- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Breaking Live Updates: थोड्याच वेळात बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार, भुजबळ, मुंडेंची उपस्थिती
Maharashtra Breaking Live Updates 17 October 2025: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking Live Updates 17 October 2025: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर... Bihar Election : नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होणार का? अमित शाह म्हणाले, ते आमदार ठरवतीलBihar Assembly Election 2025...More
जळगाव : जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी आणि धरणगाव तालुक्याचा समावेश सरसकट अतिवृष्टी नुकसानभरपाई यादीत करण्यात यावा, या मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर हंबरडा आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत राज्य सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
जळगाव : शहरातील शाहूनगर परिसरात राहणाऱ्या इमरान भिस्ती या तरुणाने सोशल मीडियावर भाईगिरी दाखवणारा एक रील बनवून व्हायरल केला होता. संबंधित व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ कारवाई करत इम्रानला घरून ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणल्यानंतर इम्रानला खाक्या दाखवताच त्याने लगेच माफी मागणारा व्हिडिओ बनविला. इम्रान विरुद्ध प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली आहे. पोलिसांनी अशा प्रकारच्या व्हिडिओंद्वारे समाजात भीती पसरवणाऱ्या तरुणांना इशारा देत सांगितले की, भाईगिरी दर्शवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.
सोन्याच्या दरात चोवीस तासात 3600 रुपयांची वाढ होऊन 127700 वरून सोन्याचे 131300 वर जाऊन पोहोचले जी एस टी सह हेच दर 135000 झाले आहे तर चांदीचे दर 178000 तर जी एस टी सह हेच दर 181000 झाले आहेत
दोन दिवसात चांदीच्या दरात सहा हजार रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे
आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना खडा सवाल
ईशान्य मुंबईत उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध का केला?
२५ वर्षे तुमचा महापौर होता, म्हणून प्रश्न तुम्हाला
मुंबईत मालवणी पॅटर्नचे समर्थक कोण?
आझाद मैदानात स्मारकाची नासधूस केली, पोलिसांवर हात टाकले त्यांची मते हवी म्हणून त्या अकादमीच्या लोकांना तुम्ही भेट का दिली?
त्या अकादमीच्या समर्थक काँग्रेसच्या मांडीला मांडी लावायला राज ठाकरे तुम्ही का गेला? हा प्रश्न विचारावा लागेल
70 लाखांच्या डिजिटल अरेस्ट प्रकरणी आर. ए. के. मार्ग पोलिसांनी केली सहा जणांना अटक
याच आरोपींनीं 58 कोटींच्या डिजिटल अरेस्ट प्रकरणात देखील सहभाग
व्यवसायात नुकसान झालेल्या व्यावसायिकाला हेरून त्यांची बँक खाती वापरायला घ्यायचे अकाऊंट अपग्रडकरून त्या खात्यांचा वापर करून फसवणूक करायचे
युवराज उर्फ मार्को लक्ष्मण सिंग सिकरवार नावाच्या मुख्य आरोपीला अटक, मार्को परदेशातील फ्रॉडस्टरच्या संपर्कात
टोळी विरोधात महाराष्ट्रासह तामिळनाडू आणि कर्नाटकासह देशभरात तब्बल 31 फसवणुकीचे गुन्हे दाखल
NIA तसेच ATS कंट्रोल चे वरिष्ठ अधिकारी असल्याचा बनाव करून पहलगाम हल्ल्यात सहभागाची भीती दाखवून करायचे फसवणूक
प्रत्येक आरोपीला एकूण रकमेच्या 3% कमिशन मिळायचं
आरोपींच्या खात्यातील 10 लाख रुपये गोठवण्यात यश
डिजिटल अरेस्ट नावाचा शब्दच कायद्यात नसून अश्या भूलथापांना बळी न पडण्याचं मुंबई पोलिसांचं आवाहन
70 लाखांच्या डिजिटल अरेस्ट प्रकरणी आर. ए. के. मार्ग पोलिसांनी केली सहा जणांना अटक
याच आरोपींनीं 58 कोटींच्या डिजिटल अरेस्ट प्रकरणात देखील सहभाग
व्यवसायात नुकसान झालेल्या व्यावसायिकाला हेरून त्यांची बँक खाती वापरायला घ्यायचे अकाऊंट अपग्रडकरून त्या खात्यांचा वापर करून फसवणूक करायचे
