Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, वाचा क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् फक्त एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking LIVE Updates: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबतही विविध अपडेट्स येत आहेत. पाकिस्तानातून आका देत होते दहशतवाद्यांना सूचना, पहलगाम हल्ल्याशी संबंधित एफआयआर 'माझा'च्या हाती लागली आहे. हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी आणखी चार...More
सोलापुरात पेट्रोल पंप परिसरात स्कॉर्पिओ गाडीला लागली भीषण आग
सोलापूर-मंगळवेढा महामार्गवरील देगाव जवळील पेट्रोल पंपावरील घटना
स्कॉर्पिओला नेमकी कशामुळे आग लागली हे अद्याप अस्पष्ट
मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही
गाडीत डिझेल भरल्यानंतर चालकाला शंका येताच त्याने गाडी बाजूला लावली
त्यावेळी अचानक गाडीत लागलेल्या आगीने रौद्र रूप घेतलं
दरम्यान अग्निशमन दल आणि पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात अतोनात प्रयत्न केल्याने मोठी घटना टळली
सातबाऱ्यावरील कालबाह्य, निरुपयोगी नोंदी हटवण्याचे महसूल विभागाचे आदेश
जिवंत ७/१२ मोहिमे’चा दुसरा टप्पा सुरू
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश
कालबाह्य नोंदींमुळे शेतकऱ्यांना कर्जप्रकरणे, जमिनीच्या खरेदीविक्री व्यवहारात तसेच शासकीय योजनांच्या लाभात अडचणी येत होत्या
ही मोहीम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे
मोहिमेअंतर्गत तलाठ्यांना संबंधित फेरफार नोंदी घेऊन जुने बोजे व शेरे कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत
कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पुढच्या महिन्यापासून आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतलाय. बच्चू कडूंनी 'डिसीएम टू सीएम' अशा आंदोलनाची घोषणा केलीय. या आंदोलनांतर्गत बच्चू कडू 2 जूनला बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर 'अर्थसंकल्प वाचन आंदोलन' करीत त्यांना कर्जमाफीची आठवण करून देणारायेत. अजित पवारांच्या घरासमोरील आंदोलनानंतर कडू पुढे टप्प्याटप्याने पंकजा मुंडे, बाळासाहेब पाटील आणि संजय राठोड यांच्या घरासमोर आंदोलन करणारायेत. यात सर्वात शेवटी कर्जमाफीच्या मुद्द्यावर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलनाची घोषणा त्यांनी केलीय. ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होतेय. दरम्यान, कर्जमाफीच्या मुद्द्यावर 7 जुलैपासून तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या अमरावती जिल्ह्यातील गुरूकूंज मोझरी किंवा आपलं जन्मगाव असलेल्या कुरळपूर्णा येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय.
भारतातलं पाकिस्तान सिमेवरचं शेवटचं गाव दर्दपूरा जिथे 'एबीपी माझा'ची टम पोहचली. दर्दपूरा या गावचा एक इतिहास आहे. ९० च्या दशकात या गावातील पुरूषांना दहशतवाद्यांकडून लक्ष केलं जायचं, या गावातील ३५० कुटुंबियांचा संसार या दहशतवाद्यांनी उद्धवस्त केला आहे. गावातील नागरिक अशिक्षित आहे.आपल्या वाट्याला आलेली गरीबी मुलांच्या वाट्याला येऊ नये. म्हणून गावात सरहद संस्थेकडून सुरू करण्यात आलेल्या शाळेत अशा परिस्थितीतही पाठवत आहे. हे पाहून पाकिस्तानच्या दहशतवादापुढे भारताच्या लोकतंत्रचा विजय झाल्याचं पहायला मिळतं
