Maharashtra Breaking LIVE Updates: नागपुरातल्या युनियन बँकेची माघार, मॅनेजरनं केली दिलगिरी व्यक्त, मराठीतला एफआयआर स्वीकारला
Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking LIVE Updates: विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपण्यास दोन दिवस उरलेत. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची निवड केली जाणार का? याकडे लक्ष सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर राज्यात देखील विविध ठिकाणी पाऊस...More
Nagpur News: एबीपी माझाच्या पाठपुराव्यामुळे युनिअन बँकेला चांगलाच धडा मिळाला आहे. योगेश बोपचे या रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांचा नुकसान भरपाईचा अर्ज अखेर युनिअन बँकेनं स्वीकारला आहे, आणि पुढील तो पुढील प्रक्रियेसाठी विमा कंपनीला पाठवला आहे. एफआयआर मराठीत आहे, ती हिंदीत किंवा इंग्रजीत घेऊन या, अशी उडवाउडवीची उत्तरं बोपचे कुटुंबीयांना बँकेकडून देण्यात येत होती. एबीपी माझानं ही बातमी दाखवली, आणि प्रकरण लावून धरलं. त्यानंतर मनसे देखील यामध्ये उतरली. अखेर बँक मॅनेजरनं दिलगिरी व्यक्त केली, आणि त्यांचा अर्ज आम्ही तातडीनं स्वीकारू असं आश्वासन दिलं.
Raigad News: रायगडच्या पेण तालुक्यातील दूरशेत गावातील ग्रामस्थआंनी बाळगंगा नदीत उड्या मारल्या. गावातील अवजड वाहतूक आणि दगडखाणीमुळे होणारी हानी थांबवण्यासाठी गावकऱ्यांनी जिते परिसरात जलसमाधी आंदोलन केलं. ग्रामस्थांच्या मागणीला महसूल प्रशासन, स्थानिक आमदारांकडून केराची टोपली दाखवल्यानंतर अखेर या गावकऱ्यांनी बाळगंगा नदीत उड्या मारल्या. पोलिसांनी नदीत उड्या मारणाऱ्या ग्रामस्थांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यात झटापटही झाली. मात्र गावकऱ्यांनी पोलिसांना चकवा देत अखेर बाळगंगा नदीत उड्या मारल्या.
Nagpur News: सरकारी काम आणि सहा महिने थांब या म्हणीचा प्रत्यय सरकारी कार्यालयांमध्ये गेल्यावर पावलोपावली येतो. मात्र, जर त्याच सरकारचा एक विभाग सरकारी काम आणि रोज चार तास अधिकचे काम करत आहे. राज्यातील फॉरेन्सिक लॅब्समध्ये प्रलंबित प्रकरणांचा बोजा पुढील तीन महिन्यात कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. नागपूरसह राज्यातील प्रत्येक फॉरेन्सिक लॅबमध्ये रोज चार तासांपर्यंत अतिरिक्त काम केलं जात आहे. शिवाय दर शनिवारीही काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीही सुरू केली आहे.
Maharashtra News: 'आम्हाला कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या'
हसन मुश्रीफांच्या कागलमधील म्हाकवे गावातल्या लोकांची मागणी
कागलमधील म्हाकवे गावाची लोकसंख्या 7,500
जिल्हा परिषद पुनर्रचनेत अवहेलना झाल्याने ग्रामस्थ आक्रमक
भौगोलिकदृष्ट्या सोयीस्कर नसलेल्या सिद्धनेर्ली मतदारसंघात समावेश केल्याने नाराजी
आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार न केल्यास कर्नाटकात जाण्याचा दिला इशारा
मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार
बानगे हा नवीन जिल्हा परिषद मतदार संघ करताना म्हाकवे गावाला वगळले
Maharashtra News: खासदार संदिपान भुमरे यांच्या ड्रायव्हरने खरेदी केलेली जमीन ही दीडशे नाहीतर पाचशे कोटींची आहे. ही जमीन अडीच एकर नाही तर साडेआठ एकर असल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय. शिवाय या जमिनीचे पीआर कार्ड काढण्यासाठी एका मंत्र्याने दबाव आणला आणि त्याच्या मोबदल्यात त्याला एक एकर जमीन मिळणार असल्याचा दावाही जलील यांनी केलाय.. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी इम्तियाज जलील यांनी केलीेय.