युवराज उर्फ मार्को लक्ष्मण सिंग सिकरवार नावाच्या मुख्य आरोपीला अटक, मार्को परदेशातील फ्रॉडस्टरच्या संपर्कात
टोळी विरोधात महाराष्ट्रासह तामिळनाडू आणि कर्नाटकासह देशभरात तब्बल 31 फसवणुकीचे गुन्हे दाखल
NIA तसेच ATS कंट्रोल चे वरिष्ठ अधिकारी असल्याचा बनाव करून पहलगाम हल्ल्यात सहभागाची भीती दाखवून करायचे फसवणूक
प्रत्येक आरोपीला एकूण रकमेच्या 3% कमिशन मिळायचं
आरोपींच्या खात्यातील 10 लाख रुपये गोठवण्यात यश
डिजिटल अरेस्ट नावाचा शब्दच कायद्यात नसून अश्या भूलथापांना बळी न पडण्याचं मुंबई पोलिसांचं आवाहन
खेड तालुक्यातील लोटे येथील अध्यात्मिक वारकरी गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे, अध्यात्मिक शिक्षक प्रितेश कदम आणि एका महिलेविरोधात आणखी एका अल्पवयीन मुलीने लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर पीडित मुलगी व तिच्या आईने संबंधित विकृतांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
“आमच्या गरिबीचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेतला... आता न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असा संताप त्या मुलीने व्यक्त केला. “ज्यांनी अध्यात्माच्या नावाखाली पाप केलं, त्यांना कायद्याने चांगला धडा शिकवा,” अशी मागणी पीडितेची आईने ‘माझं कोकण’शी बोलताना केली.
या प्रकरणाने पुन्हा एकदा लोटे गुरुकुलातील संशयास्पद कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. याआधीही अशाच स्वरूपाच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता ग्रामस्थ आणि सामाजिक संघटना दोघेही आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत.
बीड: मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांचा मंत्री छगन भुजबळ यांना विरोध कायम; भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊनच बीडमध्ये यावं - मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे
आज बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभा होत आहे आणि याच सभेला मार्गदर्शन करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. मात्र मराठा समाजाचा छगन भुजबळ यांना विरोध कायम आहे.
मराठा समाजाकडून आयोजित केलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
ही कारवाई एक तर्फी असून छगन भुजबळ यांच्या दबावात येऊन पोलिसांनी नोटीस बजावली. आमचा सभेला विरोध नाही तर भुजबळ यांना विरोध
मंत्री पदाचा राजीनामा देऊन बीड मध्ये यावं..
ओबीसीच्या मेळाव्याला आमचा विरोध नाही. मात्र भुजबळ येत असल्याने येथे वाद वाढत आहेत.
त्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली मात्र ते त्याचा भंग करत आहेत. त्यांनी राजीनामा देऊन यावं अशी ठाम भूमिका मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी घेतली आहे.
रबाळे एमआयडीसी मध्ये भीषण आग
गेली 8 तास झाले आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू
प्लॉट नंबर R/N 952 जेल फार्मासिटिकल कंपनी मध्ये आग
मेनाचे साहित्य बनविणारी कंपनी . कंपनीत केमिकल साठा जास्त असल्याने आग पु्र्ण विझण्यास अडचण
आगीत कंपणी जळून खाक …
सुदैवाने कोणती जीवीत हानी नाही
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
ऐरोली , वाशी येथील अग्निशमन विभागाच्या
10 ते 15 गाड्या दाखल
भाजप आमदार शिवाजीराव कर्डीले राजकीय प्रवास
1984-95 बुऱ्हानगर ता. नगर सरपंच.
1990 बानेश्वर शैक्षणिक संस्था स्थापना.
1995 नगर -नेवासा अपक्ष आमदार.
1999 नगर - नेवासा अपक्ष आमदार.
2003-04 राज्यमंत्री, मत्स्य व बंदरे विकास
2004 राष्ट्रवादी , नगर- नेवासा आमदार
2007 अहिल्यानगर जिल्हा बँक संचालक.
2008-09 अहिल्यानगर जिल्हा बँक चेअरमन.
2009 नगर दक्षिण खासदार राष्ट्रवादी उमेदवारी पराभव.
2009 भाजप राहुरी- नगर- पाथर्डी आमदार.
2014 भाजप राहुरी नगर पाथर्डी आमदार
2019 भाजप राहुरी- नगर- पाथर्डी प्राजक्त तनपुरे यांच्याकडून पराभव.
2023 चेअरमन अहिल्यानगर जिल्हा बँक.