Vo या शाळेचे काम पाहणार्या मुश्ताक अहमद यांच्याशी बातचीत केली असता. सिमेजवळील हे शेवटचं गाव आहे. पेहलगाम सारख्या घटनेचा परिणाम हा संपूर्ण काश्मिरवर झाला आहे. त्यामुळे मुलांमध्ये भितीचं वातावरण पहायला मिळतं, अनेक कुटुंबिय सुरवातीला मुलांना शाळेत पाठवायला घाबरत होते. मात्र त्यांच्या पालकांना विश्वासात घेतलयानंतर त्यांनी त्यांची मुले पाठवली आहे. मात्र पेहलगाम सारख्या घटना घडलयानंतर काश्मिरी मुलांकडे एका वेगळ्या नजरेने पाहिलं जातं, वारंवार आम्ही भारतीय आहोत हे सांगावं लागतं अशी खंत त्यांनी व्यक्त केली
121 मुश्ताक अहमद, संस्था चालक
Vo ९० च्या दहशकात दर्दपूर या सिमेवरील शेवटच्या गावातील परिस्थिती भयानक होती. दहशतवादी या ठिकाणी आसर्यासाठी आले किंवा त्यांची माहिती कोणी सैन्याला दिली. तर त्या कुटुंबातील व्यक्तीला मारलं जायच, त्यामुळे संपूर्ण गाव हे दहशतीखाली होतं, घरातील करत्या पुरूषाला वाचवण्यासाठी त्यांना सुरक्षितस्थळी लपवायचं झालं. त्यावेळी दहशतवाद्यांनी या गावातील ३५० व्यक्तींची हत्या केली होती. प्रचंड हाल या दरदपूराने सोसल्याचे मुश्ताक अहमद सांगतात
121 मुश्ताक अहमद, संस्था चालक
Vo सिमेवर आजही पाकिस्तानींकडून बेछुट गोळीबार केला जातो. त्यामुळे मुलांमध्ये भितीचं वातावरण आहे. मात्र तरीही मुलं आज शाळेत येत आहेत. पेहलगामसारखी घटना जिचा आम्ही निषेध करतो. आजही या मुलांचे पालक सिमेवरील सैन्यांच्या मदतीला जात असतात. सिमेवरील कुंपनाचे काम असो किंवा अन्य काही.... कुटुंबियांन भारतीय जवानांसोबत काम करताना पाहून या मुलांनाही आपण भविष्यात भारतीय सैन्यात जावेसे वाटत असल्याचे इथले शिक्षक सांगतात
हल्ला होऊन दहा दिवस लोटले, नुसता गडगडाटच, गरजेंगे वो बरसेंगे क्या : माजी आ. अनिल गोटे
जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर आठवडा उलटूनही केंद्र सरकारकडून ठोस कारवाई झाली नाही. आमचा नुसता गडगडाटच, गरजेंगे या बरसँगे क्या ? असा सवाल माजी आ. अनिल गोटे यांनी केला आहे. 'तुम्ही वेळ आणि ठिकाण ठरवा ही तीन दलप्रमुखांना दिलेली मोकळीक म्हणजे देशवासीयांची फसवणूक आहे, असा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. इंदिरा गांधी यांनी कोणतीही वल्गना न करता निर्णायक पावले उचलली होती. पण आजचं नेतृत्व केवळ जाहिरातबाजी आणि श्रेयासाठी प्रसिद्ध आहे. देशभरात वृत्तपत्रे आणि वाहिन्या अजूनही फक्त सरकारचे समर्थन करताहेत. १४० कोटी जनतेची ही सरळसरळ फसवणूक आहे असा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे. राज्य सरकारने हौतात्म्य पत्करलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना दिलेली आर्थिक मदत ही अपुरी आहे. अशा घटनांनंतर राजकीय टीका न करता निर्णायक कृती झाली पाहिजे,असे गोटे यांनी म्हटले आहे...
पहलगाम मधे जो हल्ला झाला त्याबाबत आज केंद्र सरकारची बातमी आहे की पाकिस्तान आर्मी हल्ल्यात सहभागी आहे. मी म्हणालो होतो की आर्मी हल्ला करायला तयार आहे मात्र पॉलिटिकल लीडर शीफ परवानगी देत नाही. मात्र जनतेची मागणी आहे की आपण आता ठोस कारवाई करायला हवी. मात्र पॉलिटिकल लीडर शीफ कच खात आहे. लोकांची भावना आता केंद्राने लक्षात घेऊन कारवाई करायला हवी.
आता मिलिटरी आदेश द्यावेत आणि कारवाई करावी. आम्ही अपेक्षा नरेंद्र मोदी यांच्याकडून ठोस कारवाई करतील अशी अपेक्षा आम्ही करत आहोत.आपलं इंटेलीजस फेल्युअर आहे याबाबत दुमत नाही. अजून याना हल्लेखोर सापडले नाहीत. ते कुठून आले हे देखील आपल्याला समजलेले नाही. मला असं वाटत हल्लेखोर लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करून गेले आहेत.काश्मीर मधे पर्यटक जायला हवेत. पावसाचा अजूनही एक महिना शिल्लक आहे.
