखी कोण कोण सहभागी होते हे देखील समोर येऊ शकणार असून यामुळे ही टोळीच जेरबंद केली जाणार आहे.
दरम्यान गोळीबार करणारा सुरक्षा रक्षक रूपसिंग टाक याला नेकनुर पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रुपसिंग टाक हा सेवानिवृत्त सैनिक असून तो खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता.गोळीबार प्रकरणात नेकनूर पोलिसांनी पवनचक्की परिसरातून पंचनाम्यानंतर रक्ताचे डाग असलेले दगड आणि रक्त मिश्रित माती चे नमुने पुढे तपासणी साठी पाठवले आहेत.
गडचिरोली : जिल्ह्यात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर परिसरातील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात धान पिकाची लागवड केली होती. मात्र अवकाळी पावसामुळे आता शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याचे दिसून येत आहे. शेतीचे पंचनामे करू तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Beed News: बीड पोलीस दलातील तब्बल 600 कर्मचाऱ्यांची बदली झाल्यानंतर आता महसूल विभागात बदली प्रक्रिया सुरू झालीय.. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आष्टी येथील तहसीलदार वैशाली पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवत आष्टी तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या 11 तलाठ्यांच्या बदल्या कराव्यात अशी मागणी केली.. अशाच पद्धतीने इतर तालुक्यात देखील काही तलाठी अनेक वर्षांपासून सेवा बजावत असून या सर्वांची आता बदली होण्याची शक्यता आहे..
बनावट बियाण्यांपासून शेतकऱ्याची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाकडून 14 भरारी पथकाची नियुक्ती, जिल्ह्यात 14 नियंत्रण कक्षही उभारले.
कृषी विक्रेत्यासंदर्भात काही तक्रारी असल्यास शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचे कृषी विभागाचं आवाहन.
खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट बियाण्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची फसवणूक होत असते, परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट ओढावण्याची शक्यता असल्याने ही शेतकऱ्याची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने पाऊले उचलली आहेत. बुलढाणा जिल्ह्यात 14 भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून 14 ठिकाणी नियंत्रण कक्ष देखील कार्यान्वित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी अधिकृत बियाणे विक्रेत्याकडूनच बियाण्यांची खरेदी करावी, एका विशिष्ट बियाण्याच्या संदर्भात आग्रह धरू नये, तर खताची लिंकिंग करण्यासाठी विक्रेत्यांकडून जबरदस्ती होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी अस आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
Porsche Car Accident पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाने राज्यासह देशभरात खळबळ उडाली होती. अशातच आता या प्रकरणाबाबत आणखीन एक मोठा खुलासा समोर आला आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणातील (Porsche Car Accident) रक्ताची फेरफार करणाऱ्या डॉ. अजय तावरे याचा अजून एक कारनामा समोर आला आहे. यात रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट प्रकरणात डॉ. तावरे (Dr Ajay Taware) याचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी डॉ.तावरे यांना आता सह आरोपी करण्यात येणार असल्याची माहिती ही समोर आली आहे. दरम्यान, 2022 मध्ये हे किडनी रैकेट समोर आलं होतं. या प्रकरणी आतापर्यंत तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आता तावरे याला देखील सहआरोपी करण्यात येणार आहे.
Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संतधर पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालीय...सध्या पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 17 फूट इतकी आहे.. तर कोल्हापूर जिल्ह्यातील 3 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत... पंचगंगा नदीवर असलेला राजाराम बंधारा देखील पाण्याखाली गेला असून इथली वाहतूक कोल्हापूर महानगरपालिकेने बंद ठेवली आहे... जून महिन्याच्या अखेरीस हा बंधारा पाण्याखाली जात असतो, मात्र यावेळी मे महिन्यामध्येच हा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे... त्यामुळे इथली वाहतूक बंद केली आहे... बंधारा ओव्हर फ्लो झाल्याने चढणीच्या माशांची धडपड देखील पाहायला मिळत आहे...