2024 भाजप राहुरी- नगर- पाथर्डी
नाशिक मध्ये लोंढे टोळीची गुंडगिरी कायम
- लोंढे टोळीने पुन्हा एकदा केला एकावर प्राणघातक हल्ला
- हल्लेखोरांनी डोक्यात कोयता मारत,जिवंत जाळण्याचाही केला प्रयत्न...
- चंद्रकांत विश्वकर्मा या युवकावर करण्यात आला प्राणघातक हल्ला...
- लोंढे टोळीचा मास्टरमाइंड प्रकाश लोंढे,दीपक लोंढे अटकेत असताना त्यांच्या टोळीची गुंडगिरी कायम
- सातपूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू
रबाळे एमआयडीसी मध्ये भीषण आग
प्लॉट नंबर R/N 952 जेल फार्मासिटिकल कंपनी मध्ये आग
मेनाचे साहित्य बनविणारी कंपनी
आगीत मोठे नुकसान …
सुदैवाने कोणती जीवीत हानी नाही
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
ऐरोली , वाशी संथाल अग्निशमन गाड्या दाखल
अकोला : ऐन दिवाळीत अकोलेकरांना अकोला पोलिसांनी एक खास 'सरप्राईज गिफ्ट' दिलंय... गिफ्ट होतं त्यांच्या चोरी गेलेल्या वस्तूंचं आणि सामानाचं.. अकोला पोलिसांनी तपास करून हस्तगत केलेल्या 1 कोटी 30 लाख रुपयांचा ऐवज त्याचे मूळ मालक असलेल्या नागरिकांना सुपूर्द केलाय. अकोल्याच्या पोलीस लॉनमध्ये झालेल्या कार्यक्रमाला अमरावती विभागाचे पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे उपस्थित होतेय. जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाण्यांनी कारवाई करून हस्तगत केलेल्या ऐवजाचा यात समावेश आहेय. परत करण्यात आलेल्या वस्तू आणि आयोगामध्ये 197 मोबाईल आणि 520 ग्रॅम सोनं याचा समावेश होता. यासह चोरीला गेलेल्या दुचाकींचाही परत केलेल्या ऐवजामध्ये समावेश होताय. आपल्या चोरी गेलेल्या वस्तू परत मिळण्याची आस नसलेल्या नागरिकांना अकोला पोलिसांच्या या सरप्राईज गिफ्टमुळे झालेला आनंद शब्दांच्या पलीकडचा होताय.
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेले संगणक ऑपरेटरांचं वर्षभरापासून मानधन रखडलं होतं. ते मिळावं यासाठी दोघांनी जिल्हा परिषद भंडारासमोर अन्नत्याग आंदोलन केलं. तर, उर्वरित संगणक ऑपरेटरांनी मुंबई - कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करत महामार्ग रोखून धरला होता. भंडारा जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेश असतानाही या संगणक ऑपरेटर आणि एकत्र येत कन्हाई आदेशाचे उल्लंघन करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा ठपका या संगणक ऑपरेटरांवर भंडारा पोलिसांनी ठेवला आहे. याप्रकरणी भंडाऱ्यात 35 आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डीले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले...त्यांचे वय ६७ वर्ष होते... ते राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार होते...नगर शहाराजवळ असणाऱ्या बुऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार, माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे...काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ,भाजपा अशा पक्षातून त्यांनी काम पाहिले... शिवाजी कर्डिले हे २००९ मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते... त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक लढवली हो,ती त्यात त्यांचा पराभव झाला होता...२०१४ ला पुन्हा आमदारकी लढवत त्यांनी विजय प्राप्त केला...२०१९ निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते...दूध व्यवसाय हा त्यांचा मूळ व्यवसाय होता..२०१४ च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती...नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते...
Dharashiv News: पूरग्रस्तांना मदतीसाठी अनेक संवेदनशील हात पुढे येत आहेत. पुण्यातील भारती अरविंद मांढरे या आजीने स्वतःची वैयक्तिक बचत आणि पतीचे निवृत्तीवेतन यातून धाराशिव मध्ये येत पूरग्रस्तांना पाच लाखांची रोख आर्थिक मदत केली. तसेच उबदार कपडे भेट दिले. ज्या घरामध्ये पाणी शिरलं त्या कुटुंबांना भेटत थेट मदत त्यांनी दिली. स्वतःची तब्येत बरी नसताना मुलीला सोबत घेत पुणे ते धाराशिव असा प्रवास करत त्या पूरग्रस्तांच्या मदतीला पोहोचल्या. पतीच्या पेन्शन मधून मदतीचा हात देत 69 वर्षीय भारती आजीनी माणुसकीला निवृत्ती नसते हेच दाखवून दिले.