महाराष्ट्र शासनाने जर पर्यटक काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला तर मी स्वत पर्यटकांना घेऊन जाण्याची जबाबदारी घेतो.
भंडारा : घरात झोपलेल्या 15 वर्षीय मुलीवर सावत्र बापानंचं अत्याचार केला. नात्याला काळीमा फासणारी ही घटना भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका गावात घडली. ही घटना एप्रिल महिन्यात घडली असून आज समोर आलीय. पीडितेच्या तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी आरोपी बापाविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयानं आरोपी बापाला न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
सोलापुरातील शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालसमोर आमरण उपोषण सुरू
उपोषण स्थळी देखील शिक्षकांकडून पेपर तपासण्याचे काम सुरूच
सोलापुरातील एका प्रसिद्ध शिक्षणसंस्थेतील 40 हुन अधिक शिक्षक आंदोलनात सहभागी
शालार्थ आयडी तसेच शिक्षक मान्यता न मिळाल्याने सोलापुरातील शिक्षक आमरण उपोषणाला बसले
‘एकीकडे आम्ही आमरण उपोषण करत असलो तरी दुसरीकडे आम्ही पेपर तपासण्याचे काम सुरूच ठेवले आहे.’
आम्ही बिनपगारी काम करत असलो तरी ज्ञानदानाचे काम सोडणार नसल्याचा शिक्षकांचा निर्धार
मागील तीन वर्षांपासून आम्ही शिक्षक म्हणून बिनपगारी काम करतोय.
मात्र शिक्षण विभागातील अधिकारी आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.
आमच्यातील अनेक शिक्षकांना अद्याप मान्यता मिळालेली नाही तर अनेकांना मान्यता मिळवून शालार्थ आयडी मिळाले नाहीत.
त्यामुळे आम्ही मागील तीन ते पाच वर्षांपासून बिनपगारी काम करत आहोत.
आमचे पाच सहकारी आमरण उपोषणाला बसले आहेत जर आम्हाला आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही सर्व शिक्षक आमरण उपोषणाला बसणार
शिक्षण विभागातील अधिकारी एसीत बसून काम करतात मात्र आम्ही आमरण उपोषणाच्या मंडपात बसून पेपर तपासतोय
शिक्षकांचे ज्या पद्धतीने हाल सुरू आहेत ते पाहून भविष्यात कोणीही शिक्षक व्हायला तयार होणार नाही
आमची सरकारला विनंती आहे की शिक्षकांची होणारी अवहेलना थांबवावी आणि आम्हाला न्याय द्यावा.
आळंदी नगरीत उद्यापासून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 750 वा जन्म महोत्सव सुरू होत असतानाच इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी सातत्याने प्रदूषणाच्या विळख्यात असून परिसरातील कंपन्यांमधून सातत्याने केमिकल युक्त पाणी नदीमध्ये सोडलं जात आहे. नदी प्रदूषणाबाबत राज्य सरकारकडून केवळ आश्वासन मिळत असून कोणताही ठोस उपाय केला जात नसल्याने स्थानिक आणि भाविक नाराज आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना ठाकरे गट आक्रमक
पश्चिम विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन...
अमरावती ट्रॅकटर मोर्चात खासदार अरविंद सावंत उपस्थित
ग्रामीण भागातून शेतकरी ट्रॅक्टरसह अमरावती शहरात दाखल..
अमरावतीत ट्रॅक्टर मोर्चाने वाहतूक जाम होण्याची शक्यता
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, पिक विमा, शेतमालाला भाव, शेतीला तार कंपाउंड, वीज बिलासह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यासाठी निघणार ट्रॅक्टर मोर्चे..
अमरावती ,अकोला ,बुलढाणा, आणि वाशिम जिल्ह्यात ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाच आयोजन..
अमरावतीत खासदार अरविंद सावंत,वाशीममध्ये खासदार संजय देशमुख, अकोल्यामध्ये आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात निघणार ट्रॅक्टर मोर्चे.