Maharashtra News: राज्यातील 72 आजी माजी मंत्री आणि अधिकाऱ्यांना हनीट्रॅप केल्याच्या प्रकरणावरून विधानसभेत आज विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. सभात्याग करत विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याबद्दल सरकार अजून गंभीर नसल्याचं नाना पटोलेंनी म्हटलं, तर नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणी जयंत पाटलांनी सरकारकडे उत्तर मागतिलं.
Jitendra Awhad Gopichand Padalkar: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांना धमकी
पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा आव्हाडांचा आरोप
हा सत्तेचा माज आहे, मग्रूरी आहे-जितेंद्र आव्हाड
विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री काय कारवाई करतात पाहू-जितेंद्र आव्हाड
Beed Mahadev Munde Case: बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात न्याय मिळावा यासाठी पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागात प्राथमिक उपचार झाल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. 72 तासांसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाणार आहे. दरम्यान न्याय नाही मिळाला तर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न करणार असल्याचा इशारा ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिलाय. या महिन्यात न्याय मिळाला नाही तर माझं जीवन संपवणार असल्याचं ते म्हणाले. परळीतून मुंडेंच्या बंगल्यावरून फोन आल्यावर तपास थांबवला असं त्या म्हणाल्या. मुलांच्या डोक्यात मारेकऱ्यांना मारण्याचे विचार आहेत, ते काढण्यासाठी मला न्याय द्या असं त्या म्हणाल्या.
Dharashiv News: केंद्र सरकारची 'एक पेड मा के नाम', तसेच राज्य सरकारचं 'माझी वसुंधरा अभियान' आणि 'हरित धाराशिव' मोहिमेअंतर्गत लोकसहभागातून जिल्हाभरात 19 जुलै रोजी पंधरा लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. याच वृक्ष लागवडीचे प्रात्यक्षिक तुळजापूर मध्ये करण्यात आलं असून झाडे कशी लावायची, किती अंतरावर लावायची आणि कमी वेळात योग्य पद्धतीने कसं वृक्षारोपण करायचं याचा प्रशिक्षण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आला. तुळजापूरमध्ये 31 स्थळावर 88 हजार झाडे लावण्यात येणार असून प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी मोठे तयारी केली आहे.
Beed Rains: बीड जिल्ह्यात पंधरा दिवस दडी मारल्यानंतर बीड जिल्ह्यात पुन्हा पावसाने हजेरी लावण्याचे पाहायला मिळाले आहेत. रात्री माजलगाव परिसरात अक्षरशः पाऊस धो धो बरसत होता.यामुळे काही शेतात पाणी देखील जमल्याचे दिसून आले आहे.