Washim : वाशिमच्या केकतउमरा गावातील एक तरुण हातात तलवार घेऊन दहशतमाजवत असल्याची माहिती वाशिम ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाली... त्या माहितीनुसार गावातील तरुण विकास पट्टेबहादूर या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली असून आर्म एक्ट नुसार वाशिम ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
Washim : वाशिमच्या केकतउमरा गावातील एक तरुण हातात तलवार घेऊन दहशतमाजवत असल्याची माहिती वाशिम ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाली... त्या माहितीनुसार गावातील तरुण विकास पट्टेबहादूर या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली असून आर्म एक्ट नुसार वाशिम ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
- गंगापूर रोड परिसरात 37 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या...
- सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा घरच्यांचा आरोप ...
- गंगापूर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांनविरोधात गुन्हा दाखल ...
पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताज असताना नाशिकमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर येथे विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडल्याच समोर आल आहे. सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप मृत महिलेचे नातेवाईकांनी केले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सासरच्यान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Vaishnavi Hagawane Pune Crime: लग्नात वैष्णवीला दिलेले ५१ तोळे सोने हगवणे कुटुंबाकडून फेडरेल बँकेत गहाण ठेवण्यात आल्याच समोर आलंय.वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. 51 तोळे सोने, फॉर्च्युनरसारखी आलिशान गाडी अशा अनेक गोष्टी हुंडा म्हणून दिल्या होत्या. एवढच नाही तर हगवणे कुटुंबियांना सात किलो चांदीची भांडी देखील लग्नात दिली होती. मात्र दोन कोटी रुपयांची मागणी पूर्ण केल्याने हगवणे कुटुंबाने वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला सोन नेमकं कोणत्या कारणासाठी ठेवल आहे? त्यासाठी वैष्णवीची परवानगीने ठेवल होत का? तसेच ते सोन तारण ठेवण्यासाठी तिचा छळ करुन तिच्याकडुन सोन घेतल. सोने तारण ठेवण्यामागे आरोपींचा काय उद्देश होता याबाबत पोलिस सध्या तपास करत आहे. लग्नाच्या वेळी हुंडा म्हणुन देण्यात आलेली फॉरच्युनर कार व अॅक्टिवा गाडी जप्त केली आहे.
Weather Update : एका दिवसाच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात आज पुन्हा एकदा मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. भंडारा जिल्ह्यात कुठं हलक्या तर कुठं मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी चिंतातूर झालाय. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली होती. यात अनेक भागातील भातपीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यानंतर पावसानं उसंत घेतल्यानं अनेकांनी काल भात पिकाची कापणी करून शेतात ठेवलं. मात्र, आज पहाटेपासून पुन्हा एकदा पावसाची सुरुवात झाल्यानं कापणी केलेल्या भात पिकाला याचा फटका बसण्याची भीती आता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
Ujjani Dam: पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर साठी जीवनदायीने ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये पावसाच्या पाण्यामुळे वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार राहिलेली आहे. आणि यामुळे गेल्या तीन दिवसात उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये 1 पूर्णांक 89 टीएमसी इतका पाणीसाठा वाढला आहे.सध्या उजनी धरणामध्ये एकूण 53 पूर्णांक 25 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. उजनी धरण हे आजच्या स्थितीला मायनस 19 पूर्णांक 43 टक्के इतका आहे. मायनस मध्ये असलेलं उजनी धरण प्लस मध्ये येण्यासाठी आणखी 10 पूर्णांक 41 टीएमसी इतकी पाण्याची आवश्यकता आहे.
Buldhana News : बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची नऊ महिन्याच्या कालावधीतच अमरावती येथे राज्य राखीव दलाच्या पथकात दोन दिवसांपूर्वी बदली झाली होती. मात्र या बदलीला आव्हान देत विश्व पानसरे यांनी CAT मध्ये याचिका केली होती. यावर तात्काळ सुनावणी घेत विश्व पानसरे यांच्या बुलढाणा येथून झालेल्या बदलीला कॅट ने स्थगिती दिली आहे . मात्र तत्पूर्वीच बुलढाणा येथे नवनियुक्त पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पदभार स्वीकारला आहे . त्यामुळे आता बुलढाणा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे की निलेश तांबे असा डेडलॉग सध्या तरी दिसत आहे.
Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मण वाडा या गावचे भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांना जम्मू काश्मीरच्या किश्तवाड येथे दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं. संदीप गायकर यांना वीरमरण आलं. त्यांच्यावर अहिल्यानगर जिल्हयातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे आज अंत्यसंस्कार होणार आहेत. सकाळी 8 वाजता संदीप गायकर यांचं पार्थिव मूळगावी पोहचेल. सकाळी 10 वाजता लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. जम्मू कश्मीरमधील किश्तवाड सेक्टरमध्ये दहा जणांची टीम कार्यरत असताना दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मराठा लाईट इन्फन्ट्रीचे जवान संदीप गायकर यांना वीरमरण आले.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण आलाय. लाडक्या बहिणीसाठी आता पुन्हा एकदा निधी वळवण्यात आलाय. लाडक्या बहिणीसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवण्यात आलेला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णयही जाहीर झाला आहे. आता पुन्हा आदिवासी विभागाचा 335 कोटींचा निधी वळविण्यात आला आहे. त्यामुळे या निर्णयाचा फटका आदिवासी विकास विभागाच्या योजनेवर होणार आहे. याआधीही लाडक्या बहिणी योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला होता.
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाणवर कस्पटे कुटुंबियांना धमकावल्याबद्दल आणि पिस्तुलाच्या सहाय्याने दहशत निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. निलेश चव्हाणवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कस्पटे कुटुंबाने केलीये. यावर पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र ते बाळ निलेश चव्हाणकडे होतं. कस्पटे कुटुंबीयांनी बाळाचा ताबा मागितल्यावर त्याने देण्यास नकार दिला होता. वैष्णवीच्या मृत्यूनंतर या बाळाची 6 दिवस हेळसांड झाली होती.
Solapur Rain Updates: दक्षिण सोलापुरात मान्सूनपूर्व पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. दक्षिण सोलापुरातील मनगोळीत खरबूज पिकाचं मोठं नुकसान पाहायला मिळत आहे. शेतकरी प्रभाकर पाटील यांच्या शेतातील पिकांचं पाणी झालं आहे.
Palghar Rain Updates: आज अचानक झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं पालघर जिल्ह्याला पुन्हा एकदा झोडपलं असून याचाच परिणाम मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरही झाला आहे. मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर जवळील उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्यानं काही दिवस वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सध्या वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे.
Satara Rain Updates: गेल्या चार दिवसांपासून साताऱ्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. कृष्णा, वेण्णा नद्यांना पूर आला आहे. साताऱ्यातील संगम माहुली येथील छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधी पाण्याखाली गेली आहे.
Kolhapur Rain Updates: गेल्या चार दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदीवरील कसबा बावडा इथला राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्यामुळे कसबा बावडा ते वडणगे हा रस्ता आता वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आला आहे.
Washim Rain Updates: वाशिम जिल्ह्यात मालेगाव, रिसोड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर पाहायला मिळाला. घोटा फाटा येथे विद्युत खांब कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. दोन्ही बाजूनं वाहनं अडकली असून शिरपूर-बेलखेडा रस्त्यावर पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
Sindhudurg Rain Updates: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढणार असल्याने, कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. सिंधुदुर्गात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पर्जन्यमानाप्रमाणेच पुढील दोन दिवसही धुवाँधार पाऊस बरसण्याचा इशारा वेधशाळेकडून देण्यात आला आहे. दरम्यान मच्छीमारांनी समुद्र किनारपट्टीवर मासेमारी करता जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. ताशी 45 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मान्सून पूर्व पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे नदी-नालेही प्रवाहित झाले आहेत. जिल्ह्यात सध्या मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...