नाशिक : अग्निशमन सप्ताहमध्येच नाशकात सर्वाधिक आग लागल्याच्या घटना घडल्याचे समोर आल्या आहेत. एकीकडे अग्निशमन विभागाकडून अग्निशमन सप्ताहमध्ये मॉक ड्रिलच्या माध्यमातून जनजागृती सुरू असतानाच आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अग्निशमन विभागाला जवळपास अग्निशमन सप्ताह काळात 17 आग लागल्याच्या घटनांचा कॉल आला आहे तर, यामध्ये दोन गंभीर घटना घडल्याचे समोर आले आहेत. तीन वाहनांना देखील आग लागल्याच्या तक्रारी अग्निशमन विभागाला प्राप्त झाल्या आहेत. अनेक घटना या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनात येत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे फायर ऑडिट बरोबरच इलेक्ट्रिक ऑडिट होणे देखील गरजेचं असल्याचं या माध्यमातून दिसून आलंय.
परभणी : पेडगावातील पाण्याचा प्रश्न पेटलाय गावात सुरू असलेले जलजीवन मिशन योजनेचे काम ऐन उन्हाळ्यात बंद पडले आहे. ग्राम पंचायतही पाणी पुरवठ्याकडे लक्ष देत नसल्याने पेडगावतील तरुण गणेश देशमुख याने थेट शोले स्टाईल आंदोलन केले आहे. गावातील जलकुंभावर चढून देशमुख याने स्वतःला संपवणार असल्याचे जाहीर केले. यामुळे प्रशासनाची चांगलीच दाणादाण उडाली. एक तास आंदोलन केल्यानंतर गावातील ग्रामसेवकाने गावाला पाणी पुरवठा सुरळीत चालू करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे देशमुख याने आंदोलन मागे घेतले. महत्वाचे म्हणजे बंद पडलेले जलजीवन मिशन योजनेचे काम ही तत्काळ सुरू करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
रायगड : महाड लाडवली मोहल्ला परिसरात अवैध वाळू साठा करून ठेवणाऱ्या एका व्यक्तीवर महाड महसूल विभागाने कारवाई केली आहे. मैनुद्दीन ढोकले अस या व्यक्तीचे नाव असून त्याने कोणतीही शासनाची परवानगी न घेता हा वाळू साठा गावात छुप्या पद्धतीने केला होता. यानंतर ही बाब गावातील काही व्यक्तींनी महसूल विभागाला दिली. यानंतर महसूल विभागाकडून या अवैध वाळू साठ्याचा पंचनामा करून शासनाच्या ताब्यात हा वाळू साठा घेतला आहे. एकूण 18 ब्रास वाळूसाठा शासनाकडून जप्त करण्यात आला आहे.
- नाशिक शहरात तापमान वाढीमुळे तापाच्या रुग्णांमध्ये वाढ...
- नाशिक शहरात १६०९ ताप सदृश्य आजाराचे रुग्ण तर, डेंगूंच्या रुग्णसंख्या शंभरी पार ...
- नाशिक महापालिका आणि जिल्हा रुग्णालयातील एकूण डेंग्यूची सध्याची रुग्णसंख्या १०५वर...
- नाशिक महापालिका आरोग्य विभाग अलर्ट मोडवर...
- रुग्णालयान बाहेर ताप सदृश्य आजारांच्या रुग्णांची गर्दी शहरात तापाची साथ असण्याची शक्यता...
- बदलत्या हवामानामुळे डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णातही वाढ होण्याची शक्यता, वैद्यकीय विभागाने खबरदारी घेण्याचे केले आवाहन...
मुंबई शहर व उपनगरातील आदिवासींसाठी आज महत्त्वाची बैठक
आदिवासी मंत्री अशोक उईके व मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
मुंबईतील आदिवासींचे सर्वेक्षण करण्याबाबत आदेश देण्याची शक्यता
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२.३० वाजता बैठक
मूळ आदिवासींना मोफत धान्य व शिक्षण देण्याबाबत आदेश देण्याची शक्यता
- नाशिक शहरात हत्येचे सत्र सुरूच, मध्यरात्री नाशिक रोड भागात एकाचा खून...
- नाशिकच्या जेलरोड परिसरात घडली घटना तर हल्ल्यात एक जण गंभीर जखमी...
- रितेश डोईफोडे मयत असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव...
- नाशिक रोड भागात घडली घटना, शहरात घटनेने पुन्हा खळबळ...
- पूर्ववैमनस्यातून घटना घडल्याची प्राथमिक माहिती, नाशिकरोड पोलिसांचा तपास सुरू...