याचबरोबर परळी आणि अंबाजोगाई परिसरात देखील रात्रभर पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने खरिपाच्या पिकाला जीवदान भेटण्यास मदत होणार आहे.परळी परिसरातील शेतकऱ्यांना गेले दीड महिन्यापासून पावसाची प्रतीक्षा होती.आता या झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
Satara Crime : सातारा : पाचगणी येथील एका शाळेत वर्गमित्रांकडूनच विद्यार्थ्याचे रॅगिंग; पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण पोलिसांनी बाल न्यायालयाकडे वर्ग केले. पाचगणी येथे एका प्रसिद्ध शाळेमध्ये नववीमध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांचे वर्गातीलच मुलांनी रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रॅगिंग दरम्यान दोन्ही पीडित मुलांना विवस्त्र केल्यामुळे दोघांनीही या शाळेतून पळ काढत पालकांना फोन करून सर्व हकिकत सांगितली आणि आम्ही दोघेही घरी येत असल्याचे सांगितले. यानंतर पालकांनी पाचगणी पोलीस ठाण्यात येऊन संबंधित मुलांबाबत तक्रार दिली या प्रकरणातील सर्व मुले अल्पवयीन असल्यामुळे हे प्रकरण पोलिसांनी बाल न्यायालयात वर्ग केले असून पाचगणी पोलीसही या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Pune News: आयटी अभियंत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे तक्रार केली. त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालंय. हिंजवडीत प्रवेश करताना अन घरी परतताना भूमकर चौकात ही अभूतपूर्व वाहतूक कोंडी होते. ती फोडण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड पालिकेने अतिक्रमण कारवाई सुरु केलीये. डांगे चौकाकडून येणारा प्रस्तावित मार्ग 45 मीटर आहे. मात्र काळाखडक झोपडपट्टीतील 96 कुटुंबाचं तिथं अतिक्रमण होतं, ज्यावर हातोडा चालवला जातोय. आता इथं सहा पदरी रोड होईल खरा पण भूमकर चौक ओलांडण्यासाठी पार करावा लागणारा सबवे हा फक्त दोन पदरी आहे आणि त्यामुळंच इथं मोठी वाहतूक कोंडी होते, तिथं पूल उभारण्याची गरज आहे. पण या पुलासाठी पुढचे दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागणारेय. त्यामुळं ही अतिक्रमण कारवाई आत्ता फायद्याची ठरणार का? हा खरा प्रश्न आहे.
Nashik News: उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत सप्तशृंगी गडावर आदिमायेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची नांदुरी पोलिस चौकीवरील काही पोलिस कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने आर्थिक लुट होत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असल्याने खळबळ उडाली आहे..गडावर जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांकडून कुठलीही अधिकृत पावती न देता जबरदस्तीने 100 ते 500 रुपयांपर्यंत रक्कम वसूल केली जाते पैसे देण्यास नकार दिल्यास कायद्याची भीती दाखवत पर्यटकांना धमकावले जात असल्याचाही आरोप व्हिडीओतून करण्यात आला आहे..या प्रकारामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे..
Pune Animal Seized: पुणे विमानतळावर प्राण्याची तस्करी करणाऱ्या दोन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. पोपट, ग्रीन टी पायथॉन आणि पट्टेरी ससे बँकॉककडून बेकायदेशीर आयात केलेले प्राणी जप्त करण्यात आले आहेत
झहीर अब्बास मंडल आणि भावेश सोळंके असे अटक केलेल्या प्रवाशांची नाव आहेत. एअर इंडिया एक्सप्रेसचा विमानाने हे दोघे प्राणी घेऊन आल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. दोघांविरुद्ध कस्टम कायदा आणि वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. यात १४ साप, चार पोपट, दोन पट्टेवाले ससे जत्प केले आहेत.
Pandharpur News: यंदा झालेल्या विक्रमी आषाढी यात्रेत देवाच्या खजिन्यातही विक्रमी उत्पन्न जमा झाले असून गेल्या वर्षीपेक्षा आधीच कोटीने उत्पन्नात वाढ झाली आहे. यंदाची आषाढी यात्रा आजवरच्या यात्रेपेक्षा मोठी होती. ए आय तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलीस प्रशासनाने केलेल्या हेडकाऊंटमध्ये भाविकांचा आकडा 28 लाखाच्या पार गेला होता. आज यात्रा कालावधीत विठ्ठलाच्या विविध मार्गातून आलेल्या उत्पन्नाचा एकूण आकडा समोर आला असून यावर्षी तब्बल दहा कोटी 85 लाख रुपये तेवढे उत्पन्न देवाच्या खजिन्यात जमा झाले आहे.
आषाढी यात्रा कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ 7505291 रुपये अर्पण, 28833569 रुपये देणगी, 9404340 रुपये लाडू प्रसाद विक्री, 4541458 रुपये भक्तनिवास, 14471348 रुपये हुंडीपेटी, 3245682 रूपये परिवार देवता तसेच 25961768 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून 1245075 रुपये व 3 इलेक्ट्रिक रिक्षा /बसचे 32 लक्ष इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.