Jalna Crime Santosh Khandekar: जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकरला 10 लाख रुपयांची लाच घेताना जालना एसीबी कडून अटक करण्यात आलय, जालना महानगरपालिके अंतर्गत केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी कंत्राटदाराकडून ही लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने या आयुक्ताला रंगेहाथ पकडले, जालना शहरातील डीपी रोड, सीमेंट काँक्रिटकरण आणि मनपाच्या तिसऱ्या मजल्याच्या कामाची वर्क ऑर्डर तसेच बिलांच्या मंजुरीसाठी आरोपी खांडेकर ने तक्रारदाकडे 20 लाखांच्या लाचेची मागणी केली होती, ही लाच देण्याची इच्छा नसल्याने एसीबीकडे केलेल्या तक्रारीवरून आरोपी खांडेकर याच्या शासकीय निवासस्थानी सापळा रचला असता ही 10 लाखांची रोकड स्विकारताना एसीबी पथकाने रंगेहाथ पकडलं.
Mumbai News: अंधेरी (पश्चिम)तील लोखंडवाला परिसरातील HOPS Kitchen & Bar इथे अल्पवयीन मुलींना दारू पाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारू प्यायल्यानंतर दोघींची तब्येत बिघडल्यानं त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परोसल्या गेलेल्या दारूची गुणवत्ता संशयास्पद असून नकली दारू दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी चौकशी सुरू केली असून बारचे परवाने आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. स्थानिक नागरिकांनी एक्साईज विभागाकडून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबईतील पब संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Mumbai News: मुंबईच्या दहिसर परिसरामध्ये राशन दुकानदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एका युट्युब पत्रकारासह मनसेच्या तीन कार्यकर्ता असा चौघांविरोधात दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली असून, युट्युब चॅनेल चा संपादकासह इतर काही आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
तक्रारदार राशन दुकानदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, युट्युब पत्रकार आणि मनसेशी संबंधित कार्यकर्त्यांनी त्याच्याकडून गैरप्रकार उघड करण्याची धमकी देत पैसे मागितले होते. तक्रारदाराने गुगल प्ले द्वारे तीस हजार रुपये देखील दिले. उर्वरित रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर त्याला बदनाम करण्याची भीती दाखवण्यात आली. त्याचा व्हिडिओ युट्युब चॅनेल हेडलाईन वर व्हायरल केली जाणार असल्याचा धमकी दिली होती,या प्रकरणी इंडियन पीनल कोडच्या कलम 384 (खंडणी), 385 आणि 34 अंतर्गत गुन्हा नोंदवून हर्षद बीजम (चाळीस वर्ष), अभिजीत बीजम (38 वर्ष), रामदास गोरे (32 वर्ष) आणि संकेत दरेकर (33 वर्षे) अशी एकूण चौघांना अटक केली असून युट्युब चॅनेल चा संपादक आणि त्याचे काही अन्य साथीदार अद्यापही फरार आहेत.
Solapur News: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मेगा भरती
सोलापुरातील विविध पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
माजी उपमहापौर पद्माकर काळे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
तर माजी सभागृह नेता सुरेश पाटील, बिज्जू प्रधाने यांनी भाजपत घरवापसी केलीय
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली
त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सोलापुरातील या सर्व स्थानिक नेत्यांनी भाजपत प्रवेश केलाय
या वेळी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि महिला अध्यक्षा रंजीताताई चाकोते हे देखील उपस्थित होते.
या प्रवेश सोहळ्यात माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, माजी नगरसेवक सुभाष डांगे, माजी नगरसेवक मंदाकिनी तोडकरी, मारुती तोडकरी, माजी नगरसेवक कल्पना क्षीरसागर, नागनाथ क्षीरसागर, सुनील भोसले, बिपीन पाटील, मदन क्षीरसागर, रवी काळे, मेघराज कल्याणकर, बाळासाहेब तांबे आणि सुरेश तोडकरी या स्थानिक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला
दरम्यान काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत
दिलीप माने यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून लवकरच भाजपत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking Live Updates: थोड्याच वेळात बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार, भुजबळ, मुंडेंची उपस्थिती