- हल्लेखोर स्वतःहून नाशिक रोड पोलिसांना शरण आल्याची माहिती...
रामराजे नाईक निंबाळकरांना मोठा धक्का
साताराच्या वडूज पोलिसांचे रामराजेंना समन्स
उद्या सकाळी ११ वाजता पोलिस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश
तुषार खरातांकडून मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात चौकशीसाठी समन्स
या प्रकरणात शरद पवार गटाचे नेते सामील असल्याचा आरोप
रामराजेंना समन्स पाठवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
घटनास्थळावरून 3D मॅपिंग
गुन्ह्याच्या ठिकाणाचा मोबाइल डंप डेटा घेण्यात आला.
२८०० हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली
१५० हून अधिक लोक अजूनही कोठडीत आहेत
घटनास्थळावरून जप्त केलेले ४० हून अधिक काडतुसे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत.
अनेक प्रत्यक्षदर्शींचे जबाब घेण्यात आले
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहे
दहशतवाद्यांनी वापरलेल्या सॅटेलाईट फोनची चौकशी
पहलगाममधील रेकी करण्यात आलेल्या ठिकाणांची ओळख
छायाचित्रकार, हॉटेल मालक, दुकानदार, झिप लाईन कामगार, पर्यटक मार्गदर्शक यांचे जबाब नोंदवण्यात आले.
हुर्रियत आणि जमात-ए-इस्लामी या बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित लोकांच्या घरांवर छापे
परळी तालुक्यातील कावळ्याची वाडी येथे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पुतण्याने काकूच्या डोक्यात कोरडीचे वार करून तिचा खून केल्याची घटना घडली.. . यात परिमळाबाई भागुराम कावळे वय ७० यांचा जागेवर मृत्यू झाला... या प्रकरणात रात्री उशिरा ११ वाजता सिरसाळा पोलिसात चंद्रकांत कावळे व धुराजी कावळे या बापलेकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिरसाळा पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
विलेपार्लेतील जैन मंदीरावर ५ मे पर्यंत कारवाई न करण्याचे कोर्टाचे आदेश
विलेपार्ले येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या उर्वरित बांधकामावर ५ मेपर्यंत कारवाई करू नये असे आदेश हायकोर्टाने पालिका प्रशासनाला दिले
पालिकेने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब
न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्यासमोर झालेल्या सुनावणी वेळी मंदिरावरील कारवाईनंतर वादाला तोंड फुटल्यामुळे त्यामागील काही कारणांबाबत पालिकेने माहिती दिली
न्यायालयाने ही माहिती ऐकून घेत वेळेअभावी या प्रकरणाची सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली तसेच मंदिराच्या उर्वरित बांधकामावर कारवाई न करण्याचे आदेश कायम ठेवले आहेत
०१-०२ मे २०२५ च्या रात्री, जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा आणि अखनूर भागातील नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवरून लहान शस्त्रांनी विनाकारण गोळीबार केला.
भारतीय लष्कराच्या जवानांनी संयमित आणि प्रमाणबद्ध पद्धतीने प्रत्युत्तर दिले.
मलनि:सारण वाहिन्या, कुंड तसेच भूमिगत गटारे साफ करताना अपंगत्व आलेल्यांना तसेच मृत्युमुखी पडलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अखेर योग्य भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे
विशेष म्हणजे 1993 नंतर घडलेल्या घटनांमधील पीडितांना शोधून त्यांना योग्य मदत केली जाणार आहे
नियमित, कंत्राटी तसेच दैनंदिन तत्त्वावरील कर्मचार वारस नुकसान भरपाईस पात्र असतील
सफाई कर्मचाऱ्यांमध्ये अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण ६७ टक्के आहे
१९९३ पासून राज्यात ५६ सफाई कामगारांचा मृत्यू झाला असून केवळ १९ कर्मचाऱ्यांचा वारसांना १० लाखांची भरपाई मिळाली आहे
आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके आज ठाणे कारागृहात जाणार
आद्यक्रांतिकारक राघोजी रामजी भांगरे यांच्या आठवणींना उजाळा देणार
ठाणे कारागृहात २ मे १८४८ मध्ये भांगरे यांना झाली होती फाशी
आदिवासी समाजातील आद्य क्रांतिकारक म्हणून राघोजी भांगरेंची ओळख
राघोजी भांगरेंना अभिवादन करण्यासाठी मंत्री वुईके ठाणे कारागृहात जाणार
आदिवासी समाजातील शौर्याला उजाळा देण्यासाठी विशेष कार्यक्रम
ठाणे कारागृहात आज सकाळी ९ वाजता कार्यक्रमाचे आयोजन
भंडाऱ्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. तर, रात्रीच्या सुमारास काही भागात गारपीट झाली. विशेषतः लाखांदूर तालुक्यातील राजनी गावात गारपीट पडल्यानं शेतपिकांचं नुकसान झाल्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. मागील पाच दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात कुठं हलक्या तर, कुठं मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. रात्रीच्या सुमारास गारपीट झाल्यानं आंबा पिकाचं यात नुकसान झाल्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे. वादळी वाऱ्यानं काही घरांवरील टिन पत्रे उडाल्यान अनेकांना याचा चांगलाच फटका बसलाय.