आषाढी यात्रा कालावधीमध्ये जवळपास चार लाख 82 हजार 999 भाविकांना देवाच्या पायावर दर्शन मिळाल तर पाच लाख 41 हजार 266 भाविकांना देवाचे मुखदर्शन घेता आले आहे. आषाढी कालावधीत एकूण दहा लाख 24265 भाविक मंदिरात जाऊ शकले होते.
Buldhana News: बुलढाणा उप परिवहन अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक राजश्री जाधव यांनी कार्यालयीन कामकाजासाठी आलेल्या नागरिकाला अश्लील व अर्वाच्य शिवीगाळ करतानाचा एक व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. यावरून शिवसेनेचे काही पदाधिकारी विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांनाही या महिला परिवहन अधिकाऱ्याने अश्लील शिवीगाळ केली. याची रीतसर तक्रार राज्य परिवहन आयुक्तांकडे करण्यात आली आहे त्यामुळे आता राज्य परिवहन आयुक्त या सहाय्यक परिवहन अधिकाऱ्यावर काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं आहे. मात्र अशा प्रकारे महिला परिवहन अधिकाऱ्याने शिवीगाळ करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Pune News: वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुण्यात सात नवीन पोलीस ठाणी सुरू होत आहेत, अशी टीका दैनिक सामनातून करण्यात आलीय. राज्यकर्त्याच्या आदेशानुसार पोलीस गुन्हेगारांच्याच पाठीशी उभे राहत असतील तर नवीन कितीही पोलीस ठाणी सुरू झाली तर त्याचा काय उपयोग? असा सवालही दैनिक सामनातून करण्यात आलाय. तळजाई टेकडीवरील तरुणींवरील हल्ला लांच्छनास्पद असल्याचा हल्लाबोलही सामनातून करण्यात आलाय.
Konkan News: रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील नाणार आणि सागवे भागात उभारला जाणार ऑटोमोबाईल हब
प्रकल्पासाठी केंद्र सरकारचा ग्रीन सिग्नल ; खात्रीशीर आणि विश्वसनीय सूत्रांची माहिती
काही दिवसांपूर्वी जमिनीची केली गेली पाहणी - सूत्र
कोकणात मोठ्या प्रमाणात होणार रोजगार निर्मिती
प्रदूषणकारी प्रकल्पांपेक्षा प्रदूषण विरहित प्रकल्पाची होती कोकणवासीयांची मागणी
कोकणवासीयांच्या मागणीला केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद
Maharashtra News: राज्यात प्लास्टिकच्या फुलावर बंदी घालण्यात यावी यासाठी आमदार रोहित पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. आज त्यांच्या उपस्थितीत दादरच्या फूल मार्केटमध्ये प्लास्टिकच्या फुलांची होळी करण्यात आली. प्लास्टिकच्या फुलांच्या वाढत्या वापरामुळे शेतकऱ्यांचं तसेच फुल विक्रेत्यांच मोठ नुकसान होतं.
Maharashtra News: जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेसचे विधीमंडळ गटनेता विजय वडेट्टीवार यांना कांग्रेस हायकमांडकडून नोटीस पाठवण्यात आलीय. जनसुरक्षा विधेयकाला सभागृहात विरोध का केला नाही याच नोटीसीतून वडेट्टीवारांना उत्तर मागण्यात आलंय. विधानसभेत जनसुरक्षा विधेयक पास होताना काँग्रेसकडून विरोध झाला नाही. कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी फक्त विरोध केला होता. एवढच नाही तर पक्षाची भुमिका ही विधेयक पास झाल्यानंतर काँग्रेसच्या आमदारांना सांगण्यात आली, त्यामुळे वडेट्टीवारांना हायकमांडची नोटीस आलीय. आता विजय वडेट्टीवार या कारणे दाखवा नोटीसला काय उत्तर देणार हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.