* कामठी येथे आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात रामटेक तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य, दुदाराम सव्वालाखे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
* प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजप पक्षामध्ये प्रवेश घेतला..
* दुदाराम सव्वालाखे रामटेक तालुक्याचे काँग्रेस सक्रिय कार्यकर्ता, अनेक सेवा संस्था मध्ये पदाधिकारी आहेत..
* एक जुटीने काम करून पक्ष बळकट करण्याचे काम करा ..
* नवनिर्वाचित अध्यक्ष सोबत मिळून काम करा..गटबाजी करू नका ..असा सल्ला देखील यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला..
* या वेळी , माजी आमदार टेकचंद सावरकर,नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सुधाकर कोहळे आणि इतर भाजप पदाधिकारी उपस्थित होते..
- नागपुरात सुरु झाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष,
विदर्भातील 11 जिल्ह्यातील लोकांना होणार फायदा
- वैद्यकीय उपचाराच्या मदतीसाठी विदर्भातील लोकांना आता मुंबईत जावं लागणार नाही
- विदर्भातील आर्थिकदृष्टया गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने विशेष कक्ष स्थापन
- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन
- नागपूरातील मुख्यमंत्री कार्यालयात सुरु झाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष
- कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत शासकीय सुट्टया वगळून सुरु राहील.
छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील ५,००० फूट उंचीवरील डोंगराचा सुरक्षा दलांनी विशेष मोहीम राबवून गुरुवारी ताबा घेतला.
हा डोंगर नक्षलवाद्यांचा केंद्रबिंदू होता. अनेक नक्षलवादी या डोंगरावर वास्तव्यास होते. नऊ दिवसांच्या विशेष मोहिमेनंतर नक्षलवाद्यांना हाकलून लावण्यास सुरक्षा दलांना यश आले.
घनदाट जंगलात असलेला हा खडकाळ डोंगर हिडमा, देवा, दामोदर, आझाद आणि सुजाता यांसारख्या क्रूरकर्मा नक्षलवादी म्होरक्यांचे आश्रयस्थान होते.
मात्र आता हा डोंगर पूर्णपणे सुरक्षा दलांनी ताब्यात घेतला आहे, ज्यावर तिरंगा फडकवण्यात सुरक्षा दलांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या कारवाईत जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी), बस्तर फायटर्स, स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ), राज्य पोलिसांचे सर्व विभाग, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि त्यांच्या एलिट कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अॅक्शन (कोब्रा) यांसह विविध विभागांचे सुमारे २४,००० सुरक्षा कर्मचारी सहभागी होते.
माजी आमदार अरुण काका जगताप यांचे पुणे येथे निधन गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री त्यांचे निधन झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील अमरधाम येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होते. अरुण काका जगतापहे 2016 ते 2022 पर्यंत विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते.
पाकिस्तान दुष्ट-देश, राजनाथ सिंहांनी अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांना सांगितलं...जग आता दहशतवादाकडे कानाडोळा करू शकत नसल्याचंही केलं मत व्यक्त...अमेरिकेचा भारताला पाठिंबा, तर पाकिस्तानला ठणकावलं...
महाराष्ट्रात चित्रपट निर्मिती व्यवसायाला उद्योगक्षेत्राचा दर्जा, उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा...सिनेजगताची अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य...
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, वाचा क्लिकवर...