Maharashtra Politics: एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी भाषणात उद्धव ठाकरेंना आपल्याकडे येण्याची ऑफर दिली. तर दुसरीकडे दानवेंच्या निरोप समारंभात बोलताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना शालजोडीतले हाणण्याची संधी साधली. उद्धव ठाकरेंनी संघाच्या मुशीत तयार झालेला दानवेंसारखा नेता दिल्याबद्दल फडणवीसांचे आभार मानले, तर आमचे नेते घेतल्याबद्दल आभार मानणार का असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना चिमटा काढला.
Maharashtra Politics: एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंनी भेट झाली..यावेळी फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवरुन आदित्य ठाकरेंनी मिश्किल वक्तव्य केलं.. तुम्ही ऑफर दिली, मी तुमच्या स्वागताला उभा राहिलो असा मिश्किल टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.
Maharashtra Politics: विद्यमान मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या ऑफरची.... होय.. देवेंद्र फडणवीसांनी चक्क उद्धव ठाकरेंना ऑफर दिलीय.. आणि ती देखील भर विधान परिषदेत.. अंबादास दानवेंनी विधान परिषदेचा या टर्मचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यांना निरोप देताना केलेल्या भाषणात फडणवीसांनी चक्क उद्धव ठाकरेंना ऑफर दिली.. 2029 पर्यंत सत्ताधारी होण्याचा काही स्कोप नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी इथे येण्याचा विचार करावा अशी ऑफरच फडणवीसांनी दिली. विशेष म्हणजे फडणवीसांकडून ही ऑफर दिली जात असताना एकनाथ शिंदेही सभागृहात उपस्थित होते.. देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य जरी मिश्किलपणे केलं असलं तरी त्याची राजकीय वर्तुळात गंभीर चर्चा सुरू आहे.. दरम्यान दानवेंच्या निरोप समारंभापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची ओझरती भेट झाली.
Vidhansabha Adhiveshan 2025: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात 293 प्रस्तावावर चर्चा करताना धसांनी पीकविम्यावरून कृषी संचालक विनय आवटे यांच्यावर गंभीर आरोप केले. 2016 ते 2020 दरम्यान पंतप्रधान पिकविमा योजनेत कृषी आयुक्तालयातील अधिकारी आणि विमा कंपन्यांनी संगनमताने कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप धस यांनी काल विधानसभेत केला. या घोटाळ्यातील अधिकाऱ्यांची नावं जाहीर करत एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. त्यामुळे पुन्हा एकदा पीकविमा योजनेतील घोटाळ्याची चर्चा जोर धरू लागली आहे. पावसाळी अधिवेशनात 293 प्रस्तावावर चर्चा करताना धसांनी पीकविम्यावरून कृषी संचालक विनय आवटेंवर हे आरोप केले. पिकविम्यावर विनय आवटेशिवाय अभ्यासू माणूस राज्य सरकारला अजूनही सापडलेला नाही असं ते म्हणाले.
Hingoli Rains: हिंगोली जिल्ह्यात मागील दहा ते पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारलीये. यापूर्वी जो पाऊस झाला तोही हलक्या स्वरूपाचा होता. हिंगोली जिल्ह्यांमध्ये जवळपास 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत तर सरासरीच्या 70% म्हणजेच 191 मिलिमीटर पाऊस झालेला आहे त्यामुळे पेरणी झालेल्या शेतातील पीक पावसाची वाट पाहत आहेत जोरदार पाऊस न झाल्यामुळे जमिनीतील पाणी पातळी सुद्धा वाढलेली नाही
Latur Rains: एकीकडे राज्यात मुसळधार पाऊस होतोय तर दुसरीकडे लातूर जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी मारलीय. जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या महिनाभरापासून पाऊसच झाला नसल्याने कोवळी पिके कोमेजून जातायत. पावसाच्या भरवश्यावर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या मात्र अद्याप पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झालीय. 28 दिवसांपासून पावसाचा खंड झाल्यानं अनेक पिकांनी माना टाकल्यात, त्यातच ढगाळ वातावरणमुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढतोय.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking LIVE Updates: नागपुरातल्या युनियन बँकेची माघार, मॅनेजरनं केली दिलगिरी व्यक्त, मराठीतला एफआयआर स्वीकारला